पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Date:

पुणे, दि. २८: पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्याच्या येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदुषण आदींच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे एकत्रित कृतीदल स्थापन करण्यात यावे, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

पुणे महानगरपालिकेद्वारे प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्यात येत असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिका सभागृहात आयोजित या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त एमजे प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी पी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, पुणे महानगरपालिकेला पाणीपुरवठ्यासाठी पाणीवाटपापेक्षा अतिरिक्त पाणी महानगरपालिका उचलत असल्याने दौंड, इंदापूर, पुरंदरचे सिंचनाचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता प्रतिमाणसी पाणीवापर इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त दिसून येत आहे. वितरणात जवळपास ४० टक्के पाणीगळती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा शोध घेऊन गळती रोखल्यास सिंचनाला योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य होईल.

महानगरपालिकेने आपल्या हद्दीत तयार होणाऱ्यापैकी ८० टक्के सांडपाणी व मैलापाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महानगरपालिकेने पावले उचलावीत. प्रक्रिया केलेले पाणी उद्याने तसेच अन्य बाबींसाठी वापरण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणी मानकांप्रमाणे प्रक्रिया केलेले असावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

एखादी त्रयस्थ यंत्रणा नेमूण नदीकाठावरील प्रदुषणाची ठिकाणे, अतिक्रमणे आदींच्या अनुषंगाने संपूर्ण नदीकाठाचे सर्वेक्षण करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, पाणीपुरवठ्यातील गळती रोखण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पुणे शहरातील पाटबंधारे विभागाच्या ताब्यातील नाले आदींवरील अतिक्रमणे काढणे तसेच त्या ठिकाणी नागरिकांसाठी सायकल ट्रॅक आदी सार्वजनिक सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेला परवानगी मिळणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

मनपा आयुक्त श्री. राम यांनी महानगरपालिकेच्यावतीने पाण्याच्या गळतीचा लवकरात लवकर अभ्यास करू असे सांगितले. समान पाणीपुरवठा योजनेचे काही टाक्यांसह २० टक्के काम बाकी आहे. ३ लाख पाणीमीटर बसवले असून ५ लाख मीटर बसवण्यात येणार आहेत. पुणे महानरपालिका हद्दीत नव्याने गावे समाविष्ट झाल्याने आकाराने महाराष्ट्रात मोठी झाली आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या प्रतिदिन ४७७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असून जायकाचा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ३९६ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता नव्याने निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरण केले.

बैठकीस महानगरपालिका व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांवरील कारवाई अन्यायकारकच

लोक जनशक्ती पक्षाची पुणे महापालिका आयुक्तांकडे मागणी पुणे : एकीकडे महापौरांनी गणेश...

दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या; पीजीमध्ये विद्यार्थी अडकल्याची भीती

सत्य निकेतन परिसरातील दुर्घटना; तिघांना वाचवले, अरुंद गल्लीमुळे बचावकार्यात...

महापारेषणच्या यंत्रणेतील बिघाडाचा महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम

बहुतांश भागाचा वीजपुरवठा पूर्ववत पुणे : महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी (दि. ६) दुपारी सुमारे १२.२५ वाजता तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून, या बिघाडाचा परिणाम महावितरणच्या वीजपुरवठ्यावर झाला. महावितरणने उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून बहुतांश प्रभावित भागाचा वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात यश मिळविले. चिंचवड उपकेंद्रातील २२ केव्ही सीटी व ब्रेकरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याने महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिन्यांवर परिणाम झाला. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे आदी भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. तसेच शिवाजीनगर, औंध व गणेशखिंड भागातील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला. महापारेषणकडून बिघाड झालेला भाग बंद ठेवून उर्वरित यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे, महावितरणकडून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून प्रभावित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात यश मिळाले. शिवाजीनगर परिसरातील वीजपुरवठाही काही काळ खंडित चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या रहाटणी व गणेशखिंड १३२ केव्ही वाहिनीवर परिणाम झाल्याने शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी भागांतील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता. दुपारी १२.२५ वाजता खंडित झालेला या भागातील वीजपुरवठा सुमारे १.५० वाजता पूर्ववत करण्यात आला. गणेशखिंड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून पुणे मेट्रोलाही वीजपुरवठा होतो. या वीजपुरवठ्यावरही काही काळ परिणाम झाला होता. बाधित ग्राहकसंख्या महापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील बिघाडामुळे महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील सुमारे २ लाख ६० हजार ग्राहक, तर शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहक, अशा एकूण सुमारे ३ लाख १० हजार ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. निगडी परिसरातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना विलंब महावितरणने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर देऊन बहुतांश भागातील वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत केला. मात्र निगडी, यमुनानगर, बिजलीनगर, रावेत, मामुर्डी, देहूरोड, चिंचवड, ताथवडे, वाकड आदी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास काहीसा विलंब होत आहे. या भागातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. आंबेठाण व तळेगावलाही फटका चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्रातील बिघाडाचा फटका आंबेठाण (चाकण) व तळेगाव १३२ उपकेंद्रांनाही बसला. महावितरणने तळेगाव शहराचा वीजपुरवठा खोपोलीतून पर्यायी लाईनद्वारे पूर्ववत करुन घरगुती ग्राहकांना दिलासा दिला. मात्र औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा तांत्रिक मर्यादा आल्या. तर आंबेठाण उपकेंद्राचा १२.२५ वाजता बंद झालेला वीजपुरवठा दुपारी ४.२० वाजता सुरळीत झाला. अंदाजे दीड हजार उद्योगांना याची झळ बसली. महावितरणकडून प्रभावी नियोजन महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेतील बिघाडामुळे महावितरणच्या वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला असला, तरी महावितरणने उपलब्ध पर्यायी व्यवस्थेचा प्रभावी वापर करून बहुतांश भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. उर्वरित प्रभावित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू डीजेमुळेच झाला:डीजेवर बंदी घालणे योग्यच, – मेघना बोर्डीकर

धाराशिव-सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या भूमिकेमुळे सध्या पुणे-मुंबईसह...