‘के दिलं अभी भरा नहीं’या नाटकाची सेकंड इनिंग..

Date:

उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगाने मांडणारं ‘के दिलं अभी भरा नही…’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज झालंय. विक्रम गोखले आणि रिमा यांनी एकेकाळी गाजवलेले हे नाटक आता नव्या रंगाढंगात नाटयरसिकांना पाहता येणार आहे. ”गोष्ट तशी गमती”ची मधील गमतीदार दांपत्य मंगेश कदम आणि लीना भागवत पुन्हा एकदा आपणास ‘के दिलं अभी भरा नही…’ मधून रसिकांचे  मनोरंजन करताना दिसणार आहे. यापूर्वी रिमा आणि विक्रम गोखले या जोडगोळीला एकत्र आणणाऱ्या या नाटकाला रसिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. मात्र विक्रम गोखले यांच्या आजारपणामुळे हे नाटक मधेच थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे हे नाटक पाहण्यासाठी नाट्यरसिकांनाच  ‘दिलं अभी भरा नही’ असे म्हणावे लागले. अखेर, मायबाप प्रेक्षकांच्या इच्छापुर्तीसाठी वेद प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा गोपाळ अलगेरी यांनी हे नाटक पुन्हा नव्याने रंगभूमीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

‘के दिलं अभी भरा नही’ या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी नाटकात थोडे फार बदल केले असून सध्या या नाटकाची जोरदार तालीम चालू आहे. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाच्या प्रयोगाच्यावेळी मंगेश कदम आणि लीना भागवत यांची भेट विक्रम गोखले यांच्याशी झाली. या भेटीदरम्यान त्यांनी शेखर ढवळीकर यांच्या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तोपर्यंत या नाटकात मंगेश कदम आणि लीना भागवत या  दोघांना नाटकातल्या व्यक्तिरेखेसाठी निश्चित करण्यात आले होते. विक्रम गोखले यांनी या नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर आपण त्यासाठी नाही म्हणणं योग्य ठरणार नाही असे मंगेश कदम यांना वाटले व त्यांनी या भूमिकेसाठी विक्रम गोखले यांना ऑफर दिली. मात्र विक्रम गोखले यांच्या बायकोच्या व्यक्तिरेखेत लीना या बसत नसल्याकारणाने या भूमिकेसाठी रिमा यांना विचारण्यात आले. यापूर्वीही अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये या दोघांनीही एकत्र काम केले आहे. या नाटकाचे ७४ प्रयोग झाले. परंतु विक्रम गोखले यांना त्यांच्या डॉक्टरांनी घशाला जास्त ताण देऊ नका असा सल्ला दिला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे विक्रम गोखले यांचा नाटकातील प्रवास थांबवावा लागला. प्रेक्षकांनाही या नाटकाचे भरभरून कौतुक केले. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर तसेच विक्रम गोखले यांच्या आशीर्वादाने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे.  “विक्रम काका आणि रिमा यांच्या  आशीर्वादाने मंगेश आणि मी या भूमिकांमधून दिसणार आहोत. विक्रमकाका आणि रीमा अशा दोन मोठ्या नावांसह ते नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं होतं आणि आता आम्ही करतोय, त्यामुळे अर्थातचं थोडं टेन्शन आलंय” असं लीना भागवत यांनी सांगितलं.

उतार वयातील जोडप्याची कथा या नाटकात मांडण्यात आली आहे. माणसे नोकरी लागली की आर्थिक व्यवस्थापनाचा विचार करायला सुरुवात करतात. त्याप्रमाणे ते करायला सुरुवातही करतात मात्र हे सगळ करत असताना भावनिक व्यवस्थापनाचा विचार करायचा विसरून जातात. रिटायरमेंटनंतर पेन्शन आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो मात्र भावनिक गोष्टींचा विचार कधी केलाच जात नाही. या नाटकात अरुण आणि वंदना या जोडप्याच्या माध्यमातून उतार वयातील स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेल्या भाविनक गरजांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या सोबतच या नाटकात चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांच्याही भूमिका आहेत. प्रेक्षकांसाठी मेजवानी असलेलं हे नाटक १६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....