ओल्या कचर्‍यापासुन तयार होणाऱ्या ‘बायोसीएनजी’ (सी.बी.जी) गॅसवर धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसचे उद्घाटन.

Date:

पुणे-ओल्या कचर्‍यांपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक ‘बायोसीएनजी'( सी. बी. जी ) वर धावणाऱ्या दोन
पीएमपीएमएलच्या सीएनजीच्या बसेसचे उद्घाटन पुणे महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे शुक्रवार दि. 1 जुलै रोजी
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पुणे
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे, वाहतुक व नियोजन अधिकारी
चंद्रकांत वरपे, प्रभारी चिफ मॅकेनिकल इंजिनीअर रमेश चव्हाण, कामगार व जनता संपर्क अधिकारी
सतिश गाटे, भांडार अधिकारी चंद्रशेखर कदम, ‘इंडियन ऑईल’ चे जनरल मॅनेजर (AESD) .के.
आर. रवींद्र, इंडियन ऑईल चे मंडल प्रमुख.नितीन वशिष्ठ, इंडियन ऑईल चे पुणे मंडल कार्यालय चे प्रमुख
मयांक अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नुरीएल पेझरकर, नोबल एक्सचेंज च्या संचालिका श्वेता
नेगी, नोबल एक्सचेंजचे जनरल मॅनेजर (ऑपरेशन) अश्विन झांबरे, नोबल एक्सचेंजचे संस्थापक यांची प्रमुख
उपस्थिती होती.
‘नोबल एक्सचेंज’ या कंपनीव्दारे पुणे शहरात गोळा झालेल्या ओल्या कचर्‍यांपासून तयार होणाऱ्या
‘बायोसीएनजी’ बनवून तो इंडियन ऑईल यांच्या रिटेल पंपावरून पीएमपीएमएलच्या सीएनजी बस मध्ये भरला जाणार
आहे.  केंद्रिय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालय यांच्या Sustainable Towards Affordable Transportation
या योजनेखाली ‘इंडियन ऑईल’ कंपनी भागेदारीत असणार आहे. दररोज १००० किलो ‘बायोसीएनजी’ तयार होणार
असुन हा तयार झालेला ‘बायोसीएनजी’ न्यु ॲटो कॉर्नर सोमाटणे फाटा येथे पीएमपीएमएलच्या सीएनजी बस मध्ये
भरला जाणार आहे. सदरची बसची चाचणी टाटा मोटर्स, ARAI ( ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन इंडिया) व आर. डी.
ई (व्हेईकल ॲन्ड रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट) यांनी केली आहे. सदर पर्यावरणपूरक बायोसीएनजी वर चालणाऱ्या
बसेस ह्या ‘निगडी ते लोणावळा’ या मार्गावर धावणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...