मुंबई भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब! पृथ्वीराज बाबांनी मीठ चोळले!

Date:

आज भाजपकडून मुंबई कार्यालयात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. तथापि, या विजयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे आता याच स्थितीवरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत फडणवीस यांच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हले आहे की, मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब

भाजप कार्यालयाच्या बाहेर जो फलक लावण्यात आला आहे त्यावर अमित शहा यांचाच फोटो नाही. त्यामुळेही चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणीस यांचे दिल्लीतून पंख कापण्यात आले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियामध्ये देवेंद्र फडणीस यांना का रोखण्यात आलं? याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिली नव्हती. त्या अनुषंगानेच त्यांची प्रत्येक वाटचाल सुरू होती. मात्र, आता यामध्ये भाजप सरकार स्थापन होऊनही मुख्यमंत्रि पदापासून दूर ठेवण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे तसेच मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी फडणवीस यांना विनंती करत मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देवेंद्र फडणीस यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी दोनदा फोन केल्याचे बोलण्यात आले. दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणीस मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होत असल्याचे सांगितले. त्यामुळे या सत्ता नाट्यानंतर भाजपमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...