विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांची खुर्ची आणली बाहेर…पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारांना अटक करा; दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा कार्यालयाचे कामकाज बंद पाडू– मनविसेचा इशारा

Date:

पुणे- TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्या खुर्चीला हात घातला. अध्यक्षांची खुर्ची थेट दालनाबाहेर खेचून सहाव्या मजल्यावरून खाली आणण्यात आली. त्यानंतर त्या खुर्चीवर ‘माठ’ ठेवत शासन-प्रशासनाच्या निष्क्रियतेचा, नाकर्तेपणाचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच परीक्षा परिषदेच्या कार्यालयावरील फलकालाही काळे फासण्यात आले.

राज्यात TET, तलाठी भरती, पोलीस भरती, MHCET, बारावीसह अनेक परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीमागे केवळ दलाल नव्हे, तर मंत्रालयापासून परीक्षा परिषदेपर्यंतची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे. केवळ प्याद्यांना अटक करून सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करावी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मनविसेने केली.

यावेळी पुणे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी इशारा दिला की, “आज आम्ही खुर्ची खाली आणली आहे; उद्या गरज पडल्यास परीक्षा परिषदेचे कार्यालय बंद पाडू, कामकाज ठप्प करू. मुख्य सूत्रधारांना अटक आणि दादा भुसे यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.”

या आंदोलनात अभिषेक थिटे, सारंग सराफ, परीक्षित शिरोळे, केतन डोंगरे, अशोक पवार, निलेश जोरी, शशांक अमराळे, हेमंत बोळगे, कुलदीप घोडके, मयुर शेवाळे, ऋषी जाधव, कृणाल पायगुडे, तेजस उमाप, सुमित बनके, विजय बोरकर, प्रणव हुले, अर्पित इंगवले, दर्शन रोवतू, अभय रास्ते, गणेश होळकर, स्वप्नील नाईक, प्रज्वल सरोदे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

FDA अधिकारी स्वतःला देव समजतात का? मुंबई हायकोर्टाचे कार्यपद्धतीवर कडक ताशेरे

‘स्वतःचे नियम वाचत नाहीत, कायद्याची माहिती नसताना थेट कारवाई’;...

एव्हरेस्ट आणि LGच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर FSSAIची मनाई

तपासणीत गुणवत्ता निकषांचा भंग; आवश्यक ५ टक्क्यांच्या तुलनेत अल्कोहोलमध्ये...