आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

Date:

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत – ॲड. जयदेव गायकवाड

पिंपरी, पुणे (दि. २९ जून २०२६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेच्या सभागृहावर मोठे प्रभुत्व निर्माण केले होते, ते प्रज्ञा आणि ज्ञानामुळे. या देशाच्या सर्व समाजाची पुनर्रचना करण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. ज्ञान आणि शिक्षणाचे महत्व २०० वर्षांपूर्वी महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितले. मुक्ता साळवे सारखी महिला ज्ञानामुळेच ब्रिटिशांशी लढली. आपण जातींच्या पलीकडे विचार केला पाहिजे. या देशाला राष्ट्र म्हणून निर्माण करताना समतेचे तत्व अंगीकारून पहिल्या जाती नष्ट केल्या पाहिजेत. यामुळेच विषमता नष्ट होईल. सध्या मात्र मागासवर्गीयांच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली जाती जातींमध्ये वाद निर्माण केले जात आहेत. बहुतांश समाजाचा याला विरोध असताना सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटच्या आधारे क्रिमिलेयरची अट लादण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यामुळे मागासवर्गीय समाजामध्ये वाद निर्माण होऊन फूट पडेल. याला आरक्षण उप वर्गीकरण परिषदेचा विरोध आहे असे स्पष्ट मत माजी आमदार व जेष्ठ नेते ॲड. जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथे आयोजित केलेल्या आरक्षण उप वर्गीकरण विरोधी परिषदेत ॲड. गायकवाड बोलत होते. यावेळी नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ॲड. विवेक भाई चव्हाण (कोब्रा), वसंत दादा साळवी, ॲड. अंबादास बनसोडे, प्रा. केशव वाघमारे, बाळासाहेब भागवत, देवेंद्र तायडे, कपिल सरोदे, ॲड. अरविंद तायडे, विवेक बनसोडे, सुरेश निकाळजे, बापू गायकवाड आदींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
मुख्य आयोजक म्हणून ईश्वर कांबळे, ॲड. मिलिंद कांबळे, राहुल सोनवणे, ईश्वर कांबळे, नितीन कांबळे, प्रकाश बुक्तर, विनोद सरोदे, ॲड. नीलध्वज माने, प्रमोद क्षीरसागर, सुरेश गायकवाड, विकास साळवे यांनी सहभाग घेतला होता.
ॲड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना ‘बॅकवर्ड’ (मागासलेला समाज) या शब्दाची व्याख्या केलेली नाही. का तर प्रत्येक राज्यात वेग वेगळा समाज बॅकवर्ड असू शकतो, त्यांना बॅकवर्ड ठरवणे हा त्या त्या राज्य सरकारचा अधिकार आहे. महाराष्ट्रात ५९ जाती बॅकवर्ड आहेत इतर राज्यात हा आकडा व जाती वेग वेगळ्या असतील. केवळ एका जातीच्या मागणीवरून आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे याला आमचा तीव्र विरोध असल्याचे ॲड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...

गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक–विद्याधर अनास्कर

पुणे, दि.२९: सहकाराचे अनेक पैलू आहेत. सहकारी गृहसंस्था आणि...

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय दुचाकीस्वाराला लुटले; सेव्हन लव्हज चौक :रात्री साडेदहा वाजता …

पुणे | प्रतिनिधी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५५ वर्षीय...