गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक–विद्याधर अनास्कर

Date:

पुणे, दि.२९: सहकाराचे अनेक पैलू आहेत. सहकारी गृहसंस्था आणि अपार्टमेंट हा त्याचा मोठा भाग असून गृह संस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

भारत सरकारतर्फे ६ जुलै २०२१ रोजी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाला यंदा म्हणजे २०२६ मध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे २९ जून २०२६ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सनदी अधिकारी हरनाम सिंग, राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक (सहकारी संस्था) दीपक तावरे, यशदाचे महासंचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी सहकार प्रतिज्ञा घेतली.

श्री अनास्कर म्हणाले, सहकार आणि राजकारण यांचे नाते अतुट असले तरीही राजकारण विरहीत सहकार अपेक्षित आहे. राजकीय नेतृत्वाने सहकाराभोवतीचे कुंपण या भूमिकेतून काम करावे. परंतु, कुंपणच शेत खाऊ लागले, तर काय करायचे हा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून सहकार आणि राजकारण यामध्ये लक्ष्मण रेषा असणे आवश्यक आहे. सहकार म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या थापणे हा दृष्टिकोन बदलून युवकांची क्रयशक्ती सहकार क्षेत्रात वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शालेय स्तरापासूनच सहकाराची बीजे रूजविणे अपेक्षित असताना शालेय अभ्यासक्रमातून सहकार नामशेष होत आहे, हे वास्तव खेदजनक आहे. पूर्वी शाळा-शाळांमध्ये सहकार भांडार स्थापन करून त्याचे नियोजन विद्यार्थ्यांव्दारे केले जात होते. त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकाराची तत्वे त्यांच्यापर्यंत पाझरत होती. सहकाराची ही तत्वे विद्यार्थीदशेत अधोरेखित व्हावी म्हणून आम्ही स्वतः पुढाकार घेऊन तीन धडे तयार करून दिलेत. सहकाराबाबत आपुलकीचा भाव रूजवून सहकाराचा प्रचार-प्रसार केल्यास सहकार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. सहकार जगणे, वाढणे आणि टिकणे ही काळाची गरज आहे. मदतीचे ओझे न वाटणे म्हणजे सहकार होय, अशी सहकाराची व्याख्या करता येईल. गृहनिर्माण संस्थांना स्वायत्तता दिली जाऊन सोसायटीचे प्रश्न त्या त्या सोसायटीच्या पातळीवरच सुटणे आवश्यक आहे.

श्री तावरे म्हणाले, सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ६ जुलै २०२१ रोजी सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. सहकार चळवळीला गती आणि नवीन दिशा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षात अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. सहकार विभागातील अमूलग्राम बदलामुळे या क्षेत्राची निकोप आणि सुदृढपणे वाढ होत आहे. सहकाराचा लाभ तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी केले, तर सूत्रसंचालन सुनील जोशी यांनी केले.
सहाकार सप्ताहाच्या उद्घाटन सत्राच्या आधी आज सकाळी पाषाण पंचवटी येथील सक्सेस क्लब हाऊस येथे सहकार झेंडा वंदन करण्यात आले. तसेच हरित उपक्रमांतर्गत उद्यान विभाग, मनपा, पंचवटी, पाषाण रस्ता येथे वृक्षारोपण करून पुणे इंटरनॅशनल सेंटर पर्यंत सहकार दिंडी काढण्यात आली. यावेळी माजी खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ सनदी अधिकारी हरनाम सिंग, यशदाचे महासंचालक सुहास दिवसे आणि राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक (सहकारी संस्था) दीपक तावरे, महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन सत्रानंतर सहकार सप्ताहानिमित्त आयोजित मार्गदर्शन सत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता- काल, आज व उद्या या विषयावर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी मार्गदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय दुचाकीस्वाराला लुटले; सेव्हन लव्हज चौक :रात्री साडेदहा वाजता …

पुणे | प्रतिनिधी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५५ वर्षीय...