खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा; काल सायंकाळ पेक्षा ०.०२ टीएमसीने साठा वाढला

Date:

पुणे : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती जलसंपदा विभागाने जाहीर केली आहे. मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ३.६५ टीएमसी, म्हणजेच १२.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता चारही धरणांतील एकूण पाणीसाठा ३.६३ टीएमसी, म्हणजेच १२.४५ टक्के होता. त्यामुळे मागील नोंदीच्या तुलनेत धरणसाखळीतील पाणीसाठ्यात ०.०२ टीएमसी, म्हणजेच सुमारे २० एमसीएफटी इतकी किंचित वाढ झाली आहे. टक्केवारीनुसार ही वाढ ०.०६ टक्के इतकी आहे.

आजच्या नोंदीनुसार खडकवासला धरणात ०.३० टीएमसी, म्हणजे १४.९७ टक्के पाणीसाठा आहे. काल खडकवासला धरणातील पाणीसाठा ०.२८ टीएमसी, म्हणजे १३.९५ टक्के होता. त्यामुळे खडकवासला धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

पानशेत धरणात आज १.८२ टीएमसी, म्हणजे १७.१४ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. काल पानशेतमध्ये १.८४ टीएमसी, म्हणजे १७.२५ टक्के साठा होता. वरसगाव धरणात आज १.५३ टीएमसी, म्हणजे ११.९१ टक्के पाणीसाठा असून, काल हा साठा १.५२ टीएमसी, म्हणजे ११.८३ टक्के होता. टेमघर धरणातील उपयुक्त पाणीसाठा अद्याप ०.०० टीएमसी नोंदविण्यात आला आहे.

पावसाच्या नोंदीनुसार, आज सकाळपर्यंत खडकवासला येथे ४ मिमी, पानशेत येथे २२ मिमी, वरसगाव येथे २१ मिमी, तर टेमघर येथे २५ मिमी पाऊस झाला आहे. एकूण पर्जन्यमान खडकवासला येथे ८७ मिमी, पानशेत येथे ९९ मिमी, वरसगाव येथे ९४ मिमी आणि टेमघर येथे ९४ मिमी इतके नोंदविण्यात आले आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत चारही धरणांमध्ये १४.३३ टीएमसी, म्हणजेच ४९.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अद्याप खूपच कमी असून, सध्या धरणसाखळीत गेल्या वर्षीपेक्षा १०.६८ टीएमसीने कमी पाणी आहे.

दरम्यान, चारही धरणांचा एकूण इनफ्लो ०० एमसीएफटी नोंदविण्यात आला असून, खडकवासला धरणातून आतापर्यंत स्पिलवेमधून पाणी सोडण्यात आलेले नाही. पावसाचा जोर वाढल्यास धरणसाठ्यात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तलाव आणि भूजल ऐतिहासिक पाणी साठ्याकडे महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

पुणे- पुण्याला पाण्याचे ऐतिहासिक सौख्य लाभलेले असताना कधीकाळी ...

कृत्रिम पाऊस पाडण्याचा पक्षनेत्यांच्या बैठकीत विचार

महापौर मंजूषा नागपुरे : दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठापुणे...

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...