पुणे- पुण्याला पाण्याचे ऐतिहासिक सौख्य लाभलेले असताना कधीकाळी भेडसावणाऱ्या भीषण पाणी टंचाईला आणि त्यामुळे होणार्या लोकांच्या अपेष्टांना प्रशासनातील ‘बाबूगिरी’ कारणीभूत ठरलेली असूनहि लोक्प्रतींधी देखील त्याकडे दुर्लक्ष करत आल्याचे स्पष्ट झाले . पेशवेकालीन कात्राज्ची धरणे त्यांचा व्यास कमी करणे आजूबाजूला बांधकामे करणे , भुयारी पाणीपुरवठा यंत्रणा जतन करा असा स्पष्ट अहवाल २००४ साली दिलेला असतान देखील नंतर अनेक ठिकाणी बांधकामांसाठी तो उध्वस्त करण्याचे प्रकार झाले , ज्या कात्रजच्या दोन्ही धरणाचे पाणी स्वारगेट पर्यंत कधी काळी हीच पुणे महापालिका पुरवत होती. या महापालिकेने याच धरणाचे पाणी कात्रज मधील भारती विद्यापीठ , वंडर सिटी गृह् संकुलाला पुर्व्ल्याच्या नोंदी आजही पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी दाखल आहेत . शनवार पेठेतील एक बटू शाळा हि हेच पाणी वापरत होती. निव्वळ कॉंक्रीटच्या जंगलासाठी कात्रजच्या दोन्ही धरणाच्या लगतची जंगले, शेती नष्ट करून या ऐतिहासिक पाण्याच्या यंत्रणेला कितीही लगाम घातला तरी अजूनही तलावातील आणि भुयारी मार्गातील जिवंत झरे दिसून येत आहेत. यावर अनेकांनी टँकरच धंदा करून करोडोची माया गोळा केल्याचे महापालिकेच्या दप्तरी आलेल्या तक्रारीनुसार केलेल्या कारवायांची नोंद आहे. कात्रज ची हि २ धरणेच नाही तर जांभूळवाडी तलाव आणि पाषाण च्या तलावांची अवस्था हि कठीण करून ठेवण्यात आली आहे.
दीडशे वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पाषाण तलाव एकेकाळी शहरातील गोड्या पाण्याचा सरोवर म्हणून ओळखले जात असे. पश्चिम पुणे, राजभवन, राज्यपालांच्या बंगल्यासह पुणे विद्यापीठ व गणेश खिंड भागातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांची तहान भागवणारा हा ऐतिहासिक तलाव आज अखेरची घटका मोजत आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात दुषित पाणी सोडले जात असून तलावाच्या दुरवस्थेला महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील डोंगरातून उगम पावलेल्या राम नदीचा प्रवास पुणे शहरातून १९ किलोमीटरचा आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी ही नदी भुकूम, भूगाव, बावधन आणि पाषाण परिसरातून औंध, बाणेर, सोमेश्वरवाडीकडून प्रवास करते आणि शेवटी तिचा मुळा नदीशी संगम होतो. या प्रवासात राम नदीला अनेक गावांतील लहान-मोठे ओढे येऊन मिळतात. मुळा नदीची उपनदी म्हणून रामनदीची ओळख आहे. याच नदीवर ब्रिटिश सरकारने १८६७-६८ मध्ये बंधारा घालून १३० एकर जागेत तलाव बांधला. दरम्यानच्या काळात खडकी येथील गनपावडर फॅक्टरी आणि गणेशखिंड येथील गव्हर्नर हाऊस, विद्यापीठ तसेच पाषाण आणि सुतारवाडी परिसरातील शेतीसाठीही व राज्यपालांच्या निवासस्थानासह पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे मुबलक पाणीपुरवठा होत होता. त्याकाळी हे धरण सुमारे २१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आले. मात्र कालांतराने महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या तलावात राम नदीतून वाहत येणाऱ्या दुषित पाण्यामुळे आणि जलपर्णीची वारंवार होणारी वाढ यामुळे पाषाण, सुतारवाडी परिसरात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
राम नदी पात्रात सोडलेल्या घाण पाण्यामुळे तलावाचे सौंदर्य लयाला जात आहे. मागील काही वर्षापासून तलावात जलपर्णीच्या वाढीमुळे छोटे जीव व मासे यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षांचा संचार असलेल्या या तलावात प्रदूषण वाढत चालल्याने व खाद्य कमी झाल्याने त्यांनी इकडे पाठ फिरवली आहे. तलावाशेजारीच असलेल्या सुतारवाडी परिसरातील नागरिकांना दुर्गधीचा सामना करावा लागत आहे. राम नदीतून तलावात येणान्या सांडपाण्यावर पालिकेने नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे तलावात हिरव्या रंगाचे आच्छादन तयार झाले असून, पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. तलावात जमा होणारे दूषित पाणी बाणेर, औंधमार्गे मुळा नदीच्या पात्रात मिसळत असल्याने प्रदूषणात भर पडत आहे.
तलावाच्या संवर्धनासाठी व सुशोभीकरणासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजनेंतर्गत २००६-२०१३ दरम्यान केंद्र व राज्य सरकार व पीएमसीच्या हिश्शातून २० कोटी रूपये खर्च करून तलावातील गाळ काढून काठावर सुशोभीकरण केले होते. मात्र या प्रकल्पांतर्गत सुशोभीकरणाच्या आड तलावाच्या नैसर्गिक रचनेत बदल केल्याचा आरोप करत काही पर्यावरणप्रेमींनी आक्षेप दाखल केले होते. यानंतर पीएमसीच्या पर्यावरण विभागाने संवर्धनासाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला होता, पण त्यातून अद्याप खर्च केलेला नाही, अशी आहे धरणाची रचना
पाषाण तलावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यास प्रदूषण थांबून पाण्याचा दर्जा सुधारेल. यामुळे जलचरांचे रक्षण होईल, परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. राम नदीतून तलावात येणारे दूषित पाणी शुद्ध केले जाईल, ज्यामुळे जलपणींची वाढ थांबेल आणि तलावाचे सौंदर्य अबाधित राहील.
पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढेल, ज्यामुळे माशांचे मृत्यू टळतील आणि तलावातील परिसंस्था सुरक्षित राहील. दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव कमी होईल. शुद्ध पाणी जमिनीत मुरल्यास परिसरातील विंधन विहिरींची पाणीपातळी वाढेल.पाषाण तलावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यास प्रदूषण थांबून पाण्याचा दर्जा सुधारेल. यामुळे जलचरांचे रक्षण होईल, परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. राम नदीतून तलावात येणारे दूषित पाणी शुद्ध केले जाईल, ज्यामुळे जलपणींची वाढ थांबेल आणि तलावाचे सौंदर्य अबाधित राहील.पाण्यातील प्राणवायूचे प्रमाणवाढेल, ज्यामुळे माशांचे मृत्यू टळतील आणि तलावातील परिसंस्था सुरक्षित राहील. दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव कमी होईल. शुद्ध पाणी जमिनीत मुरल्यास परिसरातील विंधन विहिरींची पाणीपातळी वाढेल. या सर्व बाबींकडे महापालिका आणि जिल्हाधिकारी यांनी कायम दुर्लक्ष केल्याचे आजवर दिसून आलेलं आहे.
लांबी -साधारण ५०० ते ६०० मीटर असून रुंदी: साधारण ३० ते ४० चौरस मीटर आणि खोली : ६ मीटर / २० फूट

