वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा बळी देऊन उद्योगपतींचे हित साधणारा, सर्व कामे तातडीने थांबवून प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ.

Date:

वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या स्थानिकांवरील पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा, काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा.

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२६

भाजपा महायुती सरकारचा वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा बळी देऊन उद्योगपतींचे हित साधणारा असून तो काँग्रेसला मान्य नाही. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे पण हा विरोध पोलीस दडपशाही करून मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने ही पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी आणि स्थानिकांच्या मुळावर उठलेल्या वाढवण बंदराची सर्व कामे तातडीने थांबवून प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात १०० हून अधिक दिवसांपासून भूमिपुत्र, आदिवासी, मच्छीमार, शेतकरी, महिला आणि युवक आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. महिला, लहान मुले आणि ग्रामस्थांशी गैरवर्तनाच्या तक्रारी गंभीर असून पोलीस दडपशाही तातडीने थांबवून या घटनांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. वाढवण बंदरामुळे पालघरच्या किनारपट्टीचे पर्यावरण, सागरी जैवविविधता, पारंपरिक मासेमारी आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर संकट निर्माण होण्याची भीती आहे. भूमिपुत्रांचे अस्तित्व आणि निसर्ग उद्ध्वस्त करून साधला जाणारा विकास कदापी स्वीकारार्ह नाही. काँग्रेस पक्ष भूमिपुत्र, मच्छीमार, आदिवासी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत लोकशाही व संविधानिक मार्गाने हा संघर्ष सुरू ठेवेल असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सावरकरांबाबतच्या पुस्तकातील मांडणीवर उबाठाने भूमिका स्पष्ट करावी : डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर अधिवेशनात शेतकरी, दुष्काळ, महिला सुरक्षा आणि कारागृहांतील महिलांचे...

चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसाद

दुष्काळी मदतीसाठी कोथरुडकर सरसावले समुत्कर्षच्या माध्यमातून १० टन धान्याची पहिली...