दादर रेल्वे स्थानकालाच ‘चैत्यभूमी’ नाव द्या; रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी

Date:

मेट्रो स्टेशनला नाव देऊन आंबेडकरी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप; महायुतीत असलो तरी गृहीत धरू नका, रिपब्लिकन नेत्यांचा सरकारला इशारा

पुणे : दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याची घोषणा करून प्रत्यक्षात रेल्वे स्थानकाऐवजी मेट्रो स्टेशनला हे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आंबेडकरी जनतेची फसवणूक झाली आहे. सरकारची ही भूमिका निषेधार्ह असून, दादर रेल्वे स्थानकाचं नामकरण ‘चैत्यभूमी’ असे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी केली आहे. आम्ही महायुतीत असलो तरी सरकारने आम्हाला गृहीत धरू नये, असा इशाराही पक्षाच्या नेत्यांनी दिला.

दादर रेल्वे स्थानकाऐवजी मेट्रो स्टेशनला ‘चैत्यभूमी’ नाव दिले जाणार असल्याचे स्पष्ट होताच पुणे शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंबेडकर पुतळा परिसरात राज्य सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, नगरसेवक निलेश आल्हाट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या चैत्यभूमीचे नाव दादर रेल्वे स्थानकाला देण्यासाठी आंबेडकरी समाजाने अनेक वर्षांपासून लढा दिला आहे. मात्र, सरकारने एका रात्रीत निर्णय बदलून आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला आहे. हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. सरकारने ६ डिसेंबरपूर्वी दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव द्यावे, अशी मागणी बाळासाहेब जानराव यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे गटाच्या विरोधाला बळी पडून राज्य सरकारने दादर रेल्वे स्थानकाऐवजी मेट्रो स्टेशनला हे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप महिपाल वाघमारे यांनी केला. जातीयवादी पक्षांच्या दबावाला बळी न पडता सरकारने हा निर्णय मागे घ्यावा आणि दादर रेल्वे स्थानकाला सन्मानाने ‘चैत्यभूमी’ हे नाव द्यावे. अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पक्षाच्या वतीने एकत्र येण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे स्थानकाऐवजी मेट्रो स्टेशनला नाव दिले जाणार असल्याचे समोर आल्याने आनंदोत्सवाऐवजी निषेधासाठी एकत्र यावे लागले, असे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्ष हा बुद्धाच्या विचारांचा आणि शांततेचा पुरस्कार करणारा पक्ष असला, तरी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचीही आमची तयारी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

जातीयवादी शक्तींच्या दबावाखाली येऊन सरकारने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना करू नये. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ही जगप्रसिद्ध स्थळे आहेत. दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमीचे नाव दिल्यास सरकारचे सर्वत्र कौतुक होईल. त्यामुळे सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करून दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘चैत्यभूमी’ असे करावे, असे आवाहन बाळासाहेब जानराव यांनी केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तसेच मनसे, ठाकरे आणि शिंदे गटाच्या भूमिकेचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या. अल्पावधीत सूचना मिळूनही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांचे श्याम सदाफुले यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार?’ कोथरूडमध्ये फलकांमधून न्यायाची मागणी!

विमान अपघाताच्या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सवाल;...