Home Blog Page 765

सतार, सरोद आणि व्हायोलीन वादनातून साधला सुरांचा ‌‘त्रिवेणी‌’ संगम

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित कार्यक्रमात कलाकारांचे बहारदार सादरीकरण

पुणे : सतारीचे सुमधुर झंकार, मैहर घराण्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे सुरेल सरोद वादन आणि गायकी अंगाने सादर झालेल्या व्हायोलीनच्या आर्त स्वरातून भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाली. सतार, सरोद आणि व्हायोलीन या तिन्ही वाद्यांच्या वादनातून त्रिवेणी संगम साधला गेला.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशनच्या स्वरदालनात ‌‘त्रिवेणी‌’ या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात नेहा महाजन यांचे सतार, अनुपम जोशी यांचे सरोद तर पंडित मिलिंद रायकर यांचे व्हायोलीन वादन झाले. रसिकांनी मैफलीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांच्या सादरीकणाला भरभरून दाद दिली.
नेहा महाजन यांनी भीमपलास रागातील दोन बंदिशी सादर केल्या. आपले गुरू सतार वादक उस्ताद जुनैद खान यांच्याकडून मार्गदर्शन मिळालेल्या या बंदिशी बिनकर घराण्याचे उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांनी रचलेल्या होत्या. सुरेल धून ऐकवून नेहा महाजन यांनी मैफलीची सांगता केली. अनिरुद्ध शंकर यांनी तबला तर मानसी पोतदार यांनी तानपुरा साथ केली.
अनुपम जोशी यांनी सरोद वादनाची सुरुवात हेमंत रागात आलाप, जोड, झाला सादर करून केली. अतिशय सुमधुर समजला जाणारा हेमंत राग उलगडून मांडताना अनुपम जोशी सरोद मैहर घराण्याचय्ा सरोद वादनातील बारकावे, वैशिष्ट्ये दर्शविल्याने रसिक मोहित झाले. त्यानंतर पुरिया कल्याण रागातील विलंबित तीन व द्रुत तीनताल अतिशय प्रभावीपणे सादर केला. पंडित राजीव तारानाथ आणि पंडित तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे मार्गदर्शन लाभलेल्या अनुपम जोशी यांच्याकडे आजच्या पिढीतील आश्वासक सरोद वादक म्हणून पाहिले जाते. महेशराज साळुंखे यांनी समर्पक तबला तर वैष्णवी सोनार यांनी तानपुरा साथ केली.
पंडित मिलिंद रायकर यांच्या आत्मभान विसरायला लावणाऱ्या व्हायोलीनच्या सुरांनी त्रिवेणी मैफलीचा कळसाध्याय गाठला. पंडित रायकर यांनी रागांचा राजा समजल्या जाणाऱ्या आणि गंभीर प्रकृतीच्या राग मालकंसचे ऐकवलेले स्वर रसिकांच्या काळजाला भिडले. अनेक दिग्गज कलाकारांसह गानसरस्वती पद्मभूषण किशोरी आमोणकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या पंडित रायकर यांच्या व्हायोलीन वादनातील आर्त सुरांनी रसिकजन मंत्रमुग्ध झाले. पंडित विश्वनाथ शिरोडकर यांनी बहारदार तबला साथ केली तर नुपूरा जोशी-भिडे यांनी स्वरमंडल आणि मानसी पोतदार यांनी तानपुरा साथ केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या संस्थापक संचालिका चेतना कडले, विनता गांगुली, विदुर महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले. कलाकारांचा सत्कार चेतना कडले, विनता गांगुली, प्रकाश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन नमिता राऊत यांनी केले.

बाळासाहेब थोरातांचा पराभव व्हायला नको होता… अजित पवारांनी व्यक्त केली भावना

मुंबई- आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली तेव्हा अजित पवारांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला, काय कारण असावेत, अशी विचारपूस करत त्यांच्या पराभवावर दुःख व्यक्त केले असल्याचे तांबे यांनी सांगितले. बाळासाहेब थोरात वरिष्ठ माणूस आहेत हा पराभव व्हायला नको होता, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला आहे. बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा अनपेक्षित होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील दुःख व्यक्त केले असल्याचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. तसेच या निकालावर सत्यजित तांबे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

सत्यजित तांबे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांची सभागृहातली कमी निश्चितच सर्व नेत्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. संगमनेरचा निकाल धक्कादायक आहे. 40 वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केले असेल ते का केले असेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे आम्ही आत्मपरीक्षण करू, असेही सत्यजित तांबे म्हणाले.
सत्यजित तांबे यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्यजित तांबे यांनी सांगितले की, अजितदादांनी मला विशेष करून विचारले की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला? काय कारणे असावेत. त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विशेष दुःख व्यक्त केले. बाळासाहेब थोरात यांच्या सारखा सीनियर माणूस पराभूत व्हायला नको होता. शेवटी त्यांच्या अनुभवाचा सभागृहामध्ये होणारा वापर हा गरजेचा होता, असे अजित पवार म्हणाले असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम

पुणे, दि.२५: अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीय व सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत २७ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या परंतु जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज करूनही अद्याप जात वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यात येणार आहे.

अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी सूचना पत्र किंवा ई-मेल पत्त्याद्वारे कळविण्यात आले असून असे विद्यार्थी किंवा पालकांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पुणे-आळंदी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, पुणे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव एस. आर. दाणे यांनी केले आहे.

स्वयंचलितरित्या नामंजूर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि.२५: भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत स्वयंचलितरित्या नामंजूर (ऑटो रिजेक्ट) झालेले प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली असून जिल्ह्यातील महाविद्यालयांनी विहीत प्रक्रियेचा अवलंब करून ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज व प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत महाडीबीटी प्रणालीमार्फत अर्ज करताना आलेल्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत भरुनही ऑटो रिजेक्ट झाले आहेत. एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहित वेळेत न लागल्याने अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरुनही पुढच्या वर्षीचा अर्ज नुतनीकरण करण्यास अडचण आल्या. अशा अडचणींमुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येत नसल्याची बाब विचारात घेऊन, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे या योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.

या योजनेच्या लाभापासून अनूसुचित जाती प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार राहू नयेत, अशा विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन अर्जावर महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे असे निर्देश सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी दिले आहेत.

‘टीबी- मुक्त शाळा’ उपक्रम लाँच

 या उपक्रमाद्वारे तीन राज्यांतील १०,००० पेक्षा जास्त शालेय मुलांमध्ये तपासणी, माहिती, उपचार व प्रतिबंधात्मक थेरपीचा प्रसार केला जाणार आहे. हिमाचल प्रदेशात या उपक्रमाची प्राथमिक टप्प्यात यशस्वी अमलबजावणी केल्यानंतर संपूर्ण देशभरात उपक्रमाची व्याप्ती वाढवणार

पुणे नोव्हेंबर २०२४ – जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ही प्रसिद्ध जागतिक आरोग्य संशोधन व तज्ज्ञ संस्था भारतीय भागीदारांसह टीबी- मुक्त शाळा हा उपक्रम लाँच करत आहे. भारतातील क्षयरोगाच्या समस्येला आळा घालण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. जॉन हॉपकिन्स गुप्ता- क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूटतर्फे (जीकेआयआय) या तीन वर्षाच्या उपक्रमासाठी ३ दशलक्ष डॉलर्स निधी दिला जाणार आहे.

भारतात दरवर्षी १५ वर्षाखालील अंदाजे ३४०,००० मुलांना क्षयरोगाची लागण होत असते. क्षयरोगाच्या एकूण रूग्णांमध्ये मुलांचे प्रमाण १३ टक्के असले, तरी केवळ ६ टक्के मुलांचे निदान होते व त्यांच्यावर उपचार केले जातात. इतरांमध्ये मिसळताना, शाळेसारख्या ठिकाणी क्षयरोगाचा प्रसार होतो असे बदलत्या वैज्ञानिक शोधातून दिसून आले आहे. हॉपकिन्सच्या जीकेआयआयमधील तज्ज्ञांच्या मते किशोरवयातील आणि लहान मुलांमधील क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असून त्यामुळे आजाराचे व लागण होण्याचे प्रमाण कमी करणे शक्य होईल.

भारतातील आघाडीच्या शैक्षणिक वैद्यकीय संशोधन संस्था आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने जगभरातील क्षयरोगाचा प्रतिबंध आणि उपचारांत लक्षणीय बदलांची यापूर्वीच दखल घेतली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथील सेंटर फॉर ट्युबरक्युलॉसिस रिसर्च आणि भागीदार संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की उदाहरणार्थ क्षयरोग प्रतिबंधक एक महिन्याचा उपचार सुरक्षित आणि नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कोर्सइतकाच प्रभावी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या अभ्यासाचा त्यांच्या क्षयरोग उपचारविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये समावेश केला आहे. आणखी एका संयुक्त इंडिया- जॉन हॉपकिन्स रिसर्च अभ्यासामुळे भारतातील क्षयरोग रूग्णांच्या घरगुती संपर्काच्या चाचणीसाठी आणि प्रतिबंधात्मक थेरपीवर देखरेख करण्यासाठी मदत झाली. या पद्धतीत प्रसार रोखला जातो आणि क्षयरोगाच्या तीव्र केसेस तयार होण्याची शक्यता कमी होते.

टीबी मुक्त शाळा उपक्रम इंडिया- जेएचयू रिसर्च यांच्यात एकत्रितपणे करण्यात आलेल्या अभ्यास अहवालाच्या यशाच्या पायावर रचण्यात आला आहे. त्यामध्ये टीबीविषयी माहिती, तपासणी, उपचार, मोबाइल सर्व्हिस डिलीव्हरी मॉडेल्सद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल प्रदेशातील तिबेटियन लोकसंख्येसाठी प्रतिबंधात्मक थेरपी यांचा समावेश आहे. या प्रकल्पाने धरमशाला येथील मॉनेस्ट्रीज व शाळांमधील क्षयरोगाचे प्रमाण वाजवी पद्धतीने कमी करण्यात आल्याचे दाखवून दिले आहे. या यशाने प्रेरित होत आणि नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्रॅम व इतर सीएसआर भागिदारांच्या सहकार्याने तीन राज्यांतील चार ठिकाणी या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पुणे व सातारा, उत्तरप्रदेश येथील गोरखपूर आणि तमिळनाडूमधील चेन्नई यांचा समावेश आहे.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता गुप्ता म्हणाल्या, ‘संसर्गजन्य आजार केंद्र क्षयरोगाला चालना देणाऱ्या पद्धती पुराव्यासह शोधण्यासाठी बांधील आहे. क्षयरोग- मुक्त शाळा उपक्रमाने लवकर निदान, उपचार आणि प्रतिबंध यांमुळे लहान मुलांमधील क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीय पद्धतीने कमी होत असल्याचे दाखवून दिले आहे. हा उपक्रम क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे क्षयरोग मुक्त पिढी उभारण्यासाठी आमच्या एकत्रित प्रयत्नांना बळकटी देणारा आहे.’

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी येथील गुप्ता- क्लिन्सिकीच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष राज गुप्ता म्हणाले, ‘जवळपास शंभर वर्षांपासून जॉन हॉपकिन्सने आधुनिक वैद्यकीय शास्त्र आणि सार्वजनिक आरोग्यासाठी भारतासह ३ दशलक्ष डॉलर्सची आमची बांधिलकी संसर्गजन्य रोगांचे आव्हान सोडवण्याची आणि विशेषतः क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न प्रतिबिंबित करते. क्षयरोगामुळे आपल्या समाजावर अजूनही मोठा ताण तयार झाला आहे. विशिष्ट स्त्रोत आणि एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही पुढील पिढ्यांसाठी अधिक निरोगी, क्षयरोगमुक्त भविष्य तयार करता येईल असा विश्वास आहे.’

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनच्या संचालक नादिया हन्सल म्हणाल्या, जॉन हॉपकिन्समध्ये आम्ही भारतीय सहकाऱ्यांसह एकत्रितपणे काम करण्यासाठी व अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी तसेच भारत आणि जगभरातील आरोग्याची पातळी उंचावण्यासाठी बांधील आहोत.

पबमॅटिकच्या इंजिनियरिंग विभागाचे सह- संस्थापक आणि अध्यक्ष मुकुल कुमार म्हणाले, ‘पबमॅटिकमध्ये आम्ही कायमच समाजाच्या ऋणांची परतफेड करण्याच्या संधींच्या शोधात असतो. या सहकार्याच्या मदतीने आम्ही भारतातील क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी आणि प्रत्येक मुलाला निरोगी आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी उत्सुक आहोत. एकत्रितपणे आम्ही भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल, क्षयरोगमुक्त भविष्य तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने भारतात स्थानिक संस्था व सरकारच्या सहकार्याने संशोधन, प्रशिक्षण उपक्रम राबवत विविध ठिकाणी क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी धोरणे अमलात आणली आहेत. टीबी- मुक्त शाळा उपक्रमामुळे भारत व जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्यातील शतकभर जुने नाते व शिक्षण, वैद्यकीय तसेच अभियांत्रिक संशोधन क्षेत्रातील काम आणखी बळकट झाले आहे.

भारताच्या एकूण AUM मध्ये योगदानामध्ये पुणे सध्या देशभरात चौथ्या क्रमांकावर, जे देशातील ₹ 68 लाख कोटींच्या मालमत्ता बेसच्या 4.12% आहे

भारताच्या सर्व क्षेत्रांमध्ये आणि मार्केट कॅप्समध्ये वाढीला चालना देण्यासाठी PLI प्रोत्साहनेपायाभूत सुविधा गुंतवणूक आणि प्रीमियमचा वापर

पुणे – 25 नोव्हेंबर, 2024: भारत 2027 पर्यंत अंदाजे $5 ट्रिलियन GDP कडे वाटचाल करत असताना, मोठ्या, मध्यम आणि स्मॉल-कॅप विभागांमध्ये गुंतवणुकीच्या महत्त्वपूर्ण संधी उदयास येत आहेत.

ही संधी घेण्यासाठी, ग्रो म्युच्युअल फंडने अलीकडेच पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जेथे ग्रो म्युच्युअलने ग्रो मल्टीकॅप फंड सादर केला. हा फंड भारतातील बाजार विभागांमध्ये गुंतवणूकदारांना संधी देण्यासाठी डिझाइन केला आहे.

म्युच्युअल फंड वितरकांना त्यांच्या गुंतवणूकदारांना अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाने एक मल्टी-कॅप दृष्टीकोन दिला. तसेच भारताच्या विकसित होत असलेल्या आर्थिक लॅन्डस्केपचा कसा उपयोग करून घ्यायचा याबाबतही मार्गदर्शन केले. सत्रादरम्यान, ग्रो म्युच्युअल फंडाचे इक्विटी प्रमुख, अनुपम तिवारी यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या वाढीच्या संधींवर प्रकाश टाकला.

प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांद्वारे चालवलेला निर्यात विस्तार, जागतिक स्तरावर भारताला एक स्पर्धात्मक खेळाडू म्हणून स्थान देत आहे. पायाभूत सुविधांचा विकास हा आणखी एक प्रमुख चालक आहे, ज्यामध्ये ₹111 लाख कोटी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन (NIP) 2025 पर्यंत संपूर्ण देशभरात कनेक्टिव्हिटी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी सेट केली गेली आहे. याव्यतिरिक्त, रिअल इस्टेट, ऑटोमोटिव्ह आणि दागिने यांसारख्या क्षेत्रातील 3 प्रीमियम वस्तूंची वाढती मागणी यामुळे उच्च-मूल्याच्या वस्तूंच्या वापराकडे भारताचा वाढत जाणारा कल लक्षात येतो.

डिजिटायझेशन तंत्रज्ञान, उत्पादन आणि ग्राहक सेवांमध्ये वाढीला गती देत आहे, आर्थिक प्रगतीसाठी नवीन मार्ग तयार करत आहे. शिवाय, भांडवलाचा विस्तारित प्रवेश आणि सहाय्यक धोरणे स्मॉल आणि मिड-कॅप कंपन्यांना, विशेषत: पायाभूत सुविधा, वित्तीय सेवा आणि IT सारख्या क्षेत्रांमध्ये वाढीस सक्षम करत आहेत. वाढत्या शहरी लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जलद शहरीकरणामुळे ग्राहकोपयोगी वस्तू, गृहनिर्माण आणि सेवांची मागणी वाढत आहे.

हे एकत्रितरित्या मोठ्या, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये बहु-क्षेत्रातील संधी प्रदान करतात, ज्यामुळे भारताच्या आर्थिक विस्तारासाठी आणि संपत्ती निर्मितीसाठी एक मजबूत पाया तयार होतो.

भारताच्या वैविध्यपूर्ण विकास क्षमतेचा फायदा घेण्यासाठी, एक मल्टी-कॅप दृष्टीकोन मोठ्या, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये संधी निर्माण करून देते. आणि व्यापक वाढीवर लक्ष केंद्रित करते. ग्रो मल्टीकॅप फंड गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीला समर्थन देण्यासाठी वाजवी मूल्यांकनात उच्च दर्जाच्या समभागांमध्ये गुंतवणूक करून विविध क्षेत्रांतील संधींमध्ये प्रवेश करण्यास मदत करेल.

ग्रो म्युच्युअल फंडातील विक्री आणि वितरण प्रमुख मनीष रंजन यांनीग्रो मल्टीकॅप फंड सारखी उत्पादने भारताच्या प्रगतीत कशी योगदान देऊ शकतातहे समजून घेण्यासाठी गुंतवणूकदारांना मदत करतातयात म्युच्युअल फंड वितरकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहेभारताच्या एकूण AUM मधील योगदानामध्ये पुणे सध्या देशभरात चौथ्या क्रमांकावर आहेजे देशाच्या ₹68 लाख कोटी मालमत्तेच्या 4.12% आहेअशा संधींद्वारे गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यात वितरकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.

ग्रो म्युच्युअल फंडाचे उद्दिष्ट वितरकांना संशोधन-आधारित अंतर्दृष्टी आणि उत्पादनांसह समर्थन देण्याचे आहे जे गुंतवणूकदारांना त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी सक्षम बनवून भारताच्या आर्थिक वाढीसाठी योगदान देण्यास मदत करतात.

ग्रो मल्टीकॅप फंड साठी NFO 26 नोव्हेंबर 2024 रोजी उघडणार आहे आणि 10 डिसेंबर 2024 पर्यंत उपलब्ध असेल. जे म्युच्युअल फंड वितरक त्यांच्या गुंतवणूकदारांना ही संधी देऊ इच्छितात ते अधिक माहितीसाठी partners@growwmf.in च्या माध्यमातून म्युच्युअल फंड टीमशी संपर्क साधू शकतात.

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले, म्हणाला – “त्यामुळेच मला बँड तयार करून लाईव्ह परफॉर्म करायची प्रेरणा मिळाली!”

बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना याने नुकताच अमेरिकेतील पाच शहरांमध्ये – शिकागो, न्यूयॉर्क, सॅन जोस, न्यू जर्सी आणि डलास येथे आपला म्युझिक टूर पूर्ण केला. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी त्याच्या परफॉर्मन्सवर प्रेमाचा वर्षाव केला. अभिनयासोबत संगीत ही त्यांची दुसरी आवड आहे, असे अनेकदा सांगणाऱ्या आयुष्मानने सांगितले की, त्यांच्या लाईव्ह सिंगिंग प्रवासाची सुरुवात कशी झाली.

आयुष्मानने खुलासा केला की त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्समागे अरिजीत सिंगचा मोठा वाटा आहे. तो म्हणाला, “मी नेहमीच माझ्या अभिनय कौशल्याबद्दल आत्मविश्वास बाळगला आणि गाणे फक्त चित्रपटांसाठीच योग्य आहे असे वाटले. हजारो लोकांसमोर स्टेजवर गाण्याचा विचारही कधी केला नव्हता. परंतु २०१३ साली डलासच्या दिवाळी मेळ्याच्या निमित्ताने अरिजीत सिंगमुळे माझ्या पहिल्या परफॉर्मन्सला सुरुवात झाली. त्यावेळी अरिजीतने मला फोन करून परफॉर्म करण्याची विनंती केली. त्याला तातडीच्या कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, पण त्याचा बँड डलासला पोहोचला होता. आधी मी संकोच केला, पण अरिजीतची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याचा चाहता असल्यामुळे, मी शेवटी होकार दिला.”

पहिल्या अनुभवाबद्दल आयुष्मान म्हणाला , “जेव्हा मी कॉन्सर्टला पोहोचलो तेव्हा स्टेडियम लोकांनी खचाखच भरलेले होते, सुमारे पन्नास हजार लोक तिथे होते. माझ्यासाठी ही ड्राइंग रूम च्या गाण्यापासून थेट स्टेडियमपर्यंतची मोठी उडी होती. मी अरिजीतच्या टीमसोबत सुमारे १० गाणी सादर केली आणि प्रतिसाद खूपच चांगला होता. या अनुभवामुळे मला स्वतःचा बँड तयार करून लाईव्ह परफॉर्मन्स सुरू करायचा आहे हे समजले. याचे सर्व श्रेय अरिजीत सिंगला जाते.”

आयुष्मानच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘थामा’ (मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील) आणि धर्मा व सिख्या प्रोडक्शन्ससोबतचा एक अन टायटल  प्रोजेक्ट समाविष्ट आहे.

१९ वर्षीय सातव आणि २४ वर्षीय सातपुते ला देशी पिस्तुलासह पकडले

पुणे : वारजे पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते (वय २४, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी), सोहम अनंत सातव (वय १९, रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मनोज पवार व विकास पोकळे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की आकाशनगरकडे जाणार्‍या रोडवर दोघे जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी रोजरी स्कुलचे विरुद्ध दिशेला आकाशनगरकडे जाणार्‍या रोडला दोघांना पकडले. त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल,तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक मोपेड असा ६५ हजार ३०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.ओंकार ऊर्फ टेड्या सातपुते याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, राईट, जबरी चोरी, घरफोडी, अग्नीशस्त्रे बाळगणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे गुन्हे निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, मनोज पवार, विजय भुरुक, दक्ष पाटील, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, विकास पोकळे, सत्यजित लोंढे यांनी ही कामगिरी केली आहे.

दरोड्याच्या तयारीतील चुहा गँगच्या चौघांची धरपकड

पुणे- मोक्का प्रकरणात न्यायालयाने २ वर्ष तडीपार केले असतानाही चुहा गँगने शहरात येऊन दरोडा टाकण्याच्या तयारीकेली आणि या तयारीत असतानाच चुहा गँगच्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडून आत टाकले आहे .

तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय २९, रा. रघुनंदन अपार्टमेंट, धानोरी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसिडेन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जनाब (रा. कॅम्प) हा पळून गेला आहे.याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथील डिलाईट बेकरीसमोर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला.

तौसिफ ऊर्फ चुहा याच्याविरुद्ध दंगली, दरोडा, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.त्याला २०२० मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली होती. या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी ६ नोव्हेबर २०२३ पासून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते. असे असतानाही या तडीपारीचा भंग करुन शहरात आला होता.

कात्रज येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत आपल्या साथीदारांसह तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरुन पोलिसांनी त्यांना घेरुन चौघांना पकडले. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल,एक जिवंत काडतुस व मॅफेड्रॉन, कोयता, डिजिटल वजन काटा, सुतळी, स्क्रु ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने , पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, मोहन कळमकर व त्यांच्या सहकार्‍यांनी हीकामगिरी केली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर ̈मो.9881802890अधिक तपास करीत आहेत.

धर्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच विश्व शांती नांदेल -आध्यात्मिक गुरू पं. विजयशंकर मेहता

एमआयटी डब्ल्यूपीयूत २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन

पुणे, दि.२५ नोव्हेंबर: “धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय घरा घरात झाला तर प्रत्येकाला शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो. हेच सूत्र समाजासाठी लागू झाल्याने विश्वशांती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. तसेच प्रत्येकाने चेहर्‍यावर हास्य ठेवणे या क्रांतिकारी प्रयोगामुळे ही जीवनात शांतीचा अनुभव येतो. प्रत्येकाने संकल्प करावा की घरामध्ये प्रवेश करतांना चेहर्‍यावर हास्य ठेवावे.” असे विचार उज्जैन येथील आध्यात्मिक गुरू व लेखक पंडित विजयशंकर मेहता यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधित आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी पैठणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. तसेच जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
पंडित विजयशंकर मेहता म्हणाले, “संतती, संपत्ती, संबंध आणि  दुर्बल आरोग्य  या चार मार्गाने जीवनात अशांती येते. अशा वेळेस शांतीसाठी जीवनाला चार टप्प्यांमध्ये विभाजीत करावे. व्यावसायिक जीवनात निष्काम राहणारे, सामाजिक जीवनात वचन बद्धतेचे पालन करणे, कुटुंबाला प्राथमिकता देणे आणि स्वतःला शांत ठेवावे. यामुळे कुटुंबात, समाजात आणि संपूर्ण विश्वात शांती नांदेल.”
ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर म्हणाले,” भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून जगाला वारकरी संप्रदायाने शांतीचा मार्ग दाखविला आहे. आजच्या युगामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची वेगळी परिभाषा करणे योग्य नाही. आत्म स्वरूपाचा विचार करणे हे अध्यात्म असून ते सर्व धर्मात आहे. खर पाहता विश्वाला शांतीची गरज आहे आणि ती विज्ञानातून मिळेल. मनुष्याने ज्ञानाचा योग्य वापर केल्यास ते शक्य आहे. ज्ञान हे आंतरिक विचार करतो त्यासाठी रोज संतांचे वाङ्मय वाचावे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,” वर्तमान काळात मानवाने विज्ञानाच्या आधारे सर्व गोष्टी साध्य केल्यात परंतू जीवनात सुख आणि शांती नाही. यासाठी आध्यात्मिक व आत्मज्ञान आवश्यक आहे. सत्याची परिभाषा ओळखणे गरजेचे आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देश्याने ही व्याख्यानमाल सुरू केली आहे. येथे सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वरसेवा पूजा आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते. ”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,”धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे जीवनात सर्वात महत्वाचे असून त्याचे पालन करावे. देशाचा विकास पाहता भारत तीसरी आर्थीक व्यवस्था म्हणून उदयास येत आहे. अशा वेळेस हा देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल आणि विश्वगुरू बनेल.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण व प्रस्तावना मांडली.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले.

महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे चौथे राज्यस्तरीय योग महासंमेलन संपन्न

आळंदी : योग शिक्षकांचा महासंमेलन आळंदी येथे नुकतेच साजरे झाले यामध्ये योगशिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये अधिक वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते . विख्यात योगाभ्यासी असे प्रिन्सिपल ऑफ योग कॉलेज कैवल्यधाम येथील डॉक्टर शरदचंद्र भालेकर, द लोणावळा इन्स्टिट्यूट चे संचालक डॉक्टर मन्मथ घरोटे, भारतीय संस्कृती दर्शन चे संचालक डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख, तसेच प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ व योगाभ्यासी डॉक्टर विश्वास येवले यांची दर्जेदार व्याख्यान झाले . तर अनेक योगी खेळ आणि योगी संगीत रजनी सारख्या करमणुकीच्या कार्यक्रमातून सर्वांचे मन प्रसन्न झाले, याबरोबर आपला महाराष्ट्र योग शिक्षक संघ योग शिक्षकांसाठी काय कार्य करत आहे योग विषयाला योग्य न्याय कसा मिळावा यासाठी आपले संस्थापक अध्यक्ष मनोज निलपवार यांनी मार्गदर्शन केले. हा योगशिक्षक संघ कोणी एकाचा नसून फक्त आणि फक्त योगशिक्षकांचा आहे यामध्ये कोणीही अधिकारी किंवा पद धारण करणारा असा नसून प्रत्येक जण योग्य शिक्षक आहे आणि प्रत्येकाला आपले मत आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. , असे देखील सांगण्यात आले. तसेच संमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉ.श्री.शरदचंद्र भालेकर यांनी योगशिक्षक एकत्र येणे का गरजेचे आहे हे सांगितले तसेच डॉ मन्मथ घरोटे सर यांनी समाज स्वास्थ्य घडविणारा हा योगशिक्षक एकत्र आलाच पाहिजे तर डॉ.राजेंद्र खेडेकर यांनी आश्वासन दिले की योगशीक्षकांच्या 12मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल. तसेच ओमानंद स्वामी आणि गेठेमहाराज यांनी आशीर्वाद दिले. संस्थेचे स्मरणिका प्रकाशन व कुणाल महाजन लिखित योग गीता या पुस्तकाचे प्रकाशन माननीय पाहुण्यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास माननीय श्रीमती इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, पद्मश्री डॉ.विजय भटकर सर बेलराईज इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर सुप्रिया बडवे, यांच्या शुभेच्छा होत्या.

कार्यक्रमात प्रसाद कुलकर्णी यांची राज्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली तसेच राज्य कोषाध्यक्ष म्हणून संतोष खरटमल यांची नेमणूक करण्यात आली.
त्याचबरोबर ऑनलाईन राज्यस्तरीय योग क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचे पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. यासाठी मानली देव आणि राहुल येवला यांनी कमकाज पाहीले आपले विभागप्रमुख प्रा. श्री सदानंद वाली सर,
मी पुणे जिल्हाध्यक्ष सौ. चंद्रज्योती दळवी, उपाध्यक्ष सौ सारिका काकडे, मारिया पारतापूर्वाला, सचिव आरुषी शिंगोटे गौरी पाटील कोषाध्यक्ष आश्लेषा मोहिते कार्यकारी सचिव तानाजी पाटील उज्वला गायकवाड श्री दिगंबर काष्टे सर तसेच आपले सोशल मीडिया प्रभारी श्री राहुल सांडभोर सर अवनी शहा माहिती दिली

चंद्रकांतदादा पाटलांनी वाढविले कोथरूडचे मताधिक्य

नुकत्याच राज्यातील विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. पुणे शहरातील आठ पैकी सात जागांवर महायुती विजयी झाली. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून होते तो म्हणजे कोथरुड मतदारसंघ. या मतदारसंघात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निवडणूक लढवत होते. यानिवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांनी १ लाख १२ हजाराचे मताधिक्य मिळवले. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून चंद्रकांतदादांना २५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. पण या निवडणुकीत सर्व कसर भरुन काढत १ लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. त्यामुळे २५ हजारापासून ते एक लाखापासूनचा प्रवास अतिशय खडतर आणि कठोर परिश्रम युक्त म्हणावा लागेल.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रकांतदादा पाटील यांना विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यानंतर, दादांनी सर्वस्व पणाला लावून काम केले. त्यावेळी मतदारसंघ नवीन असल्याने, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी संवाद प्रस्थापित करुन मतदारांपर्यंत पोहोचणं आणि जुन्यांना सोबत घेऊन काम करणं अशी अनेक आव्हाने दादांसमोर होती. पण ही सर्व अडथळ्यांची मालिका पार करत चंद्रकांतदादा पाटील यांनी विजयश्री अक्षरश: खेचून आणला. या निवडणुकीत घरचा विरुद्ध बाहेरचा असा अपप्रचार देखील झाला. त्यामुळे त्याचा मतदारांवर देखील विपरित परिणाम झाला. अनेक प्रभागात मतदानाचा टक्का रोढावला. या निवडणुकीत एकूण मतदारांच्या तुलनेत ४८.०२ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख पाच हजार २४६ (५२.९३ टक्के) मतदान झाले. तर विरोधी उमेदवार असलेल्या किशोर शिंदे यांना ७९ हजार ७५१ (४०.८७ टक्के) मतदान झाले होते. तर नोटाला २.०६ टक्के मतदान झाले होते.
यंदा २०२४ च्या निवडणुकीचा विचार केला, तर एकूण ५२.१८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख ५९ हजार २३४ (६८.४ टक्के), चंद्रकांत मोकाटे यांना ४७ हजार १९३ (२०.२७ टक्के), आणि किशोर शिंदे यांना केवळ १८ हजार १०५ (७.७८ टक्के) मते मिळाली. तर नोटाला १.३५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना तब्बल एक लाख १२ हजार ४१ मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना १४.४७ टक्के मते जास्त मिळाल्याने हा विजय सहज शक्य झाला. लोकसभा निवडणुकीचा विचार केला, तर कोथरुड विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून एक लाख पाच हजाराचे मताधिक्य मिळाले होते.
पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख १२ हजाराचे मताधिक्य मिळवले
. आता एवढे मताधिक्य मिळण्यापाठिमागे गेल्या पाच वर्षातील चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत कारणीभूत ठरली. कारण गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ २५ हजाराचे मताधिक्य मिळाल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीने सेवा कार्य आणि विकासकामे केली, त्यामुळे कोथरुडमधील जनतेच्या मनात कामाचा माणूस अशीच प्रतिमा तयार झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोविडची प्रचंड लाट संपूर्ण जगात आली. याकाळात सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण होते. अनेकांचा हातातील रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच, धान्य पुरवठा करणे, कोविड बाधितांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारणे, कोविडची कमी लक्षणे असणाऱ्य रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे उपलब्ध करुन देणे, महापालिकेच्या कोविड सेंटरसाठी दीड कोटीचा निधी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिला.
कोविडची लाट ओसरल्यानंतर ही हे सेवा कार्य असेच सुरु ठेवले. यामध्ये आर्थिक दुर्बल कुटुंबातील विवाह इच्छुक मुलींना ‘झाल’ उपलब्ध करुन देणे, त्याशिवाय गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसह रुग्णालयात उपचारासाठी लोकसहभागातून खर्च देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया सारखा उपक्रम, किंवा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना विविध प्रकारचे दाखले सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी महा ई-सेवा केंद्र कार्यन्वित करुन नागरिकांची सोय करणे, मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ देणे, बालगोपाळांमध्ये साघिंक भावना वाढीस लागावे यासाठी किल्ले बनवा स्पर्धा, नवोदित कलाकारांसाठी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोथरुडमधील प्रत्येक कुटुंबाशी एक नाते तयार केले.

याशिवाय मतदारसंघात ही विविध विकास कामांचा डोंगर उभा करुन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या. यात प्रामुख्याने डीम्ड कन्वेयन्स सारखे विषय असोत, किंवा रिडेव्हलपमेंटसाठी सोसायटीतील नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध भागातील प्रलंबित रस्त्यांचे विषय मार्गी लावणे, बाणेर बालेवाडीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन, बाणेर-बालेवाडी-सुतारवाडी भागातील वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी उपकेंद्रास जागा उपलब्ध करुन देणे, सुतारवाडीतील स्माशानभूमीतील अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेणे, असे एक ना अनेक विषय सोडविल्यामुळे कोथरुड करांच्या मनात दादांनी घर केले. याशिवाय पुणे महापालिकेने रद्द केलेली ४० टक्के करसवलत पुन्हा लागू करुन घेतल्यामुळे केवळ कोथरुडच नव्हे; संपूर्ण पुण्यातील जनता चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर प्रचंड समाधानी होती. याचाच प्रत्यय निवडणुकीत देखील आला.

निवडणूक प्रचारादरम्यान कोथरुड मधील अनेक नागरिक चंद्रकांतदादा पाटील यांच्या बद्दल भरभरुन बोलत होते. त्यामुळे दादा पुन्हा आमदार होणार यात कोणाच्याही मनात शंका नव्हती. निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक पत्रकार देखील चंद्रकांतदादा पाटील यांचा विजय निश्चित आहे, फक्त मताधिक्य किती असेल, याचीच चर्चा करत होते. त्यामुळे निवडणूक निकाला दिवशी देखील त्याचा प्रत्यय सर्वांना आला. मतमोजणी सुरु झाल्यापासून प्रत्येक क्षणाला दादांचे मताधिक्य वाढतच होते. असा एक ही प्रभाग नव्हता, जिथे दादांना मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे दादा म्हणजे कोथरुड आणि कोथरुड म्हणजेच दादा असं काहीसं समीकरण तयार करण्यात गेल्या पाच वर्षात चंद्रकांतदादा पाटील यांना यश मिळालेलं आहे. आता चंद्रकांतदादा पाटील यांचा हा पॅटर्न महाराष्ट्र भाजपाने संपूर्ण राज्यात राबविला, तर संपूर्ण महाराष्ट्र भाजपाचा बालेकिल्ला होईल, यात शंका नाही.

पुणे शहर आणि जिल्हा कॉंग्रेसमुक्त

पुणे-मावळत्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातून तीन आमदार होते. संग्राम थोपटे, संजय जगताप आणि रवींद्र धंगेकर या काँग्रेसच्या तीनही आमदारांना पराभव पत्करावा लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जिल्ह्यात गेल्यावेळी एकही आमदार नव्हता. यावेळी बाबाजी काळे हे शिवसेनेचे आमदार आहेत. एका अपक्षाबरबरच शिंदे गटाचा देखील पुणे जिल्ह्यात एक आमदार निवडून आला आहे.जिल्ह्यातील सात विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जुन्नरचे अतुल बेनके, खेडचे दिलीप मोहिते, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, काँग्रेसचे भोरमधील संग्राम थोपटे आणि पुरंदर मधील संजय जगताप त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे अशोक पवार आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पराभूत झाले आहेत.

जिल्ह्याच्या आमदारांमध्ये चार नवीन चेहरे आले आहेत. त्‍याचप्रमाणे जिल्‍ह्यात तीन माजी आमदारांना पुन्‍हा विधानसभेची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात 21 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.नव्‍या पाच चेहऱ्यांमध्ये कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने, चिंचवडमध्ये शंकर जगताप, खेडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे, शिरूरमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माउली कटके, भोरमध्ये शंकर मांडेकर यांचा समावेश आहे. माजी आमदार असलेले जुन्नरमधून अपक्ष शरद सोनवणे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पुण्यात 21 पैकी नऊ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. यामध्ये चंद्रकांत पाटील (कोथरूड), माधुरी मिसाळ (पर्वती), सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोन्मेंट), भीमराव तापकीर (खडकवासला), हेमंत रासने (कसबा पेठ), राहुल कुल (दौंड), शंकर जगताप (चिंचवड )आणि महेश लांडगे (भोसरी) यांचा समावेश आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काॅंग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत.यामध्ये स्वतः अजित पवार (बारामती), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), माउली कटके (शिरूर), अण्णा बनसोडे (पिंपरी), सुनील शेळके (मावळ), शंकर मांडेकर (भोर), चेतन तुपे (हडपसर) आणि दत्तात्रय भरणे (इंदापूर) यांचा समावशे आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला खेडमध्ये बाबाजी काळे यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वडगाव शेरीमध्ये बापूसाहेब पठारे, त्याचबरोबर शिवसेनेचे विजय शिवतारे हे पुरंदरमधून, तर जुन्नरमध्ये शरद सोनवणे हे अपक्ष विजयी झाले आहेत.

खडकवासला निवडणूक कार्यालयाचा निरोप साभारंभ उत्साहात पार पडला

0

पुणे: खडकवासला विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनानंतर, कार्यालयाने अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी निरोप साभारंभाचे आयोजन केले. या साभारंभात निवडणूक प्रक्रियेतील उत्कृष्ट व्यवस्थापन, अचूकता, आणि पारदर्शकतेचा उल्लेख करत योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या समर्पणाची प्रशंसा केली. “खडकवासला कार्यालयाने पारदर्शक व अचूक निवडणूक प्रक्रियेसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे,” असे त्यांनी नमूद केले. डॉ. माने यांनी पुढे सांगितले की, खडकवासला विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यात कर्मचार्‍यांनी अत्यंत मेहनत घेतली, त्याचबरोबर त्यांच्या कार्यशक्तीच्या आणि कुशलतेच्या जोरावर प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे यांनी मतमोजणी प्रक्रिया, ईव्हीएम व्यवस्थापन, आणि मतदान केंद्र नियोजनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमात प्रशिक्षक प्रा. तुषार राणे आणि प्रा. माधुरी माने यांनी मतमोजणी प्रक्रियेतील तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बाजूंवर मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
साभारंभात नायब तहसीलदार सचिन आखाडे (इव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी), नारायण पवार (इव्हीएम कक्षाचे सहाय्यक), अंकुश गुरव (कार्यक्रम समन्वयक), मनीष झंसारी, दिपगौरी जोशी (पोस्टल बॅलेट कक्ष अधिकारी), प्रमोद भांड (सहा. महसूल अधिकारी), धम्मदीप सातकर, साहिद सय्यद, भूमेश मसराम (मनुष्यबळ कक्ष अधिकारी) यांच्या निवडणूक प्रक्रियेत अचूकता आणि दक्षता राखण्याच्या कार्याची प्रशंसा केली.मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्षाचे नोडल अधिकारी प्रा. मनिष खोडस्कर यांच्या कामगिरीचेही विशेष कौतुक करण्यात आले. मीडिया कक्ष प्रमुख योगेश हांडगे यांनी जागरूकता निर्मितीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. माने यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व कर्मचार्‍यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि निवडणूक प्रक्रियेतील एकात्मता व कार्यसंघाचा आदर्श निर्माण करण्यात सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले.
या निरोप साभारंभाने खडकवासला विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या यशस्वी कार्यकाळाचा समारोप केला.

ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता

0

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला .एकूण 288 पैकी 193 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे.मात्र, उर्वरित 95 मतदारसंघ असे आहेत की, मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे. त्यापैकी 19 मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले. तर, 76 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएममध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. परिणामी ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होऊ शकतो.

या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यातच आता एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे.त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. या निवडणुकीत 66.05 टक्के एवढे साधारणपणे गेल्या 30 वर्षांतील विक्रमी मतदान झाले. त्यामुळे जनतेचा कौल कोणाला मिळतो याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार मतदारांनी महायुतीला भरभरून मते दिल्याने महायुतीने 230 जागा जिंकल्या.तर, महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर मर्यादित राहिली. हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.

त्यातच आता ईव्हीएमबद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारीही समोर आली आहे. आमगाव, उमरखेड, लोहा, औरंगाबाद पूर्व, भोसरी, परळी, देगलूर, हिंगोली, वैजापूर, कळवण, चांदवड, दिंडोरी, कागल, बोईसर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करमाळा, सोलापूर दक्षिण आणि मालेगाव मध्य या 19 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेते जास्त मते आढळली.

‘या’ मतदारसंघात मतदानाच्या तुलनेत कमी मते :
अक्कलकुवा, गंगाखेड, विलेपार्ले, नवापूर, पाथरी, चांदिवली, साक्री, घनसावंगी, शिरपूर, बदनापूर, सायन कोळीवाडा, चोपडा, औरंगाबाद पश्चिम, मुंबादेवी, भुसावळ, पनवेल, जळगाव शहर, गाणगापूर, कर्जत, चाळीसगाव, नांदगाव, अलिबाग, पाचोरा, मालेगाव बाह्य, आंबेगाव, जामनेर, शिरूर, अकोट, बागलाण, इंदापूर, अकोला पश्चिम, सिन्नर, बारामती, निफाड, मावळ, मोर्शी, नालासोपारा, कोथरूड, वर्धा, वसई, खडकवासला, सावनेर, भिवंडी पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, मीरा भाईंदर, वणी, ओवळा माजीवाडा, नांदेड दक्षिण, मुखेड, कोपरी पाचपाखाडी, कळमनुरी, दिंडोशी, जिंतूर, चारकोप, खानापूर, कोल्हापूर उत्तर, सोलापूर शहर मध्य.