पुणे, दि.२५: अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीय व सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत २७ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या परंतु जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज करूनही अद्याप जात वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यात येणार आहे.
अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी सूचना पत्र किंवा ई-मेल पत्त्याद्वारे कळविण्यात आले असून असे विद्यार्थी किंवा पालकांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पुणे-आळंदी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, पुणे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव एस. आर. दाणे यांनी केले आहे.