पुणे- मोक्का प्रकरणात न्यायालयाने २ वर्ष तडीपार केले असतानाही चुहा गँगने शहरात येऊन दरोडा टाकण्याच्या तयारीकेली आणि या तयारीत असतानाच चुहा गँगच्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडून आत टाकले आहे .
तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय २९, रा. रघुनंदन अपार्टमेंट, धानोरी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसिडेन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जनाब (रा. कॅम्प) हा पळून गेला आहे.याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथील डिलाईट बेकरीसमोर रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
तौसिफ ऊर्फ चुहा याच्याविरुद्ध दंगली, दरोडा, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.त्याला २०२० मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली होती. या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी ६ नोव्हेबर २०२३ पासून दोन वर्षाकरीता तडीपार केले होते. असे असतानाही या तडीपारीचा भंग करुन शहरात आला होता.
कात्रज येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत आपल्या साथीदारांसह तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरुन पोलिसांनी त्यांना घेरुन चौघांना पकडले. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल,एक जिवंत काडतुस व मॅफेड्रॉन, कोयता, डिजिटल वजन काटा, सुतळी, स्क्रु ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने , पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, मोहन कळमकर व त्यांच्या सहकार्यांनी हीकामगिरी केली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर ̈मो.9881802890अधिक तपास करीत आहेत.