Home Blog Page 764

संहितेची मागणी लक्षात घेऊन तांत्रिक बाबींचा विचार करा : प्रदीप वैद्य

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित शिक्षक कार्यशाळेला प्रतिसाद

पुणे : नेपथ्य आणि प्रकाश योजनेची गरज किती आहे असा प्रश्न आधी संहितेला विचारा. संहितेची मागणी आणि गरज लक्षात घेऊन तांत्रिक बाबींना महत्त्व द्या, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ प्रदीप वैद्य यांनी दिला.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींसाठी आज नेपथ्य आणि प्रकाशयोजना याविषयी द बॉक्स येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी वैद्य यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
वैद्य म्हणाले, काळानुरूप तांत्रिक बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. स्पर्धेतील एकांकिका सादरीकरणाचा निर्धारित वेळ याचा विचार करून नेपथ्य, प्रकाशयोजनेची आखणी करावी. उपलब्ध साहित्याचा उपयोग करून प्रतिकात्मक नेपथ्य साकारावे, प्रकाशयोजना करताना रंगसंगतीचा विचार करावा. विचारांना चालना देण्यासाठी स्पर्धेतील इतर एकांकिकाही आवर्जून बघा असा सल्लाही त्यांनी दिला.

‌‘भालबा‌’साठी 37 तर नातू करंडक स्पर्धेसाठी 28 शाळांचा सहभाग

महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेत 37 तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत 28 शाळांनी सहभाग घेतला आहे. भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 10 ते दि. 12 जानेवारी 2025 तर राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा दि. 13 ते दि. 21 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 32वे तर राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.

कात्रजमध्ये गांजा विक्रेत्या तरुणाला अडीच लाखाच्या गांजासह पकडले

पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज परिसरात एका तस्कराकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा गांजा पकडला. देव नरेश तनेजा (वय २४, रा. कात्रज) असे या तस्कराचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना बातमी मिळाली की, कात्रज येथील एकता मित्र मंडळ चौकात एक जण गांजा घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून देव तनेजा याला पकडले. त्याच्याकडून २ लाख ४३ हजार रुपयांचा गांज पकडण्यात आला असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा , अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे , पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड , सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार संदिप शेळके, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, निलम पाटील यांनी केली आहे.

तथागत गौतम बुद्धांचा भारत विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र-बंधुताचार्य प्रकाश रोकडे


पुणे, ता. २६: ,”स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली नसून, ती तथागतांच्या धम्मक्रांतीतून आलेली आहेत. सर्वच संत महात्मे आणि समाजसुधारकांनी या मूल्यांच्या प्रस्थापनेवर भर दिल्याने भारत हे विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र बनले हे सत्य असून, त्याला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे,” असे प्रतिपादन लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले.
भारतीय संविधानदि‌नानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि दर्पण प्रकाशन पुणे यांच्या वतीने आयोजित लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे उद्घाटन पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. सविता पाटील यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित संमेलनावेळी स्वागताध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री सुनिता कपाळे, प्रकाशक गुलाबराजा फुलमाळी, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, सौ. पौर्णिमा वानखेडे, कादंबरीकार शंकर आथरे, कवयित्री शिल्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रसंगी ११४ कवींच्या रचनांचा प्रा. चंद्रकांत वानखेडे संपादित ‘विश्वबंधुतेचा बोधीवृक्ष’ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. संमेलनात ११० हुन अधिक कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.
प्रकाश रोकडे म्हणाले, “या देशातील नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांमधून या मूल्य विचारांचे शिक्षण दिले जात होते. त्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत होते, हा शाश्वत इतिहास आहे. विश्वबंधुतेचा संदेश देणारा आपला देश आहे. बंधुतेचे हे मूल्य समजून घेत आपण माणूसपणाची भावना वृद्धिंगत करायला हवी. आज जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे, हे आपण आत्मसात करायला हवे.” 
डॉ. सविता पाटील म्हणाल्या, “आयुष्यात येणाऱ्या अडचणीकडे डोळसपने पाहिले पाहिजे. त्यातून आपल्यातील क्षमता ओळखता येतात. कविता आपल्याला जगण्याची उर्मी देते. भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ देते. त्यामुळे ती केवळ मनोरंजन करणारी नव्हे, तर क्रांती घडवणारी असावी. लेखणी क्रांतीचे प्रतीक आहे. या प्रतिभाशाली लेखणीतून समाज परिवर्तन होणारी काव्य निर्माण व्हावीत.”

प्रा. चंद्रकांत वानखेडे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. संविधानदिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून प्रत्येकाला बंधुतेचे तिरंगी वस्त्र, संविधान उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. गुलाबराजा फुलमाळी यांनी आभार मानले.

अग्निवीर भरती रॅली (पुरुष आणि महिला) , अहमदनगर येथे 14 ते 27 डिसेंबर 2024 पासून.

अग्निवीर आर्मी भरती रॅली (पुरुष आणि महिला) ए.टी यांत्रिकी पायदळ केंद्र आणि शाळा, अहमदनगर

पुणे-महाराष्ट्र राज्यातील सहा जिल्ह्यांतील शॉर्टलिस्ट केलेल्या पुरुष उमेदवारांसाठी (अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर) आणि शॉर्टलिस्ट केलेल्या महिला उमेदवारांसाठी , मुख्यालय रिक्रूटिंग झोन , पुणे यांच्या अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा होत असून  दमण, दीव आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये होत आहे 14 ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल, अहमदनगर (पंकज जोशी स्टेडियम) येथे आयोजित करण्यात आली आहे .अहमदनगरचे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी संमती दिली आहेअहमदनगर येथे भरती रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे

प्रवेशपत्रे जारी करण्यात आली आहेत आणि आगामी भरती रॅलीसाठी उमेदवार उत्साहित आणि प्रेरित आहेत. या भरती रॅलीमध्ये जवळपास 6000 निवडलेले उमेदवार सहभागी होण्याची शक्यता आहे. रॅलीचे आयोजन 1.6 किमी धावणे, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या आणि वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असेल. लष्करी डॉक्टरांची एक समर्पित टीमही वैद्यकीय तपासणीसाठी अहमदनगर येथे ठेवण्यात येणार आहे . उमेदवारांना सूचनांमध्ये दिल्याप्रमाणे सर्व संबंधित कागदपत्रे मिळविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Agniveer Recruitment Rally (Men and Women), Ahmednagar wef 14 to 27 Dec 2024.

Agniveer Recruitment rally under the aegis of HQ Recruiting Zone, Pune for the Shortlisted Male Candidates of six districts (Ahmednagar, Beed, Latur, Dharashiv, Pune & Solapur) of Maharashtra State & shortlisted Female Candidates, who are domicile of Maharashtra, Gujarat, Goa & UTs of Daman, Diu & Dadra & Nagar Haveli, is being conducted at Mechanised Infantry Centre & School, Ahmednagar (Pankaj Joshi Stadium) with effect from 14 to 27 December 2024.District administration of Ahmednagar and Local Military Authorities have consentedfull support for successful conduct of Recruitment Rally at Ahmednagar.

Admit Cards have been issued and candidates are excited and motivated for the upcoming Recruitment Rally. Close to 6000 shortlisted candidates are likely to participate in the said Recruitment Rally. The conduct of the Rally will comprise of 1.6 Km Run, Physical Fitness Tests, Physical Measurement Tests and Medicals. A dedicated team of Army doctors will also be placed at Ahmednagar for the conduct of Medicals. Candidates have been advised to get all relevant documents as given out in instructions.

देशातील सर्व तीर्थ ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे-हभप यशोधन महाराज साखरे

आळंदीत जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन

पुणे, दि. २६ नोव्हेंबर: “आळंदी ही ज्ञानाची भूमी आहे. हे तीर्थ क्षेत्र मानवाला भवसागरातून पार करून परमार्थाकडे घेऊन जाते. त्यामुळेच देशातील सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे या उद्देशाने डॉ. विश्वनाथ कराड अविरत कार्य करीत आहेत. ते सहिष्णुतेचे खरे आदर्श व्यक्तीमत्व आहेत.” असे विचार हभप यशोधन महाराज साखरे यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधन पर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी श्री क्षेत्र देहू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, आळंंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगावकर, अशोक उमरगेकर, विठ्ठलराव काळोखे, बाळासाहेब काळोखे व गणपतराव कुर्‍हाडे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी  प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच सौ. उषा विश्वनाथ कराड, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण उपस्थित होते.
हभप यशोधन महाराज साखरे म्हणाले,” सहिष्णूता ही व्यापक असून त्यात विश्व चिंतनाचा समावेश आहे. यामुळे सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ व्हावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी कार्य करावं. आळंदीत ज्ञान, नाद, विज्ञान आणि ब्रह्म याची अनुभूती होते. येथील घाटांची निर्मिती करण्यास करण्यास डॉ. कराड यांनी जे सोसले ते पाहता ते खरे सहिष्णूतेचे आदर्श आहेत.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”जगातील सर्व तीर्थ हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे या दिशेने कार्य करीत आहोत. अहंकाराचा वारा न लागो अंगी या नुसार आळंदी, देहू, पंढरी ते देवभूमी बद्रीनाथ येथे घडलेले कार्य हा माऊलीचा प्रसादच आहे. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोग हे याचेच फलीत आहे. बद्रीनाथ येथील सरस्वती मंदीराजवळ स्वर्गारोहणाचा मार्ग बनून नवा इतिहास घडला आहे.”
त्यानंतर डॉ. संजय उपाध्ये, सुरेश काका वडगावकर यांनी विचार मांडले.
डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी प्रस्तावना केली व नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा:विधानसभा विसर्जित, नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग

मुंबई-महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. नव्या सरकारचा शपथविधी होई पर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर राहतील.

उदयोन्मुख भारतीय तथा महाराष्ट्राची बॅडमिंटन स्टार मालविका बनसोड जेटसिंथेसिसच्या टॅलेंट मॅनेजमेंट डिव्हिजनमध्ये, रिअल स्पोर्ट्समध्ये सहभागी

0

नागपूरचा 23 वर्षीय शटलर रिअल स्पोर्ट्स रोस्टरमध्ये सहभागी झाली असून, ज्यामध्ये बॅडमिंटनची दिग्गज सायना नेहवाल आणि वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

मुंबई: तरुण आणि उदयोन्मुख भारतीय क्रीडा प्रतिभेची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना सर्वसमावेशक पाठिंबा देण्यासाठी समर्पित, क्रीडा व्यवस्थापन, डिजिटल मनोरंजन व तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीवर असलेल्या जेटसिंथेसिसने भारतीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोडचे त्यांच्या प्रतिभा व्यवस्थापन कंपनी, Real Sports मध्ये स्वागत केले आहे.

सायना नेहवाल, क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या आयकॉन्सचा समावेश असलेल्या तारका रोस्टरमध्ये ही नवीन भर, उत्कृष्ट क्रीडापटूंना सक्षम बनविण्याच्या रिअल स्पोर्ट्सच्या वचनबद्धतेला बळकटी देते.
23 व्या वर्षी मालविकाने भारतीय बॅडमिंटनच्या सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक म्हणून तिचे स्थान निर्माण केले आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) द्वारे जागतिक क्रमवारीत 34 व्या क्रमांकावर असलेल्या मालविकाने हायलो ओपन फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय म्हणून या वर्षी इतिहास रचला आणि सुपर 1000 चायना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्या एलिट रँकमध्ये सामील झाली. पाच आंतरराष्ट्रीय विजेतेपदांसह, मालविका भारतीय क्रीडा उत्कृष्टतेच्या नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करते.

रियल स्पोर्ट्ससोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना मालविका बनसोड म्हणाली, “माझ्या कारकिर्दीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर रियल स्पोर्ट्स कुटुंबात सामील होण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. त्यांच्या कौशल्य आणि दूरदृष्टीने, मला खात्री आहे की, आम्ही आमच्या सामाईक उद्दिष्टे आणि मूल्यांशी जुळणाऱ्या नवीन संधी शोधू शकतो. मी डायनॅमिक भागीदारी आणि भविष्यात प्रभावी सहयोग निर्माण करण्याच्या संधीची वाट पाहत आहे.”

याबद्दल बोलताना, जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि सीईओ राजन नवानी म्हणाले, “जेटसिंथेसिसमध्ये देशाला प्रेरणा देणाऱ्या खेळाडूंसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मालविकाचा प्रवास ही प्रतिभा, धैर्य आणि चिकाटीची कहाणी आहे. अशा खेळाडूच्या पाठिशी रिअल स्पोर्ट्स उभी राहते. भारतातील जागतिक दर्जाच्या खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या आणि त्यांचे पालनपोषण करण्याचे आमचे मिशन आहे. आमचा एकात्मिक दृष्टिकोन मैदानावर आणि मैदानाबाहेर, या ताऱ्यांसाठी नवीन संधी कशा प्रकारे निर्माण करू शकतो, हे अनेक खेळांमधील खेळाडूंसोबतच्या आमच्या भागीदारीने दाखवून दिले आहे.”

रिअल स्पोर्ट्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री. तारिश भट्ट म्हणाले की, “मालविका बनसोड भारतीय बॅडमिंटन प्रतिभेच्या पुढच्या लाटेचे प्रतिनिधित्व करते. रिअल स्पोर्ट्समध्ये तिचे स्वागत करताना आम्हाला सन्मान वाटतो. आमचे ध्येय क्रीडापटूंना पारंपरिक भागीदारींच्या पलीकडे जाणाऱ्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना क्रीडा परिसंस्थेवर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्यात मदत करणे हे आहे. मालविकासोबत तिच्या आणि तिच्या वाढत्या चाहत्यांसाठी अर्थपूर्ण प्रतिबद्धता वाढविण्याची अपार क्षमता आम्हाला दिसत आहे.”
रिअल स्पोर्ट्सने क्रीडा प्रतिभा व्यवस्थापनामध्ये खेळाडूंना स्ट्रॅटेजिक ब्रँड सहयोग, सर्वांगीण करिअर डेव्हलपमेंट आणि अत्याधुनिक डिजिटल प्रतिबद्धता साधने उपलब्ध करून देऊन कामगिरीचा एक मजबूत रेकॉर्ड तयार केला आहे.

जेटसिंथेसिस विविध उपक्रमांद्वारे भारतातील तळागाळातील युवा क्रीडा प्रतिभा शोधण्यात आणि त्यांना पाठिंबा देण्यात आघाडीवर आहे. रिअल स्पोर्ट्स तरुण, आश्वासक प्रतिभेची ओळख आणि पालनपोषण करते, या व्यतिरिक्त ते महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील रत्नागिरी जेट्सचे मालक व व्यवस्थापन करते. अझीम काझी, निखिल नाईक, किरण चोरमले यांसह रत्नागिरी जेट्सने आपल्या संघातील काही भारतातील सर्वात रोमांचक क्रिकेट प्रतिभेचा गौरव केला आहे.
जेटसिंथेसिस तिच्या प्रमुख ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) सह विविध उपक्रमांसह भारतात ईस्पोर्ट्सच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठीही वचनबद्ध आहे.

कविता, गझला, रुबायांवर आधारित ‌‘तेव्हाची गोष्ट‌’ सोमवारी

पुणे : संवेदनेची समृद्ध भावकविता लिहिणारे मराठीतील ज्येष्ठ कवी हिमांशू कुलकर्णी यांच्या कविता, गझला आणि रुबायांवर आधारित ‌‘तेव्हाची गोष्ट‌’ या कार्यक्रमाचे सेतू अभिवाचन मंच, पुणेतर्फे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि श्रीराम लागू रंग-अवकाश यांच्या स्टेज इज युवर्स या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रम सोमवार, दि. 2 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीराम लागू रंग-अवकाश हिराबाग, टिळक रोड येथे होणार आहे. कार्यक्रमाचे संहिता लेखन दीपाली दातार यांनी केले असून दिग्दर्शन अनिरुद्ध दडके यांचे तर संगीत राघवेंद्र जेरे यांचे आहे.
रुबाया, गझला आणि कवितांमधून तरल भावात्म, सामाजिक प्रेम, विरह, चिंतनशील जाणिवा हिमांशू कुलकर्णी यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या गझलमांधून सामाजिक, राजकीय वास्तव आणि सामान्य माणसाचे जगणे यातला अंतर्विरोध समर्थपणे अभिव्यक्त झाला आहे. मराठी मातीचा आणि भारतीय संस्कृतीचा गंध त्यांच्या मुक्तशैलीतील रुबायांमधून अनुभवायला मिळतो. हिमांशू कुलकर्णी यांच्या कविता, गझला आणि रुबयांचे अभिवाचन गीतांजली अविनाश जोशी, अनिरुद्ध दडके आणि दीपाली दातार करणार आहेत. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे आणि कवी हिमांशू कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

लैंगिक अत्याचाराच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या: धनकवडीतील तरुणाला अटक


पुणे- 26 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार, तसेच अश्लील कृत्य केल्याने 15 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आराेपी तरुणाला अटक केली. आराेपी विरुध्द बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संकेत राजेश माेहिले (वय 26, रा. 318 भवानी पेठ आणि मोहननगर, धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिडित मयत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. पीडित मुलगा आणि आरोपी संकेत मोहिले यांची एकमेकांशी ओळख होती. मोहिलेने मुलाला आमिष दाखवून एक वर्षापूर्वी तळजाई टेकडी परिसरात बळजबरीने नेले. त्याठिकाणी त्याने मुलासाेबत अश्लील कृत्य, तसेच लैंगिक अनैसर्गिक अत्याचार केले. त्याचप्रमाणे मोहिलेने मोबाईलवर पिडित मुलाची आक्षेपार्ह फाेटाे काढले. त्यानंतर त्याने मुलाला ब्लेकमेल करत धमकाविण्यास सुरुवात केली.मुलाच्या मोबाइल क्रमांकावर आराेपी वेळाेवेळी संपर्क साधून त्याला धमकावत हाेता.सततच्या त्रासामुळे मुलाने 15 नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे याबाबत उशिराने तक्रार दिली. पोलिस चौकशीत मोहिलेने मुलावर लैंगिक अत्याचार करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याप्रकरणी आराेपी मोहिलेला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून,याबाबत सहायक पोलिस निरीक्षक एस पवार पुढील तपास करत आहेत.

पुणे शहर पोलिसांची मुंबई २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांना मानवंदना

सारसबागेत चित्रकलेतून ६ हजार चिमुकल्यांनी  वाहिली आदरांजली 

पुणे :  जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी… या भावना व्यक्त करीत मुंबईमधील २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना पुणे पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला. पोलिसांसह ६ हजार शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. 

मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम विभागचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल, पोलीस उपायुक्त आर. राजा, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष पराग शिंदे,अमर लांडे, उमेश कांबळे, सचिन ससाणे, विक्रांत मोहिते, राजाभाऊ महाडिक, भूमी पंडित, वैष्णवी सासणे उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले. 

चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण गिरीश चरवड, संदीप गायकवाड नितीन होले, समीर धर्माधिकारी, रुपेश पवार यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले.

“द पोएट्री रेन ऑफ भारत” कवी स्नेह संमेलन संपन्न.

पुणे (दि.२६) ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन इंडिया आणि सुबुद्धी लिटरेचर सर्कल श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने “द पोएट्री रेन ऑफ भारत हा कार्यक्रम भांडारकर संस्थेच्या आवारात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर मुळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य को ऑपरेटिव्हचे सुशील जाधव उपस्थित होते. या प्रसंगी भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील कवींचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.लोकमान्य कल्चरल फौंडेशनच्या वतीने मुकुल मारणे यांनी सर्वांचे स्वागत केले.या प्रसंगी आभा औटी आणि सहकार्यांनी गणेश वंदना सादर केली कल्याणी देशपांडे यांनी सतार तबल्यावरती समीर पुणतांबेकर यांची साथ होती. या प्रसंगी श्रीलंकेतून सहभागी झालेल्या सर्व कवींनी दोन दिवसाच्या पुणे भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.सुशील जाधव,किरण केंद्र,भांडारकर संस्थेचे सुधीर वैशंपायन यांची उपस्थिती होती.लोकमान्यच्या किरण ठाकूर यांचेही विशेष आभार त्यांनी मानले.

क्रीडा भारतीच्या दोन क्रीडा केंद्राचा उद्घाटन समारंभ

पुणे-
क्रीडा भारतीच्या वतीने क्रीडा भारती व दिव्यांग कल्याण केंद्र, वानवडी,पुणे येथे शुटींग रेंज सुरु करण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ्या क्रीडा मैदानावर क्रीडा केंद्र सुरु करण्यात आले आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ नोव्हेंबर रोजी म.ए.सो.मुलांचे (भावे) विद्यालय पुणे या ठिकाणी दुसरे क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले.
या क्रीडा केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्य व क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे सदस्य व म ए सो मुलांचे विद्यालय या शाळेच्या शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस मल्लखांब खेळाची प्रात्यक्षिके SVM अकादमी (कृष्णा काळे सहकार नगर) यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.
क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष विजय पुरंदरे यांनी क्रीडा केंद्र सुरू करण्यामागची भूमिका विषद केली. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे विजय भालेराव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे शेवटी भाऊसाहेब खुने सहसचिव क्रीडा भारती पुणे महानगर यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजपूत यांनी केले.
२) तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी कर्वेनगर येथील महिलाश्रम हायस्कूल तिसरे क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले.तसेच मुलांना व मुलींना बालपणापासूनच खेळण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून बाल क्रीडांगणचे उद्घाटन करण्यात आले.
या क्रीडा केंद्राचे उद्घाटन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवी देव व प्रदीप वाजे सहसचिव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदीप वाजे व क्रीडा भारतीचे राष्ट्रीय महामंत्री राज चौधरी यांनी उपस्थित सर्व विध्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजपूत यांनी केले तर कबड्डी खेळाडू ज्योती भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.
या क्रीडा केंद्रामध्ये मल्लखांब, क्रिकेट,कबड्डी आणि बाल क्रीडांगण अशा चार खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या सर्व उद्घाटन प्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि पुणे महानगराच्या व पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या उपाध्यक्ष श्रीमती शकुंतला खटावकर,क्रीडा भारतीचे अध्यक्ष शैलेश आपटे, क्रीडा भारतीचे पुणे महानगराचे मंत्री आणि अखिल भारतीय कार्यालयीन प्रमुख विजय रजपूत,हरिश अनगोळकर, अनुजा दाभाडे, मल्लखांब खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते सत्यजित शिंदे,आशिष वैद्य,स्वाती बेने,दिपक मेहेंदळे,योगीराज टाकले, सुवर्णा मांढरे,कृष्णा काळे खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.

यंदाची ३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, पुढील रविवारी दिनांक १ डिसेंबर रोजी

पुणे : यंदाची ३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२४, पुढील रविवारी दिनांक १ डिसेंबर रोजी पहाटे सुरू होणार आहे. यात भाग घेणारऱ्या इंटरनॅशनल तसेच  भारतीय धावपटुंसाठीआणि पुणेकर प्रेक्षकांसाठी ही मॅरेथॉन एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे वचन घेऊन येत आहे. या स्पर्धे मुळे पुण्यात निर्माण होणारे उत्साह पूर्ण वातावरण, पुण्याचा समृध्द सांस्कृतिक वारसा आणि पुणेकरांची खेळांची आवड याचे दर्शन होत असते.

यावर्षी या स्पर्धेचे ३८ वे वर्ष आहे. करोना सारखे एक दोन अपवाद वगळता , सन १९८३ पासून ही स्पर्धा सातत्याने पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट तर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (एम्स)समितीने त्यांच्या वार्षिक कॅलेंडर मध्ये आपल्या मॅरेथॉन चा कायम स्वरुपी समावेश केला असून भारतातील सर्वात जुनी मॅरेथॉन असा “फ्लॅग शिप” चा मान हिला मिळाला आहे.

४२.१९५ किमी ची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पहाटे ब्राह्म मुहूर्तावर ३ वाजता सणस मैदानावरून सुरू होईल, त्यानंतर पहाटे ३.३० वाजता हाफ मॅरेथॉन २१.०९७५ किमी, सकाळी ६.३० वा. १० किमी
तसेच ७ वा. ५ किमी ची शर्यत ( सर्व रेसेस पुरुष आणि महिला गट) आणि सकाळी ७.१५ वा. ३ किमी ची व्हील चेअर  अशा क्रमाने रेसेस सोडण्यात येतील.

     दरवर्षी प्रमाणे च हजारो पुणेकर क्रीडा रसिकांनी सणस मैदान येथे एकत्र येणे अपेक्षित आहे.त्यामुळे सहभागी होणाऱ्या धावपटूंना आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल आणि ते त्यांची सर्वोत्तम
वेळ नोंदवतील. पुणेकर lखालील रेस मार्गावर उभे राहून त्यांना प्रोत्साहित करू शकतील.

स्पर्धा मार्ग  : प्रारंभ सणस मैदानात आतील ट्रॅक वरून होईल ,सारसबाग मार्गे महालक्ष्मी चौक उजवी कडे वळून सरळ दांडेकर ब्रीज चौक मार्गे सिंहगड रस्ता, गणेश मळा, विट्ठलवाडी,आनंद हॉल, नांदेड सिटी चौक ,उजवी कडे वळून नांदेड सिटी मध्ये आत २ किमी जाऊन ( १०.५ किमी अंतर जन) परत याच मार्गे सणस मैदानावर एक फेरी पूर्ण करून दुसरी फेरी घेतील ( पूर्ण मॅरेथॉन साठी). इतर स्पर्धा याच मार्गावर आयोजित केल्या जातील ,त्यांचे टर्निंग पॉईंटस वेगळे असून तेथून धावपटू परत सणस मैदानात येऊन स्पर्धा समाप्त करतील.स्पर्धेत सहभगी होणाऱ्या खेळाडूंसाठी सुरक्षितता तसेच कोणताही त्रास होणार नाही, सहभागाचा आनंद मिळेल यासाठी संयोजन समिती तर्फे खालील सोयी, सुविधा करण्यात येत आहेत.

वैद्यकीय व्यवस्था समिती  या समितीत १५० डॉक्टर्स आणि २५० नर्सिंग, फिजीओ स्टाफ , 108 नंबर च्या १० ॲम्ब्युलन्स , सणस मैदानात १५ बेडचे तात्पुरते हॉस्पिटल,याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर हे डॉक्टर्स , 108 ॲम्ब्युलन्स एम. इ.एम.एस. नर्सिंग स्टाफ खेळाडूंची काळजी घेतील. भारती नर्सिंग कॉलेज, संचेती फिजिओ कॉलेज,सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ,नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, विश्वराज  नर्सिंग कॉलेज, आरोग्यम वैद्यकीय पथक, नवी मुंबई यांची पथके यांचा समावेश यात आहे.

सणस मैदान आणि संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमी वर पिण्याचे पाणी,
एक डॉक्टर आणि ३ नर्सिंग स्टाफ , १ ॲम्ब्युलन्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक २.५ किमी वर , फिडींग बूथ ,एनर्जी ड्रिंक, फळे, ,स्पंजिंग (वॉटर बूथ )आणि इतर सर्व  व्यवस्था ” वर्ल्ड ॲथलेटिक्स”  आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघ ,नवी दिल्ली यांचे नियमां नुसार आणि अटिं नुसार करण्यात आली आहे.

एम्स आंतरराष्ट्रीय  संस्थे तर्फे स्पर्धा मार्ग हा मान्यता प्राप्त आहे.

रनर ड्यूड्स, शिव स्पोर्ट्स, रनींग पंटर्स, पॉवरफुल  अल्ट्रा रनर्स, बालेवाडी रनर्स, पीसीएमसी रनर्स, विश्व रनर्स, पी.आर.साऊथ ग्रुप,
नांदेड सिटी रनर्स ,अबकड रनर्स आदि पुण्यातील १२ हौशी धावपटू संस्थांनी प्रत्येक किमी वरील हायड्रेशन पॉईंट्स चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेतली आहे. यांचे धावपटू रेसेस मध्ये भाग घेऊन स्पर्धेच्या यशात सुध्दा हातभार लावतील. “आरोग्यम संस्था ” नवी मुंबई यांचे तर्फे त्यांचे खास धावपटूं साठी तयार केलेले  एनर्जी ड्रिंक देण्यात येईल.

पुणे पोलिस दलातील तसेच ट्रॅफिक ब्रांच पुणे चे आधिकारी आणि
कॉन्स्टेबलस हे रात्री पासून ते स्पर्धा संपे  पर्यंत वरील मार्गावर सुरक्षा, बंदोबस्तआणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था दरवर्षी प्रमाणे उत्तम रित्या करणार आहेत.

पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे ५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी ,जजेस व  वेळाधिकारी , स्पर्धा नियमांनुसार तांत्रिक व्यवस्था पार पाडतील. त्यांची नेमणूक प्रारंभ व अंतिम रेषा, सर्व रेसेचे टर्निंग पॉईंटस वर , स्पर्धा मार्गावर निरीक्षण करणे आणि आंतिम निकाल बनविणे साठी केली जाईल.

या स्पर्धेसाठी संपूर्ण मार्गावर इलेक्ट्रॉनिक्स टायमिंग सिस्टीम बसवण्यात येईल. प्रत्येक धावपटूच्या स्पर्धा क्रमांकाच्या मागील बाजूस लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स चीपशी ती जोडली जाईल आणि सर्व खेळाडूंना त्यांचे वैयकतिक टायमिंग दिले जाईल.

गेली तीन वर्षे  सायकल पायलटींग व्यवस्था संपूर्ण मार्गावर ,शर्यत संपेपर्यंत , ” सायक्लोहोलिक्स” पुणे संस्थेचे ५० सायकल पायलटस ॲड. सम्राट रावते यांचे नेतृत्वा खाली करतात. यावर्षी सुध्दा त्यांचे पथक येत आहे. पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे १० मोटर सायकल पायलट धावपटुंनामार्गदर्शक म्हणून स्पर्धे पुढे नियमा नुसार असतील.

या स्पर्धेत सर्व गटात मिळून संपूर्ण  देशातील ८ ते १० हजार खेळाडू सहभागी होतील. इथीओपिया,केनिया टांझानिया , नेपाळ इ. परदेशातील ७० दिग्गज पुरुष, महिला धावपटू सहभागी होतील.

त्यांना ज्योती गवते , मनीषा जोशी या महाराष्ट्राच्या आंतर राष्ट्रीय महिला धावपटू तसेच सेनादल,पोलिस दलातील धावपटू कडवी झुंज देतील.तसेच कारगिल (लडाख) मध्ये झालेल्या  ” सरहद कारगिल
इंटर नॅशनल मॅरेथॉन २०२३ मधील विजेते  तसेच जून २०२४ मध्ये द्रास येथे  पार पडलेल्या ” सरहद शौर्याथॉन २०२४ चे विजेते महिला ,पुरुष धावपटू सुध्दा या स्पर्धेत  सहभागी होत आहेत.३८ व्या पुणे आंरराष्ट्रीय मॅरेथॉन मधील विजेत्या धावपटूं ना बांबू सोसायटी ऑफ इंडिया तर्फे बांबू पासून तयार केलेल्या ट्रॉफीज देण्यात येतील, ज्या “टीकाऊ आणि पर्यावरणीय जबाबदारी” चे प्रतीक असेल आणि हेच या वर्षीचे ध्येय वाक्य आहे.पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन ने सातत्याने देशभरातील आणि परदेशी अव्वल धावपटुंना नेहमीच आकर्षित केले आहे.यंदाची स्पर्धा त्याला अपवाद राहणार नाही. स्पर्धेचा सपाट आणि वेगवान मार्गावर त्यांची
वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून आणि इतर आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांसाठी पात्र ठरण्याची एक आदर्श संधी देत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघ,नवी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे.पुणे महानगर पालिके तर्फे विजेत्यांना दरवर्षी प्रमाणे रोख पारितोषिके देण्यात येतील.

जोडीदार पाठीशी उभा राहिला तर पत्नीही होते यशस्वी : सुकन्या कुलकर्णी-मोने

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सुकन्या मोने आणि संजय मोने यांचा यशवंत-वेणू पुरस्काराने गौरव
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा 24वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे : प्रत्येक क्षेत्रात मदत करणारा, पत्नीच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा जोडीदार मिळाल्यास पत्नीलाही तिच्या कार्यक्षेत्रात यश मिळू शकते हे संजय मोने यांनी सिद्ध केले आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक क्षेत्रातील आमची वाटचाल समांतर होत असताना प्रगतीही होत गेली, अशी प्रांजळ भावना प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी व्यक्त केली तर परिचयात सांगितलेले गुणांचे कोठार माझ्यात नाही, पण हे गुण भविष्यात माझ्यात नक्की येतील, अशी मिश्लिक टिप्पणी संजय मोने यांनी व्यक्त करत पत्नीमुळे मला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत-वेणू पुरस्काराने प्रसिद्ध अभिनेते संजय मोने आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांचा सोमवारी गौरव करण्यात आला. त्या वेळी सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा 24वा वर्धापन दिन यानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे 7वे वर्ष असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी, उद्योजक अमित गोखले, दीपक गुप्ते, मदन गायधने मंचावर होते. मानपत्र, शाल आणि पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सुहास जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

सुकन्या मोने म्हणाल्या, यशवंत-वेणू पुरस्कार मिळाल्याने जबाबदारीची जाणीव झाली आहे तसेच नाट्य-कला क्षेत्रात, रंगमंचावर पुन्हा एकदा कार्यरत होण्याची उभारी निर्माण झाली आहे. माणूस म्हणून प्रिय असलेल्या लाडक्या सुहासताईंच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे.
संजय मोने म्हणाले, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पण भावनिक नात्याने बांधल्या गेलेल्या दाम्पत्याचा यशवंत-वेणू पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. पुरस्काराविषयी आभार व्यक्त करून नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

निदान रुमाल तरी द्या..
सुकन्या मोने यांचा सत्कार करताना पुणे या माहेरघरातून त्यांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. तर माझा सत्कार करताना शाल देण्यात आली. जी मुंबईत घालून फिरलो तर लोक मला डोक्यावर पडला आहेस का? असे विचारतील. त्यामुळे मला रुमाल तरी द्या, असे म्हटल्यानंतर सुकन्या मोने म्हणाल्या, पुणेकर रसिकांना माहित आहे की, मला मिळालेली साडी नेसून तू रंगमंचावर वावरू शकतोस. या शाब्दिक कोट्यांवर पुणेकर रसिकांनी टाळ्यांची दाद दिली.

पुण्याने मला जीवनात उभे केले : सुहास जोशी
पुणेकर प्रेक्षक मला मनापासून आवडतात असे आवर्जून सांगून सुहास जोशी म्हणाल्या, माझा जन्म पुण्यातील असल्यामुळे आणि माझी जडणघडण पुण्यात झाल्यामुळे मला पुण्याविषयी विशेष ममत्त्व आहे. पुण्यात येताना माझ्या जडणघडणीतील अनेक वास्तू पाहून मला जुने दिवस आठवले. पुण्याने मला खूप काही दिले आहे, जीवनात उभे केले आहे. पुण्याहून सुरू झालेला नाट्यक्षेत्रातील प्रवास दिल्ली मार्गे मुंबईत येऊन स्थिरावला. माझ्या यशात माझ्या पतीचा फार मोठा वाटा आहे. यामुळेच सांस्कृतिक क्षेत्रातील जोडप्याचा सत्कार यशवंत-वेणू पुरस्काराने होत आहे ही माझ्यासाठी मोलाची गोष्ट आहे. सुकन्या आणि संजय हे मला मुलांसारखे आहेत. त्यांना पुरस्कार देताना त्यांच्या बरोबर अभिनय केलेल्या नाटक-मालिकांमधील आठवणी जाग्या झाल्या.

सुरुवातीस सुनील महाजन यांनी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेविषयी तर समीर हंपी यांनी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या उपक्रमांची सविस्तर माहिती सांगितली. मान्यवरांचे स्वागत सुनील महाजन, अमित गोखले, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते यांनी केले. सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले तर आभार सत्यजित धांडेकर यांनी मानले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‌‘तो राजहंस एक‌’ या संगीतकार श्रीनिवास खळे संगीत रजनी कार्यक्रमात मंदार आपटे आणि मनिषा निश्चल यांनी गीते सादर केली. स्मिता गवाणकर यांनी निवेदन केले..

‘इच्छामरण‌’ जीवनाला भिडणारी साहित्यकृती : संजय सोनवणी

पुणे : वैद्यकीय क्षेत्राने संशोधन आणि उपचारात भरारी घेतली असली तरी नैतिकतेचा होत असलेला ऱ्हास ही जागतिक पातळीवरील समस्या आहे. वैद्यक क्षेत्रात असलेली अनैतिकता बघून भारतातही इच्छामरण असले पाहिजे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले. आयुष्यातील सुख-दु:खाचे अवडंबर न करता संगीता लोटे व्यक्त झाल्या असून त्यांच्या लिखाणात साहित्यसौंदर्यही आहे. ‌‘इच्छामरण‌’ ही जीवनाला भिडणारी साहित्यकृती आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

संगीता भारत लोटे लिखित ‌‘इच्छामरण‌’ या सत्य घटनेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सोनवणी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. भावार्थ, कोथरूड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक, समीक्षक चंद्रकांत जोशी, मराठी भाषा साहित्य कला संवर्धन मंडळाचे अध्यक्ष हनुमंत कुबडे, अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी, निवृत्त पोलिस अधिकारी संभाजी सावंत, न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या अमृता तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरीबांचे डॉक्टर म्हणून डॉक्टर भारत लोटे यांची ओळख होती. रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दल त्यांना राज्य शासनाचा मानाचा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. भारत लोटे यांच्यावर 2017 मध्ये पुण्यातील एका रुग्णालयात चुकीचे उपचार करण्यात आले. त्यामुळे झालेला शारीरिक व मानसिक त्रास, दवाखान्याकडून मिळालेली हीन वागणूक, मदतीबाबत शासनाने दाखविलेली अनास्था यामुळे डॉक्टर लोटे यांच्यावर इच्छामरण मागण्याची वेळ आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली होती. याच सत्य घटनेवर आधारित ‌‘इच्छामरण‌’ हे आत्मकथनपर पुस्तक असल्याचे संगीता लोटे यांनी लिखाणामागील हेतू स्पष्ट करताना सांगितले.
वेदना ही साहित्याचा आत्मा आहे, असे सांगून सोनवणी पुढे म्हणाले, भावनांना आवर घालून पुस्तकाचे वाचन केले. आयुष्यात आलेले अनुभव संगीता लोटे यांनी प्रामाणिकपणे मांडले आहेत. ही साहित्यकृती समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
संगीता लोटे यांनी हा अतिशय संवेदनशील विषय प्रभावीपणे मांडला असल्याचे अनिल कुलकर्णी म्हणाले. मानसिक, वैचारिक दृष्टीकोनातून या पुस्तकाचे वाचन झाले तर प्रत्येकाला आवडेल, असेही ते म्हणाले. संभाजी सावंत म्हणाले, ज्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्यांनाच उपचारासाठी इतरांसमोर याचना करावी लागली या सारखी दुसरी दु:खदायक घटना नाही.
इच्छामरणाचा अधिकार असला पाहिजे, असे आग्रही मत व्यक्त करून चंद्रकांत जोशी म्हणाले, जीवनाचा सखा लौकिक रूपात मिळालेला असतो; पण तो खऱ्या अर्थाने रोमारोमात भिनलेला असतो. जीवनातील अगतिकता ‌‘इच्छामरण‌’ या आत्मकथनपर पुस्तकातून प्रभावीपणे मांडली आहे. हनुमंत कुबडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक अमृता तांदळे यांनी तर सूत्रसंचालन पूनम अहिरे यांनी केले.