Home Blog Page 676

ठाकरेंनी विधानसभा लढून आमदार होऊन दाखवावे! चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान

· उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून!

चंद्रपूर-देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, आमदार होऊन नंतर आरोप करावे असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून झाला आहे, असे ते म्हणाले.

ते चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जिंकली नाही, आमदार म्हणून निवडून आले नाही. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मागच्या दरवाज्याने आमदारकी मिळवली. याउलट देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत, ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व कुणी स्वीकारायला तयार नाही. म्हणूनच त्यांचे आमदार बाहेर पडले.
ते म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे वाघ होते. हिंदू विचार महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उध्दव ठाकरे ही एकमेव ओळख त्यांची आहे. मात्र त्यांनी हिंदुत्वाचा विचार संपविला आहे. त्यामुळेच त्यांना काँग्रेस सोबत जावे लागले आहे. शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगवास भोगावा लागलेल्या अनिल देशमुख व दीडशे कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात आमदारकी गमावलेल्या सुनील केदार यांची सोबत त्यांना करावी लागत आहे. महाआघाडीने हार पत्करली आहे.

राहुल गांधीचा खोटेपणा घरोघरी सांगणार
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असे सांगितले. अमेरिकेत गेल्यावर आरक्षणाची गरज नाही असे सांगितले, त्यांचा हा खोटेपणा महाराष्ट्रातील प्रत्येक घरी जाऊन सांगणार आहोत. विरोधकांनी जनतेचा विश्वास गमावला असल्याचेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातील भगिनी सोडणार नाहीत.

छत्रपतींचा एकेरी उल्लेख

सुनील केदार यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. ते बोलत असताना ठाकरे केवळ बघत राहिले, असा आरोपही श्री बावनकुळे यांनी केला.

बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद ३ ऑक्टोबर रोजी आयोजन

0

मुंबई दि. ३० : राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवार ३ ऑक्टोबर २०२४ रोजी ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, छत्रपती संभाजी महाराज चौक, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणेचे कार्यकारी संचालक, संजय कदम यांनी दिली.

राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत. सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा तसेच या परिषदेस राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य हेही उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, बाजार समितीनिहाय विकास आराखडा, बाजार समित्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी व उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादीबाबत चर्चा अपेक्षित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणेचे कार्यकारी संचालक, संजय कदम यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे मार्फत राज्यातील ३०५ बाजार समित्या व त्यांचे ६२३ उप बाजारांचे माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसीत करण्याचे कामकाज गेल्या ४० वर्षापासून सुरु आहे. हे करीत असताना राज्यात कृषी पणन व्यवस्थेत अद्ययावतपणाबरोबरच सुसूत्रता आणि समन्वयता आणण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय नियोजनाचे कामकाजही करण्यात येत आहे. कृषि पणन मंडळाने कृषि पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण, सुधारणा आणण्याबरोबरच राज्यात कृषि पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध प्रकल्प राबविणे, योजना राबविणे, नवीन कार्यक्रम आखणे तसेच शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांच्या विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्यातील बाजार समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तसेच राज्यात कृषि मालाच्या निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करुन त्यांचेमार्फत निर्यातवृध्दी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.

समाज कल्याण विभागामार्फत मंगळवारी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन

पुणे, दि. ३०: समाज कल्याण विभागामार्फत १ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

या दिवशी ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक कक्षाचे उद्धाटन करण्यात येणार असून कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त बाळासाहेब सोळंकी व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
0000

तुषार कपूरचे फेसबुक अकाउंट हॅक:स्टेटमेंट जारी करून चाहत्यांना अलर्ट

0

मुंबई- गोलमाल, द डर्टी पिक्चर, क्या कूल हैं हम यांसारख्या चित्रपटांचा भाग असलेला अभिनेता तुषार कपूरचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. अभिनेत्याने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. अभिनेत्याने लिहिले आहे की त्याची टीम खाते पुनर्प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

तुषारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले, हॅलो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझे पब्लिक आणि प्रायव्हेट अशा दोन्ही प्रकारचे फेसबुक अकाउंट कॉम्प्रमाइज झाले आहेत. यामुळे मी काही काळ निष्क्रिय होतो. माझी टीम आणि मी या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आणि खाते पुनर्प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.त्यांनी पुढे लिहिले की, आम्ही या काळात तुमचा संयम आणि समजूतदारपणाची प्रशंसा करतो आणि तुमच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची अपेक्षा करतो. तुमच्या सततच्या समर्थनासाठी धन्यवाद.

कॉंग्रेसकडे महाराष्ट्रात 1688 इच्छुक उमेदवार,उद्यापासून मुलाखती

१ ॲाक्टोबर पासून काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.

ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी, जिल्ह्यात जाऊन घेणार मुलाखती.

नेते १० ऑक्टोबरला मुलाखतीचा गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार

मुंबई, दि. ३० सप्टेंबर २०२४
विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दि. १ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली असून हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेऊन आपला अहवाल देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस पक्षाकडे एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुणे शहर व पुणे ग्रामीण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण, खा. चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे ठाणे जिल्हा, खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे सांगली व सातारा जिल्हा, मुजफ्फर हुसेन यांच्याकडे अहमदनगर आ. कुणाल पाटील यांच्याकडे नाशिक, माजी मंत्री विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे मुंबई शहर, अमित देशमुख यांच्याकडे सोलापूर व कोल्हापूर, डॉ. नितीन राऊत यांच्याकडे वर्धा व यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्याकडे परभणी व हिंगोली, डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेड, प्रा. वसंत पुरके यांच्याकडे अकोला, खा. नामदेव किरसान यांच्याकडे वाशीम, खा. डॉ. कल्याण काळे यांच्याकडे लातूर व बीड, खा. डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे जालना, आ. संग्राम थोपटे यांच्याकडे मुंबई उपनगर, डॉ. वजाहत मिर्झा यांच्याकडे संभाजीनगर, एम.एम. शेख यांच्याकडे धाराशिव, हुसेन दलवाई यांच्याकडे पालघर, शिवाजीराव मोघे यांच्याकडे धुळे व नंदुरबार, सुरेश शेट्टी यांच्याकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड, आ. अभिजीत वंजारी चंद्रपूर व गडचिरोली, सतीश चतुर्वेदी भंडारा व गोंदिया, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्याकडे बुलढाणा व अमरावती, ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हे नेते दिनांक १ ते ८ ॲाक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील व १० ॲाक्टोबर पर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

भोर तालुक्याला शिवसैनिकांच्या मनातील उमेदवार मिळेल गोऱ्हे यांनी केले आश्वस्त :धनुष्यबाणानेच महिलांची सुरक्षा केलीये आणि करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

भोर, दि. २९ सप्टेंबर २०२४: खोटा प्रचार करून निवडणुका जिंकणे हा काँग्रेस पक्षाचा नेहमीच अजेंडा राहिला आहे. नागरिकच्या सेवेला प्राध्यान्य देऊन राजकारण करणे ही भूमिका हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची राहिली असल्याने महायुतीचे हे सरकार देखील जनतेच्या हिताच्या अनेक योजना राविण्यासाठी तत्पर आहे. लाडकी बहीण, वयोश्री, नमो शेतकरी महासन्मान निधी, युवा कार्य प्रशिक्षण, आनंदाचा शिदा, मुख्यमंत्री सहायता निधी आदी योजनांचा लाभ राज्यातील जनता घेत आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कामाचं आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले.

भोर तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा आणि धांगडवाडी ता. भोर येथे आयोजित महाविजय संवाद मेळाव्यात संबंधित करताना डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. या यावेळी पुणें जिल्हा भोर मुळशी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, बारामती जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, जिल्हा संघटीका कांताताई पांढरे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगरे, तालुका संघटिका जयश्री शींडकर, सविता कुंभार, भोर तालुका प्रमुख दशरत जाधव, वेल्हा सुनील शिंडकर, मुळशी दीपक करंजावणे, उपजिल्हाप्रमुख गणेश निगडे, विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, मतदारसंघातील नागरिक, सरकारी योजनांच्या लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बाळासाहेब चांदेरे , सुरेंद्र जेवरे , कांताताई पांढरे यांनी मनोगते व्यक्त केली.
सर्व महिला व शेतकरी यांना शिवसेनेची योजना विषयक पुस्तिका व मुख्यमंत्री यांचे पत्रही वितरित करण्यात आले.
कार्यक्रमांआधी ढोल ताशे व फटाके यांत नीलम गोर्हे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

लोकअदालतीमध्ये वीजबिलांसंबंधी दोन कोटींचे ६७६ प्रकरणे निकाली

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२४: महावितरणच्या पुणे परिमंडलामधील २ कोटी १६ लाख ८५ हजार ३८ रुपयांच्या थकीत वीजबिलासंबंधी न्यायप्रविष्ट असलेली ६७६ प्रकरणे नुकत्याच झालेल्या येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघाली आहेत. यामध्ये सहा वीजचोरीच्या प्रकरणांतील वीजबिल व तडजोड शुल्काच्या ३४ लाख ६५ हजार २९० रुपयांचा समावेश आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने आयोजित नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे परिमंडलातील थकीत वीजबिलांबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये गणेशखिंड मंडलमधील सर्वाधिक ७३ लाख ७० हजार रुपयांची ३२३ प्रकरणे, रास्तापेठ मंडलमधील ५० लाख ९५ हजार ९७६ रुपयांची २६६ प्रकरणे आणि पुणे ग्रामीण मंडलमधील ५७ लाख ५३ हजार ७७२ रुपयांची ८१ प्रकरणे अशी एकूण १ कोटी ६० लाख १२ हजार ४९३ रुपयांची ६७० प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच कलम १३५ मधील एकूण सहा वीजचोरीचे प्रकरणे निकाली काढण्यात आली. संबंधितांनी वीजचोरीच्या बिलांपोटी ३० लाख ७३ हजार २९० रुपये आणि तडजोड शुल्कापोटी ३ लाख ९२ हजार असा एकूण ३४ लाख ६५ हजार २९० रुपयांचा भरणा केला.

महावितरणच्या लोकअदालतमधील सहभागाबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. महेंद्र महाजन यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. या लोकअदालतमध्ये मुख्य अभियंता श्री. पवार यांच्यासह अधीक्षक अभियंते युवराज जरग व सिंहाजीराव गायकवाड उपस्थित होते. लोकअदालतीच्या कामकाजात महावितरणकडून वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त) राहुल पवार, विधी अधिकारी दिनकर तिडके, नीतल हसे, गणेश सातपुते तसेच अभियंते, लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

गरीबांचा अमिताभ , डिस्को डान्सर म्हणून ओळखल्या गेलेल्या मिथुनदांचा उल्लेखनीय प्रवास

मिथुनदा म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती श्रेष्ठ भारतीय अभिनेते, निर्माते आणि राजकारणी आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका आणि विशेष नृत्य शैलीसाठी ते ओळखले जातात. ऍक्शनपटातील भूमिकांपासून मार्मिक नाट्यमय व्यक्तिरेखांपर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. 

एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण ते दिग्गज, प्रतिष्ठित अभिनेता असा मिथुन चक्रवर्ती यांचा जीवनप्रवास आशा आणि चिकाटी यांनी भरलेला असून ध्यास आणि समर्पण यासह माणूस अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वप्नेदेखील पूर्ण करू शकतो, हे सिद्ध करणारा आहे, असे गौरवोद्गार वैष्णव यांनी व्यक्त केले. 

पश्चिम बंगालमधल्या कोलकाता येथे 16 जून 1950 रोजी जन्मलेल्या मिथुनदांचे बालपणीचे नाव गौरांग चक्रवर्ती. ‘मृगया’ (1976), या आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. प्रतिष्ठेच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे माजी विद्यार्थी असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांनी अत्यंत सर्जनशीलतेने आपली अभिनयकला विकसित करत चित्रपटातील आपल्या शानदार कारकिर्दीचा पाया रचला.

मृणाल सेन यांच्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या संथाळ बंडखोराच्या भूमिकेने त्यांना राष्ट्रीय पातळीवरील गोरव प्राप्त करून दिला. वर्ष 1982 मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटातील भूमिकेने मिथुन यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून दिली. हा चित्रपट, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर अत्यंत यशस्वी ठरला आणि या चित्रपटाने नृत्य क्षेत्रातील झळाळता तारा अशी ओळख  प्रस्थापित करण्यात’ मिथुन यांना यश आले. डिस्को डान्सर या चित्रपटाने मिथुन यांच्या अत्युत्कृष्ट कौशल्याचे साऱ्या जगाला दर्शन घडवलेच पण त्याच सोबत भारतीय चित्रपट क्षेत्रात डिस्को संगीताला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे मिथुन यांचे नाव घराघरात पोहोचले. वर्ष 1990 मध्ये अग्नीपथ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

नंतरच्या काळात, तहादेर कथा (1992) आणि स्वामी विवेकानंद (1998) या चित्रपटांतील भूमिकांसाठी मिथुनदा यांनी आणखी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले. मिथुन यांच्या विस्तृत कारकीर्दीमध्ये त्यांनी हिंदी, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि तेलुगु यांसारख्या अनेक भारतीय भाषांतील साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या.

मिथुनदा त्यांच्या चतुरस्त्र अभिनयासाठी सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी नाटक ते विनोदी चित्रपट अशा अनेक प्रकारच्या अविष्कारांमध्ये अभिनयाची चमक दाखवली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

मिथुनदा यांचा दुहेरी वारसा

केवळ चित्रपट क्षेत्रातीलच कामगिरी नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील मिथुनदा यांनी समर्पित भावनेने काम केले आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिथुन चक्रवर्ती यांचे वर्णन केलेल्या. शिक्षण, आरोग्यसुविधा या क्षेत्रांमध्ये तसेच वंचित समुदायांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होऊन मिथुनदा यांनी समाजाचे ऋण फेडण्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे असे ते म्हणाले. समाजसेवा आणि प्रशासन यांच्याप्रती कटिबद्धता प्रदर्शित करत मिथुनदा यांनी संसद सदस्य म्हणून देखील काम केले आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

सुमारे पाच दशकांच्या कारकिर्दीत, मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेले असंख्य पुरस्कार तसेच सन्मान यांनी भारतीय सिनेमासृष्टीला मिथुनदा यांनी दिलेल्या लक्षणीय योगदानाला ओळख मिळवून दिली आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी नुकतेच त्यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. “डिस्को डान्सर” आणि “घर एक मंदिर” सारख्या उत्तम चित्रपटांचा समावेश असलेल्या त्यांच्या कारकीर्दीने लाखो लोकांचे मनोरंजन करण्यासह बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांचे नवे परिदृश्य घडवले आहे. त्यांचा प्रभाव रुपेरी पडद्याच्या पलीकडे पोहोचला असून मिथुनदा यांची चित्रपटातील कारकीर्द आणि सामाजिक कार्य येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिले आहे. 

येत्या मंगळवारी, दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित 70 व्या राष्ट्रीय चित्रपट समारंभात मिथुनदा यांचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. या पुरस्कारासाठीच्या निवड समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश होता:  

  1. आशा पारेख
  2. खुशबू सुंदर 
  3. विपुल अमृतलाल शाह 

प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांच्या कलात्मक प्रतिभेला मोठी मान्यता मिळण्याबरोबर अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणणारी दयाळू आणि समर्पित व्यक्ती म्हणून मिथुनदा यांच्या वैभवशाली वारशाचा देखील हा सन्मान असेल.

एकल संवादिनी वादनातून पंडित तुळशीदास बोरकर यांच्या जागविल्या स्मृती

पंडित विश्वनाथ कान्हेरे, अनिरुद्ध गोसावी यांचे संवादिनी वादन
पुणे : भारतातील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध संवादिनी वादक कै. पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर शिष्य परिवार आणि संवादिनी प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात युवा संवादिनी वादक अनिरुद्ध गोसावी आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचे एकल संवादिनी वादन झाले. शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात ही मैफल रंगली.
एकल वादनासाठी स्वतंत्र व्यासपीठ आणि गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे श्रीराम हसबनीस यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मैफलीची सुरुवात अनिरुद्ध गोसावी यांनी पुरिया धनाश्री रागातील मत्ततालातील गतीने केली. त्यानंतर ‌‘मुश्किल करोगे आसान‌’ ही रचना सादर करून रसिकांना आपल्या संवादिनी वादन कौशल्याचे दर्शन घडविले. बोरकर गुरुजींनी रचलेली तीन तालातील रचना गोसावी यांनी प्रभावीपणे सादर केली. पहाडी धून ऐकवून त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना विघ्नेश कामत यांनी तबला साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायकी अंगाने संवादिनी वादन करण्यात हातोटी असलेल्या ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित विश्वनाथ कान्हेरे यांच्या संवादिनीने रसिकांशी स्वरसंवाद साधला. पंडित कान्हेरे यांनी वादनाची सुरुवात ‌‘अलख निरंजन कहत गोरखनाथ‌’ या गोरखकल्याण रागातील बंदिशीने केली. एक तालातील या रचनेने रसिकांना मोहित केले. त्यानंतर जोड राग सादर करताना मधुवंती व भीमपलास रागाची एकरूपता दर्शविणारा मधुपलासी हा राग ऐकविला. जवळपास दोन तास रंगलेल्या या मैफलीत पंडित कान्हेरे यांनी रसिकांच्या आग्रहाखातर बसंत, भुपांगिनी या रागांबरोबरच मिश्रपिलु रागातील अध्धा तीनतालातील रचना ऐकवून वादनाची सांगता भैरवीतील बंदिशीने केली. त्यांना प्रसाद लोहार यांनी समर्पक तबलासाथ केली. वरद सोहनी, श्रीरंग जोगळेकर यांनी संवादिनीवर सहवादन केले.
पंडित कान्हेरे म्हणाले, प्रतिथयश गायक-वादकांकडून मार्गदर्शन मिळाल्याने त्याचा संवादिनी वादनात खूप उपयोग झाला. दोन हजार नाट्यप्रयोग वाजविल्यामुळे जे ऐकू येते ते वाजवायचे असा गुरुमंत्रच मिळाला. गुरूंचा आशीर्वाद माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. एकल वादन आणि साथ करणे यात फरक असतो. गायकाच्या साथीला वादन करताना त्याचे गाणे खुलवायला वादकाची साथ लाभणे आवश्यक असते. मी गायकांशी असलेली बांधिलकी जपली. संवादिनी या वाद्यावर गायकी अंगाने वाजविणे हे मुलात गायकीची तालिम असल्याशिवाय शक्य नाही अन्यथा स्वरवाद्यावर नुसता तबला वाजतो. नव्या पिढीने चतुरस्त्र होण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. त्यांच्याशी संवादिनी वादक श्रीराम हसबनीस यांनी संवाद साधला.
गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी मनोगत व्यक्त केले.
कलाकारांचा सत्कार पंडित प्रमोद मराठे, ज्ञानेश्वर सोनवणे, सुधीर नायक, श्रीराम हसबनीस यांनी केला. आभार श्रीराम हसबनीस यांनी मानले.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक आदरांजली

डॉ. राधिका जोशी आणि अभिषेक काळे यांचे सुरेल सादरीकरण

पुणे : अभिजात संगीत, उपशास्त्रीय रचना, गझल, ठुमरी, भावगीत, चित्रपटगीत, नाट्यसंगीत, अभंग आणि भजन.. असे गायन वैविध्य रसिकांनी अनुभवले. युवा कलाकारांच्या आश्वासक सादरीकरणाने ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आयोजित ‌‘सहेला रे आ मिल गाये..‌’ या मैफलीचे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यासाठी या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, वेद भवन मागे, कोथरूड, येथे कार्यक्रम झाला

मैफलीची सुरुवात डॉ. राधिका जोशी यांनी भूप रागातील किशोरीताईंचीच ‌‘सहेला रे आ मिल गाये‌’ या अध्धा त्रितालातील बंदिशीने केली. अगदी मोजक्या अवधीत त्यांनी रागरूप दर्शवून किशोरीताईंच्या या गाजलेल्या बंदिशीची सौंदर्यस्थळे उलगडली. अभिषेक काळे यांनी भीमसेनजींनी निर्मिलेल्या कलाश्री रागातील ‌‘धन धन भाग सुहाग‌’ या त्रितालातील बंदिशीचे बहारदार सादरीकरण केले.

डॉ. राधिका जोशी यांनी ‌‘जाईन विचारित रानफुला‌’, ‌‘हम वो गुल है‌’, ‌‘म्हारो प्रणाम‌’, ‌‘बोलावा विठ्ठल‌’ अशा विविध रचनांच्या सुरेल गायनातून किशोरीताईंना अभिवादन केले. अभिषेक काळे यांनी ‌‘मन राम रंगी रंगले‌’, ‌‘इंद्रायणी काठी‌’, ‌‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा‌’, ‌‘माझे माहेर पंढरी‌’, ‌‘जमुना के तीर‌’ या रचना ताकदीने सादर करत रसिकांची दाद मिळवली. किशोरीताईंच्या ‌‘अवघा रंग एक झाला‌’ या भैरवीमधील भक्तीरचनेने या रंगतदार मैफलीची सांगता झाली.

रसिकांशी संवाद साधताना अभिषेक काळे म्हणाले, संगीतसाधना करत असताना, जे जमत नाही, ज्यासाठी परिश्रम करायचे ते घरी रियाज म्हणून करा आणि जे उत्तम जमते, ते मैफलीत सादर करा, असे पं. भीमसेन जोशी सांगत असत. संगीतसाधक म्हणून मला हे फार महत्त्वाचे वाटते.
डॉ. राधिका जोशी म्हणाल्या, किशोरीताईंना शास्त्रीय संगीताप्रमाणेच संगीताच्या अन्य प्रकारांविषयी आस्था होती. गजल हा संगीतप्रकार त्यांना आवडत असे. उर्दू उच्चार त्यांनी जाणीवपूर्वक शिकून घेतले होते.

या मैफलीसाठी रामकृष्ण करंबेळकर (तबला), मालू गावकर (हार्मोनिअम), प्रथमेश तारळकर (पखवाज), उद्धव कुंभार (साईड ऱ्हिदम) यांनी अनुरूप साथसंगत केली. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी ओघवत्या शैलीत निवेदन केले. ऋत्विक फाऊंडेशनच्या रश्मी वाठारे यांनी आभार मानले.

… ही पंचसूत्री पाळून करिअरमध्ये यशस्वी व्हा – डॉ. संग्राम निर्मळे

पीसीसीओईआर मध्ये प्रेरणा महोत्सव

पिंपरी, पुणे (दि. ३० सप्टेंबर २०२४) जिज्ञासूपणा जोपासत नेहमी शिकण्याची तयारी ठेवा. आंतरशाखीय कौशल्ये आत्मसात करीत आव्हानांना खंबीरपणे तोंड द्या. दूरदृष्टी ठेवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे नेटवर्क तयार करावे ही पंचसूत्री पाळून करिअरमध्ये यशस्वी व्हा असे मार्गदर्शन मुंबई आयआयटीचे प्रा. डॉ. संग्राम निर्मळे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पीसीसीओईआर येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सिव्हिल विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे, विद्यार्थी समन्वयक प्रा. अक्षय राहणे, स्पर्धा परीक्षा देऊन पास झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्रेयस धर्माधिकारी, संदीप वाघमोडे, अमित मडगे, अश्विनी यलंगफले, गौरव अवघडे, शुभम जेलेवाड, प्रणव पवार आणि त्यांचे पालक उपस्थित होते. या माजी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातील अनुभव व स्पर्धा परीक्षेस सामोरे जाण्यासाठी करावी लागणारी तयारी याबाबत मार्गदर्शन करून प्रेरणा दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच माजी विद्यार्थ्यांना देखील संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा, गेट परीक्षा, उच्च शिक्षण तसेच ड्रोन प्रशिक्षण यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन आणि मार्गदर्शन केले जाते अशी माहिती डॉ. बोबडे यांनी प्रास्ताविक करताना दिली.
प्राचार्य डॉ. तिवारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सिव्हिल विभागाचे कौतुक केले. पीसीईटी आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध प्रकल्पाविषयी माहिती दिली. शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती

पर्यावरणस्नेही १.९५ लाख ग्राहकांना २.३३ कोटींचा फायदा

पुणे, दि. ३० सप्टेंबर २०२४: पश्चिम महाराष्ट्रातील पर्यावरणस्नेही १ लाख ९४ हजार ८९८ वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास राज्यात सर्वाधिक पसंती दिली आहे. यासाठी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ३३ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा फायदा होत आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ९४ हजार ८९८ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यातील ४ लाख ८७ हजार ११३ वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४० टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. तर पुणे परिमंडलातील १ लाख ३० हजार ७६१ ग्राहक राज्यात सर्वाधिक संख्येने या योजनेत सहभागी झाले आहेत.

आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो-ग्रीन’ योजना पर्यावरण रक्षणासाठी देखील महत्वाची आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार ८२२ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांची १ कोटी ६७ लाख ७८ हजार ६४० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर या योजनेतून सातारा जिल्ह्यातील १२ हजार ७९६ ग्राहकांचे १५ लाख ३५ हजार ५२० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १३ हजार ८१९ ग्राहकांचे १६ लाख ५८ हजार २८० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार ५१५ ग्राहकांचे २१ लाख १ हजार ८०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील १० हजार ९४६ ग्राहकांच्या १३ लाख १३ हजार ५२० रुपयांचा वीजबिलामध्ये वार्षिक फायदा होत आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळ येथे सुविधा उपलब्ध आहे.

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२१ निरंकारी भक्तांचे रक्तदान 

धायरी येथे २५१ आणि हडपसर येथे १७० निरंकारी भक्तांनी केले रक्तदान – रक्तदान ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा.

पुणे :  सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने रविवार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिरांचे आयोजन शाखा धायरी व शाखा हडपसर, झोन पुणे येथे करण्यात आले होते.यामध्ये शाखा धायरी येथे  २५१ आणि शाखा हडपसर येथे १७० संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थीपणे रक्तदान केले.रक्त संकलनासाठी संत निरंकारी रक्तपेढी मुंबई, वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तपेढी,औंध रुग्णालय रक्तपेढी  आणि ससून हॉस्पिटल रक्तपेढी यांनी आपले योगदान दिले.या शिबिराचे उद्घाटन आदरणीय ताराचंद करमचंदानी जी (झोनल इन्चार्ज-पूना झोन) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की, रक्ताला पर्याय नाही, रक्तदान हीच सर्वात मोठी मानव सेवा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पुणे झोन मध्ये मिशनद्वारा दर महिन्याला तीन ते चार रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये अनेक रक्तदाते सहभागी होत असतात.बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.            संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे  उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता  यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी  भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.            रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले.

येवलेवाडी कारखान्यात अपघात प्रकरणी मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे- येथील येवलेवाडीमध्ये काल दिनांक 29 सप्टेंबर रोजी काच कारखान्यात मोठी दुर्घटना घडून चार कामगारांचा मृत्यू झाला. तर अजूनही दोघेजण गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी आता या कारखान्यातील कारखााना मालकासह पाचजणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांनी दुर्घटनेस जबाबादार असल्याप्रकरणी तसेच सुरक्षाविषयक कामगारांची काळजी किंवा उपाययोजना न करण्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कारखान्याचे मालक हुसेन तय्यबरअली पिठावाला (वय 38, रा.कोंढवा), हातीम हुसेन मोटारवाला (वय 36, रा. येवलेवाडी, कोंढवा), गाडी मालक संजय धुळा हिरवे (वय 34, रा. कलंबोळी), ठेकेदार सुरेश उर्फ बबन दादू चव्हाण, गाडी चालक राजू दशरथ रासगे (वय 30, कळंबोली) यांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी याबाबत दयानंद ज्ञानदेव रोकडे (वय 36, येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येवलेवाडी (Pune) येथे दुपारी दिड वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. इंडिया ग्लास सोल्यूशन्स या काचेच्या कारखान्यातून गृहप्रकल्प आणि विविध व्यावसायिक कार्यालयांसाठी काचा पुरवल्या जातात. रविवारी कच्चा मालाच्या ट्रकातून काचा उतरवताना त्याला बांधण्यात आलेला पट्टा तुटला आणि कामगारांच्या अंगावर दोन टन वजन असलेल्या काचांचे तुकडे पडले.यामध्ये सहा कामगार अडकले होते. अग्निशमन दलाने या कामगारांना बाहेर काढले परंतु, यामध्ये (Pune) चार कामगारांचा मृत्यू झाला. चार कामगार जखमी झाले असून दोन जण अजूनही गंभीर जखमी आहेत.अमित शिवशंकर कुमार (वय 27 वर्ष), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय 40), विकास सरजू प्रसाद गौतम (वय 23) आणि पवन रामचंद्र कुमार (वय 44 , येवलेवाडी) या कामागरांचा मृत्यू झाला. तर जगतपाल संतराम सरोज (वय 49), मोनेश्वर कुली (वय 34), पिंटू नवनाथ इरकल (वय 30) तसेच फिर्यादी दयानंद रोकडे देखील जखमी झाले आहेत.

कालच्या पिल्लाला शिवसेना काय माहिती, शिंदे गटाच्या रामदास कदमांची जहरी टीका

खेड: आदित्य ठाकरे ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. रामदास कदम यांनी खेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कालच्या आलेल्या पिल्लाला शिवसेना काय माहिती, असेही रामदास कदम म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे देखील मागे नाहीत. आदित्य ठाकरे मतदारसंघात भेटी देत असून पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आम्ही एका कवडीची देखील किंमत देत नाही. शिवसेना आम्ही मोठी केली. शिवसेना कोकणी माणसाने मोठी केली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनी काय योगदान दिले. कालच्या या पिल्लाला शिवसेना काय माहिती, अशा शब्दांत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. पुढे बोलताना, आदित्य ठाकरे हे बेईमान आहेत. ही बाळासाहेबांची खानदान होऊ शकत नाही. असे विधान रामदास कदम यांनी केले आहे.

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता आहे. राजकारणातून आमच्या खानदानाला उद्धवस्त करण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे करत होते. त्यांच्यात जर हिंमत असेल तर आदित्यच काय त्याच्या बापाने उद्धवने दापोली मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान देखील रामदास कदम यांनी दिले.

नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर हाच उद्धव ठाकरे मला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर निघत नव्हता. ज्या सापाला आम्ही दूध पाजले आता तोच आमच्या अंगावर येत आहे. पण त्याचा फणा कसा ठेचायचा हे आम्हाला चांगले माहिती आहे. त्यामुळे आपण कुणाच्या अंगावर जात आहोत याचे भान ठेवा, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.