पुणे, दि. ३०: समाज कल्याण विभागामार्फत १ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक कक्षाचे उद्धाटन करण्यात येणार असून कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त बाळासाहेब सोळंकी व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
0000