भोर, दि. २९ सप्टेंबर २०२४: खोटा प्रचार करून निवडणुका जिंकणे हा काँग्रेस पक्षाचा नेहमीच अजेंडा राहिला आहे. नागरिकच्या सेवेला प्राध्यान्य देऊन राजकारण करणे ही भूमिका हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची राहिली असल्याने महायुतीचे हे सरकार देखील जनतेच्या हिताच्या अनेक योजना राविण्यासाठी तत्पर आहे. लाडकी बहीण, वयोश्री, नमो शेतकरी महासन्मान निधी, युवा कार्य प्रशिक्षण, आनंदाचा शिदा, मुख्यमंत्री सहायता निधी आदी योजनांचा लाभ राज्यातील जनता घेत आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कामाचं आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले.
भोर तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा आणि धांगडवाडी ता. भोर येथे आयोजित महाविजय संवाद मेळाव्यात संबंधित करताना डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. या यावेळी पुणें जिल्हा भोर मुळशी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, बारामती जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, जिल्हा संघटीका कांताताई पांढरे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगरे, तालुका संघटिका जयश्री शींडकर, सविता कुंभार, भोर तालुका प्रमुख दशरत जाधव, वेल्हा सुनील शिंडकर, मुळशी दीपक करंजावणे, उपजिल्हाप्रमुख गणेश निगडे, विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, मतदारसंघातील नागरिक, सरकारी योजनांच्या लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बाळासाहेब चांदेरे , सुरेंद्र जेवरे , कांताताई पांढरे यांनी मनोगते व्यक्त केली.
सर्व महिला व शेतकरी यांना शिवसेनेची योजना विषयक पुस्तिका व मुख्यमंत्री यांचे पत्रही वितरित करण्यात आले.
कार्यक्रमांआधी ढोल ताशे व फटाके यांत नीलम गोर्हे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.