पुणे- येथील येवलेवाडीमध्ये काल दिनांक 29 सप्टेंबर रोजी काच कारखान्यात मोठी दुर्घटना घडून चार कामगारांचा मृत्यू झाला. तर अजूनही दोघेजण गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी आता या कारखान्यातील कारखााना मालकासह पाचजणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांनी दुर्घटनेस जबाबादार असल्याप्रकरणी तसेच सुरक्षाविषयक कामगारांची काळजी किंवा उपाययोजना न करण्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कारखान्याचे मालक हुसेन तय्यबरअली पिठावाला (वय 38, रा.कोंढवा), हातीम हुसेन मोटारवाला (वय 36, रा. येवलेवाडी, कोंढवा), गाडी मालक संजय धुळा हिरवे (वय 34, रा. कलंबोळी), ठेकेदार सुरेश उर्फ बबन दादू चव्हाण, गाडी चालक राजू दशरथ रासगे (वय 30, कळंबोली) यांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी याबाबत दयानंद ज्ञानदेव रोकडे (वय 36, येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येवलेवाडी (Pune) येथे दुपारी दिड वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. इंडिया ग्लास सोल्यूशन्स या काचेच्या कारखान्यातून गृहप्रकल्प आणि विविध व्यावसायिक कार्यालयांसाठी काचा पुरवल्या जातात. रविवारी कच्चा मालाच्या ट्रकातून काचा उतरवताना त्याला बांधण्यात आलेला पट्टा तुटला आणि कामगारांच्या अंगावर दोन टन वजन असलेल्या काचांचे तुकडे पडले.यामध्ये सहा कामगार अडकले होते. अग्निशमन दलाने या कामगारांना बाहेर काढले परंतु, यामध्ये (Pune) चार कामगारांचा मृत्यू झाला. चार कामगार जखमी झाले असून दोन जण अजूनही गंभीर जखमी आहेत.अमित शिवशंकर कुमार (वय 27 वर्ष), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय 40), विकास सरजू प्रसाद गौतम (वय 23) आणि पवन रामचंद्र कुमार (वय 44 , येवलेवाडी) या कामागरांचा मृत्यू झाला. तर जगतपाल संतराम सरोज (वय 49), मोनेश्वर कुली (वय 34), पिंटू नवनाथ इरकल (वय 30) तसेच फिर्यादी दयानंद रोकडे देखील जखमी झाले आहेत.