Home Blog Page 3541

‘त्रिदल’ पुणे च्या ‘दिवाळी पहाट’मध्ये रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी यांची प्रातःकालीन संगीत मैफल

0

 

पुणे :
‘त्रिदल’ पुणे, ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’च्या वतीने यावर्षीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी, यांची प्रातःकालीन संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. दि. 10 नोव्हेंबर 2015 रोजी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. रोणू मुझुमदार आणि तौफिक कुरेशी यांना रामदास पळसुले, रोहित कुलकर्णी हे अनुक्रमे तबला, की-बोर्ड वर साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमात 5 पक्क्या पुणेकरांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात राजकुमार आगरवाल, दत्तोबा पाचंगे (चौघडा वादक), बाळासाहेब गांजवे (कोहिनूर आर्ट्स), भारत गायन समाज, शरद मोरे (शौकिन पान) यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष  सुशील मुहनोत, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्ता धनकवडे, जगदीश देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.

दिवाळी पहाटेच्या मुहूर्तावर रंगणार “कट्यार काळजात घुसली” चा दिमाखदार प्रिमीयर

0

 

सूर निरागस हो चा स्वर्गीय सूर, घेई छंद मकरंदची अफलातून जुगलंबदी, तेजोनिधी लोह गोलच्या हरकती, दिल की तपीशमधून व्यक्त झालेली मनातील उद्विग्नता, मन मंदिरामधून दिसणारं गुरू शिष्याचं नातं अशा विविध भाव भावना गाण्यांमध्ये गुंफवून प्रेक्षकांसाठी दिवाळीची अनोखी भेट आणलीये कट्यार काळजात घुसली चित्रपटाने. भारतीय शास्त्रीय संगीताची भरजरी परंपरा जपणा-या आणि सुरांची विशेष मेजवानी असलेल्या या चित्रपटाची सुरूवातही एक खास परंपरा जपून होणार आहे ती म्हणजे दिवाळी पहाटद्वारे. अभ्यंग स्नान, सुगंधी उटण्याचा सुवास, झेंडूंच्या फुलांचे तोरण, घरभर पसरलेला आनंद दिवाळीच्या उत्सवात घराघरांत असलेलं हे वातावरण आणि अशाच वातावरणात रसिकांसाठी दरवर्षी साजरी होणारी दिवाळी पहाट. कधी सुरांच्या कधी तालवाद्यांच्या तर कधी कवितांच्या साथीने. याहीवर्षी ही दिवाळी पहाट रंगणार आहे पण एका विशेष कार्यक्रमाने. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या कट्यार काळजात घुसली हा भरजरी चित्रपट दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि त्याचा दिमाखदार प्रिमीयर रंगणार आहे दिवाळी पहाटेच्या मुहुर्तावर. मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच दिवाळीचा योग साधून असा भव्य दिव्य प्रिमीयर दिवाळी पहाटच्या मुहूर्तावर रंगतोय. येत्या १० नोव्हेंबरला मुंबईत सकाळी ९ वा. चित्रपटाच्या संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांसह मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर या खास प्रिमीयरला उपस्थित राहणार आहेत.

 

मराठी संगीत रंगभूमीवरील अजरामर अशी कलाकृती म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. भारतीय संगीताची महती सांगणारी, अभिजात अशी कलाकृती चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अनेक दिग्गज कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी, भव्य दिव्य सेट्स, विलोभनीय छायाचित्रण आणि काळजाचा ठाव घेणारं संगीत ही या कट्यारची वैशिष्ट्यं. यावर्षी गोव्यात पार पडणा-या ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही कट्यार..ची अधिकृत निवड झाली. प्रदर्शनापूर्वीच रसिकांच्या ओठी या चित्रपटाची अशा विविध कारणांनी चर्चा आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या दिमाखदार चित्रपटामधून सुरांची आतषबाजी रसिकांना अनुभवायला मिळणार आहेच पण त्यासोबतच दिवाळी पहाटेचा आनंदही वेगळ्या प्रकारे साजरा होणार आहे.

 

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पुरुषोत्तम दारव्हेकर यांची आहे तर हिंदीमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांचे पटकथाकार प्रकाश कपाडिया यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. चित्रपटाची भव्यता आपल्या कॅमेरात टिपून तो नयनरम्य बनवलाय ज्येष्ठ छायालेखक सुधीर पलसाने यांनी तर कलादिग्दर्शनातून स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि राजे रजवाड्यांची भव्यता उभारण्याचं काम केलंय संतोष फुटाणे यांनी. रंगभूषेचे जादूगार विक्रम गायकवाड यांच्या कलेची जादू पुन्हा एकदा यातून बघायला मिळेल. जुन्या रचनांचा आत्मा न हरवता त्यांना नव्या रुपात सजवण्याचं आणि काही नवीन गाण्यांच्या माध्यमातून संगीताचा हा अनमोल नजराणा रसिकांना देण्याचं काम केलंय प्रख्यात संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला “कट्यार काळजात घुसली” हा भरजरी चित्रपट दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड

0
पुणे, ता: ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघा’च्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष या पदांसाठीच्या निवडणुका ६ नोव्हेंबर ‘एनसीयुआय’ च्या बेटा हॉल, नवी दिल्ली येथे पार पडल्या. या निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार दिलीप दत्तात्रय वळसे पाटील यांची ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघा’च्या अध्यक्षपदी तीन वर्षांकरिता निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी अमित प्रभाकर कोरे यांची निवड केली गेली आहे. गुजरात फेडेरेशनचे मनीषभाई पटेल व कर्नाटक राज्य फेडेरेशनचे दनाप्पागौडा बसनागौडा इनामदार यांनी अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव सुचविले होते. तसेच उपाध्यक्षपदासाठी अमित कोरे यांचे नाव तामिळनाडू राज्य फेडेरेशनचे के. जी. पी गणामुर्ती यांनी सुचविले होते.
संचालक मंडळ म्हणून गुजरात राज्य फेडेरेशनचे मनिषभाई पटेल,  हरियाणा राज्य फेडरेशन व आयएएस सुधीर राजपाल, कर्नाटक राज्य फेडेरेशनचे दनाप्पागौडा बसनागौडा इनामदार, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे शिवाजीराव नारायणराव नगवडे,  पंजाब राज्य फेडरेशन आयएएस कंवाल प्रीत ब्रार, तामिळनाडू राज्य फेडेरेशनचे के. जी. पी. गणामुर्ती, उत्तरप्रदेश फेडेरेशनचे बी. के. यादव,  गुजरात फेडेरेशनचे जयंतीलाल बावजीभाई पटेल, हरयाणा शुगर फेक्टरीचे साचेनदार सिंह, दक्षिण महाराष्ट्र मतदारसंघातील कलप्पा आवडे, मध्य- दक्षिण महाराष्ट्र मतदारसंघातील विजयसिह मोहिते पाटील, उत्तर – मध्य महाराष्ट्र मतदार संघातील जयप्रकाश रावसाहेब साळुंके दांडेगावकर, पंजाब शुगर फेक्टरीचे हरदीपसिंह धिल्लोन, तामिळनाडू शुगर फेक्टरीचे ए. कुमार तसेच उत्तरप्रदेश शुगर फेक्ट्रीचे चंद्रशेखर सिंह यांची निवड केली आहे.

उद्यानाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करून उद्यान खुले करावे – सामाजिक कार्यकर्ते म्हस्के ची मागणी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

0

 

पुणे:- कोंढवा खुर्द येथील पार्क सर्वे नंबर ४३,साईबाबा नगर येथे उद्यानाचे काम गेली तीन ते चार वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहेत व मुख्य प्रवेशद्वार बंद असून त्याच्या समोर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात तेथील झाडांची व उद्यानाची देखभाल होत नसल्याने दुरवस्था झाली आहे. राडारोडा,तुटलेले गेट व कोणीही तेथे प्रवेश करतात. पथदिव्यासाठी खड्डे खोदलेले आहेत.जेष्ठ नागरिक,महिला लहान मुले यांना त्रास सहन करावा लागत आहे असे बाळासाहेब म्हस्के यांनी आंदोलनात सांगितले.
पुढे ते म्हणाले कि, उद्यानात  वेळी आधार असल्याने मद्यपी येथे मोठ्या प्रमाणात मद्य पिण्यासाठी बसतात या मुळे रस्त्याच्या  जाणाऱ्या महिला तसेच वयोरुद्ध नागरिक यांना फ्हार त्रास सहन करावा लागतो. वेळोवेळी उद्यान अधीक्षक,आयुक्त मनपा यांना निवेदन दिले परंतु  निष्पन्न झाले नाही.ऐन दिवाळीत मुलांना सुट्ट्या लागणार असून त्यांना त्यांच्या हक्काचे उद्यान खेळण्यास नाही हे अत्यंत दृर्दैवाची बाब आहे.तसेच प्रशासनाचे याची  घेऊन नागरिकांसाठी उद्यान खुले करून द्यावेत.
अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा म्हस्के यांनी दिला  प्रमुख मागण्या १)उद्यानाचे नामकरण करावे व उद्यानास डॉ ए.पी. ज़े. कलाम द्यावे. २) उद्यानाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करून उद्यान खुले करावे.
या वेळी स्थानिक नागरिक महिला मुलांसह अनेक नागरिक ह्या आंदोलनास उपस्थित होते.

तय्यबिया अनाथ गृहात प्रथमच दिवाळी साजरी ! राष्ट्रीय एकात्मता, सहिष्णुता वृद्धीसाठी प्रत्येक कृती महत्वाची : अन्वर राजन

0
पुणे :
“प्रबोधन माध्यम’ या संस्थेतर्फे “सर्वधर्मीय आणि कृतज्ञ दिवाळी’ या उपक्रमाचे यावर्षी तैय्यबिया अनाथगृहात (पुणे कॅम्प) येथे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे.  . शनिवार, दिनांक 7 नोव्हेंबर 2015, रोजी सकाळी दिवाळीच्या “वसूबारस’ या पहिल्या दिवशी हा उपक्रम ईस्ट स्ट्रिट पुणे कॅम्प येथील तैय्यबिया यतिमखाना (ऑर्फनेज) मधील विद्यार्थ्यांसमवेत साजरा झाला.
तय्यबिया अनाथ गृह या 1909 साली स्थापन झालेल्या या अनाथ गृहात प्रथमच दिवाळी साजरी झाली.”प्रबोधन माध्यम’संस्थेचे हे तपपूर्ती वर्ष आहे
“देशात द्वेष  आणि असहिष्णुतेचे वातावरण वाढत असताना सर्वधर्मियांना एकत्र आणणारी प्रत्येक कृती राष्ट्रीय एकात्मता आणि सहिष्णुता वृद्धीसाठी महत्वाची ठरणार आहे’, असे उद्‌गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि “महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे सचिव अन्वर राजन यांनी काढले.
ते म्हणाले, “सर्व धमियांचे सण पूर्वी एकत्र साजरे होत असत, घरोघरी फराळ पोहोचवला जात असे. पुण्यातल्या मध्यवस्तीत नाना पेठे सारख्या ठिकाणी आठ धर्मांची प्रार्थना स्थळे आहेत आणि सर्वजण गुण्या गोविंदाने राहात आहेत. सर्व धर्मियांनी एकमेकांचे सण एकत्र साजरे केले तर एकात्मता वृद्धीस लागेल. त्यादृष्टीने “प्रबोधन माध्यम’चा हा उपक्रम महत्वपूर्ण आहे.’
यावेळी अन्वर राजन, शिक्षण मंडळाच्या माध्यमातून उर्दू शाळांच्या आधुनिकीकरणासाठी निर्णय घेणारे मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रवी चौधरी, युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे, “प्रबोधन माध्यम’चे संस्थापक दीपक बिडकर, संचालक गौरी बिडकर, “तय्यबिया अनाथ आश्रमा’चे मुख्याध्यापक वाहिद बियाबानी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सारीका रोजेकर, सचिन सुर्यवंशी, जयदीप कोकीळ व गायत्री कोकीळ उपस्थित होते.
दिवाळी हा आनंदाचा कृतज्ञतेचा सण आहे. त्यात सर्व धर्मियांना, सर्व समाज घटकांना सहभागी करून घ्यावे या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन सलग चार वर्षापासून केले जात आहे. या उपक्रमातंर्गत आत्तापर्यंत गरीब, अनाथ विद्यार्थी, कचरावेचक, काश्मीरमधील विद्यार्थी, मदरसामधील विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते, बॅक स्टेज आर्टीस्ट, सामाजिक कार्यकर्ते आदी समाजातील विविध घटक सहभागी झाले आहेत.

46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कट्यार काळजात घुसली’ची निवड-झीच्या चित्रपटांनी साधली हॅटट्रीक

0

unnamed1

मराठी संगीतरंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली.

आपल्या श्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक आता

चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. येत्या दिवाळीत 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणा-या या

चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा

असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) 2015 च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी

या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच विविध प्रकारच्या चित्रपटांसाठी काही विशेष विभाग तयार केलेले

असतात. यातील इंडियन पॅनोरमा हा भारतीय भाषांमधील दर्जेदार चित्रपटांसाठीचा एक खास विभाग असून यामध्ये

यावर्षी झी स्टुडिओ निर्मित आणि सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची निवड झाली आहे.

येत्या 21 नोव्हेंबरपासून देश विदेशातील अनेक चित्रपटांचा हा महाकुंभ भरतोय. गेल्या वर्षी इंडियन पॅनोरमा

विभागात तब्बल 11 चित्रपटांसह मराठीने आपली मक्तेदारी राखली होती ज्यामध्ये एस्सेल व्हिजनच्या

(आताचे झी स्टुडिओज्) तब्बल चार चित्रपटांची निवड झाली होती. तर 2013 मध्ये हा मान एस्सेल व्हिजनच्या

या निवडीबद्दल झी स्टुडिओजच्या मराठी विभागाचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की , “कट्यार काळजात घुसली

हा केवळ मराठी चित्रपट नसून तो ख-या अर्थाने भारतीय संगीताचं प्रतिनिधीत्व करतो. इफ्फीसारख्या मानाच्या

महोत्सवासाठी झालेली कट्यार..ची ही निवड अनेक अर्थाने महत्त्वाची ठरते. मराठी चित्रपटाला जगभरातील चोखंदळ

रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इफ्फीचं हे व्यासपीठ अतिशय महत्त्वाचं आहे. एकूणच मराठी चित्रपटांत वेगवेगळे

विषय येत असताना अभिजात संगीत नाटकावर आधारीत ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला हा बहुमान मिळतोय हे

निश्चितच वाखणण्याजोगं आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट हाताळू शकलो. 2013 मध्ये

‘फॅंड्री’, गेल्यावर्षी ‘किल्ला’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल

हिरो’ या चित्रपटांनंतर झी स्टुडिओज् ने या वर्षी ‘कट्यार काळजात घुसली’च्या माध्यमातून हॅटट्रीक साधत इंडियन

पॅनोरमात आपले स्थान कायम राखले आहे याचाही विशेष आनंद आहे.

या निवडीबद्दल दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की, “हा केवळ माझा किंवा या चित्रपटाचा सन्मान नसून तो ख-या अर्थाने

कट्यारचे जनक पुरूषोत्तम दारव्हेकर, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा सन्मान आहे. मराठी संगीत नाटकाची

एवढ्या मोठ्या स्तरावर दखल घेतली गेली ही गौरवाची बाब आहे. इफ्फीच्या माध्यमातून जगभरातील रसिकांसमोर

भारतीय शास्त्रीय संगीताची जादू पसरेल याचा आनंद आहे.”

गोव्यात पार पडणा-या या महोत्सवासाठी तसं कट्यारचं एक वेगळं महत्त्व आहे. कट्यारचं अभिजात संगीत ज्यांच्या

सुरांनी आणि स्वरांनी सजलं ते पं. जितेंद्र अभिषेकी यांचं जन्मस्थान गोव्यातील मंगेशी हे गाव. ज्या मातीत या महान

कलाकाराचा जन्म झाला त्याच मातीत त्याच्या संगीतावर आधारित एका कलाकृतीचा असा सन्मान होणं हा एक आगळा

वेगळा योगच आहे. पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या शब्दांनी सजलेली ‘घेई छंद मकरंद, ‘तेजोनिधी लोह गोल, ‘सुरत पिया

की छिन बिसरायी’ ही आणि अशीच इतर लोकप्रिय गाणी. विविध राग, हरकती आणि आवाजातील नजाकतीने

सजलेल्या या गाण्यांना पंडितजींनी स्वर्गीय सुरावटींनी  संगीतबद्ध केलं होतं. ही गाणी त्याच चालीवर पण नव्या

आवाजात या चित्रपटामधून ऐकायला मिळणार आहेत. याशिवाय यात ‘दिल की तपीश’, ‘सूर निरागस हो’, ‘मन

मंदिरा’, ‘सूर से सजी संगिनी’, ‘भोला भंडारी’ ह्या नवीन गाण्यांचाही समावेश आहे. यातील मूळ गाण्यांचं

पुनर्ध्वनिमुद्रण आणि ही नवीन गाणी संगीतबद्ध केली आहेत शंकर-एहसान-लॉय या लोकप्रिय संगीतकार त्रयींनी.

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर

महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर

यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पुरुषोत्तम दारव्हेकर यांची आहे तर हिंदीमधील अनेक गाजलेल्या

चित्रपटांचे पटकथाकार प्रकाश कपाडिया यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. चित्रपटाची भव्यता

आपल्या कॅमेरात टिपून तो नयनरम्य बनवलाय ज्येष्ठ छायालेखक सुधीर पलसाने यांनी तर कलादिग्दर्शनातून स्वातंत्र्यपूर्व

कालखंड आणि राजे रजवाड्यांची भव्यता उभारण्याचं काम केलंय संतोष फुटाणे यांनी. रंगभूषेचे जादूगार विक्रम

गायकवाड यांच्या कलेची जादू पुन्हा एकदा यातून बघायला मिळेल.

गोव्याच्या भूमित रंगणा-या या चित्रपट महोत्सवात ‘कट्यार काळजात घुसली’ प्रेक्षकांची मने जिंकेल असे मत निर्माते

आणि दिग्दर्शकांनी व्यक्त केलंय.

निखिल म्हणतोय, डरना जरुरी है

0

988271_533856110003165_1312588345_n

 

              ‘हेडलाईन’ या चित्रपटाद्वारे रसिक प्रेक्षकांच्या मनात – मनात आणि घराघरात ठाण मांडून बसलेला अभिनेता निखिल वैरागर म्हणतोय, डरना जरुरी है. आपल्याला प्रश्न पडलेला असेल कि, तो असे का म्हणतोय. त्याला एक भन्नाट कारण आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर आहे.  हा भयपट रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेवून त्यांना घाबरवण्यासाठी कोठे हि कमी पडणार नाही. म्हणून डरना जरुरी है. असे निखिल म्हणतोय.

10565203_687862441269197_4895891604254586982_n 11210450_822783657777074_4613552122046145075_n

                       माझ्या आगामी चित्रपटात चार  जिवलग  मित्रांची  कहाणी असून रहसम्य ठिकाणी हे चार मित्र गेल्यानंतर एका हवेलीत अडकून पडतात. त्या ठिकाणी दिसतात त्यांना आगळ्या वेगळ्या सावल्या, विचित्र आकृत्या ऐकू येतात किचाळलेले आणि कानाला सुन्न करणारे आवाज, आणि  उडतो त्यांच्या  मनाचा थरकाप. असा हा सस्पेन्स थ्रिलर भयपट असून एका रात्रीत घडणारी हि चित्रपटाची  कथा आहे.

               ‘एक थ्रिलर नाईट’ असे चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात माझ्या बरोबर आश्मित पटेल, संस्कृती बालगुडे, खुशबू तावडे अशी तगडी स्टार कास्ट असून या चित्रपटाकडून मला खूप अपेक्षा आहे. “आपल्या होतो तो भास आणि आपण निर्माण करतो तो आभास”. अशा या सस्पेन्स थ्रिलर भयपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पहायला विसरू नका असे निखिलने आवहान केले आहे.      

“प्रेमाचे साइड इफेक्ट्स” चित्रपटातून झळकणार पृथ्वीक कांबळे

0
मराठी सिनेमा कात टाकत आहे याबद्दल आता काही शंकाच उरली नाही. काळासोबत पुढे जात असताना नवनवीन प्रयोग मराठीतील अनेक जण अवलंबताना दिसतात आणि म्हणूनच आता मराठी इंडस्ट्री ला अनेक नवीन चेहरे मिळत आहेत. प्रथमेश परब सरखा सुपरहिट चेहरा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाल्या नंतर आता लवकरच याच नवीन चेहऱ्यांमध्ये पृथ्वीक कांबळे हे नाव देखील जोडलं जाणार आहे.
पृथ्वीक कांबळे हा आगामी प्रदर्शित होणा-या ‘प्रेमाचे साईड इफेक्ट्स’ या सिनेमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पृथ्वीक सोबत आणखी एक नवीन चेहरा झळकणार आहे तो म्हणजे ईश्वरी देशपांडे. या दोन्ही कलाकारांचा हा पहिलाच सिनेमा आहे.  या सिनेमात दीपक शिर्के, रवि काळे, किशोरी अंबिये, सुप्रिया पाठारे अशी दिग्गज आणि तगडी कलाकार मंडळी सुद्धा आहेत. या सिनेमाची निर्मिती “ईश्वरी प्रोडक्शन” या बॅनर खाली जयश्री देशपांडे यांनी केली आहे. सिनेमाचे लेखन अभिजित हरिश्चंद्र यांनी केले असून याचे दिग्दर्शन सुनील चौथमल यांनी केले आहे.
पृथ्वीक ने या आधी अनेक एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर ठेवली आहे.  या सिनेमा द्वारे पृथ्वीक प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या आधीही  नाईट स्कूल, प्यार वाली लव्ह स्टोरी अशा मोठ्या सिनेमात त्याने छोटे छोटे रोल्स देखील केले आहेत.
कीर्ति कॉलेज मधून जनमाध्यम म्हणजेच BMM ची पदवी घेतलेला पृथ्वीक हा सध्या सोशल मीडिया एक्सिक्युटीव म्हणून जॉब सुद्धा करत आहे. त्याच्या या स्ट्रगलमध्ये त्याला संजय जाधव आणि दीपक राणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन हि मिळाले आहे.
शाहरुख खान आणि नावाजुद्दिन सिद्दकी यांना आपला आदर्श मानत असलेल्या पृथ्वीक ला पुढे अभिनयातच करिअर करायचं आहे आणि त्याच दृष्टीने तो पाऊले हि उचलत आहे. प्रेमाचे साईड इफेक्ट्स या सिनेमानंतर ‘ऑनलाईन’ या द्विभाषी (हिंदी-मराठी)  सिनेमात सुद्धा पृथ्वीक हिरो म्हणून झळकणार आहे. त्यामुळे मराठी सिनेमाला नवं स्वरूप मिळत असतानाच नवीन कलाकारांसोबत नवीन कलागुण सुद्धा आपल्याला पृथ्वीक आणि ईश्वरी च्या रुपात लवकरच पाहायला मिळतील.

देशातील स्त्रीभ्रूण हत्येतील चिंताजनक वाढीमुळेच नरेन्द्रभाई मोदींकडून बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम-आ.माधुरी मिसाळ.

0
स्त्रीयांना सन्मानाची वागणूक मिळत नाही याची खंत-स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याबरोबरच मुलींना शिक्षण व समानतेची वागणूक ही द्या -आ.मेधा कुलकर्णींचे आवाहन.
ख्वाडा ची अभिनेत्री वैष्णवी ढोरे ही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवणाऱ्या स्त्री शक्तीचे प्रतीक-सौ.मंजुश्री खर्डेकर.
unnamed unnamed1
कोथरूड विधानसभा मतदारसंघात बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाचा प्रारंभ करताना आणि या उपक्रमा अंतर्गत ख्वादा तील अभिनेत्री कु.वैष्णवी ढोरे हिचा सत्कार व कन्या पूजन करताना मला मनस्वी आनंद होत आहे.आमच्या या संत ज्ञानेश्वर वसाहतीत राहणारी आणि आई वडिलांचे छत्र बालपणीच हरपल्यानंतर आजी आजोबांनी मायेने सांभाळ केलेली वैष्णवी आज ख्वाडा सारख्या अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपटात नायिका म्हणून अभिनय करते,भारत नाट्यम मध्ये नैपुण्य मिळवते,ती खरया अर्थाने प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवणाऱ्या स्त्री शक्तीचे प्रतीक आहे असे गौरवोद्गार शिक्षण मंडळ सदस्य व बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाच्या पुणे शहर सह संयोजिका सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी काढले.कोथरूड येथे बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाचा प्रारंभ करताना कन्या पूजन व ख्वाडा तील याच वस्तीत राहणाऱ्या वैष्णवी ढोरे च्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.
आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत,मात्र अजून ही स्त्रीभ्रूण हत्या होत आहे,महिलांवर अत्याचार होत आहेत आणि स्त्रीयांना सन्मानाची वागणूक मिळत नाही याची खंत वाटते असे नमूद करून मुलींना नुसते वाचवू नका तर त्यांना शिकवा आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्या असे आवाहन आ.मेधा कुलकर्णी यांनी केले.पुण्यात नुकत्याच संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या किवा जीन्स घातली म्हणून पत्नीचा खून करणाऱ्या प्रवृत्तींचा उल्लेख करून पुरुषी मानसिकतेच्या विकृतीचे हे बळी ठरले असून ही मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी नमूद केले.
देशातील स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून महिलांचे घटते प्रमाण लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम देशभर सुरु केला असल्याचे या मोहिमेच्या महाराष्ट्राच्या प्रमुख आ.माधुरी मिसाळ यांनी सांगितले.हजार पुरुषांमागे ८३२ महिला राहिल्या असल्याचे निदर्शनास आल्यावर मोदिजींनी ही मोहीम देशभर राबविण्याचा निर्णय घेऊन आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला असून ही मोहीम महाराष्ट्रात यशस्वी करून दाखवेन असे ही त्या म्हणाल्या.स्त्री मुक्ती म्हणजे स्त्रियांनी मुक्त वागावे,पुरुषांवर अत्याचार करावेत असे नाही तर स्त्रियांनी घरातील सर्वांना बरोबर घेऊन यश मिळवायचे आहे.आदिशक्ती च्या रूपातील देवी ला सर्व देवतांनी पाठबळ दिले म्हणूनच त्यांनी राक्षस संहार केला याचा संदर्भ देऊन स्त्री व पुरुषांनी एकत्र येऊन संसाराचा गाडा हाकावा व बेटी बचाव बेटी पढाव हे सार्थ करावे,असे ही त्या म्हणाल्या.
संदीप खर्डेकर यांनी आ.माधुरीताई,आ.मेधा ताई व सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी आपल्या मुलींना कसे संस्कार दिले व त्या कश्या उच्च विद्या विभूषित झाल्या याचे वर्णन करताना त्याचे सर्वांनी अनुकरण करावे असे आवाहन केले.तसेच ५ वर्षाची चिमुरडी वैष्णवी नवरात्र व गणेशोत्सवात हिरीरीने भाग घ्यायची व आता कार्यक्रम कधी,स्पर्धा कधी आहेत अशी विचारणा करायचे ही आठवण सांगून संदीप खर्डेकर यांनी तिला भावी आयुष्यासाठी सुयश चिंतिले.
यावेळी भाजप चे शहर सरचिटणीस व बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाचे पुणे शहर प्रमुख दीपक मिसाळ,कोथरूड मंडळ अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी,जयंत भावे,प्रशांत हरसुले,विभीषण मुंडे,भारत कदम,निलेश गारुडकर,जनार्दन क्षीरसागर,सौ.संयुक्ता छत्रे,संगीता आदवडे,मानिक्ताई दीक्षित,सौ.ठिपसे,जयेश सरनौबत,मुकेश अनिवसे,पोपट बालवडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक केले,कोथरूड भाजप चिटणीस सुधीर फाटक यांनी सूत्र संचालन केले,तर श्रीकृष्ण गोगावले यांनी आभार व्यक्त केले.यावेळी संपूर्ण वस्ती आपल्या लेकीच्या सत्काराला उपस्थित होती.या कार्यक्रमात लहान मुलींना ओवाळून व त्यांना भेटवस्तू देऊन कन्या पूजन करण्यात आले.

मॉ धर्मदीक्षा यांना वर्ल्ड योगा फौंडेशन कडून योग शिरोमणी व मानव रत्न पुरस्कार प्रदान

0
पुणे:-कलकत्ता येथील वर्ल्ड योग फौंडेशन च्या वतीने देण्यात येणारा योग शिरोमणी व मानव सेवा रत्न पुरस्कार या वर्षी धार्मिक उलेखनीय कार्या  बद्दल गुरु  मॉ धर्मदीक्षा यांना पुण्यात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री आर के पांडे यांनी मॉ धर्मदीक्षा आविष्कृत संवेदन शास्त्रा बद्दल विवेचन केले योगाच्या माध्यमाला अनुसरून विशिष्ठ पद्धतीने समाजात शारीरिक मानसिक व आत्मिक संतुलन आणण्यासाठी संवेदन शास्त्राची उपयोगिता असल्याचे त्यांनी सांगितले.
    अध्यक्षांच्या भाषणात हा पुरस्कार मॉ धर्मदीक्षा यांनी संवेदन शास्त्र द्वारे शोध वर्तनाचा आणलेल्या मुद्रा उपचार व योग विज्ञान द्वारे शरीर अंतर्गत गुप्त दयानंविषयी मानव जीवन उपयुक्त पुस्तकाचे अवतरण दिलेले सांगितले.
मॉ धर्मदीक्षा यांनी मानवाचे संपूर्ण स्वस्थ जे शारीरिक मानसिक तसेच आत्मिक धरणावर अवलंबून त्या करिता योग मार्ग त्यातील प्रक्रिया व संवेदन शास्त्राची जोड या अवतरणाच शक्य आहे असे सांगितले.
   ट्रस्टचे कार्यवाहक व ट्रस्टी श्री दिनेश फेरवानी,संतोष तांदळे व विजयपाल सिह यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.

 

विकासासंदर्भात श्रेयस आणि प्रेयस गोष्टींची पुनर्मांडणी करण्याची वेळ :डॉ गिरीश बापट

0
‘सम्यक विकासाच्या दिशेने :भूतान आणि क्युबा ‘ पुस्तकाचे प्रकाशन 
पुणे :
‘आर्थिक वाढ म्हणजे विकास ‘ हा या प्रचलित समीकरणाला  अपवाद असणाऱ्या भूतान आणि क्युबा देशातील सम्यक विकासाचा वेध घेणाऱ्या ‘सम्यक विकासाच्या दिशेने :भूतान आणि क्युबा ‘ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी इंद्र धनुष्य पर्यावरण आणि नागरिकत्व केंद्रात ज्ञान प्रबोधिनी चे संचालक गिरीश बापट ,राजहंस प्रकाशन चे संपादक आनंद हर्डीकर ,पर्यावरण अभ्यासक भरत मन्साटा,लेखक दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते झाले
‘सततच्या अमर्याद विकासाला ब्रेक लावला पाहिजे किवा दिशा वळवली पाहिजे याचे  भान असलेले क्युबा आणि भूतान या देशाच्या विकसन तत्वज्ञानाचा अभ्यास मांडणारे हे पुस्तक महत्वपूर्ण असून दिशादर्शक आहे . जगाला विकासासंदर्भात श्रेयस आणि प्रेयस गोष्टींची पुनर्मांडणी करण्याची वेळ आली आहे ‘ असे प्रतिपादन यावेळी ज्ञान प्रबोधिनी चे संचालक डॉ गिरीश बापट यांनी केले
विकासाचे पर्यावरण आणि मानवता पूरक प्रारूप शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे ‘ असे आनंद हर्डीकर यांनी सांगितले
नागरिक आणि देशाच्या आनंदी असण्याचे प्रमाण हे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्यापेक्षा महत्वाचे आहे हे भूतान ने जगाला दाखवून दिले तर क्युबाने भांडवलशाही नंतर शेतीचे सेन्द्रीयकरण ,शहरी शेती ,उत्तम संशोधने आणि महासत्तेच्या विरोधात जाउन मानवी विकासाची पर्यावरण पूरक वाट दाखवली ‘ असे मनोगत पर्यावरण अभ्यासक आणि लेखक दिलीप कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले
पौर्णिमा कुलकर्णी यांनी आभार मानले
unnamed

चार्ल्स शोभराज काही दिवसातच तुरुंगाबाहेर … -अभिनेता रणदीप हुड्डा ची माहिती

0

unnamed1

पुणे-
चार्ल्स शोभराज हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असला तरी त्याची खरी कहाणी मांडण्याचा प्रयत्न
मैं और चार्ल्स‘ या चित्रपटातून केला आहे मात्र हा त्याचा जीवनपट नाही असे सांगत
शोभराज हा लवकरच कारागृहाबाहेर पडणार आहे . त्याने स्वतः या चित्रपटाला शुभेच्छ्या  देखील दिल्या आहेत असे आज येथे या चित्रपटाचा नायक अभिनेता रणदीप हुड्डा याने वक्तव्य केले आहे यामुळे चार्ल्स शोभराज विषयी लोकांची उत्सुकता आणखी वाढेल , आणि गुन्हेगाराला हिरो बनविण्याचा प्रयत्न होईल असे प्रश्न मात्र यावेळी रणदीप आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवाळ रामन यांनी फेटाळून लावले . यावेळी अभिनेता आदिल हुसेन हि उपस्थित होते

ते म्हणाले , चार्ल्स शोभराज याच्या जीवनातला केवळ २० ते २५ वर्षाचा काळ यात घेतला आहे १९८६ मध्ये १७० रक्षकांना  झुलवून तिहार तुरुंगातून पसार झालेला शोभराज च्या गुन्हेविषयक कृत्यांचे कोणतेही समर्थन करीत नाही मात्र या काळातील त्याच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे

रणदीप म्हणाला , हायवे या चीत्रापाताहून आणि एकूणच कारकिर्दीतील माझी हि भूमिका माझ्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण  आहे हि भूमिका करण्यासाठी मी महत्प्रयासाने त्याला कारागृहात भेटलो हि आणि या चित्रपटाचे ३ पोस्टर त्याच्यापर्यंत पोहोचविले त्यापैकी २ पोस्टरवर त्याने सह्या केल्यात आणि तिसरे पोस्टर त्याच्या कारागृहातील बऱ्याक मध्ये लावले आहे य़ेत्य ३ नोव्हेंबर ला बहुधा त्याची न्यायालयाची तारीख असावी आणि त्यानंतर लवकरच त्याची शिक्षाही संपेल आता तो ७० ते ७५ वर्षाचा आहे . ३० -३५ वर्षे तो जेल मध्ये आहे तसे पाहता जन्मठेप हि १४ वर्षांची असते . हा चित्रपट पाहून लोकांना शोभराज बनावेसे वाटेल काय ? या प्रश्नाचे हि त्याने खंडन केले , तो म्हणाला कोणाला दिल्लीतील पोलिस अधिकारी अमोधकांत हि बना वेसे वाटेल . या चित्रपटातील शोभराज ला पकडणाऱ्या  महारष्ट्रातील पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांची भूमिका मराठी कलावंत नंदू माधव यांनी अत्यंत सुरेखपणे साकारली आहे मात्र यावर चित्रपट बनवावा अशी कदाचित त्यांची इछ्या नव्हती म्हणून त्याबाबत त्यांच्याकडून फारसी माहिती घेतली नाही असेही त्यांनी सांगितले


दिवाळी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

0

 

‘ स्फूर्ती महिला मंडळ  आणि  ‘स्माइल ‘ संस्थेच्या  वतीने महिला बचत गटांनी दिवाळी साठी तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार एड . वंदना चव्हाण यांच्या हस्ते विश्राम बाग वाडा येथे रविवारी दुपारी झाले . यावेळी हेमंत चव्हाण ,प्रदीप्ता कुलकर्णी उपस्थित होते

सात लोकांनी बनविला ७० मिनिटांचा सिनेमा द ऑफेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल

0

 

पुणे(प्रतिनिधी):- द गोल्ड पिरामिड पिक्चर्स निर्मित “द ऑफेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल”हा चित्रपट प्रेक्षकांच्या  लवकरच भेटीला येत आहे. ह्या चित्रपटाची  निर्मिती  द गोल्ड पिरामिड  पिक्चर्स पुण्यातील नव्याने उभ्या असलेल्या चित्रनिर्मिती संस्थेने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक व संकलन सुशील महाजन तसेच कथा,पटकथा, लेखन डॉ अमित कांबळे  केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट  असे कि, हा चित्रपट सात लोकांनी बनवला असून यातील जे कलाकार चित्रपटात पडद्यावर दिसतात त्यांनीच या चित्रपटाच्या तांत्रिक बाबींची म्हणजे केमेरा,साउंड, लाईट,एडिटिंग,अशा सर्व  बाबींची पूर्तता केली असून सर्व कलाकार डॉ,इंजिनिअर्स,प्रोफेसर आहेत. 
    चित्रपटाचे पूर्ण चित्रीकरण पुण्यातील खानापूर येथे १३ दिवसात पार पडले असून सिंक साउंड तंत्राण्यानाचा या सिनेमात करण्यात आला आहे.संपूर्ण सिनेमा ५.१ साउंड मध्ये बनला आहे.या चित्रपटात सस्पेन्स,थ्रिलर,अक्शन,यांचा समावेश आहे. 
या चित्रपटात अनिकेत सोनावणे,दिनेश पवार,सुरज दहिरे,शिवाजी कापसे,दीप्ती इनामदार,सोमनाथ जगताप,निखिल ओडयरहल्ली,हृषीकेश वाईकर या कलाकारंचा समावेश आहे. 

जागतिक मधुमेह दिनानिमित ओर्थोपेडिक इंडस्ट्रीजच्यावतीने मधुमेहांसाठी लागणारे फुटवेअर सवलतीच्या दरात उपलब्ध

0

जागतिक मधुमेह दिनानिमित ओर्थोपेडिक इंडस्ट्रीजच्यावतीने  मधुमेहांसाठी लागणारे फुटवेअर  सवलतीच्या  दरात उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती ओर्थोपेडिक इंडस्ट्रीजचे संचालक गिरीष डबीर यांनी सांगितले . जर्मन कंपनीचे असणारे  फुटवेअरमध्ये बूट , सेंडल्स , कृत्रिम अवयवांचा  समावेश आहे . यामुळे रुग्णांना अत्याधुनिक साधनांची उपलब्ध झाल्याने आरामदायक जीवन जगता येईल . संपर्कासाठी – ओर्थोपेडिक इंडस्ट्रीज

२८० , नारायण पेठ , माती गणपती जवळ , न चि केळकर रोड , पुणे – ४११०३०,

 गिरीष डबीर – मोबाईल – ९८२२२७४४४४