‘त्रिदल’ पुणे च्या ‘दिवाळी पहाट’मध्ये रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी यांची प्रातःकालीन संगीत मैफल
पुणे :
‘त्रिदल’ पुणे, ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’च्या वतीने यावर्षीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात रोणू मुझुमदार, तौफिक कुरेशी, यांची प्रातःकालीन संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. दि. 10 नोव्हेंबर 2015 रोजी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. रोणू मुझुमदार आणि तौफिक कुरेशी यांना रामदास पळसुले, रोहित कुलकर्णी हे अनुक्रमे तबला, की-बोर्ड वर साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमात 5 पक्क्या पुणेकरांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात राजकुमार आगरवाल, दत्तोबा पाचंगे (चौघडा वादक), बाळासाहेब गांजवे (कोहिनूर आर्ट्स), भारत गायन समाज, शरद मोरे (शौकिन पान) यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष सुशील मुहनोत, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्ता धनकवडे, जगदीश देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत.