‘हेडलाईन’ या चित्रपटाद्वारे रसिक प्रेक्षकांच्या मनात – मनात आणि घराघरात ठाण मांडून बसलेला अभिनेता निखिल वैरागर म्हणतोय, डरना जरुरी है. आपल्याला प्रश्न पडलेला असेल कि, तो असे का म्हणतोय. त्याला एक भन्नाट कारण आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर आहे. हा भयपट रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेवून त्यांना घाबरवण्यासाठी कोठे हि कमी पडणार नाही. म्हणून डरना जरुरी है. असे निखिल म्हणतोय.
माझ्या आगामी चित्रपटात चार जिवलग मित्रांची कहाणी असून रहसम्य ठिकाणी हे चार मित्र गेल्यानंतर एका हवेलीत अडकून पडतात. त्या ठिकाणी दिसतात त्यांना आगळ्या वेगळ्या सावल्या, विचित्र आकृत्या ऐकू येतात किचाळलेले आणि कानाला सुन्न करणारे आवाज, आणि उडतो त्यांच्या मनाचा थरकाप. असा हा सस्पेन्स थ्रिलर भयपट असून एका रात्रीत घडणारी हि चित्रपटाची कथा आहे.
‘एक थ्रिलर नाईट’ असे चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात माझ्या बरोबर आश्मित पटेल, संस्कृती बालगुडे, खुशबू तावडे अशी तगडी स्टार कास्ट असून या चित्रपटाकडून मला खूप अपेक्षा आहे. “आपल्या होतो तो भास आणि आपण निर्माण करतो तो आभास”. अशा या सस्पेन्स थ्रिलर भयपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पहायला विसरू नका असे निखिलने आवहान केले आहे.