चार्ल्स शोभराज हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असला तरी त्याची खरी कहाणी मांडण्याचा प्रयत्न
‘मैं और चार्ल्स‘ या चित्रपटातून केला आहे मात्र हा त्याचा जीवनपट नाही असे सांगत
शोभराज हा लवकरच कारागृहाबाहेर पडणार आहे . त्याने स्वतः या चित्रपटाला शुभेच्छ्या देखील दिल्या आहेत असे आज येथे या चित्रपटाचा नायक अभिनेता रणदीप हुड्डा याने वक्तव्य केले आहे यामुळे चार्ल्स शोभराज विषयी लोकांची उत्सुकता आणखी वाढेल , आणि गुन्हेगाराला हिरो बनविण्याचा प्रयत्न होईल असे प्रश्न मात्र यावेळी रणदीप आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवाळ रामन यांनी फेटाळून लावले . यावेळी अभिनेता आदिल हुसेन हि उपस्थित होते
ते म्हणाले , चार्ल्स शोभराज याच्या जीवनातला केवळ २० ते २५ वर्षाचा काळ यात घेतला आहे १९८६ मध्ये १७० रक्षकांना झुलवून तिहार तुरुंगातून पसार झालेला शोभराज च्या गुन्हेविषयक कृत्यांचे कोणतेही समर्थन करीत नाही मात्र या काळातील त्याच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे
रणदीप म्हणाला , हायवे या चीत्रापाताहून आणि एकूणच कारकिर्दीतील माझी हि भूमिका माझ्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे हि भूमिका करण्यासाठी मी महत्प्रयासाने त्याला कारागृहात भेटलो हि आणि या चित्रपटाचे ३ पोस्टर त्याच्यापर्यंत पोहोचविले त्यापैकी २ पोस्टरवर त्याने सह्या केल्यात आणि तिसरे पोस्टर त्याच्या कारागृहातील बऱ्याक मध्ये लावले आहे य़ेत्य ३ नोव्हेंबर ला बहुधा त्याची न्यायालयाची तारीख असावी आणि त्यानंतर लवकरच त्याची शिक्षाही संपेल आता तो ७० ते ७५ वर्षाचा आहे . ३० -३५ वर्षे तो जेल मध्ये आहे तसे पाहता जन्मठेप हि १४ वर्षांची असते . हा चित्रपट पाहून लोकांना शोभराज बनावेसे वाटेल काय ? या प्रश्नाचे हि त्याने खंडन केले , तो म्हणाला कोणाला दिल्लीतील पोलिस अधिकारी अमोधकांत हि बना वेसे वाटेल . या चित्रपटातील शोभराज ला पकडणाऱ्या महारष्ट्रातील पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांची भूमिका मराठी कलावंत नंदू माधव यांनी अत्यंत सुरेखपणे साकारली आहे मात्र यावर चित्रपट बनवावा अशी कदाचित त्यांची इछ्या नव्हती म्हणून त्याबाबत त्यांच्याकडून फारसी माहिती घेतली नाही असेही त्यांनी सांगितले