IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विदेशी कंपनीला विकणे बेकायदेशीर व देशासाठी धोकादायक: विश्वास उटगी.

Date:

IDBI बँकेतील LIC आणि भारत सरकारचे भागभांडवल परदेशी गुंतवणूकदाराला विकण्याचा प्रस्तावित निर्णय मागे घ्या.

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२६.

IDBI बँकेतील एलआयसी व भारत सरकारचा ६०.७२% भांडवली हिस्सा कॅनडाच्या ‘फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्स लिमिटेड’ या कंपनीला ५२,२८३ कोटी रुपयांना विकण्यास केंद्र सरकारने दिलेली परवानगी ही बेकायदेशीर आहे. असा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला नसून तो संसदेला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा विदेशी कंपनीला विकणे देशहिताचे नसून ते देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्ला आहे, असा गंभीर आरोप करून IDBI बँकेतील LIC आणि भारत सरकारचे भागभांडवल परदेशी गुंतवणूकदाराला विकण्याचा प्रस्तावित निर्णय मागे घ्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांनी केली आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेला संबोधित करताना विश्वास उटगी पुढे म्हणाले की, IDBI ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, तिची स्थापना भारत सरकारने १९६४ मध्ये ‘डेव्हलपमेंटल फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन’ म्हणून केली होती. कालांतराने तिचे रूपांतर ‘युनिव्हर्सल बँक’मध्ये झाले. गेल्या पाच वर्षांत या बँकेच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून ही बँक प्रचंड नफ्यात आहे. या बँकेची मुंबई व हैदराबाद येथे १ लाख कोटी रुपयांची जमीन आहे, देशभरात २२०० शाखा आहेत. ही बँक विकल्यास १ लाख कोटी मिळतील असा केंद्र सरकारचा अंदाज होता, तो नंतर ८२ हजार कोटी व नंतर ७२ हजार कोटीपर्यंत आला आणि आता तो ५२ हजार कोटी रुपये निश्चित केला आहे. भारत सरकारचे हे पाऊल सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या हिताच्या विरोधात आहे. या बँकांनी कठीण काळातही स्वतःला सिद्ध केले असून, त्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी एक साधन आहेत. भारत सरकारद्वारे वेळोवेळी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठीही या संस्था एक माध्यम म्हणून काम करतात. याव्यतिरिक्त, LIC ने २०१८ मध्ये ६१ रुपये प्रति शेअर दराने गुंतवणूक केली होती, तर आता प्रस्तावित परदेशी गुंतवणूकदार भारत सरकारने सुचवल्याप्रमाणे, त्यापेक्षा कमी किमतीत हे शेअर्स खरेदी करू इच्छित आहेत. या प्रस्तावित प्रक्रियेमुळे पॉलिसी धारकांचे हितही धोक्यात आले आहे.

आज सार्वजनिक क्षेत्रातील IDBI बँक विदेशी कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय एसबीआयसह सार्वजनिक क्षेत्रातील १२ महत्वाच्या बँकांच्या अस्तित्वावर गंडांतर आणणारा ठरू शकतो. या १२ बँकांच्या तीनच बँका करण्याचा केंद्र सरकारचा मनसुबा आहे. खाजगी बँकांमध्ये विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के असताना सार्वजनिक क्षेत्रातील IDBI बँकेतील जवळपास ६१ टक्के हिस्सा कसा काय विकला जाऊ शकतो, असा प्रश्न उटगी यांनी उपस्थित केला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरु झाली आहे, असेही विश्वास उटगी म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईतील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा अहवाल द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविण्यात...

एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी निवारा शेडसाठी आमदार निधीतून १२ लाख रुपयांची शिफारस : डॉ. नीलम गोऱ्हे

एकवीरा मातेच्या चरणी प्रार्थना; राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन...

स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद

महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्धार; पाचही जिल्ह्यांत एकत्रित प्रचारावर भर पुणे,...