राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड
पुणे, ता: ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघा’च्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष या पदांसाठीच्या निवडणुका ६ नोव्हेंबर ‘एनसीयुआय’ च्या बेटा हॉल, नवी दिल्ली येथे पार पडल्या. या निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार दिलीप दत्तात्रय वळसे पाटील यांची ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघा’च्या अध्यक्षपदी तीन वर्षांकरिता निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी अमित प्रभाकर कोरे यांची निवड केली गेली आहे. गुजरात फेडेरेशनचे मनीषभाई पटेल व कर्नाटक राज्य फेडेरेशनचे दनाप्पागौडा बसनागौडा इनामदार यांनी अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव सुचविले होते. तसेच उपाध्यक्षपदासाठी अमित कोरे यांचे नाव तामिळनाडू राज्य फेडेरेशनचे के. जी. पी गणामुर्ती यांनी सुचविले होते.
संचालक मंडळ म्हणून गुजरात राज्य फेडेरेशनचे मनिषभाई पटेल, हरियाणा राज्य फेडरेशन व आयएएस सुधीर राजपाल, कर्नाटक राज्य फेडेरेशनचे दनाप्पागौडा बसनागौडा इनामदार, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे शिवाजीराव नारायणराव नगवडे, पंजाब राज्य फेडरेशन आयएएस कंवाल प्रीत ब्रार, तामिळनाडू राज्य फेडेरेशनचे के. जी. पी. गणामुर्ती, उत्तरप्रदेश फेडेरेशनचे बी. के. यादव, गुजरात फेडेरेशनचे जयंतीलाल बावजीभाई पटेल, हरयाणा शुगर फेक्टरीचे साचेनदार सिंह, दक्षिण महाराष्ट्र मतदारसंघातील कलप्पा आवडे, मध्य- दक्षिण महाराष्ट्र मतदारसंघातील विजयसिह मोहिते पाटील, उत्तर – मध्य महाराष्ट्र मतदार संघातील जयप्रकाश रावसाहेब साळुंके दांडेगावकर, पंजाब शुगर फेक्टरीचे हरदीपसिंह धिल्लोन, तामिळनाडू शुगर फेक्टरीचे ए. कुमार तसेच उत्तरप्रदेश शुगर फेक्ट्रीचे चंद्रशेखर सिंह यांची निवड केली आहे.