Home Blog Page 3216

१५ जणांनी केला १५००० फुट उंचीचा हिमालयन ट्रेक

0

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यामार्फत युनायटेड नेशन्स हीफॉरशी व ऑर्गन डोनेशनसाठी केले आयोजनतावनिया परिवारातील आई-लेकीने हिमालयात चढाई करून रचला इतिहास

दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी केले टीमचे कौतुक

दिल्ली: 360 एक्स्प्लोररमार्फत सोलापूर, पुणे, सांगली, अहमदनगर, बीड, अकलूज येथील जवळपास १५ नवख्या ट्रेकर्सनी हिमालयातील ट्रेकमध्ये १५००० हजार फुट उंची गाठून एक आगळावेगळा इतिहास रचला आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे सहित बालाजी जाधव, निखिल यादव, सुमित पवार, करण पंजाबी, निहाल बागवान, धनश्री लेकुरवाळ यांनी स्थापन केलेल्या 360 एक्स्प्लोरर मार्फत हा ट्रेक आयोजित केला होता. १४ ते ५० अश्या वयोगटातील नवख्या ट्रेकर्सना घेवून “जर आपल्यात धाडस असेल तर कोणीही हिमालयावर चढाई करू शकतो” हेच या 360 एक्स्प्लोरर ट्रेकर्सनी दाखवून दिले आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे काम करत असलेल्या युनायटेड नेशन्स च्या हीफॉरशी या स्त्री-पुरुष समानतेसाठी ही मोहीम समर्पित होती. अंबेजोगाईच्या विजय चाटे या युवकाने “ऑर्गन डोनेशन” जागृतीसाठी या मोहिमेद्वारे काम सुरु केले असून १५००० फुटांवरून असा संदेशही त्याने दिला आहे.

            २० डिसेंबर रोजी या मोहिमेची सुरवात झाली होती. २३ तारखेला मनाली येथून सुरवात करून १०००० व १२००० फुटांवर दोन कॅम्प सेट करून या टीमने पुढील चढाई केली. गुढग्याइतका बर्फातून मार्ग काढत या टीमने पुढील चढाई पूर्ण केली. या टीमकडे कोणताही अनुभव नसताना एव्हडी उंची गाठणे या टीमसाठी मोठी गोष्ट होती. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, बालाजी जाधव, कारण पंजाबी, निहाल बागवान या सर्वांच्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनामुळे या सर्वांनी हे करून दाखवले. पुणे येथील उद्योजिका सुषमा कोलवणकर, मयुरी लाटे, किशोर दाते, माधवी मिनासे यांच्यासोबत सांगली येथील गायत्री ओझा यांनीही हा ट्रेक पूर्ण केला. अकलूज येथील प्राथमिक शिक्षक असलेले कृष्णदेव माने यांनीही ‘शिक्षकांनी आपल्या साच्यात न राहता वेगवेगळे अनुभव घेतले पाहिजेत’ असा आदर्श घालून दिला. वालचंद अभियांत्रिकी कॉलेजमधील साक्षी सिंघल हिनेही १५००० फुटांवर चढाई करून ‘शिक्षणासोबत इतर साहसी कामगिरी केली पाहिजे’ असा संदेश दिला. या मोहिमेनंतर दिल्ली विधानसभेत या टीमचा कौतुक झाले व दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामविलास गोयल यांनी या टीमचे अभिनंदन केले. 360 एक्स्प्लोरर मार्फत लवकरच दुसरा हिमालयन ट्रेक आयोजित केला जाणार आहे. याशिवाय माउंट एव्हरेस्ट बेसकॅम्प व मनाली-लेह-लदाख हायवेवर बाईक राईड मोहिमेत सहभागी होण्यासाठी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना संपर्क करण्याचे आवाहन 360 एक्स्प्लोरर मार्फत करण्यात आले आहे.

आई-लेकीचा पराक्रम-

        सोलापूरमधील अर्चना तावनिया व पूर्वा तावनिया या आई व मुलीने १५००० फुट उंची गाठून एक आगळावेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. जवळपास ४० वर्षानंतर प्रथमच अर्चना यांनी घराबाहेर पडून आपल्या मुलीसोबत हा विक्रम केला आहे.

माधवी मिनासे ( ट्रेकर)

“माझ्या आयुष्यातील हा प्रथमच हिमालयन ट्रेक होता. 360 एक्स्प्लोररचे अतिशय काटेकोर नियोजणामुळे हे शक्य झाले आहे. ‘मी सर्व काही करू शकते’ हा एक विश्वास घेवून मी हिमालयातून परत आले आहे.”

साक्षी सिंघल (ट्रेकर, वालचंद अभियांत्रिकी)

“माझ्यासाठी हे एक स्वप्न होते जे आता पूर्ण झाले. मी हिमालयन ट्रेक पूर्ण करू शकते असा विश्वास कोणी दाखवत नव्हते. पण “स्वतवर शेवटपर्यंत विश्वास ठेवा” हा एकच मंत्र घेवून मी हा ट्रेक पूर्ण केला.”

सुषमा कोलवणकर (उद्याजीका, ट्रेकर)

“मी हिमालयाच्या प्रेमात पडले आहे. आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी हिमालयात गेलेच पाहिजे. आणि हिमालयाच्या भव्यतेपुढे आपण मानव किती शुद्र आहोत ही जाणीव मला झाली. या ट्रेक मधून एक नाव जन्म मिळाला आहे.”

विजय चाटे (अंबेजोगाई)

“गेले अनेक महिने ज्याची वाट पाहत होतो त्या स्वप्नपूर्तीचे हे दिवस होते. या ट्रेकमधून अनेक गोष्ठी शिकायला मिळाल्या. जेव्हा गुढग्याइतक्या बर्फातून मी पुढे वाट काढत होतो त्यावेळी स्वतवरचा विश्वास दुणावला. १५००० फुट उंचीवरून माझ्या ऑर्गन डोनेशन च्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली

मिठाईच्या दुकानात घुसला ट्रक; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

0

पुणे-

वडगाव येथील नवले पुलाखाली कात्रजहून येणाऱ्या सीमेंट-काँक्रिट मिक्स घेऊन जाणा-या टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. यात एका तरुणीचा मृत्यू झाला. तर दोनजण जखमी झाले आहेत. आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. स्वाती मधुकर ओरपे (वय-29) असे मयत महिलेचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि, आज दुपारी दोनच्या सुमारास कात्रजहून लुंकड ट्रान्सपोर्टचा एक मिक्स सीमेंट काँक्रिट घेऊन जाणारा टँकर येत होता. त्यावेळी नवले पुलाखाली आल्यानंतर भरधाव वेगातील टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट समोरील विश्व आर्केड कॉम्पलेक्सच्या आवारात घुसला. त्यावेळी दोन वाहनांना ठोकरत आवारातील पाणीपुरी स्टॉलला उडवून तळमजल्यावरील सिरवी मिठाईवाले या दुकानात घुसला.

घटनेवेळी मयत स्वाती ही नाश्ता करण्यासाठी आली होती. ती टँकरच्या समोरील चाकाखाली अडकली. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. टँकर बाजूला हटवून तिचा मृतदेह बाजूला काढण्यात आला. घटनेत अन्य दोनजणही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

नव्या काळाची आव्हाने पेलणारी शिक्षण पध्दती निर्माण करावी लागेल : डॉ. माणिकराव साळुंखे

0
पुणे :’शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून, भावी काळाची आव्हाने पेलणारी, पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवणारी शिक्षणपध्दती निर्माण करावी लागेल’, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ चे वितरण भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस येथे शानदार कार्यक्रमात झाले. त्यावेळी डॉ. साळुंखे बोलत होते.
गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे चंद्रकांत दळवी (​विभागीय ​आयुक्त, पुणे), मुकेश माचकर (महाराष्ट्राचे पहिले मतपोर्टल ‘बिगुल’ चे संपादक), सुवर्णा गोखले (ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन प्रमुख, ग्रामीण विभाग) आणि ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरूंजी, ता. भोर, (ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गृह बांधणी, पर्यटन प्रकल्प उभारणी) यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला .
डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, ‘सध्याची शिक्षणपध्दती ही डाव्या मेंदूला कामाला लावणारी आहे, मात्र, संशोधनासह अनेक महत्वपूर्ण कामांसाठी उजवा मेंदू वापरला जाणे आवश्यक आहे.
काळ बदलत असून, नव्या पिढीसमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहत आहेत. अशा वेळी आगामी काळाची आव्हाने पेलणारी शिक्षण पध्दती निर्माण करावी लागेल. सर्वांना प्रगतीची समान संधी दिली तरच देशाची प्रगती होईल.
‘लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक पत्रकारितेला प्रोत्साहन देणे, स्त्रियांना विकासाची समान संधी देणे आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे मॉडेल उभारणे यासाठी कार्य करणाऱ्यांना या सन्मान सोहळ्यात गौरविण्यात आले, हा अत्यंत आगळावेगळा उपक्रम आहे, समुहाची आणि समाजाची कार्यक्षमता, गुणवत्ता वाढविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील ‘, असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘या सामाजिक कृतज्ञता सन्मानामुळे अधिक काम करायला बळ मिळाले आहे. डॉ.पी.ए. इनामदार हे मागे पडलेल्या समाजाला शिक्षणाद्वारे पुढे आणण्यासाठी उच्च कोटीचे काम शांतपणे करीत आहेत. आदराने पाहावे असे हे व्यक्तीमत्व असून त्यांच्या नावचा सामाजिक कृतज्ञता सन्मान मिळाला, याचा आनंद वाटतो.’
‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरुंजी (ता.भोर) च्या वतीने संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव, अमृता देवगावकर यांनी सन्मान स्विकारला.
‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’  डॉ. व्ही. एन. जगताप (प्राचार्य, एम.सी.ई.सोसायटी ची ​’​इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी डिप्लोमा’​) आणि खतीब अजाझ हुसेन (हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट​’​चे कर्मचारी) यांना देण्यात आला .
मुकेश माचकर, सुवर्णा गोखले, मंदार देवगावकर, डॉ. व्ही. एन. जगताप, खतीब अजाझ हुसेन यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) च्या असेंब्ली हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला .
‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी पी.ए.इनामदार यांचा 73 वा वाढदिवस असून, सन्मानाचे नववे वर्ष होते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व शाल असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
चंद्रकांत दळवी, डॉ.व्ही.एन. जगताप यांनी पुरस्काराची रक्कम समाजोपयोगी कामासाठी संस्थेकडे सुपूर्द केली.
दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले, एम सी ई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम यांनी आभार मानले. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, सारिका रोजेकर आणि सचिन सूर्यवंशी उपस्थित होते .

‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटातील बबली चे फोटो

0

देवाच्या यशानंतर नंतर तेजस्विनी पंडित चा आगामी चित्रपट संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ ५ जानेवारी ला प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटात तेजस्विनीची बबली ह्या भूमिकेत दिसणार आहे. टिझर मध्ये बबलीची ओळख ‘लक्ष्मी रोडची दीपिका पदुकोण’ ह्या नावाने करून दिली आहे. तर तिच्या ह्या भूमिकेचे हे एक्सक्लुसिव्ह फोटो.

 

प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषि पुरस्कार प्रदान सोहळा!

0
पुणे: पुण्यातील सात नामांकित विनाअनुदानित विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे थोर सुपुत्र, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांच्या अमृत महोत्सव – ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषि पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार दि.१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १०.१५ वा. ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ज्ञान-विज्ञान, शिक्षण, राष्ट्रसेवा व मानवकल्याणाच्या अनुषंगाने जीवनभर केलेल्या कार्याबद्दल त्यांना तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषि पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलींची सुवर्णजडीत प्रतिमा, सन्मानपत्र, सुवर्णपदक, रु. १,२५,०००/- (रु. सव्वालक्ष), शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले असून, अध्यक्ष शिवशाहीर मा.श्री. बाबासाहेब पुरंदरे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ.शां.ब.मुजुमदार, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.डी.वाय.पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.पतंगराव कदम व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या शुभहस्ते सदरील पुरस्कार प्रदान केला जाईल.
सदरील पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. पी. डी. पाटील, प्रा. राहुल वि. कराड, डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. विश्‍वजीत कदम,  डॉ. मंगेश तु. कराड,  प्रा. सोमनाथ पाटील, प्रा. स्वाती मुजुमदार, प्रा. अजिंक्य पाटील, डॉ. भरत अग्रवाल  यांच्या संयुक्त संयोजन समितीतर्फे करण्यात आले  आहे.
पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानावर आधारित, राजबाग, लोणीकाळभोर येथील एमआयटी विश्‍व शांती संगीत कला अकादमीतर्फे “विश्‍व शांती सांस्कृतिक संध्या” हा कार्यक्रम त्याच दिवशी सायं.५.१५ ते रात्री १०.०० वाजेपर्यंत शनिवारवाडा प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. यामध्येे ह.भ.प. श्री.धर्मराज महाराज हांडे यांचे भजन व कीर्तन, सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे यांचे अभंगगायन, सौ. सुवर्णा माटेगांवकर यांचा सुगम संगीत गायन आणि पं.उपेंद्र भट यांच्या अभंगवाणीने या संध्येचा समारोप होणार आहे.

टेनिस स्पर्धेत मानस धामणे, जैष्णव शिंदे, ईरा शहा,रुमा गाईकवारी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे – प्रविण मसालेवाले प्रायोजित व हिलसाईड जिमखाना बिबवेवाडी यांच्या तर्फे आयोजित ३१व्या प्रविण करंडक राष्ट्रीय(12 वर्षाखालील) मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात मानस धामणे, जैष्णव शिंदे, राघव हर्ष, अंशूल सातव तर मुलींच्या गटात ईरा शहा, रुमा गायकैवारी, कश्मिरा सुंबरे व  रिया मथारू  यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व  फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत मानस धामणेने अझमिर शेखचा 6-0, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकीत जैष्णव शिंदेने पाचव्या मानांकीत अर्णव पापरकरचा 6-3, 6-2 असा पराभव केला तर तिस-या मानांकीत राघव हर्षने प्रथमेश पाटीलचा 6-0, 6-1 असा व चौथ्या मानांकीत अंशूल सातवने अश्विन नरसिंघानीचा  6-0, 6-1 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात अव्वल मानांकीत ईरा शहाने पाचव्या मानांकीत अनन्या भाटीयावर 6-0, 6-1 असा एकतर्फी विजय मिळवला. दुस-या मानांकीत रुमा गायकैवारीने सातव्या मानांकीत अदिती लाखेचा  6-2, 6-2 पराभव केला. सहाव्या मानांकीत कश्मिरा सुंबरेने जुई काळेचा 6-4, 6-3 असा तर रिया मथारूने पुर्वा भुजबळचा  6-1, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी फेरी: मुले:

मानस धामणे(1) वि.वि अझमिर शेख 6-0, 6-3

जैष्णव शिंदे(2) वि.वि अर्णव पापरकर(5) 6-3, 6-2

राघव हर्ष(3) वि.वि प्रथमेश पाटील 6-0, 6-1

अंशूल सातव(4) वि.वि अश्विन नरसिंघानी  6-0, 6-1

उपांत्यपुर्व फेरी फेरी: मुली:

ईरा शहा(1) वि.वि अनन्या भाटीया(5)  6-0, 6-1

रुमा गायकैवारी(2) वि.वि अदिती लाखे(7)  6-2, 6-2

कश्मिरा सुंबरे(6) वि.वि जुई काळे 6-4, 6-3

रिया मथारू वि.वि पुर्वा भुजबळ  6-1, 6-1

अरुण साने मेमोरियल हौशी लीग टेनिस स्पर्धेत एमडब्लूटीए संघाला विजेतेपद

0

पुणे पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी लीग टेनिस स्पर्धेत एमडब्लूटीए संघाने गोल्डन बॉईज संघाचा पराभव करत विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत एमडब्लूटीए संघाने गोल्डन बॉईज संघाचा 16-14 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. टाय १ मध्ये  ८०अधिक गटात राजेश मनकानी व सुनिल लुल्ला यांनी अमित पाटणकर व विक्रम उमरानी यांचा 6-3 असा सहज पराभव केला. टाय 2 मध्ये प्रविण पांचाल व निलेश ओसवाल या जोडीने केदार पाठक व प्रशांत गोसावी यांचा  6-5(7-4) असा टायब्रेकमध्ये पराभव करत संघाला विजेतेपद मिळवून दिले तर टाय 3 मध्ये आशिष मनियार व अभिषेक सिंग यांना मुकुंद जोशी व आदित्य कथोड यांच्याकडून 4-6 असा पराभव पत्करावा लागला. 

उपांत्य फेरीत एमडब्लूटीए संघाने टोपाझ संघाचा 14-10 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आशा साने, पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीवायसीचे टेनिस विभागाचे सचिव हिमांशू गोसावी, पीएमडीटीएचे उपाध्यक्ष प्रशांत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. अभिषेक ताम्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी

एमडब्लूटीए वि.वि गोल्डन बॉईज 16-14(टाय १: ८०अधिक गट: राजेश मनकानी/सुनिल लुल्ला वि.वि अमित पाटणकर/विक्रम उमरानी 6-3;टाय 2ः प्रविण पांचाल/निलेश ओसवाल वि.वि केदार पाठक/प्रशांत गोसावी 6-5(7-4); टाय 3ः आशिष मनियार/अभिषेक सिंग पराभूत वि मुकुंद जोशी/आदित्य कथोड 4-6)

उपांत्य फेरी
एमडब्लूटीए वि.वि टोपाझ 14-10(टाय १: ८०अधिक गट: राजेश मनकानी/सुनिल लुल्ला वि.वि अभय जेमिनीस/योगेश पंतसचिव 6-3; टाय 2: प्रविण पांचाल/निलेश ओसवाल पराभूत.वि अमित लोटे/अमित नाटेकर 2-6; टाय 3: आशिष मनियार/अभिषेक सिंग वि.वि सारंग देवी/ प्रतिक वांगीकर 6-1)
 
गोल्डन बॉईज वि.वि लॉ कॉलेज 17-124(टाय १: ८०अधिक गट: अमित पाटणकर/विक्रम उमरानी वि.वि गिरिष राव/ आशिष धोंगडे 6-2; टाय 2: केदार पाठक/प्रशांत गोसावी वि.वि तारक पारीख/ शिवाजी यादव 6-4; टाय 3:  मुकुंद जोशी/आदित्य कथोड पराभूत वि केतन जठार/अभिजित मराठे 5-6 (5-7))

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा १४० कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर

0

मुंबई : श्री. क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास करण्यात येणार असून आज देवस्थानच्या सर्वांगीण विकासाचा १४० कोटी रुपयांचा आराखडा सादर झाला असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज सह्याद्री अतिथीगृहात भीमांशकर देवस्थान चा विकास आराखडा अर्थमंत्र्यांसमोर सादर करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. बैठकीस माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांच्यासह पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह पुरातत्व, वन आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग असून त्यास “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. येथे दरवर्षी साधारणत: २५ लाख भाविक दर्शनासाठी येतात हे लक्षात घेऊन श्री.क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास करण्याचे शासनाने ठरवले असल्याचे अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, या आराखड्यातील कामांना आज अंतिम स्वरूप देण्यात आले. राज्यातील सर्व ज्योर्तिलिंगे राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात येणार असून  या कामास गती देण्यासाठी आपण केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणार असल्याचे अर्थमंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले. ते पुढे  म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे. भीमाशंकरचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून वन्यजीव अभयारण्य म्हणून राखीव वनात मोडतो त्यामुळे आराखड्यातील ज्या विकास कामांना भारतीय वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत मान्यता घेण्याची गरज आहे, त्या कामांचे प्रस्ताव तयार करून ते केंद्र शासनाकडे पाठवावेत तसेच ज्या कामांना या मान्यतेची गरज नाही त्या कामांना वेग देण्यात यावा.  इथे करण्यात येणाऱ्या प्रत्येक विकास कामांचा दर्जा सर्वोत्तम राहिल यासाठी प्रयत्न करतांना नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी केली जावी, परिसरात इलेक्ट्रीक किंवा बॅटरी ऑपरेटेड वाहने चालविण्यात यावीत असेही ते म्हणाले.

नियोजन विभाग या आराखड्यासाठी नोडल विभाग म्हणून काम करील असे स्पष्ट करून श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आरखड्यातील कामे करतांना ज्या खाजगी जमिनी संपादित करावयाच्या आहेत,  त्याबाबत संबंधित मालकांशी चर्चा करून त्यासंबंधीचे प्रस्ताव तयार केजे जावेत. भीमाशंकर येथील बस स्थानकाचे नुतनीकरण करतांना त्यासाठी उत्तम वास्तुविशारद नेमण्यात यावा.  आराखड्यातील ज्या ज्या कामांना वॉल कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या भिंती या बोलक्या भिंती असाव्यात. ज्योर्तिलिंगाचे महत्व, वन, वृक्ष आणि वन्यजीव संपदा याची माहिती, स्वच्छतेचे संदेश त्यावर देण्यात यावेत.

वन विभागातर्फे महादेव वन विकसित करतांना तेथे रुद्राक्षाच्या रोपांबरोबर पांढऱ्या फुलांची तसेच बेलाच्या सर्व प्रजातींची लागवड केली जावी. येथील प्रकाशयोजना उत्तम आणि आकर्षक असावीच परंतू ती सौर उर्जेवर कशी विकसित करता येईल याचा देखील अभ्यास केला जावा. महादेव वनात मोठे त्रिशुळ किंवा नंदी उभारण्यात यावा, असेही ते म्हणाले.

देवस्थानला २०३० मध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन आराखड्यातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारणाच्या सुविधा, वाहनतळ विकास, आरोग्य केंद्राचे काम तसेच स्वच्छतेच्या सुविधा यांचा विकास केला जावा. दिव्यांग व्यक्तींसाठी देवस्थान प्रवास व देवदर्शन सुलभ होईल याची यात काळजी घेतली जावी.

नियोजित आराखड्यात  पायरीमार्ग ते भीमाशंकर मंदिर परिसर विकास, भीमा नदीचे उगमस्थान, महादेव वन, बस स्टॅण्ड परिसर, भीमाशंकर मंदिर परिसर, नवीन दगडी मंडप, प्रवेशद्वार, ओवरी, पादत्राणे रॅक, दुकानांचा विकास, कुंड सुशोभिकरण, हेलिपॅड, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुहिक सेवा केंद्र, वाहनतळ विकास, मदत केंद्र,  पाणपोई, सीसीटीव्ही आणि माहिती फलक, निकास मार्ग, सुलभ इंटरनॅशनल शौचालये, यासारख्या विकास कामांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

4 जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

0

विंदांच्या आठवणींना उजाळा देणारा विशेष कार्यक्रम

मुंबई : राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने येत्या 4 जानेवारी रोजी ‘मराठी भाषा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यानिमित्त ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या  विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘देणाऱ्याने देत जावे..’ अशा विंदांच्या अभूतपूर्व कवितांचे गायन, अभिवाचन आणि त्यांच्यावरील लघुपटांचे सादरीकरण रसिकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याची वेळ सायंकाळी 5 ते 7 अशी आहे, असे सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी कळविले आहे.

भारत-अफगाणिस्तानचे उद्योग व्यापार संबंध अधिक वृध्दिंगत व्हावेत – राज्यपाल

0

मुंबई: काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने अफगाणिस्तान आणि भारताचे उद्योग-व्यापारविषयक संबंध अधिक वृध्दिंगत होतील असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी आज व्यक्त केला.

राजभवन येथे अफगाणिस्तानच्या वाणिज्‍य शिष्टमंडळाने राज्यपाल यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. विद्यासागरराव म्हणाले, अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध प्राचीन आहेत. शेकडो वर्षापूर्वी दोन्ही देशा दरम्यान व्यापार चालायचा. आज पुन्हा त्या जुन्या संबंधाना उजाळा मिळाला आहे. दोन्ही देशात पर्यटनाला चांगला वाव आहे. अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारत ठामपणे उभा राहिलेला आहे. राजनैतिक संबंध उत्तमप्रकारे प्रस्थापित झाले आहेत. दोन्ही देशादरम्यान व्यापार विषयक देवाण-घेवाण वाढली पाहिजे. त्यासाठी विविध शहरे विमान सेवेने जोडली पाहिजेत, म्हणजे उद्योग-व्यवसायाला चालना मिळून पर्यटन क्षेत्राचा विकास होईल.

अफगाणिस्तान मधील सुकामेवा (ड्रायफ्रुटस) भारतात प्रसिध्द आहे, तर भारतातील मोती आणि मोत्यांचे दागिने अफगाणिस्तानात प्रसिध्द आहेत. असे सांगून ते म्हणाले, भारताने जवळपास 16 हजार अफगाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली आहे. पुणे,मुंबई आणि अन्य शहरात ते उच्च शिक्षण घेत आहेत. भारताने अफगाणिस्तानात अनेक शाळा सुरु केल्या आहेत. दहशतवाद संपविणे हे दोन्ही देशाचे उद्दिष्ट आहे. व्यापार आणि उद्योग व्यवसायात दोन्ही देशांनी चांगली भरारी घेतली तर अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल.

भारतातील अनेक भाषातील चित्रपटाचे चित्रिकरण हे अफगाणिस्तानात केले जाते. तेथील सुंदर प्रेक्षणीय स्थळांची मोहिनी भारतीयांवर आहे. त्याच बरोबर भारतीय चित्रपटाचा खास शौकीन वर्ग अफगाणिस्तानात आहे. असेही शेवटी राज्यपाल म्हणाले.

प्रारंभी अफगाणिस्तानचे राजदूत मोहमंद झीया सालेही यांनी राज्यपाल विद्यासागरराव यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कार्गो सेवेद्वारे दाखल फळांची पहिली पेटी राज्यपाल विद्यासागर राव यांना सन्मानपूर्वक भेट दिली. या भेटी दरम्यान अफगाणिस्तान दूतावासातील अधिकारी, व्यापारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काबूलचे सफरचंद मुंबईत

काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने फळे आणि भाजीपाला आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. कालच जवळपास 40 टन सफरचंद घेऊन अफगाणिस्तानचे विमान मुंबईत दाखल झाले. आता नियमित विविध फळे, सुकामेवा येथील बाजार पेठेत उपलब्ध होणार आहेत. भारतातील केळी आणि द्राक्षाला चांगली मागणी असल्याचे अफगाण शिष्टमंडळाने चर्चा करताना सांगितले.

अफगाणिस्तानचे व्यापारी शिष्टमंडळ आणि मुंबईतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची एकत्रित बैठक घेऊन फळे, भाजीपाला व अन्य जिवनावश्यक वस्तुंची देवाण-घेवाण वाढविण्याबाबत चर्चा घडवून आणण्याच्या सूचना यावेळी राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी दिल्या.

यावेळी सर्वश्री. हाजी मोहमंद (आशिक अफगाण लि.) हाजी फरहार (फरहाद लि.) हाजी सादुद्दीन (खंदा फूड लि.), हाजी अहमद शाह (अल मन्सूर झम झम लि.), मोहमंद अली खान (क्रिस्टाल इन्टरप्राईजेस) आदी उद्योग-व्यापारविषयक शिष्टमंडळातील व्यापाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी राज्यपाल यांचे प्रधानसचिव वेणूगोपाल रेड्डी, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, पणन विभागाचे प्रधानसचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.

स्वच्छ शहरांसाठी स्वच्छ सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढवावा- मुख्यमंत्री

0

स्वच्छ सर्वेक्षणातील गुणानुक्रमातील अव्वल शहरांनाही राज्यशासनामार्फत मिळणार प्रोत्साहनपर बक्षिसे

– 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान सर्व शहरात स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

मुंबई : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राचा क्रमांक अग्रस्थानी येण्यासाठी आपली शहरे ही स्वच्छ राहिली पाहिजेत, ही भावना सर्वांमध्ये जागृत करणे आवश्यक आहे. स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पहिल्या शंभर क्रमाकांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा समावेश व्हावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा व स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम शहरांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 ची आढावा बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेची व अमृत शहरे व अमृत योजनेत सहभागी नसलेल्या शहरांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची घोषणा केली. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह भिवंडी, उल्हासनगर, पनवेल, ठाणे आदी महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त,  नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, मुंबईचे आयुक्त अजोय मेहता, विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून स्वच्छता अभियानाच्या प्रगतीची माहिती घेतली.

येत्या 1 जानेवारी 2018 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार आहे. मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत या स्पर्धेचे परिक्षण करण्यात येणार असून यातील पहिल्या तीन वॉर्डना बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांतील पहिल्या तीन वॉर्डना अनुक्रमे 50 लाख, 30 लाख व 20 लाख तर ‘क’ व ‘ड’ वर्ग महानगरपालिकेतील वॉर्डना अनुक्रमे 30 लाख, 20 लाख व 15 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच ‘अ’ वर्ग नगरपरिषदासाठी अनुक्रमे 30 लाख, 20 लाख व 15 लाख तर ‘ब’ वर्ग नगरपरिषदांसाठी 20 लाख, 15 लाख, 10 लाख आणि ‘क’ वर्ग नगरपरिषदांसाठी अनुक्रमे 15 लाख, 10 लाख व 5 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन गुणानुक्रमात आलेल्या राज्यातील शहरांना 20 कोटी तर, 4 ते 10 क्रमांकामध्ये आलेल्या शहरांना 15 कोटी देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागीय गुणानुक्रमात येणाऱ्यांसाठीही बक्षिसे जाहीर करण्यात आली असून यामध्ये पहिल्या 3 क्रमांकात येणाऱ्या शहरांना 15 कोटी, 4 ते 10 क्रमांकामध्ये येणाऱ्यांना 10 कोटी तर, 11 ते 50 क्रमांकामधील शहरांना 5 कोटी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाने घोषित केलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत यावर्षी राज्यातील शहरांचा गुणानुक्रम वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. अमृत योजनेतील जास्तीत जास्त शहरे यंदा पहिल्या शंभर क्रमांकामध्ये यावीत, यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. तसेच स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिक्रियांना महत्त्व असल्यामुळे यासंबंधीचे ॲप जास्तीत जास्त लोकांनी वापरून आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात, यासाठीही प्रयत्न करावेत. स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यासाठी बैठका घेण्यात याव्यात.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वच्छतेत चांगली प्रगती केली आहे. परंतु अद्यापही स्वच्छ शहरांच्या गुणानुक्रमात आघाडी घेण्याची संधी असून त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये चांगले गुणानुक्रम न मिळविणारे, शहरातील 80 टक्के कचरा विलगीकरण न करणारे व कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार न करणाऱ्या शहरांना राज्य शासनामार्फत अतिरिक्त अनुदान देण्यात येणार नाही. पुढील काळात शहरांच्या कामगिरीनुसारच अनुदान वितरीत करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती म्हैसकर-पाटणकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2018 ची माहिती दिली. श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, केंद्र शासनाने यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण अमृत शहरे व अमृत योजनेत समाविष्ट नसलेली शहरे अशा दोन गटात होणार आहे. अमृत शहरांचे गुणानुक्रम हे देशातील 500 शहरांमधून होणार असून अमृत योजनेत नसलेल्या शहरांची विभागणी पाच विभागात करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा समावेश पश्चिम विभागात करण्यात आला असून यामध्ये 1015 शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजेत्या शहरांना केंद्राकडूनही बक्षिस मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त शहरे पहिल्या 100 क्रमांकामध्ये यावीत, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. चार जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू होणार आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक आहे.

एसआरए गृहनिर्माण संस्था यापुढे माहिती अधिकार कक्षेत येणार

0

मुंबई :- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सर्व गृहनिर्माण संस्था माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत आणण्याचे व संस्थानिहाय जन माहिती अधिकारी नेमणूक करून त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याचे निर्देश राज्य माहिती आयोगाच्या बृहन्मुंबई खंडपीठाचे आयुक्त ए.के.जैन यांनी दिले आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदाने मागणी केलेली माहिती नाकारणाऱ्या संस्थेविरूध्द राज्य माहिती आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलावर खंडपीठाने 19 डिसेंबर 2017 रोजीच्या निर्णयात हे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणाची पार्श्वभुमी अशी, जयप्रकाश एस. पागधरे यांनी ते रहात असलेल्या झोपु योजनेतील गृहनिर्माण संस्थेकडे माहितीची मागणी केली होती. संस्थेने माहिती देण्याची तयारी दर्शवितानाच, संस्था माहितीचा अधिकार अधिनियम,2005 च्या कक्षेत येत नसल्याची भूमिकाही घेतली होती. आयोगाने, संस्थेच्या याच भूमिकेला आक्षेप घेऊन अशा गृहनिर्माण संस्थांना शासनाकडून 100 टक्के भरीव अर्थसाह्य व शासनाचे संपूर्ण नियंत्रण असल्यामुळे ती  व अशा सर्व संस्था ‘सार्वजनिक प्राधिकरण’ असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

सर्वसाधारण गृहनिर्माण संस्थांच्या कारभाराकडे सहकार विभागामार्फत सहकार कायद्याचे पालन होईल इतक्या मर्यादेपर्यंतच नियंत्रण असते. परंतु, झोपु योजनेतील सर्व गृहनिर्माण संस्था या शासनाच्या ‘सर्वांना घरे’ या धोरणाचा भाग आहेत. म्हणून या योजनेच्या यशस्वीतेसाठी, शासन स्वत:हून इमारतींचे बांधकाम, लाभार्थ्यांना सदनिकांचे योग्य रीत्या वाटप, इमारतींच्या देखभाल व दुरूस्तीकरिता प्रत्येक सदनिकेमागे रु. 20,000/- इतकी तरतूद, व दहा वर्षांपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण आणि अटी व शर्तींच्या अधीन सदनिकांचे हस्तांतरण तसेच विकासकांना प्रोत्साहनपर जादा चटई क्षेत्र इत्यादी माध्यमातून शासनाचे भरीव अर्थसाह्य आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण असते. म्हणजेच अशा गृहनिर्माण संस्था या शासन धोरणाच्या अंमलबजावणीकरिता एक माध्यम म्हणून आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी “सार्वजनिक प्राधिकरण” कोणास म्हणता येईल याबाबतची संदिग्धता दूर केली आहे. त्या निवाड्यानुसार झोपु  गृहनिर्माण संस्थांना मिळणारे अर्थसाह्य भरीव स्वरूपाचे असल्यामुळे व पात्र  कुटुंबांना  मिळालेल्या  सदनिका  10 वर्षांपर्यंत  हस्तांतरणावर बंधन  व तो पर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सखोल नियंत्रण असते. म्हणून या निकषावरही अशा गृहनिर्माण संस्था माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत त्या “सार्वजनिक प्राधिकरण” या व्याख्येत बसत आहेत, असे आयोगाचे मत आहे. या योजनेत पारदर्शकता यावी व शासनामार्फत मिळणाऱ्या एवढ्या भरीव मदतीचा उपयोग पात्र व्यक्तींना व्हावा व योजनेत गैरप्रकार होणार नाहीत, म्हणून अशा संस्थांना माहिती अधिकाराच्या कक्षेत आणणे सार्वजनिक हिताचे आहे. आणि म्हणून आयोगाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत स्थापित झालेल्या व या पुढे होणाऱ्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 2 (एच) अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे.

आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी समयबध्द व परिणामकारक व्हावी म्हणून झोपु प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  सर्व झोपू योजनेतील गृहनिर्माण संस्थांमध्ये जन माहिती अधिकारी व  प्राधिकरणातील सहाय्यक निबंधक या श्रेणीपेक्षा कमी नाहीत, अशा अधिकाऱ्यांना  प्रथम अपील अधिकारी म्हणून नामनिर्देशन करून ती माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावी.  तसेच, यासाठी आवश्यक ती प्रशासकीय यंत्रणा उभारून अधिनियमाबद्दल प्रबोधन व प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावेत.  याकामी आवश्यक त्या निधीची तरतूदही करण्याचे निर्देश आयोगाने प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत.

प्रधानमंत्री लोकप्रशासन पुरस्कारांसाठी जिल्ह्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

मुंबई : ‘प्रधानमंत्री लोकप्रशासन पुरस्कार 2017’ साठी जिल्ह्यांनी 31 डिसेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्राधान्य कार्यक्रमांची नोंदणी करावी; त्याअनुषंगाने दि. 1 जानेवारी 2018 पासून प्रस्ताव स्विकारण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

प्रधानमंत्री कृषी विमा योजना, डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन (प्रमोटींग डिजीटल पेमेंट्स), प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण आणि शहरी, दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना या चार प्राधान्य क्रमाच्या योजनांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व लोकतक्रार निवारण विभागाने तयार केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. या पोर्टलची लिंक www.darpg.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निवड झालेल्या जिल्ह्यांना 2018 च्या नागरी सेवा दिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

आतापर्यंत पुरस्कारांसाठी नोंदणी केली नाही अशा जिल्ह्यांनी मुदतीत नोंदणी करावी तसेच आपला प्रस्ताव सादर करावा असे आवाहन केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व लोकतक्रार निवारण विभागाने केले आहे, असेही सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

जनकल्याण समितीतर्फे ‘समाजसेवक सहाय्यता निधी योजना’

0

पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे  ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ ही योजना सुरू केली जाणार आहे. सामाजिक कार्यामध्ये अनेक वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांना काही ना काही कारणाने आर्थिक साहाय्याची आवश्यकता निर्माण होते, अशा कार्यकर्त्यांना या योजनेअंतर्गत नित्य वा नैमित्तिक अशा स्परूपात पूरक निधी दिला जाणार आहे.
अनेकविध संस्था, संघटनांमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते पंधरा, वीस, पंचवीस वर्षे असा प्रदीर्घ काळ निरपेक्षपणे काम करतात, त्यातील काही जणांना आर्थिक मदतीची गरज निर्माण होते. ज्या कार्यकर्त्यांना अशा मदतीची आवश्यकता असेल, अशांचा शोध घेऊन त्यांना उचित आर्थिक मदत करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या कार्यकर्त्यांना जनकल्याण समितीने आर्थिक मदत केली, तर मी समाजासाठी अनेक वर्षे काम केल्यानंतर मला आवश्यकता निर्माण झाली तेव्हा समाजही माझ्या मदतीला आला, असे समाधान त्या कार्यकर्त्याला मिळावे, ही या योजनेमागची भावना आहे. त्याबरोबरच निरपेक्ष भावनेने समाजाची सेवा केलेल्या कार्यकर्त्यांबद्दल समाजानेही कृतज्ञ असले पाहिजे, तसेच हा कृतज्ञ भाव समाजाने या ना त्या रूपाने व्यक्त केला पाहिजे हा संस्कार नव्या पिढीवर व्हावा, अशीही या योजनेमागील भावना आहे.
या योजनेसाठी जनकल्याण समितीने कायमस्वरुपी निधी निर्माण केला असून त्यातून समाजसेवकांना काही निकषांवर सहाय्यता निधी दिला जाईल. तसेच दानशूर व्यक्तींच्या इच्छेनुसार या निधीत भरही घातली जाणार आहे.
दीर्घकाळ काम केलेल्या समाजसेवकाला आवश्यक ती मदत समाजानेच दिली पाहिजे या जाणीवेतून पुण्यातील एका दानशूर व्यक्तिने दीड कोटी रुपयांची देणगी जनकल्याण समितीकडे दिली आहे. या स्थायी निधीच्या व्याजातून समाजसेवक सहाय्यता निधी योजना राबविली जाणार आहे.
सहाय्यता निधीसाठी जनकल्याण समितीने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती नावांची निवड करेल. या योजनेअंतर्गत निधी देणार्‍यांना आयकर विभागाची ८० जी सवलत आहे. ज्यांना या योजनेचा लाभ हवा आहे अशा समाजसेवकांनी तसेच ज्यांना योजनेत निधी द्यायचा आहे, अशांनी पुढील क‘मांकावर संपर्क साधावा ०२०-२४३२४०७१ किंवा ९४२३५००२३६ असे आवाहन करण्यात आले आहे.

 

‘मोहोर प्रतिमा’ला रेसिडेंशियल गटातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार

0

पुणे – बांधकाम क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘बिल्डर्स असोसिएशन ऑङ्ग इंडिया, पुणे चॅप्टर’चा २१ वा ‘रेसिडेंशियल हौसिंग कॉम्प्लेक्स’ गटातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ‘मोहोर ग्रुप’च्या ‘मोहोर प्रतिमा’ या गृहनिर्माण प्रकल्पाला प्रदान करण्यात आला.
‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते ‘मोहोर ग्रुप’चे संचालक पंकज सोळंकी, प्रकल्प प्रमुख महेंद्र रामपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘मोहोर ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालय भारत देसडला, ‘मनिषा कन्स्ट्रक्शन’चे सुरेश वाघेला यांची प्रमुख उपस्थिती होती. चाळीस प्रवेशिकांमधून ही निवड करण्यात आली.
गुणवत्ता, गतीमानता, सुरक्षितता, समाजकल्याण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक साहित्य आणि आर्थिक निकषांवर ही निवड करण्यात आली. सुप्रसिध्द आर्किटेक्चर, इंजिनिअर, टाऊन प्लॅनर आणि कन्स्लटंट यांच्या परीक्षक मंडळाने ही निवड केली.
सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात तळेगाव येथे ‘मोहोर प्रतिमा’ हा गृहरचना प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. आधुनिक काळातील सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. आधुनिक जीवन शांततेत जगण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. तुमच्या स्वप्नातील घरासाठी हा सर्वोत्तम प्रकल्प आहे. या प्रकल्पात ३९० अपार्टमेंटस आहेत.