पुणे – प्रविण मसालेवाले प्रायो
बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत मानस धामणेने अझमिर शेखचा 6-0, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकीत जैष्णव शिंदेने पाचव्या मानांकीत अर्णव पापरकरचा 6-3, 6-2 असा पराभव केला तर तिस-या मानांकीत राघव हर्षने प्रथमेश पाटीलचा 6-0, 6-1 असा व चौथ्या मानांकीत अंशूल सातवने अश्विन नरसिंघानीचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकीत ईरा शहाने पाचव्या मानांकीत अनन्या भाटीयावर 6-0, 6-1 असा एकतर्फी विजय मिळवला. दुस-या मानांकीत रुमा गायकैवारीने सातव्या मानांकीत अदिती लाखेचा 6-2, 6-2 पराभव केला. सहाव्या मानांकीत कश्मिरा सुंबरेने जुई काळेचा 6-4, 6-3 असा तर रिया मथारूने पुर्वा भुजबळचा 6-1, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी फेरी: मुले:
मानस धामणे(1) वि.वि अझमिर शेख 6-0, 6-3
जैष्णव शिंदे(2) वि.वि अर्णव पापरकर(5) 6-3, 6-2
राघव हर्ष(3) वि.वि प्रथमेश पाटील 6-0, 6-1
अंशूल सातव(4) वि.वि अश्विन नरसिंघानी 6-0, 6-1
उपांत्यपुर्व फेरी फेरी: मुली:
ईरा शहा(1) वि.वि अनन्या भाटीया(5) 6-0, 6-1
रुमा गायकैवारी(2) वि.वि अदिती लाखे(7) 6-2, 6-2
कश्मिरा सुंबरे(6) वि.वि जुई काळे 6-4, 6-3
रिया मथारू वि.वि पुर्वा भुजबळ 6-1, 6-1