पुणे– पीवा
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत एमडब्लूटीए संघाने गोल्डन बॉईज संघाचा 16-14 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. टाय १ मध्ये ८०अधिक गटात राजेश मनकानी व सुनिल लुल्ला यांनी अमित पाटणकर व विक्रम उमरानी यांचा 6-3 असा सहज पराभव केला. टाय 2 मध्ये प्रविण पांचाल व निलेश ओसवाल या जोडीने केदार पाठक व प्रशांत गोसावी यांचा 6-5(7-4) असा टायब्रेकमध्ये पराभव करत संघाला विजेतेपद मिळवून दिले तर टाय 3 मध्ये आशिष मनियार व अभिषेक सिंग यांना मुकुंद जोशी व आदित्य कथोड यांच्याकडून 4-6 असा पराभव पत्करावा लागला.
उपांत्य फेरीत एमडब्लूटीए संघाने टोपाझ संघाचा 14-10 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आशा साने, पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीवायसीचे टेनिस विभागाचे सचिव हिमांशू गोसावी, पीएमडीटीएचे उपाध्यक्ष
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी
एमडब्लूटीए वि.वि गोल्डन बॉईज 16-14(टाय १: ८०अधिक गट: राजेश मनकानी/सुनिल लुल्ला वि.वि अमित पाटणकर/विक्रम उमरानी 6-3;टाय 2ः प्रविण पांचाल/निलेश ओसवाल वि.वि केदार पाठक/प्रशांत गोसावी 6-5(7-4); टाय 3ः आशिष मनियार/अभिषेक सिंग पराभूत वि मुकुंद जोशी/आदित्य कथोड 4-6)