Home Blog Page 3192

वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी सेलिब्रिटींनी केले फिटनेस कॅलेंडर लाँच

0

पुणे : आर पिलेट्स स्टुडिओच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये पुण्यातील नामवंतांची मांदियाळी जमली होती, त्यामुळे या सोहळ्यात जणू तारांगणच अवतरल्यासारखे भासत होते. पुण्यातल्या पहिल्या पिलेट्स स्टुडिओमध्ये जेव्हा आर पिलेट्स कॅलेंडर लाँच करण्यात आले तेव्हा सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उपस्थित होती. या कॅलेंडरच्या विक्रीतून जमा होणारा निधी पुण्यातील निवारा वृद्धाश्रमला मदत म्हणून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठीतील आघाडीची अभिनेत्री भार्गवी चिरमुले उपस्थित होती. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक राधिका कारळे यांच्या हस्ते या फिटनेस कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

पिलेट्स या विषयावर आधी कोणीच कधी सादर केले नव्हते असे पिलेट्स कॅलेंडर या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले, हा या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला. जीवनाच्या विविध क्षेत्रांत आपला प्रभाव निर्माण केलेल्या आणि स्टुडिओच्या ग्राहक असलेल्या महिलांना स्टुडिओच्या ब्रँड अम्बॅसिडर म्हणून या कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आले आहे. सुजाता शिरोळे, पायल कलमाडी, सलोनी चाफळकर, नेहा चाफळकर, श्रुती शेट्टी, शीतल रांका, नीता गोयल, देवश्री मराठे, श्रिया कोलते-पाटील, स्नेहा बलदोटा आणि भावना कोठारी यांच्या उपस्थितीमुळे जणू अवघी स्री शक्तीच या कार्यक्रमाला एकवटल्यासारखे वाटत होते.

आर पिलेट्स स्टुडिओच्या मालक रूचा मुळे म्हणाल्या,  ̒निवारा वृद्धाश्रमाला मदत करण्यासाठीच केवळ आम्ही हे कॅलेंडर प्रकाशित केले आहे. पुण्यात आम्ही यशस्वीपणे तिसरा वर्धापनदिन साजरा करत असताना आमच्या मान्यवर ग्राहकांनी या वृद्धाश्रमाला काही प्रमाणात मदत करावी, अशी आमची इच्छा होती. ̕

त्या पुढे म्हणाल्या ,  ̒कॅलेंडर प्रकाशनापूर्वीच्या विक्रीतून आम्ही १५ हजार रुपयांचा निधी उभा केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यात आम्ही भरघोस रकमेची भर घालून ती स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून देऊ. ̕

अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणाली, ̒ मला या कार्यक्रमात सहभागी होता आले याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. त्याचबरोबर निवारा वृद्धाश्रमाला आर्थिक मदत देण्यासाठी आर पिलेट्सने घेतलेल्या पुढाकाराचेही मला कौतुक वाटते. या उत्तम कार्याला आपला पाठिंबा देण्यासाठी इतकी माणसे इथे एकत्र आली आहेत हे पाहून चांगले वाटले. ̕

सुजाता शिरोळे म्हणाल्या, ̒ आर पिलेट्सने निवाराच्या सोबतीने हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आर पिलेट्सचे अभिनंदन करते. समाजोपयोगी कार्यासाठीच्या या सोहळ्यात एकत्र आलेल्या मान्यवरांमध्ये मीही आहे याचा मला आनंद वाटतो.

शिवसृष्टीनंतर -खंडपीठाबाबत पुण्याची फसवणूक -गिरीश बापटांबाबत वकिलांमध्ये संताप

0

पुणे- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आज पुण्याची फसवणूक झाल्याचा आरोप करीत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबाबत संताप व्यक्त करीत  पुणे जिल्ह्यातील वकिलांनी आज (गुरुवारी) कामकाजावर बहिष्कार टाकला ,आणि जोरदार घोषणाबाजी केली .बार असोसिअशन चे पदाधिकारी, तसेच अनेक वकिलांनी स्वयंस्फुर्तीने यावेळी निदर्शने केली या मध्ये  सुरेश बोराटे,राणी राम कांबळे , रुपाली पाटील ,मोहन वाडेकर , अॅड. सुहास पडवळ, अॅड. अतिश लांडगे, अॅड. सुनील कड, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. गणेश राऊत, अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. सुनील कड, अॅड. विक्रम यादव आदि मान्यवर सहभागी झाले होते .आता थांबणार नाही … तर बापटांच्या घरावर मोर्चा .. असे इशारे यावेळी दिले गेले ..

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपल्याच जिल्ह्यात व्हावे या मागणीसाठी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांनी सातत्यातने पाठपुरावा केला आहे. यासाठी मोर्चे, कामबंद आंदोलनेही झाली आहेत. परंतू बुधवारी मुख्यमंत्र्याच्या दालनात झालेल्या बैठकीत कोल्हापूर खंडपीठासाठी शंभर कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याती ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याच्या वृत्त समजताच शिवाजीनगर न्यायालयातील वकीलांमध्ये खळबळ उडाली .

यावेळी बोलताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर म्हणाले, ” मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पुण्यात खंडपीठ व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी न्यायमूर्ती चेल्लूर यांच्यासमोर या मागणीचा प्रस्ताव ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु काल झालेल्या बैठकीदरम्यान पुण्यातील खंडपीठाबाबत विचार न केल्यामुळे आज शिवाजीनगर न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे, या मागणीसाठी आज पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने देखील एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर म्हणाले, ” महाराष्ट्र सरकारने पुण्यास खंडपीठ देण्याचे आश्वासन दिले होते पण ते खोटे ठरले. ही सरकारची नामुष्की असून वकिलांची व जनतेची फसवणूक आहे. कोल्हापूरला खंडपीठ मिळाल्याचा आनंदच आहे पण हायकोर्टात जाणारी सर्वात जास्त प्रकरणे ही पुण्याची असताना देखील पुण्यावर अन्याय का ? ” असा सवाल देखील अॅड. पुणेकर यांनी बोलून दाखविला.माजी अध्यक्ष अॅड. सुहास पडवळ म्हणाले, ” काम बंद करण्याची वेळ शासनाने आणली असून या निष्क्रीय शासनास लवकर जाग न आल्यास व पुण्यास खंडपीठ न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार” असल्याचे सांगितले.

पीएमपीएमएल-प्रशासनाच्या प्रगतीच्या वाटचालीवर कामगारहिताला गळफास देणारे निर्णय होऊ नयेत …मुरलीधर मोहोळ

0

निलंबित कामगारांची बाजू ऐकणार कोण ?
पुणे- कुठलाही निर्णय घेताना तो एकतर्फी नसावा, किंवा चूक झालेली असेल तरी कोणत्या परिस्थितीत चूक झाली याचा हि विचार आवश्यक असतो …केवळ संस्थेचा फायदा म्हणून लोकहिताला  -कामगार हिताला गळफास देऊन चालणार नाही . तुकाराम मुंडे यांनी घेतलेला निर्णय प्रशासनासाठी योग्य असूही शकेल .. तो कामगार विरोधी तर नाही ? मानवता विरोधी तर नाही ? याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला करावाच लागेल .आणि  प्रशासन आणि कामगारांची बाजू ऐकून घेवूनच निलंबित कामगारांबाबत योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे अशी माझी ठाम भमिका असल्याचे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष म्र्लीधर मोहोळ यांनी म्हटले आहे .
पीएमपीएमएल मधील १५८ कामगारांच्या निलंबनाबाबत मंडे यांची बदली झाल्यावर आक्षेप घेणारी वक्तव्ये काही मंडळी करीत आहेत . याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले . कामगारांची बाजू ऐकून घेण्यात गैर काय ? परिस्थिती समजून घेण्यात अडचण काय ? कोणी जाणून बुजून , अमिषाला बळी पडून चूक केली तर शासन जरूर व्हावे .. याच भूमिकेतून मुंडे यांनी केलेल्या निलंबनविषयक  कारवाईचा फेरविचार करावा असे मला वाटते …चांगल्या कामगारांनादेखील  कोणी वाली उरला नाही असे होता कामा नये ..असे हि त्यांनी स्पष्ट केले .. पहा आणि ऐका नेमके मोहोळ यांनी काय म्हटले आहे .

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालया समोर निषेध आंदोलन

0

शिक्षण आयुक्त विपिन शर्मा यांना निवेदन सादर

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांकरिता अवांतर वाचनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या ‘भारतीय विचार साधना’ या संस्थेकडुन पुस्तके खरेदी केली आहेत, बाजारात २० रुपयाला मिळणारी ही पुस्तके ५० रुपये प्रती दराने खरेदी केली आहेत, याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन  करण्यात आले.

आंदोलनादरम्यान शिक्षण आयुक्त विपिन शर्मा यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले.

हे आंदोलन शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले

यावेळी नगरसेवक विशाल तांबे, नंदा लोणकर, वासंती काकडे, अशोक राठी, शशिकला कुंभार, भोलासिंग अरोरा, मिलिंद वालवडकर, डॉ.दत्ता गायकवाड, महेश हांडे, मनोज पाचपुते, किशोर कांबळे, निलेश वरे, फहिम शेख, नितिन राठोड, नितीन रोकडे, जावेद इनामदार, विपुल म्हैसुरकर, रोहन पायगुडे, अतुल तरवडे, विक्रम मोरे, शरद दबडे, मोरेश्वर चांदेरे, सागरराजे भोसले, गजानन लोंढे, निखिल बटवाल, विकी वाघे, सुरज लाटे, युसुफ शेख, अजिंक्य पालकर , संजय गायकवाड, संदीप नवघरे, तुकाराम शिंदे आदी उपस्थित होते.

आंदोलनाचे आयोजन युवक शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी केले होते.

‘शालेय विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके खरेदी केली असुन या पुस्तकात आक्षेपार्ह मजकुर आहे. यातील भाषा प्राथमिक शाळेतील मुलांना न समजणारी आहे. ‘बाल नचिकेता’ या पुस्तकात  मीलन, कोमार्यभंग आणि कामातुर यासारख्या शब्दाचा भडीमार करण्यात आलेला आहे . या वयोगटातील मुलांना कथा समजावी यासाठी चित्रांचा वापर अधिक केला जातो, पंरतु  या पुस्तकामध्ये “कथा गणपती” यासारखी एक दोन पुस्तके सोडली तर उर्वरित साऱ्या  कथा चित्रांशिवाय आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोजड भाषेत लिहिलेल्या आहेत.  अत्यंत कठीण व अनावश्यक अशा शब्दाचा वापर केलेला आहे . या पुस्तकांत पौराणिक व धार्मिक कथाचा भर आहे यातुन मुलांवर विशिष्ट विचारधारेचा संस्कार लादण्याचा सरकारचा घाट आहे’, असे खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितले. 

‘मुलांच्या ‘सोशलायझेशन’ च्या नावाखाली १ हजार ३१४ शाळा बंद करणाऱ्या सवेदनशील शिक्षणमंत्र्याना विद्यार्थ्यांची मानसिकता व शिक्षणाबद्दल ची एवढी साधी बाब लक्षात येउ नये ही आश्चर्य कारक बाब आहे . याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले’, असे पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष राकेश कामठे म्हणाले. 

मोहन भागवत यांचे वक्तव्य लष्कराचे मनोधैर्य खचविणारे – खा.अ‍ॅड.वंदना चव्हाण यांची टिका

0

पुणे :

‘लष्काराला तयार व्हायला 7 दिवस लागतात, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सीमेवर लढण्यासाठी केवळ 3 दिवसात तयार होऊ शकतात,’ अशा आशयाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान लष्कराचा अवमान करणारे तर आहेच, पण मनोधैर्यावर विपरीत परिणाम करणारे आहे , अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खा.अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

भारतीय लष्कराला शिस्त, त्याग, समर्पणाची दीर्घ परंपरा आहे. सीमेवर सतत सज्ज राहून , लढायाकरून भारतीय लष्काराने आपले सामर्थ्य जगाला वेळोवेळी दाखवलेले आहे. संघाला संचलनापलिकडे सेना उभारण्याची परवानगी घटनेने दिलेली नाही, तसा आवही त्यांनी आणू नये. तसेच सैन्याशी तुलना होईल अशी वक्तव्ये करून सैन्याचा तेजोभंग करू नये.’ असे खा. वंदना चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.

स्वातंत्र्य लढ्यात सर्व भारतीय जीवाची पर्वा न करता उतरले होते, तेव्हा संघ मैदानात का उतरला नाही, याचे उत्तर मोहन भागवत यांनी जगाला द्यावे, असेही खा. चव्हाण यांनी म्हटले आहे.

‘आयडीया,कन्सेप्ट आणि स्टोरी’ विषयावरील राज्यस्तरीय अ‍ॅनिमेशन कार्यशाळेस चांगला प्रतिसाद

0

पुणे :‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अ‍ॅण्ड आर्ट्स’, आझम कॅम्पस च्या वतीने नुकतीच रणजित (टोनी) सिंग यांच्या ‘आयडीया, कन्सेप्ट आणि स्टोरी’ या विषयावरील दोन दिवसांची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन रणजित (टोनी) सिंग यांचा हस्ते करण्यात आले.

रणजित सिंग एक प्रसिद्ध लेखक आणि अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ आहेत. ‘द आर्ट ऑफ अ‍ॅनिमेशन प्रॉडक्शन मॅनेजमेंट’ हे त्यांचे पुस्तक तत्काळ प्रसिध्द झाले आहे. कार्यशाळे दरम्यान एकुण 85 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद होता. महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य, आयोजक स्वतंत्र जैन, निलीमा घरत यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना त्यांच्या अ‍ॅनिमेशन कौशल्यात वाढ करण्यासाठी तसेच ज्ञान आणि कौशल्यातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या कारकिर्दीसाठी मदत व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळे दरम्यान ‘प्रकल्प व्यवस्थापन आणि क्रिएटिव्ह पर्यवेक्षण’, ‘2 डी / 3 डी प्रदर्शन अ‍ॅनिमेशनसह उत्पादन / दिशानिर्देश’, उत्पादन निरीक्षण, उत्पादन ट्रॅकिंग सिस्टम डिझाईन आणि सल्ला, कोर्स डिझाईन, सल्ला आणि शिक्षण, व प्रोजेक्ट मेन्टरिंग आणि इनक्यूबेशन या विषयावर विद्यार्थांना प्रबोधन करण्यात आले.

‘अ‍ॅनिमेशन आणि क्राफ्ट ऑफ स्टोरीजिंग’, ‘अ‍ॅनिमेशन प्रॉडक्शन मॅनेजमेंट’, ‘फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स’ आणि ‘डिजिटल अ‍ॅनिमेशन’ आदी विषयावरील व्याख्याने आणि विशेष वर्ग ते चालवतात.

स्वतःच स्वतःचा आदर्श व्हा अभिनेते सुबोध भावे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

0
एमआयटीतर्फे आयोजित ‘अभिनेता म्हणून झालेला माझा प्रवास’ मध्ये विशेष मुलाखत
पुणे- तुम्ही कोणाचाही आदर्श घेण्याची जरूरी नाही. स्वतःच स्वतःचा आदर्श व्हा, तुमची स्पर्धा स्वतःशीच असली पाहिजे. ज्यात आनंद मिळेल अशीच गोष्ट करा आणि त्यात भरपूर शिका व परिश्रम करा. त्यामुळे आनंद व यश दोन्हींमुळे नाही तरी कोणत्याही क्षेत्रात गेलात, तरी तुम्हाला परिश्रम घ्यावेच लागतात. असा सल्ला प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना दिला.
निमित्त होते माईर्स एमआयटीच्या मेकॅनिकल इंजिनियरिंग विभाग आणि असोसिएशन ऑफ स्टूडन्ट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनियरिंगतर्फे आयोजित ‘अभिनेता म्हणून झालेला माझा प्रवास’ या मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या मुलाखतीचा. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतांना त्यांचे विविध पैलू समोर आले.
पुण्याच्या बालनाट्य संस्थेच्या माध्यमातून अभिनयाची कारकिर्द सुरू करता-करता पुरूषोत्तम करंडक मिळविण्यासाठी प्रयत्न करताना त्याना आपल्या स्वतःमधील अभिनेत्याचे दर्शन झाले. आयुष्यातील महत्वाच्या वळणावर म्हणजेच १२वीं सायन्यमध्ये मी नापस झालो. तोच माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता. त्यामुळेच आज मी येथवर पोहोचलो, अशी कबुली सुबोध भावे यांनी दिली. पुरूषोत्तम करंडक स्पर्धा हेच माझ्यासाठी अभिनयाचे धडे देणारे विद्यापीठ होते. नंतर कॉमर्सचे शिक्षण घेतांना केलेल्या घडपडीत रंगमंचाने मला खूप काही शिकविले. ‘चंद्रपुरच्या जंगलात’ या नाटकासाठी बरेच परिश्रम घेतल्यानंतरही पुरूषोत्तममध्ये हवे असे तसे यश मिळाले नाही. पण एड्स विषयावर आधारित असे हे नाटक आम्ही जेव्हा इतर कॉलेजेस, सामाजिक  संस्था आणि जेलमध्ये सुद्धा केल्यानंतर रंगमंचावरील आलेला अनुभव हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंंट ठरला.
अहोरात्र अभिनयाची नशा असल्यामुळे नोकरीचा राजिनाम दिल्यानंतर नैराश्य न येता याच क्षेत्रात संघर्ष करीत राहण्याचा निर्णय घेतला. संघर्षा शिवाय जीवनात काहीच मिळत नाही हा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.
‘व्हेलेंटाइन डे’ निमित्त आपल्या जीवनाची प्रेमकथा उलगडतांना सुबोध भावे म्हणाले, बालनाटक करतांना मी १०वीं होतो तर नंतर इंजिनियर झालेली माझी पत्नी मंजिरी ही ८वींत होती. त्यावेळेसच मी तिला प्रपोज केले. त्यानंतर ११९१ पासून अगदी आजपर्यंत आमचे अफेअर सुरूच आहे. आमच्या दोन मुलांचा सांभाळ करून मंजिरी पूर्णपणे कान्हाज प्रॉडक्शनची जवाबदारी सांभाळून सृजनात्मक कार्य करीत आहे.
बालगंधर्व व लोकमान्य या चित्रपटाच्या माध्यमातून हुबेहुब व्यक्तिरेखा करणारे सुबोध भावे यांनी नाटक कट्यार काळजात घुसली या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाची जवाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात विशेष रूची उत्पन्न झाल्यामुळे पं.भीमसेन जोशी, जितेन्द्र अभिषेकीबुवा, राहुल देशपांडे व महेश काळे यांचे गायन रोज ऐकतो. खंत एकच आहे, की आईने लहानपणीच सांगितले होते की संगीत शीक.
गूढकथा, परीकथा, थ्रिलर या सारख्या वेगवेगळया विषयांची आवड असल्यामुळे राजन खान, ग.दि. मा, विश्‍वास पाटील, सुहास शिरवळकर सारख्या लेखकांची पुस्तके वाचतांना विशेष आनंद मिळतो. त्यामुळे विचारांना चालना मिळते. ती तुम्हाला पुढे घेऊन जाण्यास प्रेरणा देत असते.
या वेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक विश्‍वस्त प्रा. प्रकाश जोशी, असोसिएशन ऑफ स्टूडन्ट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सचिव रितेश देवकर, प्रा.डॉ. सुहासिनी देसाई व प्रा. सुधीर राणे उपस्थित होते.
सोशल मीडिया हे साफ खोटे आहे. त्यावर काहीही लिहिल जाते.  त्याचा परिणाम हा समाजात वाईटच दिसतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने देशातील कायदे न पाळणारा हाच खरा दहशतवादी आहे. प्रत्येकाने माणसे जोडावीत. तोडू नयेत. रोजच्या जीवनात साधे साधे नियम पाळले तरी जीवन  सुखमय बनेल. सर्वांनी सिग्नलच्या नियमांचे पालन केले तरी मोठ्या प्रमाणात हानी टळेल.

बालेवाडीत महाआरोग्य शिबिर! सर्व प्रकारच्या तपासण्या, शस्रक्रिया व औषधोपचार मोफत होणार

0

शेतकरी आठवडे बाजार ग्रामीण फुड कार्निव्हलचे

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पुणे: हृदयरोग, लठ्ठपणा, श्वसनाचे विकार, त्वचा रोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, आतड्याचे विकार आदी सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी, त्यावरील शस्रक्रिया व औषधोपचार मोफत असणारे महाआरोग्य शिबिर येत्या शनिवार व रविवारी (17 व 18 फेब्रुवारी) पुण्यातील बालेवाडीमध्ये होत आहे. त्यासोबतच थेट शेतकऱ्यांचा ताजा शेतीमाल शहरातील नागरिकांना मिळावा व त्यांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडावे यादृष्टीकोनातून शेतकरी आठवडे बाजार व ग्रामीण फूड कार्निव्हलचे आयोजनही करण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट व खासदार संजय काकडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आयोजक व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाउंडेशन, बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशन आणि पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य शिबिर आणि अमोल बालवडकर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि स्फूर्ती ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी आठवडे बाजार व ग्रामीण फूड कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बालेवाडी येथील दसरा चौकातील संजय फार्म येथे येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता याचे उद्घाटन होणार आहे. महाआरोग्य शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असणार आहे. तर, बाजार व फूड कार्निव्हल सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी 2017 चा विजेता अभिजीत कटके याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे, असेही नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले.

महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, सर्व प्रकारची चाचणी, औषधोपचार तसेच सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या आरोग्य शिबिरामार्फत नागरिकांना सर्व सुविधा मोफत पुरविल्या जातील तसेच योग्य उपचार केले जातील,  असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले. यावेळी मोफत अवयवदानाचे फार्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

प्रत्येक शनिवार व रविवारी शेतकरी आठवडे बाजार व ग्रामीण फूड कार्निव्हल!

बालेवाडीतील साई चौकात प्रत्येक शनिवारी व रविवारी शेतकरी आठवडे बाजार भरणार आहे. हा आठवडे बाजार प्रत्येक शनिवार व रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. प्रभागातील नागरिकांसाठी थेट शेतकऱ्यांचा शेतीमाल मिळणार आहे. तसेच, खास खवय्यांसाठी ग्रामीण फूड कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे थेट शेतकऱ्याला पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. ग्रामीण खाद्य पदार्थांची विक्री होणार आहे. यासोबतच मनोरंजनासठी घोडागाडी, बैलगाडी व उंटावरील सफारी तर, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोष्टींबरोबरच नंदी बैल, वासुदेव यामध्ये असणार आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून हे काम केले जाणार असल्याने महिलांनाही रोजगार मिळणार आहे, असेही नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

17वा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव 25 फेब्रुवारी रोजी

0

 

पुणे ः नृत्य, घुंगरू, संगीत, ताल, लय यांचा अजोड मिलाफ असलेला 17वा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव ऐतिहासिक  शनिवारवाड्याच्या प्रांगणात रविवार, 25 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होत आहे. पवित्र भट व सहकारी यांचा ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ हा कार्यक्रम आणि नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य हे या महोत्सवाचे यंदाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव समिती अध्यक्षा सबीना संघवी यांनी ही माहिती दिली.

शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर, डीव्हीडी एक्सप्रेस-औंध आणि दि ओ हॉटेल-कोरेगांव पार्क येथे 16 ते 24 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असतील. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 11.00 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी प्रवेशिका उपलब्ध असतील. प्रवेशिकेची किंमत रु. 250 असून प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था असेल. तसेच www.bookmyshow.com या वेबसाइटवर ऑनलाईन बुकींग करता येतील.

कार्यक्रमाचा प्रारंभ पवित्र भट व सहकारी यांच्या ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ या नृत्याच्या कार्यक्रमाने होईल. पवित्र भट यांनी देशात आणि परदेशातही अनेक भरतनाट्यम् कार्यशाळा आयोजित केल्या. ‘श्रीरंगा’ या कार्यक्रमात एका भक्ताचा पवित्र कावेरी नदीपासून सध्याच्या तामिळनाडू राज्यातील श्रीरंगम् येथील रंगनाथस्वामीपर्यंतचा प्रवास सादर केला आहे. भक्ताने मंदिरात प्रवेश करताक्षणी गरूड त्याचे स्वागत करतो. हा सर्व नृत्याविष्कार कार्यक्रम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.

यानंतर नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य सादर होईल. नक्षत्र गुरुकुलाची स्थापना त्याचे संस्थापक संचालक गुरु बिजय कुमार साहू यांनी 2007 मध्ये भुवनेश्वर येथे केली. ओडिसी डान्सचा पूर्वावतार असलेले गोतिपुआ नृत्य हे स्त्रियांची वेशभूषा व पोशाख केलेली मुले सादर करतात. गोतिपुआचा ओडिया भाषेतील अर्थ गोती म्हणजे मुलगी आणि पुवा म्हणजे मुलगा आहे. यात नर्तक अनेक गुंतागुंतीच्या बंध (मुद्रा) करतो.

उमेशचंद्र बरिक, सब्यसाची साहू, जगमोहन साहू, कुणाल प्रधान, अनंत जेना, अभिषेक साहू आणि पबित्रा साहू हे गोतिपुआ नृत्य सादर करणार आहेत. हे मनोहर नृत्य पाहण्याची संधी पुणेकरांना प्रथमच मिळणार आहे.

यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पंचशील रिअ‍ॅलिटी हे असणार आहेत, तर 5 एफ वर्ल्ड, वेकफील्ड, मोर मिसचीफ, रेडिओ वन, दि ओ हॉटेल आणि प्युअर गोल्ड फाइन चॉकलेट हे या कार्यक्रमाचे सह प्रायोजक असतील.

लक्ष्यच्या ग्रॅंड मास्टर विदीत गुजराथी, प्रार्थना ठोंबरे, स्वप्निल कुसळे, विक्रम खुराडे यांना शिव छत्रपती पुरस्कार जाहीर

0
पुणे- क्रीडा स्वयंसेवी संस्था असलेल्या लक्ष्यच्या  ग्रॅंड मास्टर विदीत गुजराथी(बुध्दीबळ,नाशिक), प्रार्थना ठोंबरे(टेनिस, सोलापुर), स्वप्निल कुसळे(रायफल नेमबाज, कोल्हापुर) व विक्रम खुराडे(कुस्ती, कोल्हापुर) यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागातर्फे देण्यात येणारा शिव छत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 17 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 
 
लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडीया म्हणाले, संस्थेसाठी ही अतिशय अभिमानास्पद क्षण आहे . खेळाडू, प्रशिक्षक व पालकांनी घेतलेल्या महिनतीचे हे फळ आहे. हे सर्व खेळाडू लहान शहरे आणि गावातील आहेत आम्ही खरोखरच समाधानी आहोत की आम्ही तळागाळातून योग्य प्रतिभा ओळखू शकलो. या खेळाडूंना योग्या वेळी पाठिंबा देता आला. ही तर केवळ सुरूवात आहे. अजून खूप यश त्यांना मिळवायचे आहे असे ते म्हणाले. 
 
बुध्दिबळ खेळामध्ये नाशिकच्या ग्रॅंड मास्टर विदीत गुजराथी याला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लक्ष व भारत फोर्ज यांचा पाठिंबा लाभलेला विदीत जोगतीक क्रमवारीत 34व्या स्थानी, आशियायी क्रमवारीत 9व्या तर राष्ट्रीय क्रमवारीत 3-या स्थानावर आहे. 2013 मध्ये त्याला ग्रॅंड मास्टर किताब मिळवला.2016 मध्ये दोहा येथे झालेल्या विश्व रैपिड बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंद विरूध्द खेळताना 8 विजय, 3 बरोबरी व 4 पराभव मिळवत 9.5 गुणांसह 8वे स्थान पटकावले होते. 
 
टेनिस खेळामध्ये बार्शी सोलापूरच्या प्रार्थना ठोंबरेला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लक्ष्य व भारत फोर्ज यांचा पाठिंबा असलेली प्रार्थने 2014 साली इन्चोन येथे झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांच्या दुहेरी गटात सानिया मिर्झाच्या साथीत कांस्य पदकाची कमाई केली होती. 2015 साली केरळ येथे झालेल्या 34व्या राष्ट्रीय स्पर्धेत एकेरी गटीत एक रौप्य, संघिक गटात व दुहेरी गटात 2 कांस्य पदकांची कमाई केली.   
 
नेमबाजी प्रकारात कोल्हापुरचा रयफल शुटर स्वप्निल कुसळे याला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लक्ष्य व रावेतकर ग्रुप यांचा पाठिंबा लाभलेल्या स्वप्निलने 2017 साली केरळ येथे पार पडलेल्या 61व्या राष्ट्रीय नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत 50मीटर थ्री पोझीशन प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. याशिवाय  थ्री पोझीशन सिविलीयन प्रकारात रोप्य तर 1163 गुणांसह सांघिक कांस्य पदक पटकावले. स्पर्धेच्या अंतिम लढतीत 457 गुणांसह नविन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 2017 मध्ये गोल्ड कोस्ट येथे आयोजीत राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत स्वप्निलने 50प्रोन प्रकारात 619.1 गुणांसह कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत गगन नारंगने रौप्य पदक मिळवले होते. 
 
ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात कोल्हापुरच्या विक्रम खुराडेला पुरस्कार जोहीर करण्यात आला आहे. लक्ष्य व नांदेड सिटी यांच्या पाठिंबा लाभलेल्या विक्रमने  फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या आशियायी अजिंक्यापद स्पर्ध्यांच्या  निवड चाचणी स्पर्धेत विजय मिळवला.  ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात 63 किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. याशिवाय प्रो रेस्टलींग लीग मध्ये मुंबई मराठी संघातही त्याचा सहभाग होता. 

इंद्रायणी महाविद्यालयात ‘आयसीटी इन एज्युकेशन’ वर 16 व 17 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

0
पिंपरी :
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात येत्या 16 व 17 फेब्रुवारी रोजी ‘आयसीटी इन एज्युकेशन’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन लोकप्रिय लेखक आणि मराठी माहितीतंत्रज्ञ अतुल कहाते यांच्या हस्ते होणार आहे. विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी तसेच मावळ परिसरातील नागरीकांनी या चर्चासत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ यांनी केले आहे. हे चर्चासत्र इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए व बीसीए विभागातर्फे आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र प्राध्यापक व विद्यार्थी यांना एक प्रकारची बौद्धिक मेजवानी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे, असा विश्‍वास उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे यांनी व्यक्त केला.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे असणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल पवार हे प्रमुख पाहुणे असतील. या चर्चासत्रात अमोल धोंडसे, आनंद पिकले, डॉ. रंजीत पाटील, डॉ. एम.एस. गायकवाड, डॉ. जे.डी. टाकळकर, डॉ. यशोधन मिठारे, डॉ. विलास वाणी, डॉ. दिपाली सवाई, डॉ. प्रसन्न देशमुख, निरुपमा कानेटकर आदी वक्ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. समारोपप्रसंगी संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे उपस्थित असणार आहेत.
या दोन दिवसीय चर्चासत्रात आयसीटी’चे सर्व क्षेत्रातील महत्त्व, शिकवण्याच्या प्रक्रियेत आयसीटीचा प्रभावी वापर आणि नॅक मूल्यांकनासाठी आयसीटीचे अनिवार्य असणे अशा विविध विषयांवर चर्चा करणे हा प्रमुख उद्देश आहे, असे चर्चासत्राच्या संयोजिका प्रा. विद्या भेगडे यांनी दिली.

साळुंके शैक्षणिक कला क्रिड़ा आरोग्य संकुलाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ

0

पुणे -मनपाच्या सहकार्याने व सभागृह नेते -.श्रीनाथ भिमाले यांनी मंजूर करून दिलेल्या रु 20 लाख निधीचा  कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला . बुरडी पुलाजवळील कै. पै. गजानन रामचंद्र साळुंके शैक्षणिक , कला , क्रीडा व आरोग्य संकुल  इमारतीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन – श्रीनाथ- भिमाले यांच्या हस्ते झाले तसेच स्थानिक नगरसेवक सौ.सुलोचनाताई कोंढरे  सौ ..वनराज आंदेकर    मिस युनिव्हर्स गौरव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक मनिष साळुंके यांनी केले होते .

संजय देशमुख,सोमनाथ पवार,रामभाऊ पारीख,मदीना ताबोळी , पोपटराव गायकवाड़,नईम  शैख़,पै.राजेंद्र पड़वळ,जयप्रकाश पुरोहित,तुलशीदास  चव्हाण,अँड शेखर पवार,गणेश पाचारकर, संजय रजपूत,उदय लेले,बाप्पू नाईक, तेजेन्द्र कोंढरे,उमेश शिंदे,विश्वास महाजन सागर शिंदे सनी पवार रोहन ढाले गणेश औवगडे संकेत महामुनी नानासाहेब कोलतेआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संयोजन साठी अँड.मयूर पायगुडे,धनंजय विरोळे, माधवीताई साळूके,गोपीआण्णा येमूल यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सुत्रसंचांलन व आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष मनिष साळुंके यांनी केले.

अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत स्पार्टन्स, वाडेश्वर विझार्डस संघांचे विजय

0
पुणे- डेक्कन जिमखाना तर्फे आयोजित अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत  स्पार्टन्स, वाडेश्वर विझार्डस या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अमित परांजपे याच्या नाबाद ४२धावांच्या खेळीच्या जोरावर  स्पार्टन्स संघाने  हॅट्ट्रिक संघाचा ७ गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना  अभिजित तावरे ३०, नितीन हार्डीकर १५ यांनी केलेल्या धावांच्या जोरावर हॅट्ट्रिक संघाने ७षटकात ५बाद ६८धावा केल्या. स्पार्टन्सकडून  यश परांजपे(२-६), पराग चितळे(२-१६), ऋषिकेश मोने(१-९)यांनी सुरेख गोलंदाजी केली. ६८धावांचे आव्हान  स्पार्टन्स संघाने ६.४ षटकात २बाद ६९धावा करून पूर्ण केले. यात अमित परांजपेने २० चेंडूत ३चौकार व ३षटकारांच्या मदतीने नाबाद ४२धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अमितला  पराग चितळेने १० चेंडूत नाबाद १३धावा काढून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी अमित परांजपे ठरला. अन्य लढतीत कर्णा मेहता(४२धावा व  २-७)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वाडेश्वर विझार्डस संघाने सिटी प्राईड संघावर ११धावांनी विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली.  हर्षद बर्वे(२६धावा व १-७)याच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर  मोटिव्हेटर्स संघाने एम.जे.वुल्वस्‌चा ३०धावांनी पराभव केला.  शैलेश बांगळे (४५धावा)याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर हॅट्ट्रिक संघाने मोटिव्हेटर्स संघाचा ८गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
हॅट्ट्रिक: ७षटकात ५बाद ६८धावा(अभिजित तावरे ३०(१६), नितीन हार्डीकर १५, यश परांजपे २-६, पराग चितळे २-१६, ऋषिकेश मोने १-९)पराभूत वि.स्पार्टन्स: ६.४ षटकात २बाद ६९धावा(अमित परांजपे नाबाद ४२(२०), पराग चितळे नाबाद १३(१०), संग्राम चाफेकर १-८, निखिल दीक्षित १-१३);सामनावीर-अमित परांजपे;
वाडेश्वर विझार्डस: ७षटकात ७बाद ७८धावा(कर्णा मेहता ४२(२x१,५४,१x६),साकेत गोडबोले १३(८), निखिल मुंडे २-९, सचिन गोडबोले २-२१, श्रीनिवास चाफळकर १-७)वि.वि.सिटी प्राईड: ७षटकात ५बाद ६७धावा(गौरव चाफळकर २८(१५), श्रीनिवास चाफळकर १७(१०), कर्णा मेहता २-७);सामनावीर-  कर्णा मेहता;
मोटिव्हेटर्स: ७षटकात ३बाद ७७धावा(हर्षद बर्वे २६(१४), रोहित बर्वे नाबाद २४(१४), रोहित भालेराव १-११)वि.वि.एम.जे.वुल्वस्‌: ७षटकात ७बाद ४७धावा(निरंजन गोडबोले २०(१५), तेज दीक्षित १०, समीर जोग २-६, हर्षद बर्वे १-७, रोहित बर्वे १-१६);सामनावीर-हर्षद बर्वे;
मोटिव्हेटर्स: ७षटकात ६बाद ७६धावा(शार्दूल वाळिंबे ३५(१८), विक्रांत पाटील १६, साहिल गोवित्रीकर ११, रोहित बर्वे ६, अनिलेश वाघचौरे ३-२२)पराभूत वि.हॅट्ट्रिक: ७षटकात १बाद ७९धावा(शैलेश बांगळे ४५(२२,२x४,४x६), निखिल दीक्षित नाबाद २७(१५), हर्षद बर्वे १-२१);सामनावीर-शैलेश बांगळे.

महापालिका भवनाचा रंग न्यारा ….

0

पुणे- ..पाणी रे पाणी .. तेरा रंग कैसा … हे गाणे आठवत असेल अनेकांना … पुणे महापालिकेचं काहीसं तसच आहे . येणाऱ्या बहुसंख्य अधिकाऱ्यांना .. लोकप्रतिनिधींना आपल्या रंगात रंगवून सोडलेल्या पुणे महापालिकेचा वर्धापन दिन१५ फेब्रूवारी रोजी आहे … त्या निमित्त १४ फेब्रुवारी –पूर्वसंध्येला  महापालिकेची मुख्य इमारत ..महापालिका भवन पहा असे रंगात न्हाऊन निघाले होते …

 

‘त्या’महिलांनी गाजविली पालिकेची ‘उल्टापुल्टा’ सभा (व्हिडीओ)

0

पुणे- नेहमीच सभागृहात अत्यंत शांत राहणाऱ्या ‘त्या’ महिलांनी आज सभागृहात रोल बदलला .. चक्क सभागृह गाजवून सोडलं.. ..
सभेच्या वेळी इकडं तिकडं बघून कारभार : झापडं लावा यांना ‘ बैला सारखी … अशी नगरसचिव यांच्यावर तत्कालीन पक्षनेत्या शीतल उगले यांनी केलेली कोटी ,नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणाऱ्या: ‘आयुक्तां’च्या अँटीचेंबरवर त्यांच्या  विरोधात बोलणाऱ्या तथाकथित अधिकारी बनलेल्या आबा बागुलांची सभागृहातून उचलबांगडी होणे अशा प्रसंगांनी आज महापालिकेतील उल्टा पुल्टा सभा गाजली ..

 

बहुसंख्य पत्रकारांचा सहभाग , सभागृह नेते बनलेले नगरसचिव आणि पक्षनेत्या बनलेल्या दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांचा जोश पाहून महापौर बनलेले आयुक्त …. आणि आयुक्त बनलेल्या महापौरही
या विनोदी वातावरणात काही भाष्य करण्याचा मोह टाळू शकले नाहीत . सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची भूमिका जोरदार पणे वठवताना नगरसचिव  सुनील पारखी यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक बनलेल्या पत्रकारांनी तेवढ्याच जोरदारपणे  साथ दिली .  विरोधी आणि सत्ताधारी यांच्यातील सभागृहातील हालचाली दाखविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जोरदार हशाने दाद मिळाली  .तर नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणे, आयुक्तांचे न ऐकणे .. अशा अधिकाऱ्याची कशी उचलबांगडी होते ….ते आपल्या आयत्यावेळेच्या कृत्याने आबा बागुल यांनी दाखवून दिले . त्यातच’ त्यांनी ‘आयुक्त ‘ बनलेल्या महापौरांना तुम्ही सारख्याच अँटी चेंबर मध्ये असता असा टोला लगावून सभागृहात हशा पिकविला
अधिकारी बनलेले सभागृह नेते भिमाले , सुरक्षा अधिकारी बनलेले वसंत मोरे , नगरअभियंता बनलेले विरोधी पक्षनेते चेतन तुपे आदींनी आपापल्या भूमिका पार पाडल्या .. पण एकूणच बाजी मारली दोन महिला अतिरिक्त आयुक्त ज्या पक्ष नेत्या बनल्या होत्या त्यांनी .. आणि सभागृह नेता बनलेल्या नगरसचिव पारखी यांनी …. पहा एक झलक