पुणे :‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अॅण्ड आर्ट्स’, आझम कॅम्पस च्या वतीने नुकतीच रणजित (टोनी) सिंग यांच्या ‘आयडीया, कन्सेप्ट आणि स्टोरी’ या विषयावरील दोन दिवसांची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन रणजित (टोनी) सिंग यांचा हस्ते करण्यात आले.
रणजित सिंग एक प्रसिद्ध लेखक आणि अॅनिमेशन तज्ज्ञ आहेत. ‘द आर्ट ऑफ अॅनिमेशन प्रॉडक्शन मॅनेजमेंट’ हे त्यांचे पुस्तक तत्काळ प्रसिध्द झाले आहे. कार्यशाळे दरम्यान एकुण 85 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद होता. महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य, आयोजक स्वतंत्र जैन, निलीमा घरत यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या अॅनिमेशन कौशल्यात वाढ करण्यासाठी तसेच ज्ञान आणि कौशल्यातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या कारकिर्दीसाठी मदत व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळे दरम्यान ‘प्रकल्प व्यवस्थापन आणि क्रिएटिव्ह पर्यवेक्षण’, ‘2 डी / 3 डी प्रदर्शन अॅनिमेशनसह उत्पादन / दिशानिर्देश’, उत्पादन निरीक्षण, उत्पादन ट्रॅकिंग सिस्टम डिझाईन आणि सल्ला, कोर्स डिझाईन, सल्ला आणि शिक्षण, व प्रोजेक्ट मेन्टरिंग आणि इनक्यूबेशन या विषयावर विद्यार्थांना प्रबोधन करण्यात आले.
‘अॅनिमेशन आणि क्राफ्ट ऑफ स्टोरीजिंग’, ‘अॅनिमेशन प्रॉडक्शन मॅनेजमेंट’, ‘फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स’ आणि ‘डिजिटल अॅनिमेशन’ आदी विषयावरील व्याख्याने आणि विशेष वर्ग ते चालवतात.