पुणे : आर पिलेट्स स्टुडिओच्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये पुण्यातील नामवंतांची मांदियाळी जमली होती, त्यामुळे या सोहळ्यात जणू तारांगणच अवतरल्यासारखे भासत होते. पुण्यातल्या पहिल्या पिलेट्स स्टुडिओमध्ये जेव्हा आर पिलेट्स कॅलेंडर लाँच करण्यात आले तेव्हा सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उपस्थित होती. या कॅलेंडरच्या विक्रीतून जमा होणारा निधी पुण्यातील निवारा वृद्धाश्रमला मदत म्हणून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठीतील आघाडीची अभिनेत्री भार्गवी चिरमुले उपस्थित होती. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक राधिका कारळे यांच्या हस्ते या फिटनेस कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
पिलेट्स या विषयावर आधी कोणीच कधी सादर केले नव्हते असे पिलेट्स कॅलेंडर या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले, हा या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला. जीवनाच्या विविध क्षेत्रांत आपला प्रभाव निर्माण केलेल्या आणि स्टुडिओच्या ग्राहक असलेल्या महिलांना स्टुडिओच्या ब्रँड अम्बॅसिडर म्हणून या कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आले आहे. सुजाता शिरोळे, पायल कलमाडी, सलोनी चाफळकर, नेहा चाफळकर, श्रुती शेट्टी, शीतल रांका, नीता गोयल, देवश्री मराठे, श्रिया कोलते-पाटील, स्नेहा बलदोटा आणि भावना कोठारी यांच्या उपस्थितीमुळे जणू अवघी स्री शक्तीच या कार्यक्रमाला एकवटल्यासारखे वाटत होते.
आर पिलेट्स स्टुडिओच्या मालक रूचा मुळे म्हणाल्या, ̒निवारा वृद्धाश्रमाला मदत करण्यासाठीच केवळ आम्ही हे कॅलेंडर प्रकाशित केले आहे. पुण्यात आम्ही यशस्वीपणे तिसरा वर्धापनदिन साजरा करत असताना आमच्या मान्यवर ग्राहकांनी या वृद्धाश्रमाला काही प्रमाणात मदत करावी, अशी आमची इच्छा होती. ̕
त्या पुढे म्हणाल्या , ̒कॅलेंडर प्रकाशनापूर्वीच्या विक्रीतून आम्ही १५ हजार रुपयांचा निधी उभा केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यात आम्ही भरघोस रकमेची भर घालून ती स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून देऊ. ̕
अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणाली, ̒ मला या कार्यक्रमात सहभागी होता आले याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. त्याचबरोबर निवारा वृद्धाश्रमाला आर्थिक मदत देण्यासाठी आर पिलेट्सने घेतलेल्या पुढाकाराचेही मला कौतुक वाटते. या उत्तम कार्याला आपला पाठिंबा देण्यासाठी इतकी माणसे इथे एकत्र आली आहेत हे पाहून चांगले वाटले. ̕
सुजाता शिरोळे म्हणाल्या, ̒ आर पिलेट्सने निवाराच्या सोबतीने हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आर पिलेट्सचे अभिनंदन करते. समाजोपयोगी कार्यासाठीच्या या सोहळ्यात एकत्र आलेल्या मान्यवरांमध्ये मीही आहे याचा मला आनंद वाटतो.