शिवसृष्टीनंतर -खंडपीठाबाबत पुण्याची फसवणूक -गिरीश बापटांबाबत वकिलांमध्ये संताप

Date:

पुणे- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आज पुण्याची फसवणूक झाल्याचा आरोप करीत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबाबत संताप व्यक्त करीत  पुणे जिल्ह्यातील वकिलांनी आज (गुरुवारी) कामकाजावर बहिष्कार टाकला ,आणि जोरदार घोषणाबाजी केली .बार असोसिअशन चे पदाधिकारी, तसेच अनेक वकिलांनी स्वयंस्फुर्तीने यावेळी निदर्शने केली या मध्ये  सुरेश बोराटे,राणी राम कांबळे , रुपाली पाटील ,मोहन वाडेकर , अॅड. सुहास पडवळ, अॅड. अतिश लांडगे, अॅड. सुनील कड, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. गणेश राऊत, अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. सुनील कड, अॅड. विक्रम यादव आदि मान्यवर सहभागी झाले होते .आता थांबणार नाही … तर बापटांच्या घरावर मोर्चा .. असे इशारे यावेळी दिले गेले ..

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपल्याच जिल्ह्यात व्हावे या मागणीसाठी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांनी सातत्यातने पाठपुरावा केला आहे. यासाठी मोर्चे, कामबंद आंदोलनेही झाली आहेत. परंतू बुधवारी मुख्यमंत्र्याच्या दालनात झालेल्या बैठकीत कोल्हापूर खंडपीठासाठी शंभर कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याती ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याच्या वृत्त समजताच शिवाजीनगर न्यायालयातील वकीलांमध्ये खळबळ उडाली .

यावेळी बोलताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर म्हणाले, ” मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पुण्यात खंडपीठ व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी न्यायमूर्ती चेल्लूर यांच्यासमोर या मागणीचा प्रस्ताव ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु काल झालेल्या बैठकीदरम्यान पुण्यातील खंडपीठाबाबत विचार न केल्यामुळे आज शिवाजीनगर न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे, या मागणीसाठी आज पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने देखील एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर म्हणाले, ” महाराष्ट्र सरकारने पुण्यास खंडपीठ देण्याचे आश्वासन दिले होते पण ते खोटे ठरले. ही सरकारची नामुष्की असून वकिलांची व जनतेची फसवणूक आहे. कोल्हापूरला खंडपीठ मिळाल्याचा आनंदच आहे पण हायकोर्टात जाणारी सर्वात जास्त प्रकरणे ही पुण्याची असताना देखील पुण्यावर अन्याय का ? ” असा सवाल देखील अॅड. पुणेकर यांनी बोलून दाखविला.माजी अध्यक्ष अॅड. सुहास पडवळ म्हणाले, ” काम बंद करण्याची वेळ शासनाने आणली असून या निष्क्रीय शासनास लवकर जाग न आल्यास व पुण्यास खंडपीठ न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार” असल्याचे सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.