शिक्षण आयुक्त विपिन शर्मा यांना निवेदन सादर
पुणे : महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांकरिता अवांतर वाचनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या ‘भारतीय विचार साधना’ या संस्थेकडुन पुस्तके खरेदी केली आहेत, बाजारात २० रुपयाला मिळणारी ही पुस्तके ५० रुपये प्रती दराने खरेदी केली आहेत, याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान शिक्षण आयुक्त विपिन शर्मा यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले
यावेळी नगरसेवक विशाल तांबे, नंदा लोणकर, वासंती काकडे, अशोक राठी, शशिकला कुंभार, भोलासिंग अरोरा, मिलिंद वालवडकर, डॉ.दत्ता गायकवाड, महेश हांडे, मनोज पाचपुते, किशोर कांबळे, निलेश वरे, फहिम शेख, नितिन राठोड, नितीन रोकडे, जावेद इनामदार, विपुल म्हैसुरकर, रोहन पायगुडे, अतुल तरवडे, विक्रम मोरे, शरद दबडे, मोरेश्वर चांदेरे, सागरराजे भोसले, गजानन लोंढे, निखिल बटवाल, विकी वाघे, सुरज लाटे, युसुफ शेख, अजिंक्य पालकर , संजय गायकवाड, संदीप नवघरे, तुकाराम शिंदे आदी उपस्थित होते.
आंदोलनाचे आयोजन युवक शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी केले होते.
‘शालेय विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके खरेदी केली असुन या पुस्तकात आक्षेपार्ह मजकुर आहे. यातील भाषा प्राथमिक शाळेतील मुलांना न समजणारी आहे. ‘बाल नचिकेता’ या पुस्तकात मीलन, कोमार्यभंग आणि कामातुर यासारख्या शब्दाचा भडीमार करण्यात आलेला आहे . या वयोगटातील मुलांना कथा समजावी यासाठी चित्रांचा वापर अधिक केला जातो, पंरतु या पुस्तकामध्ये “कथा गणपती” यासारखी एक दोन पुस्तके सोडली तर उर्वरित साऱ्या कथा चित्रांशिवाय आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोजड भाषेत लिहिलेल्या आहेत. अत्यंत कठीण व अनावश्यक अशा शब्दाचा वापर केलेला आहे . या पुस्तकांत पौराणिक व धार्मिक कथाचा भर आहे यातुन मुलांवर विशिष्ट विचारधारेचा संस्कार लादण्याचा सरकारचा घाट आहे’, असे खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
‘मुलांच्या ‘सोशलायझेशन’ च्या नावाखाली १ हजार ३१४ शाळा बंद करणाऱ्या सवेदनशील शिक्षणमंत्र्याना विद्यार्थ्यांची मानसिकता व शिक्षणाबद्दल ची एवढी साधी बाब लक्षात येउ नये ही आश्चर्य कारक बाब आहे . याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले’, असे पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष राकेश कामठे म्हणाले.