Home Blog Page 3128

प्रभारी खर्गेंची भेट घेतली आबा बागुलांनी..विधानपरिषदेचे वारे

पुणे–एकीकडे आपण केवळ पर्वती विधानसभेतून निवडून जाण्यास उत्सुक असल्याचे सांगणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे  प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे  यांची दिल्लीत जावून भेट घेतल्याने हि भेट केवळ विधानपरिषदेच्या निवडणुकीत बागुल यांच्या उमेदवारीची  होणारी चर्चा या अनुषंगानेच घेतली गेल्याचा राजकीय समीक्षकांचा दावा आहे .गेली ३० वर्षे नगरसेवक म्हणून आणि पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळख असणाऱ्या आबा बागुलांना विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकी देवून विधानसभेला पर्वती राष्ट्रवादीच्या हाती नेहमीप्रमाणे दिला जाईल असा अंदाज बांधला जातो आहे .जर राष्ट्रवादीला पर्वती सोडवा लागणार असेल तर पुन्हा आबा बागुल सारख्या जुन्या ज्येष्ठ नेत्याला डावलण्याची नामुष्की पक्षावर येवू शकते .या अनुषंगाने आबा यांची आताच शरद रणपिसे यांच्या जागेवर नियुक्ती व्हावी असा सूर आहे. रणपिसे यांना पक्षाने बरीच संधी दिली आहे आता त्यांना पक्षबांधणीसाठी वेगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी असाही सूर आहे .
दरम्यान आपण हि भेट केवळ आक्रमक, अभ्यासू आणि समाजाच्या विविध प्रश्नांची जाण, कॉमनमॅनविषयी आस्था असणारे काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे  यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी घेतली असे स्पष्टीकरण आबा बागुल यांनी केले आहे.

प्लास्टिक वर पर्याय न देता दंडुकेशाही कारवाई चुकीचीच ; कॉंग्रेस कडूनही संताप (व्हिडीओ)

0

पुणे- कायदा  चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी निश्चित  असतो पण तत्पूर्वी सर्व  प्रथम चांगल्या मार्गावर चालणाऱ्यांना मदत करण्यासाठी कायदा असतो हे लक्षात घेवून प्लास्टिकबंदी राबविताना अगोदर पर्याय निर्माण करून द्या ,नंतर दंडात्मक कारवाई करा . पर्याय उपलब्ध करून न देता कायद्याची दंडुकेशाही दाखवून कायद्याबाबत लोकांत गैरसमज पसरविण्याचे काम करू नका असे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी आज येथे म्हटले  .


महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यात प्लॅस्टिकवर बंदी घातलेली आहे. प्लॅस्टिक बंदीचीअमंलबजावणी करता ना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने दुकानांना लक्ष केले आहे.‌प्लॅस्टिक पिशव्‍या, थर्माकोलच्या डिश, चमचे आदींची विक्री करणाऱ्या व प्लॅस्टिक पिशवीतून वस्तूंचीविक्री करणाऱ्या दुकानदारांविरूध्द पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ५,०००/- रू. दंड आकारले आहे. या
दंडात्मक कारवाईच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्याअ ध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन
सादर केले. महापालिका आयुक्तांशी चर्चा करताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आधीचनोटबंदीमु ळे त्रस्त झालेले व्‍यापारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे योग्य नाही. राज्यसरकारने
प्लॅस्टिक बंदी करण्यापूर्वी पर्यायी व्‍यवस्था करणे गरजेचे होते. जनतेमध्ये विशेषत: झोपडप ट्ट ीमध्ये प्लॅस्टिक वस्तूंच्या हानीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे बाजारात कापडी व कागदीपिशव्‍यांचा तुटवडा जाणवत आहे. कापडी व कागदी पिशव्‍यांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला कापडी व कागदी पिशवी उपलब्ध होत नाही. या शिवाय सरकारकडूनकिती मायक्रॉनची प्लॅस्टिक पिशवी वापरण्याची परवानगी आहे आणि कुठल्या प्रकारची प्लॅस्टिक वापरू
शकतात  या बाबतीत कुठलेही परिपत्रक प्रसिध्द झालेले नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाआहे.’’
पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले की, ‘‘प्लॅस्टिक बंदीच्या विषयावर सविस्तरमाहिती देण्यासाठी रविवार दि. १ जुलै २०१८ रोजी प्रदुषण नियंत्रण खात्याचे अधिकारी. पी. अनभयगन
यांच्या बरोबर बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये या प्लॅस्टिक बंदीच्या विषयावर सविस्तर चर्चा  होईलआणि त्या विषयावर ज्या काही शंका असतील त्या दूर करण्याचे काम प्रशासन करणार.’’ आयुक्तांनी
आश्वासन दिले की, प्रशासन दंडात्मक कारवाई न करता जनतेमध्ये जनजागृतीवर करणार.
यावेळी पुणे मनपा चे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अजित दरेकर, लता राजगुरू, चाँदबी नदाफ,सुजाता शेट्टी,  नीता रजपूत, रमेश अय्यर,  द. स. पोळेकर, निलेश बोराटे,
मीरा शिंदे, चैतन्य पुरंदरे, प्रकाश पवार, साहिल राऊत, भगवान धुमाळ, राजेश शिंदे, विक्रम खन्ना, दिपकओव्‍हाळ, प्रकाश आरणे, सुनिल पंडित, संगिता क्षिरसागर, रजिया बल्लारी व इतर पदाधिकारी व कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाटे शिक्षण समूहाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रंगला ..(व्हिडीओ

0

पुणे:-

चाटे शिक्षण समूहाच्या 2017-18 मध्ये दहावी बारावी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा  अण्णाभाऊ साठे सभागृहात संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाटे समुहाचे चेअरमन प्रा. गोपीचंद चाटे तसेच संचालक प्रा. फुलचंद चाटे, पुणे विभागाचे विजय बोबडे व प्रा. बापू काटकर यासह खुप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते,

कार्यक्रमाचा शुभारंभ शर्वरी जेमनिस यांच्या गणेश वंदनांने झाली, प्रास्ताविक विजय बोबडे यांनी केले.

सीईटी स्पर्धा परीक्षेत राज्यातून दुसरा क्रमांक प्राप्त अमेय झरकर सर्वांचा प्रेरणा ठरला,यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मिळत असलेल्या शिक्षण पध्द्ती, सिक्युरिटी, सेवा सुविधामुळेच यश प्राप्त होत असल्याचे सांगितले
चाटे समूहाचा सीईटी मध्ये राज्यात द्वितीय आलेला अमेय झरकर- ज्ञानाचा झरा असलेला झरकर, सीईटी मध्ये मिळालेल्या यशाने आनंदाचा मोठा धक्का बसला, या उत्तुंग यशात आई-वडील, बहीण, चाटे सर तसेच शिक्षकानी याविद्यार्थ्यांना दिलेला पाठिंबा व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, मन शांत ठेऊन अभ्यास केल्यानंतर यश मिळत असतात. मोजकाच अभ्यास तसेच शालेय पाठय पुस्तकातील अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा. वर्गातील उपस्थिती, चुकांचा अभ्यास, बारावीची परीक्षा व स्पर्धा दोन महिन्याचा वेळ कारणी लावली. टाईम मॅनेजमेंट व वेळ तपासून पेपर सोडवले, मानसिक स्थिती सांभाळत मानसिक आधार, घरचे जेवण, आरोग्य सांभाळताना छंद देखील जोपासले असल्याचे अमेय झरकर याने सांगीतले.
पहा या सत्कार सोहळ्याची एक झलक

प्लास्टिक बंदी कारवाई वरून मनसे चा पालिकेत राडा (व्हिडीओ)

पुणे- प्लास्टिक बंदी राबविताना होणाऱ्या दंडात्मक कारवाई च्या विरोधात आज मनसे च्या शहर महिला अध्यक्ष रुपाली पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले . महापालिका सह आयुक्त सुरेश जगताप यांच्या कार्यालयात अगोदर आंदोलन केले पण जगताप इकडे फिरकलेच नाहीत त्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या कार्यालयात या मनसैनिकांनी जोरदार निदर्शने केली . पण त्याच क्षमतेने अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी या आंदोलकांचा सामना हि केला . पहा प्रत्यक्षात महापालिकेत एक तासाहून अधिक वेळ चाललेल्या या संघर्षाची एक व्हिडीओ झलक ….

‘स्टार्ट अप’ महाराष्ट्राचे सप्ताहात मराठी उद्योजक नाही- मनसेचा आंदोलनाचा इशारा

0
ग्रामीण भागातील ‘स्टार्ट अप’ला संधी नाही 
 पुणे : ‘महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटी’ आणि राज्य सरकार च्या वतीने राज्यातील पहिल्याच स्टार्ट अप सप्ताहास सुरुवात झाली आहे. या सप्ताहात महाराष्ट्राबाहेरील उद्योजकांचीच वर्णी लावल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेत राज्य शासनाने मराठी तरुणांचा विचार न करता केवळ परप्रांतीयांनाच संधी देऊन महाराष्ट्रातील नवउद्योजकांना दूर ठेवण्यात आले आहे. या सर्व घटनेबाबत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आंदोलन करणार आहे, असे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ चे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी या पत्राद्वारे कळविले आहे.
 
महाराष्ट्र राज्याच्या कौशल्यविकास व उद्योजकता विभागांतर्गत स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटी’तर्फे आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्याच स्टार्ट अप सप्ताहात महाराष्ट्राबाहेरील उद्योजकांचीच वर्णी लावल्याचे दिसून येत आहे. 
 
100 पैकी 36 उद्योग हे कर्नाटक, गुजरात, राजस्थान, दिल्ली, तेलंगणा इ. राज्यातील आहेत. तर 51 स्टार्ट अप चे संचालक परप्रांतीय आहेत, हे धक्कादायक आहे. मराठी उद्योजकांवर केलेला हा अन्याय आहे, असे अॅड. गणेश सातपुते यांनी म्हटले आहे.
 
ज्या 100 उद्योगांना यात निवडण्यात आले आहे. त्यातील अनेक उद्योजक  यापूर्वीपासूनच उद्योगात कार्यरत आहे. यापैकी काही उद्योजकांनी यापूर्वीच शासनाच्या योजनेअंतर्गत कर्ज घेतली आहेत. ‘स्टार्ट अप महाराष्ट्र’ या योजनेत नवीन तरुणांना संधी मिळावी हे धोरण असताना यापूर्वीच्या उद्योजकांपैकीच 24 भाजपाच्या विविध आघाड्यांशी संबंधित उद्योगांनाच यात स्थान दिल्याचे दिसत आहे. 
 
महाराष्ट्रातील स्टार्ट अप योजनेतील लाखो रुपये परप्रांतीय उद्योगांना व उद्योजकांना देऊन भाजपाचे सरकार मराठी नवउद्योजकांना व्यवसायातून हद्दपार करण्याचे काम या माध्यमातून करीत आहे, असा आरोप अॅड. सातपुते यांनी पत्रकात केला आहे.
 
दि. 25 ते 29 जून या काळात होणार्‍या स्टार्ट अप सप्ताहात सहभागी होण्यासाठी 5 जूनपर्यंत अर्ज मागविले होते त्यातून निवडण्यात आलेल्या 100 स्टार्टअपसाठी त्यांच्या उत्पादनांचे किंवा सेवेचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
 
या सर्व बाबतीत ‘महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ या संस्थेलासुद्धा डावलण्यात आले असून, ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या वेळेला सुद्धा राज्य शासनाने या संस्थेला विश्वासात घेतले नव्हते.
 
ग्रामीण भागात अनेक चांगले स्टार्ट अप आहेत ज्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. परंतु या स्टार्ट अप पर्यंत या सप्ताहाची माहिती पोहोचली नाही. तरी मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून,  या विरोधात आंदोलन करणार आहोत असे अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले. 

विद्यार्थीच देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत -पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे दि. 25- विद्यार्थी देशाचा कणा आणि केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठीच शासनाच्या विविध योजना आहेत. विद्यार्थी दशेत चांगले शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चे भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

येथील अल्पबचत भवन येथे आयोजित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृहस्तरावरील विविध उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगूरू विलास गायकर, बि. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने वेळेचे योग्य नियोजन करावे तरच त्यांना विविध क्षेत्रात यश मिळू शकेल. तसेच शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा योग्य वापर करावा. एखाद्या विषयात परिपूर्ण होण्यासाठी त्या विषयाचा सखोल अभ्यास करा. समाजातील विविध घटनांची माहिती व परिस्थितीची जाण ठेवणारा विद्यार्थी यशाचे शिखर गाठतो. आजच्या स्पर्धेच्या यूगात टिकण्यासाठी व्यवहार ज्ञान असणे आवश्यक आहे. वस्तुस्थितीवर मात करून पुढे जाणे हाच यशस्वी होण्यासाठीचा मार्ग असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जन्म हा आपल्या हातात नसला तरी देखील जन्मभर चांगला माणूस म्हणून जगणे आपल्या हातात आहे, त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध प्रकल्पांमधुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास होणे महत्वाचे असल्याने त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते, स्टार्टअप ट्रायबल या योजनेचे तसेच संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच पुणे विद्यापीठाबरोबर वस्तिगृहातील शैक्षणिक प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठीचा सामंजस्य करार तसेच वसतिगृहातील विविध कामांचे मुल्यमापन करण्यासाठीचा गोखले महाविद्यालया सोबतचा सामंजस्य करार यावेळी त्यांच्या हस्ते सबंधितांकडे हस्तांतरीत करण्यात आला. तसेच ज्ञानदर्पन या पुस्तकाचे, वस्तिगृह व आश्रमशाळेच्या कॅलेंडरचे प्रकाशन श्री. बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांचा निवृत्ती सत्कार देखील करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

वसतीगृहातील विद्यार्थांची गुणवत्ता मुल्यमापनासाठी विशेष कक्ष

अदिवासी वसतीगृहात राहणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत विविध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थांना शैक्षणिक सुविधा, तसेच कमी गुण असणाऱ्या किंवा उत्तम गुण असणाऱ्या विषयाचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे मुल्यमापन करण्यात येणार असून त्यासाठी पुणे विद्यापीठा सोबत हा सामंजस्य करार केला असल्याचे देखील श्री. प्रसाद यांनी सांगितले.

पीएमआरडीएच्या पहिल्या महाळुंगे-माण नगर रचना योजनेच्या प्रारूपाला प्राधिकरणाची मंजुरी

0

पुणे-महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षानंतर हाती घेण्यात आलेल्या म्हाळुंगे-माण नगररचना योजनेच्या प्रारूपास
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दि.२२ जून २०१८ रोजी मान्यता दिली आहे. यासाठी राज्य शासनाचे
अधिकार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ६८ (२) अन्वये प्रदान करण्यात आल्याने
केवळ ८ महिन्यातच ही योजना मंजूर करण्यात आली आहे.
हिंजवडी येथील राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान पार्क शेजारी सुमारे ६२५ एकर जमीन विनाविकास अनेक वर्षापासून
पडून होती. जमीन मालकांना योग्य मोबदला व या परिसरात विकासाला चालना मिळावी याकरिता योग्य तो पर्यायी
मार्ग अवलंबून म्हाळुंगे-माण टीपी स्कीम करण्याचे निश्चित करण्यात आले.
प्रस्तावित नगरचना योजनेखालील क्षेत्र हे मंजूर प्रादेशिक योजनेनुसार शेती तथा नाविकास विभागात आहे. योजनेमुळे
विभागामध्ये बदल होऊन कोणतेही अधिमुल्य न भरता विकसनक्षम विभागातील जमीनमालकांना विकसित भूखंड प्राप्त
होतो. तसेच कोणीही विस्थापित व भूमिहीन न होता आवश्यक असणाऱ्या रस्ते, शाळा, दवाखाने, बगीचा, क्रीडांगणे, व
इतर सार्वजनिक सुविधाकरिता जमीन उपलब्ध होते. तसेच जमीनधारकाचे कोणतेही नुकसान न होता समन्यायाने योग्य
आकाराचे जमिनीच्या मोबदल्यात नियमित आकारातील विकसित भूखंड मिळतात.
प्रारूप नगररचना योजने अंतर्गत नागरिकांना सुनियोजित रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युतीकरण आदी
सोईसुविधा प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मुलभूत सोयीसुविधामुळे महाळुंगे माण टीपी
स्कीमला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. प्रारूप नगररचना योजनेमध्ये जमीन मालकांना ११८.६८ हे., एलआयजी व
इडब्लुएस विस्थपिताकरिता १३.५५ हे., खुल्या जागेसाठी २३.०९हे., सार्वजनिक सेवा सुविधेकरिता १५.८५हे., विक्री
योग्य भूखंडाकरिता २२.८९हे., प्रस्तावित व विद्यमान रस्त्याकरिता ४१.७०हे., व नाल्याखालील ६.२३० हे., असे
मिळून संपूर्ण नगररचना योजना क्षेत्राखालील एकूण क्षेत्र २५०.५३ हेक्टर इतके आहे.
महानगर आयुक्त किरण श्री गित्ते म्हणाले की, “सदर प्रारूप नगररचना योजना मंजूर झाल्यामुळे स्कीम अंतर्गत रस्ते
विकास लगोलग करण्यात येणार आहे. नगररचना योजना ६ महिन्यामध्ये शासनाकडे मंजूर करून अंतिम भूखंडाचे
संबधित जमीन मालकांना वाटप करण्यात येणार आहे.”

सचिन तालेवार महावितरणच्या पुणे परिमंडल मुख्य अभियंतापदी रुजू

0

पुणे, दि. 25 जून 2018 : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी सोमवारी (ता. 25) कार्यभार स्वीकारला. त्यांना प्रभारी मुख्य अभियंता श्री. सुंदर लटपटे यांनी या पदाची सुत्रे सोपविली.

मुळचे नागपूर जिल्ह्यातील श्री. सचिन तालेवार यांचे शालेय शिक्षण छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे झाले आहे. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. तसेच गूडगाव येथील (MDI) मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्सिट्यूटमधून एनर्जी मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम 2007-08 मध्ये पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून त्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली होती.

मुख्य अभियंता श्री. तालेवार हे 1997 मध्ये तत्कालिन विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून एचव्हीडीसी चंद्गपूर येथे 500 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र (जि. चंद्रपूर) येथे रुजू झाले. याच ठिकाणी पदोन्नतीनंतर सहाय्यक अभियंता म्हणून काम पाहिले. त्यानंतर सरळसेवा भरतीमध्ये श्री. तालेवार यांची 2006 ला कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर त्यांनी वर्धा, नागपूर व जालना येथे काम केले आहे. 2016 मध्ये झालेल्या सरळसेवा भरती श्री. तालेवार यांची अधीक्षक अभियंता पदी निवड झाली. तेव्हापासून ते लातूर मंडलचे अधीक्षक अभियंता म्हणून काम पाहत होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या 2018 च्या सरळसेवा भरतीमध्ये श्री. सचिन तालेवार यांची मुख्य अभियंता पदी निवड झाली आणि त्यांनी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून आज पदभार स्वीकारला. याआधी कार्यरत असलेले मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे सेवानिवृत्त झाले आहेत.

पुणे परिमंडलातील सर्व वीजग्राहकांसाठी वेगवान प्रशासकीय कामकाजाची तसेच आधुनिक ग्राहकसेवेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. वीजबिलांच्या थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रीत करून वाणिज्यिक हानी आणखी कमी करण्यासाठी व सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्वाधिक प्राथमिकता देण्यात येईल, असे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी सांगितले.

संपर्क से समर्थन ’..खासदार शिरोळेंनी घेतली आनंद देशपांडेची भेट

0

पुणे-संपर्क से समर्थन ’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योजक आणि परसिस्टंट समूहाचे प्रमुख आनंद देशपांडे यांची भेट घेतली. या वेळी तासभर झालेल्या चर्चेत श्री. शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विशद केली. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपाने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल शिरोळे यांनी देशपांडे यांना भेट दिला. तीस जुन पर्यंत संपर्क से समर्थन हे अभियान सुरु राहणार आहे व त्या अंतर्गत समाजातील विविध स्थरातील मान्यवर व नागरिकांची भेट शिरोळे घेणार आहेत. या वेळी नगरसेवक जयंत भावे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे,नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, भा. ज प उपाध्यक्ष दत्तात्रय खाडे, सुनील पांडे आदी उपस्थित होते.

एफसी पुणे सिटी संघात आदिल खानचे पुनरागमन

0

पुणे, 25 जून 2018: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आदिल खान याला पुढील दोन मौसमासाठी  आपल्याकडेच कायम राखण्याची घोषणा केली. गत वर्षीच्या मौसमामध्ये आदिलने सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली. आदिलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे  संघाने अव्वल चौथे स्थान मिळवले.

एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, आदिलचे पुनरागमन संघासाठी आत्यंत महत्वाचे आहे. संघाबाबतची त्याची बांधीलकी व समर्पन प्रशंसनीय आहे. आदिलच्या अष्टपैलुत्वामुळे टीमला भरपूर लवचिकता मिळाली ज्यामुळे टीमच्या ऐतिहासिक कामगिरीला मोठा हातभार लाभला आहे.

2017-18 च्या मौसमात आदिलने 18 सामन्यांमध्ये 4 गोल नोंदवले. यामध्ये जमशेदपुर एफसी संघाविरोधात खेळताना आदिलने सर्वोत्कृष्ट हेडर मारला. मिडफिल्डमध्ये तैनात करण्यात आलेल्या 29 वर्षीय आदिलने सर्वोत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले.

यावेळी आदिल म्हणाला की, पुन्हा एकदा एफसी पुणे सिटी संघात सामील होताना मला अतिशय आनंद होत आहे. एफसी पुणे सिटी संघाने माझे व्यावसायीक करियर परिपुर्ण केले आहे. एक संघ म्हणुन गेल्या मौसमात संघाने प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. या मौसमात करंडक जिंकण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. मी एफसी पुणे सिटी संघाकडून खेळण्यास उत्सुक आहे आणि ऑरेंज आरमीला साजरे करण्यासाठी अनेक चांगले क्षण आम्ही देऊ असे आदिल म्हणाला.

विकास कामांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या- पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे 25:-जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येणारी विकासाची कामे ही जनतेची आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि विकास कामांमध्ये श्रेयवाद येऊ नये, अशी सूचना पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केली.

जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 अंतर्गत मार्च,2018 अखेरील खर्चाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक येथील विधान भवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, खासदार सुप्रिया सुळे, महापौर मुक्ता टिळक,आ.भिमराव तापकीर, आ.सुरेश गोरे, आ.बाबुराव पाचरणे, आ.निलम गोऱ्हे, आ.माधुरी मिसाळ,आ.दत्तात्रेय भरणे, आ.जयदेव गायकवाड, आ.राहूल कुल, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे,सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधकारी प्रमोद केंभावी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास कामांसंदर्भात लोकप्रतिनिधी विविध सूचना करतात. अधिकाऱ्यांनी या सूचनांचे निराकरण करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यायला हवे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर तातडीने कार्यवाही करावी. विकास कामांमध्ये लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन, कामे  तातडीने पूर्ण करावी अशी सूचना पालकमंत्री यांनी केली.

आज झालेल्या बैठकीत सन 2017-18 या वर्षामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रुपये 479.64 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत रुपये 159.74 कोटी आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत रुपये 73.97 कोटी अशा एकूण 713.35 कोटी रुपयांच्या खर्चास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. सर्वसाधारण योजनेसाठी वितरीत तरतूदीशी खर्चाची टक्केवारी 99.98, अनुसूचित जाती उपयोजना वितरीत तरतूदीशी 93.16 आणि आदिवासी उपयोजनेसाठी वितरीत तरतूदीशी खर्चाची टक्केवारी 98.23 टक्के असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सन 2018-19 च्या सर्वसाधारण  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पुणे जिल्हयासाठी 752.52 कोटी रुपयांचा नियतव्यय अर्थसंकल्पित झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीमध्ये पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी आरोग्य, गृह, जलसंपदा, सिंचन, सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागांच्या कामांवर चर्चा करुन सूचना केल्या. या सूचनांची दखल घेण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिले. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

स्मार्ट गर्ल मोबाईल ॲप्लीकेशनचा शुभारंभ

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींचे सक्षमीकरण करण्यात येते. त्यांच्या अडचणी सोडवून त्यावर मान्यवरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या स्मार्ट गर्ल मोबाईल ॲपचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते करण्यात आला. या उपक्रमाचे पालकमंत्री यांनी कौतुक करुन, आवश्यकतेनुसार या ॲपमध्ये सुधारणा करण्याची सूचना केली.

व्यापाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित; चुकीची कारवाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

0

पुणे, 25 जून : प्लास्टिक बंदी कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणी विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा बडगा उगारताच महापालिका प्रशासनाने चुकीची कारवाई यापुढे होणार नाही असे स्पष्ट आश्वासन आज व्यापाऱ्यांबरोबरील चर्चेदरम्यान दिले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, चुकीची कारवाई व्यापाऱ्यांवर झाल्यास पुन्हा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करु, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी आज दिली.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने आज प्लास्टिक बंदी कायद्याच्या चुकीच्या कारवाईविरोधात आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता. तसेच, महापालिकेसमोर आंदोलन केले. यादरम्यान, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि मिठाई व फरसाण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक व भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्लास्टिक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये व्यापाऱ्यांवर होत असलेल्या हुकुमशाही व चुकीच्या पद्धतीच्या कारवाईबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बैठकीस पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, पुणे व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सोमाराम राठोड, नवनाथ सोमसे, सारंग राडकर, सुनील गेहलोत, अशोक साळेकर, रविंद्र सारुक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले असताना त्यांच्यावर ही कारवाई करणे योग्य नाही. खाद्य पदार्थाला प्लास्टिकचे आवरण नसेल तर, ते खराब होतात. अशा परिस्थितीत कायदाचा विपर्यास करीत अंमलबजावणी करून व्यापाऱ्यांना त्रास देणे योग्य नाही. जागेवर 5 हजार, 10 हजार व 25 हजार रुपयांचा दंड भरणे किरकोळ व्यापाऱ्यांना शक्य नाही. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत सरसकट प्लास्टिकवर कारवाई करणे हिताचे नाही. प्लास्टिक पिशव्यांबाबत मात्र ठोस कारवाई करावी, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली. त्यावर पालकमंत्री बापट यांनी याविषयी बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडतो असे आश्वासन दिले. तर, महापौर मुक्ता टिळक व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापुढे व्यापाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची चुकीची कारवाई होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच, चुकीची कारवाई करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले.

तर व्यापाऱ्यांच्या उद्रेकाचा करावा लागेल सामना ….प्लास्टिक बंदीच्या कारवाईविरोधात मोर्चा (व्हिडीओ)

0

पुणे-प्लास्टिक ला पर्याय दिल्याशिवाय दंडाची कारवाई म्हणजे मोगलाई ,आम्ही बंदी ची अंमलबजावणी करू पण अगोदर प्लास्टिक ऐवजी वापरायचे काय ? त्याला सर्वसंमत पर्याय तर द्या … तो दिल्यावर मग हवा तेवढा दंड आणि शिक्षा करा अशी भूमिका घेत ..आज एक दिवसाचा लाक्षणिक  बंद  करत आहोत ..वेळीच दक्षता घ्या अन्यथा व्यापाऱ्यांचा आणि ग्राहकांचा देखील उद्रेक होईल असा इशारा आज व्यापाऱ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून दिला .
पहा या मोर्चाची व्हिडीओ झलक …

अमिताभची नात पंतप्रधान होणार, भविष्यवाणी…

0

हैदराबाद:
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रॉय यांची मुलगी आराध्या भारताची पंतप्रधान होईल, अशी भविष्यवाणी प्रसिद्ध ज्योतिषी डी. ज्ञानेश्वर यांनी केली आहे. ज्ञानेश्वर यांनी या आधी केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत.

विशेष म्हणजे ज्ञानेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भविष्यवाणी केली आहे. अमिताभ यांची नात आराध्या भविष्यात भारताची पंतप्रधान होईल. फक्त त्यासाठी त्यांनी आराध्याचं नाव बदलून रोहिणी ठेवायला हवं, असा सल्लाही ज्ञानेश्वर यांनी दिला आहे. या आधी सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी राजकारणात प्रवेश करतील, अशी भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरल्याचा दावाही ज्ञानेश्वर यांनी केला आहे. २००९ मध्ये काँग्रेस केंद्रात सरकार स्थापन करणार असल्याची भविष्यवाणीही त्यांनी केली होती. दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री होतील, अशी नवी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणूक जिंकतील आणि भारत-पाकिस्तान दरम्यान २०२४ मध्ये युद्ध होईल, अशी भविष्यवाणी वर्तवतानाच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश यांना २०१९मध्ये लग्न करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

नगरसेवकाने वाटल्या 4 हजार कापडी पिशव्या

0

पुणे-प्लास्टिक बंदी च्या निर्णयानंतर आपल्या भागातील नागरिकांना अचानक त्रासाला सामोरे जावे लागतेय हे पाहून  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने नगरसेवक  अजित दरेकर यांनी पूर्व भागात ४००० कापडी पिशव्यांचे नागरिकांना मोफत वाटप केले. या प्रसंगी   हेमंत राजभोज, रवि पाटोळे, शाबिर खान, अशपाक शेख, रघुराज दरेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.