पुणे- कायदा चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी निश्चित असतो पण तत्पूर्वी सर्व प्रथम चांगल्या मार्गावर चालणाऱ्यांना मदत करण्यासाठी कायदा असतो हे लक्षात घेवून प्लास्टिकबंदी राबविताना अगोदर पर्याय निर्माण करून द्या ,नंतर दंडात्मक कारवाई करा . पर्याय उपलब्ध करून न देता कायद्याची दंडुकेशाही दाखवून कायद्याबाबत लोकांत गैरसमज पसरविण्याचे काम करू नका असे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी आज येथे म्हटले .
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यात प्लॅस्टिकवर बंदी घातलेली आहे. प्लॅस्टिक बंदीचीअमंलबजावणी करता ना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने दुकानांना लक्ष केले आहे.प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलच्या डिश, चमचे आदींची विक्री करणाऱ्या व प्लॅस्टिक पिशवीतून वस्तूंचीविक्री करणाऱ्या दुकानदारांविरूध्द पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ५,०००/- रू. दंड आकारले आहे. या
दंडात्मक कारवाईच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्याअ ध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन
सादर केले. महापालिका आयुक्तांशी चर्चा करताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘आधीचनोटबंदीमु ळे त्रस्त झालेले व्यापारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे योग्य नाही. राज्यसरकारने
प्लॅस्टिक बंदी करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. जनतेमध्ये विशेषत: झोपडप ट्ट ीमध्ये प्लॅस्टिक वस्तूंच्या हानीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे बाजारात कापडी व कागदीपिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. कापडी व कागदी पिशव्यांच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला कापडी व कागदी पिशवी उपलब्ध होत नाही. या शिवाय सरकारकडूनकिती मायक्रॉनची प्लॅस्टिक पिशवी वापरण्याची परवानगी आहे आणि कुठल्या प्रकारची प्लॅस्टिक वापरू
शकतात या बाबतीत कुठलेही परिपत्रक प्रसिध्द झालेले नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाआहे.’’
पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले की, ‘‘प्लॅस्टिक बंदीच्या विषयावर सविस्तरमाहिती देण्यासाठी रविवार दि. १ जुलै २०१८ रोजी प्रदुषण नियंत्रण खात्याचे अधिकारी. पी. अनभयगन
यांच्या बरोबर बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये या प्लॅस्टिक बंदीच्या विषयावर सविस्तर चर्चा होईलआणि त्या विषयावर ज्या काही शंका असतील त्या दूर करण्याचे काम प्रशासन करणार.’’ आयुक्तांनी
आश्वासन दिले की, प्रशासन दंडात्मक कारवाई न करता जनतेमध्ये जनजागृतीवर करणार.
यावेळी पुणे मनपा चे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अजित दरेकर, लता राजगुरू, चाँदबी नदाफ,सुजाता शेट्टी, नीता रजपूत, रमेश अय्यर, द. स. पोळेकर, निलेश बोराटे,
मीरा शिंदे, चैतन्य पुरंदरे, प्रकाश पवार, साहिल राऊत, भगवान धुमाळ, राजेश शिंदे, विक्रम खन्ना, दिपकओव्हाळ, प्रकाश आरणे, सुनिल पंडित, संगिता क्षिरसागर, रजिया बल्लारी व इतर पदाधिकारी व कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.