झोपडपट्टी अस्तित्वात नसतानाही टिडीआर; नगरसेवक आबा बागूल यांचा आरोप
टेंडरच्या भोवऱ्यात सापडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्यासाठी आंदोलन (व्हिडीओ)
पुणे-कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांमध्ये कोणतीही गुपिते नसून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काम केले जाणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्वसाधारण सभेत दिले. कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम बरेच दिवस होत नसून कात्रज कोंढवा रस्ता निविदा रद्द केल्यामुळ शिवसेनेच्या वतीने सभागृहात शिवसेनेच्या संगीता ठोसर , गटनेते संजय भोसले,विशाल धनवडे,पल्लवी जावळे अशा नगरसेवकांनी सभागृहात आंदोलन केले.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर गेल्या काही वर्षात अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. या रस्त्याचे अनेक वेळा निविदा प्रक्रिया राबवून सुद्धा काम होत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या संगीता ठोसर यांनी सभागृहात केला. याविषयी महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले, कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांमध्ये कोणतीही गुपित नाही, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे काम केले जाणार आहे. मागील निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने ती रद्द करण्यात आली. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी 120 दिवसात वर्क ऑर्डर देणे अपेक्षित आहे. मात्र, हा कालावधी 180 दिवस झाल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या रस्त्याचे काम लवकर होण्यासाठी नवीन निविदा तयार करण्यात आले आहे. इस्टिमेट कमिटीने त्याला मान्यता दिली असून ऑगस्ट महिन्यात ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सध्या या रस्त्याच्या कामासाठी 42 टक्के जागा संपादित करण्यात आल्या असून येत्या दोन महिन्यांमध्ये नगरसेवक आणि स्थानिक आमदार यांच्या माध्यमातून अधिक भूसंपादन केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त यांनी सांगितले.
घाईची कुठली अवदसा आठवली अनं पुण्याची अब्रू घालविली -सुभाष जगतापांचा प्रहार (व्हिडीओ)
पुणे- घिसाडघाई ने कुठली अवदसा आठवल्याने महापौर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली .आपण अतिशय चुकीचे काम केलेय ..या मुळे पुण्याची गेलेली अब्रू आता परत येणे शक्य नाही .अशा स्पष्ट शब्दात आज नगरसेवक सुभाष जगताप यांनी महापालिकेच्या सभागृहात महापौरांची कानउघाडणी केली .
पालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटना समयी छताला लागलेली गळती आणि महापौरांनी त्यावर दिलेले स्पष्टीकरण यावर बोलताना जगताप म्हणाले ,’पालिकेतील पदाधिकारी बदलणार अशा बातम्या होत्या . इमारतीच्या कमकुवत अवस्थेबद्दल अगोदर कल्पना दिली जात होती …तरीही उद्घाटन.. या प्रकारामुळे आपल्या नेत्यांना आपणास आयत्या पिठावर हि रेघोट्या मारता येत नाहीत हे लक्षात आले असेल …सत्ताधाऱ्यांच्या चुका काढल्या कि अंगावर धावून येतात .
(सुशील मेंगडे यांनी जगताप यांचे भाषण चालू असताना आक्षेप घेतला ..’आम्ही यांचे भाषण ऐकायला आलो नाहीत .. कॉंग्रेसच्या अरविंद शिन्देनी हा आक्षेप मोडून काढला )
पहा जसेच्या तसे …नेमके काय घडले.कोण काय म्हणाले ..
वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉक्टरांचा अजित पवार करणार सन्मान
‘कुरुंजी ‘ भोर येथे पुणेकरांनी लुटला ‘ काजवा महोत्सवा ‘ चा आनंद !
बालगंधर्वांमुळे भारतीय चित्रपट संगीतमय झाले कीर्ती शिलेदार
सामाजिक बांधणीमध्ये पत्रकारांची महत्त्वाची भूमिका – ज्येष्ठ पत्रकार निळू दामले
पुणे- पत्रकारिता आणि जनतेचे प्रश्न यांच्यातील नाते विस्कळीत झाले असून जगभर अशीच परिस्थिती असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी व्यक्त करुन सामाजिक बांधणीमध्ये पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असते, असे प्रतिपादन केले.
पुणे येथे महिला व बालविकास या विषयावरील माध्यम कार्यशाळेत ते बोलत होते. युनिसेफ आणि चरखा डेव्हलपमेंट कम्युनिकेशन नेटवर्क यांच्या विद्यमाने आयोजित कार्यशाळेस आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आशीष भारती, युनिसेफच्या संवाद तज्ञ स्वाती मोहपात्रा, राजलक्ष्मी नायर, बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत गांगल, डॉ.गोपाळ पंडगे, डॉ. खनिंद्र भुयान, माध्यम समन्वयक तानाजी पाटील आदींची उपस्थिती होती.
निळू दामले म्हणाले, पत्रकारांनी जनतेच्या प्रश्नांशी आपले नाते जोडून घ्यायला हवे. कृषी, विज्ञान, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये खूप काही नवीन करण्यासारखे आहे. खरे पत्रकार कोणत्याही अडचणीचा सामना करु शकतात. फक्त त्यांच्यात समाजाच्या प्रश्नांशी जोडून घेण्याची ऊर्मी हवी. सामाजिक बांधणीमध्ये पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद करुन त्यांनी विविध भागात जाऊन केलेल्या पत्रकारितेचे अनुभव सांगितले.
आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आशीष भारती यांनी माध्यमांचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, सरकार एकटे काम करत नाही, त्यासाठी समाजातील सर्वच घटकांची मदत लागत असते. कुपोषण, बालमृत्यू यासारख्या प्रश्नांबाबत माध्यमांनी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत गांगल यांनी शिशू पोषणाची माहिती समाजाच्या प्रत्येक घटकाला असणे गरजेचे असल्याचे सांगितले. राजलक्ष्मी नायर आणि डॉ. खनिंद्र भुयान यांनी गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्य, पोषण याबाबत माहिती सांगितली. युनिसेफच्या संवाद तज्ञ स्वाती मोहपात्रा यांनी माध्यम कार्यशाळेचा उद्देश सांगून प्रास्ताविक केले. कार्यशाळेत विविध राज्यातील माध्यम प्रतिनिधींचा सहभाग होता.
मांजरीबुद्रुकमध्ये अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएकडून कारवाई
पुणे-– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) च्यावतीने मौजे
मांजरी बुद्रुक, तालुका हवेली, सर्वे नंबर १०४/१९ मधील ४५०९ चौ.फूट आकारातील
अनधिकृत बांधकाम कारवाईस मोठ्या प्रमाणात विरोध होऊन सुद्धा पीएमआरडीएने ही
कारवाई करून बांधकाम जमीनदोस्त केले.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६च्या कलम ५३ (१) अन्वये संबधिताना
प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. सदरील
बांधकामाचे क्षेत्रफळ हे एकूण ४५०९ चौरस फूट आरसीसी स्वरुपात चार माजली स्वरूपातील
हे बांधकाम होते. सदरची अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई पीएमआरडीएच्या
अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक एक मार्फत करण्यात आली.
अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाईवेळी पीएमआरडीएचे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे,
(प्रभारी तहसीलदार) उपअभियंता राजेंद्र मेदनकर, उपअभियंता सुर्यकांत कापसे, सह्यक
अभियंता राजेश्वर मंडगे, , कनिष्ठ अभियंता योगेश दिघे, तसेच हडपसर पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान स्थानिक पोलीस अधिकारी व
कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली व सहकार्याने सदरील कारवाई पार पाडण्यात
आली.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी नागरिकांनी सदर सदनिका खरेदी
करताना सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका खोटी माहिती देऊन स्वस्त दराचे आमिष
दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते, नागरिकांचे आर्थिक नुकसान टळावे याकरिता
नागरिकांनी जागरूक राहावे. नागरिकांनी शहानिशा करूनच सदनिका खरेदी कराव्यात असे
आवाहन महानगर आयुक्तांनी केले
कुठवर आमची तोंडं दाबाल ? महापौरांवर उखडल्या अश्विनी कदम (व्हिडीओ)
पुणे- नव्या विस्तारित इमारती चे काम अपूर्ण असताना उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रकरणावर सभागृहात बोलू न दिल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेविकाअश्विनी कदम महापौरांवर उखडल्या . ठराविक लोकांना बोलू दिले जाते , आम्हालाही बोलायचे असते पण मुस्कटदाबी केली जाते असा आरोप भैय्या जाधव आणि योगेश ससाणे यांनी हि केला . अखेर संताप व्यक्त करत अश्विनी कदम यांनी सभात्याग केला ..पहा जसेच्या तसे काय झाले सभागृहात ….
पुणे लोकसभेसाठी काकडेंची जोरदार मोर्चेबांधणी; आता शशिकांत सुतारांच्या भेटीला
पुणे, दि. 28 जून : राज्यसभा खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी जोरात सुरु केली आहे. दलित, मुस्लिम नेते व पदाधिकाऱ्यांपाठोपाठ त्यांनी आता बहुजन समाजातील नेत्यांच्या भेटीगाठीवर भर देऊन पुण्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न सुरु केला असून याचाच भाग म्हणून त्यांनी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शशिकांत सुतार यांची त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.
पुणे लोकसभा मतदार संघात निवडून येण्यासाठी आवश्यक त्या सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न खासदार संजय काकडे यांनी चालविला आहे. रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी, डॉ. पी. ए. इनामदार, अॅड. एस. के. जैन आदी विविध मान्यवरांबरोबरच्या भेटीगाठी व डिनर डिप्लोमसीनंतर रमजान ईदनिमित्त खासदार काकडे यांची ईदगाह मैदानावरील उपस्थिती लक्षणीय ठरली. आता शिवसनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार यांची सदिच्छा भेट घेतली. यातून पुणे लोकसभा मतदार संघासाठी आपली दावेदारी प्रबळ करण्याचा प्रयत्न संजय काकडे यांनी पद्धतशीरपणे चालविला असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
खासदार संजय काकडे हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. जनतेतून निवडून जाण्याची त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखविली आहे. पुण्यासाठी व पर्यायाने महाराष्ट्र व देशासाठी चांगले काम करण्याचा मनोदय त्यांनी अनेकवेळा बोलून दाखविला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर समान पाणीपुरवठ्याच्या निविदेच्या विषयावर सत्ताधारी भाजपला विरोधकांनी चांगलेच खिंडीत गाठले होते. यावेळी खासदार काकडे यांनी समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदेतील त्रुटी सउदाहरण पुणेकरांसमोर आणल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेस त्या व्यवस्थितपणे आणल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही फेरनिविदा काढण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. यातून पुणेकरांचे कोट्यावधी रुपये वाचले आणि सर्वस्तरातून खासदार काकडे यांचे कौतुक झाले.
खासदार काकडे यांचे दलित, मुस्लिमसह बहुजन समाजात मोठ्या प्रमाणात चाहते व हितचिंतक आहेत. त्यांचे सोशल नेटवर्कींग मजबूत आहे. याची चुणूक गेल्या महापालिका निवडणुकीत सर्वांना पाहायला मिळाली. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे. यातूनच ते आता सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न करून लोकसभेची दावेदारी पक्की करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुणे लोकसभेची उमेदवारी संजय काकडे यांना मिळणार का? त्यांचे हे सोशल इंजिनिअरिंगचे प्रयत्न फलद्रूप होणार का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला अजून वाट पाहावी लागणार असली तरी, काकडेंनी सुरु केलेल्या भेटीगाठींची चर्चा पुण्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच सुरु असल्याचे चित्र आहे.
गोवा टुरिझमतर्फे म्हादेई नदीत राफ्टिंग करण्याचा चित्तथरारक अनुभव आज पासून …
पणजी – पावसाळ्याची सुरुवात झाली आहे आणि खळाळत्या म्हादेई नदीत किनाऱ्यावर वसलेल्या वन्यजीवन अभयारण्याच्या साक्षीने लाटांवर स्वार होण्यासाठी ही सर्वात चांगली वेळ आहे. हा अनुभव देण्यासाठी जीटीडीसी २८ जूनपासून व्हाइट वॉटर राफ्टिंगती सुरुवात करत असून हा उपक्रम सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. दर दिवशी दोन राफ्टिंग सहलींचे आयोजन करण्यात येणार असून पहिली ट्रिप सकाळी ९.३० वाजता आणि दुसरी दुपारी २.३० वाजता केली जाणार आहे. प्रत्येक सहलीमध्ये २.५ ते ३.५ तासांत १० किलोमीटरचे अंतर पार केले जाणार असून त्यादरम्यान पर्यटकांना लाटांच्या वेगाबरोबर पुढे जात निसर्गरम्य लँडस्केप्सचा अनुभव घेता येणार आहे.
व्हाइट वॉटर राफ्टिंगच्या चित्तथरारक अनुभवासाठी तुम्हाला वाल्पोई येथील द अर्थन पॉट रेस्टॉरंटमध्ये एकत्र येता येईल व तिथून २५ मिनिटे प्रवास आणि १० मिनिटे चालत गेल्यावर म्हादेई नदीच्या खोऱ्यात वसलेल्या राफ्टिंगच्या ठिकाणी पोहोचता येईल. तेथे तुम्हाला उपकरण बसवून दिले जाईल आणि तुमचा प्रवास सुरक्षित व अविस्मरणीय होण्यासाठी रिव्हर गाइड्सद्वारे सुरक्षेसंदर्भातील सुचना दिल्या जातील. तुम्ही पहिल्यांदाच असा प्रवास करत असाल, तरी काळजी करण्याचे कारण नाही कारण आमचा उच्च प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी वर्ग तुमच्या सुरक्षेची काळजी घेईल.
यावर्षी व्हाइट वॉटर राफ्टिंग अनुभव वेगळा असार आहे. गोवा टुरिझमने देशातील आघाडीच्या साहस क्रीडा व्हिडिओ कंपनीशी करार केला असून त्यामुळे तुमचा राफ्टिंग अनुभव वैयक्तिक व्हिडिओद्वारे कैद केला जाणार आहे. हा व्हिडिओ त्याच दिवशी व्हॉट्स अप किंवा गुगल ड्राइव्हद्वारे शेअर केला जाईल. त्यासोबत आठवण म्हणून फ्रेम केलेला फोटोही दिला जाईल. राफ्टिंग ठिकाणापर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दिवसातून दोनदा पणजी ते उत्तरेकडच्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत २०० रुपयांत बस सेवा सुरू करण्याचा विचार आहे.
गोव्यातील रिव्हर राफ्टिंग ट्रेंडविषयी श्री. निलेश काब्राल, अध्यक्ष, गोवा पर्यटन विकास महामंडळ म्हणाले, ‘विश्रांतीसाठी गोवा हे कायमच सर्वोत्तम भारतीय ठिकाणांपैकी एक मानले जाते व आता गोव्यात वॉटर स्पोर्ट्स उपक्रमही मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहेत. उपलब्ध असलेल्या भरपूर उपक्रमांपैकी म्हादेई नदीतील भोवरे रिव्हर राफ्टिंग उपक्रमाद्वारे पार करण्याला पर्यटकांची चांगली पसंती मिळत आहे. म्हणूनच या वर्षी आम्ही आघाडीच्या साहस क्रीडा व्हिडिओ कंपनीशी करार करून त्याद्वारे साहसप्रेमींना म्हादेई नदीत राफ्टिंग करतानाचे त्यांचे व्हिडिओज देण्याचे आठवण म्हणून देण्याचे ठरवले आहे. भविष्यातही आम्ही वेगवेगळे करार करणार आहोत, जे प्रवाशांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आम्हाला मदत करतील.’
ही सहल प्रथमच राफ्टिंग करणाऱ्यांसाठी आणि दहा वर्ष वयाच्या पुढच्या मुलांसाठी आदर्श आहे. सुरक्षित फुटवेअर आणि योग्य कपडे बंधनकारक आहेत.या सहलीचा खर्च प्रती व्यक्ती १८९० रुपये प्रती व्यक्ती असून त्यात पाच टक्के जीएसटीचा समावेश आहे.
‘पालिकेतील समाविष्ट गावांचे भवितव्य काय’ ? यावर महाचर्चा
सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त ‘आयसीएआय’ तर्फे विविध कार्यक्रम
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) ७० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स’ (जीएसटी) कायद्याला एक वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल विद्यार्थीनींसाठी ‘जीएसटी’वर पाच दिवसांच्या मोफत कार्यशाळेचे आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जीएसटी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मार्गदर्शन करणार असून ही कार्यशाळा महिला सक्षमीकरणा अंतर्गत घेण्यात येत आहे.
आयसीएआयच्या करिअर कौन्सलिंग ग्रुप, आयसीएआय पुणे विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागातर्फे (पुम्बा), एमआटी- डब्लूपीयु, एसएनडीटी महाविद्यालय, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (एमकेएसएसएस’एस) यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा दि. १ जुलै ला सुरु होऊन जुलै महिन्यातील दर शनिवारी (७,१४,२१,२८ जुलै) विविध महाविद्यालयात होणार आहे. वाणिज्य विषय शिकणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थीनींसाठी ही कार्यशाळा आहे. ‘बेटी पढाओ’ योजनेत सहभाग घेऊन विद्यार्थीनींना मुलभूत व विस्तारित माहिती देण्याचे कार्य केले जाणार आहे. देशभरात आयसीएआय विविध विद्यापीठांच्या, संस्थांच्या सहकार्याने अशा कार्यशाळा घेत आहे. आतापर्यंत या ग्रुपने २००० पेक्षा जास्त करिअर कौन्सिलिंगचे कार्यक्रम आयोजिले आहेत. एकूण २० तासांचे हे प्रशिक्षण असणार आहे. ७० वर्षानिमित्त ७० ठिकाणी ७० विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.या पैकी सर्वाधिक आठ कार्यशाळा या आयसीएआय च्या पुणे विभागा तर्फे घेण्यात येत आहे.
दरवर्षी एक जुलैला आयसीएआयचा वर्धापनदिन ‘सीए दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, नेत्रशिबिर, पुस्तक वाटप आदींचा समावेश असतो. दोन दिवसीय रक्तदान शिबिर ३० जून आणि १ जुलै या दोन दिवशी आयसीएआय पुणे शाखा, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनच्या (डब्ल्यूआयसीएएसए) आणि चार्टर्ड अकाउंटंट्स फम यांच्या सहकार्याने होत आहे. बिबवेवाडीतील आयसीएआय भवन, सदाशिव पेठेतील फडके संकुल, पु. ल. देशपांडे उद्यानासमोर राठी राठी अँड कंपनी, खराडी येथील एसआरपीए अँड असोसिएट्स, विधी महाविद्यालय रस्त्यावरील पुणे डेक्कन सीपीई स्टडी सर्कल, बाणेर-पाषाण लिंक रोडवरील एसकेपी ग्रुप, मित्र मंडळ चौकातील एसपीसीएम आणि बाणेर येथील बिझसोलइंडिया सर्व्हिसेस येथे हे रक्तदान शिबीर होणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या पुणे विभागाचे चेअरमन सीए आनंद र. जाखोटिया यांनी दिली.
भाजप ओबीसी मोर्चाच्या सचिवपदी राजू केकान यांची नियुक्ती
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश ओबीसी मोर्चाच्या सचिवपदी राजू केकान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी आमदार योगेश टिळेकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अनुक्रमे केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या योजनांचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम यामाध्यमातून करणार असल्याचे राजू केकान यांनी सांगितले.
नवीन औद्योगिक धोरणावर उद्योगमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद
पुणे : नवीन औद्योगिक धोरण निश्चित करण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्येाग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे उद्योजकांशी संवाद साधला. उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सतिश गवई, उद्योग सह संचालक संजय कोरबु, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक व्ही.एल.राजाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी.डेकाटे, विविध उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक यावेळी उपस्थित होते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा नवीन औद्योगिक धोरण निश्चित करताना प्राधान्याने विचार करण्यात येऊन नवीन औद्योगिक धोरण परिपूर्ण असेल, असे यावेळी सांगितले. नवीन औद्योगिक धोरण ठरवताना औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार वाढावा याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक धोरण ठरवताना महिला उद्योजकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. मोठया प्रमाणावर महिला उद्योजक तयार व्हाव्या, अशी अपेक्षा त्यांनी उद्योजकांशी संवाद साधताना व्यक्त केली. उद्योगांमध्ये विविध क्षेत्रांचा सहभाग वाढत असल्याने, त्या-त्या क्षेत्रात होणाऱ्या उत्पादनांचा विचार करुन औद्योगिक वसाहती निर्माण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या चर्चासत्रादरम्यान विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजकांनी औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण सूचना केल्या.





