वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉक्टरांचा अजित पवार करणार सन्मान
‘डॉक्टर्स डे’ निमित्त ‘राष्ट्रवादी डॉक्टर सेल’ पुणे च्या वतीने डॉक्टरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉक्टरांचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार होणार आहे, अशी माहिती ‘साई स्नेह हॉस्पिटल’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल’चे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली.
हा सन्मान सोहळा रविवार, दिनांक १ जुलै २०१८ रोजी रात्री १०:३० वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे होणार आहे. खासदार वंदना चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे डॉक्टर सेल करीता रात्री ९:३० वाजता ‘सख्खे शेजारी’ विनोदी नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या प्रयोगा दरम्यान हा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले आहे.
याप्रसंगी डॉ. रमेश भांगे , डॉ. कल्पना भांगे, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. ज्ञानेश्वर दुसाणे, डॉ. ओंमप्रकाश जाधव, डॉ. सुनील घागरे, डॉ. प्रकाश महाजन, डॉ. श्रीहरी ढोरे-पाटील, डॉ. विलास जगन्नाथ पाठक, डॉ . दीपाली विलास पाठक या डॉक्टरांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते होईल, अशी माहिती डॉ. सुनील जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष), डॉ. अजितसिंह पाटील, डॉ. सिद्धार्थ जाधव – (राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष), डॉ. राजेश पवार (कार्याध्यक्ष), डॉ. हेमंत तुसे – (राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल, सचिव) यांनी पत्रकाद्वारे दिली.