Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बालगंधर्वांमुळे भारतीय चित्रपट संगीतमय झाले कीर्ती शिलेदार

Date:

 
पुणे- बालगंधर्व यांच्या काळात मराठी रंगभूमीने सुवर्णयुग अनुभवले. मराठी संगीत नाटकांना भाषा, प्रांत या भेदांच्या पलिकडे नेण्याची किमया नटसम‘ाट बालगंधर्व यांच्यामुळे घडली. बालगंधर्वांच्या संगीत नाटकांमुळे भारतीय चित्रपटात संगीतमय झाले, असे मत अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.
महापालिकेतर्ङ्गे देण्यात येणारा संगीत, नाट्य व कला क्षेत्रांतील या वर्षीचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार ऑर्गनवादक चंद्रशेखर देशपांडे यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक‘मात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. नगरसेविका नीलीमा खाडे, माधुरी सहस्त्रबुध्दे, ज्योत्स्ना एकबोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वर्षीचे बालगंधर्व विशेष पुरस्कार गायिका पोर्णिमा धुमाळे, नेपथ्यकार दत्ता गाडेकर, संगीत नाटक कलाकार राम साठ्ये, प्रकाश योजनाकार अनिल टाकळकर, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शक ऋषी मनोहर यांना देण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे मु‘य पुरस्काराचे स्वरुप होते.
शिलेदार पुढे म्हणाल्या, ‘बालगंधर्वांचे गायन ललित मधुर, अजूनही गंधर्व सूर निनादतात, आजही संगीत नाटक म्हटल्यावर बालगंधर्व आठवतात, असा अद्वितीय, लोकोत्तर बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ ऑर्गनवादक चंद्रशेखर यांना मिळतो तेव्हा अतिशय योग्य व्यक्तिचे कौतुक झाले अशीच भावना होते.’
बालपणी बालगंधर्वांचा सहवास लाभला, वडिल चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे यांच्यामुळे संगीत रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली. नाट्यसंगीताचे विद्या दान ६५ वर्षे करता आले. बालगंधर्व गायकीच्या सेवेत आयुष्य वेचता आले याचे समाधान आहे. विद्यादानाचे काम चालू ठेवणार असल्याची भावना चंद्रशेखर देशपांडे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. ज्योत्स्ना एकबोटे यांनी सूत्रसंचालन, माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी मानपत्राचे वाचन आणि नीलिमा खाडे यांनी आभार प्रदर्शन केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...