३० जून रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थित ‘ पुणे महानगर परिषदेची महाचर्चा
पुणे : पुणे महानगर परिषदेच्या वतीने शनिवार, दिनांक ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता, मुक्ताई गार्डन, धायरी येथे महाचर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाचर्चेत ‘महापालिकेतील समाविष्ट गावांचे भवितव्य काय’ ? या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर परिषदेचे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी पत्रकाद्वारे दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून ‘महानगर पालिकेतील समाविष्ट गावांचे भवितव्य काय’ ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या संबंधित सर्व पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यासाठी पुणे महानगर परिषद यांच्या वतीने आयोजित हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, मुरलीधर मोहोळ (स्थायी समिती, माजी अध्यक्ष), आबा बागुल (माजी उपमहापौर), संजय भोसले (गटनेते, शिवसेना), वसंत मोरे (गटनेते, मनसे) , नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, सचिन दोडके, साईनाथ बाबर, रमेश कोंडे (पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना), राजाभाऊ रायकर (समिती सदस्य), प्रवीण तुपे (संचालक साधना सह. बँक), बाळासाहेब हगवणे (माजी सरपंच, किरकटवाडी), जयश्री पोकळे (सदस्य, जिल्हा परिषद), दिनकर हरपळे (सदस्य, पंचायत समिती, सौरभ मते (सरपंच), सागर भूमकर (सरपंच, नऱ्हे), मिलिंद पोकळे असे अनेक मान्यवर सहभाग घेणार आहेत.
या महाचर्चासत्रात पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे महानगर परिषदेच्या वतीने चर्चासत्राचे निमंत्रक अध्यक्ष अॅड गणेश सातपुते, उपाध्यक्ष संतोष पाटील, किरण बराटे, महेश महाले (कार्याध्यक्ष), चिटणीस दत्तात्रय जगताप, अॅड. राजेश तोंडे, सरचिटणीस योगेश खैरे, केदार कोडोलीकर, खजिनदार संजय दिवेकर, सह खजिनदार अनिरुद्ध खांडेकर यांनी केले आहे.