Home Blog Page 3116

‘वेध साधनेचा’ कथक मैफल

0

अव्याहत साधनेची ७१ वर्षे पूर्ण

पुणे: दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्वरचित नृत्यरचना गुरुदक्षिणा म्हणून शिष्यांनी गुरूला द्यावी, अशी संकल्पना गुरू पं. रोहिणी भाटे यांनी रुजविली. नृत्यभारती डान्स अकॅडमीतर्फे आजही हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. यंदा यास ७१ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त ‘वेध साधनेचा’ या कथक संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (ता.२०) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी ७ ते १० यावेळेत ही मैफल पार पडेल.

पखवाजी बाजाचा परंतु, लास्यांगाने जाणारा ताल धमार, वादनातील बंदीशींनी नटलेला चौताल, मानसिक आजार व समाज यांवर विचार मांडणारी ‘चैतन्य’ रचना, अभिसारिका नायिका, गुरू रोहिणीताईंवर रचलेली कविता आणि रोहिणीताईंचे नृत्यदिग्दर्शन लाभलेली ‘ऋतुगान’ ही नृत्यसंरचना अशा अभिजात कथक नृत्याचे विविध पैलू उलगडणाऱ्या नृत्यरचना एकाच व्यासपीठावर अनुभविण्याची संधी यानिमित्ताने रसिक पुणेकरांना लाभणार आहे.

गुरू पं. रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या शरदिनी गोळे यादेखील मैफलीत सहभागी होणार आहेत. पं. अरविंदकुमार आजाद(तबला), अजय पराड (संवादिनी), अर्पिता वैशंपायन (गायन), गोविंद भिलारे (पखवाज), सुनील अवचट (बासरी) आदी कलाकार मैफलीत साथसंगत करणार आहेत. तरी, या मैफलीचा अधिकाधिक रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्वेलर्सचे दुकान फोडुन साडेसात लाख रूपये किंमतीचे चांदीच्या दागिण्यांची चोरी

0
ओतुर – दि.१५
ओतुरमधील भरवस्तीत असणारे लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानचे शटर अज्ञात चोरट्याने उचकटुन आत प्रवेश करुन काऊंटरमधे ठेवलेल्या डब्यातील सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरीस गेल्याची घटना शनिवारी (दि.१४) च्या रात्री घटली असल्याची माहीती ओतुर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार के. एम. पाटोळे यांनी दिली.
या बाबत मनिषा दादासाहेब सुळे(रा.होळीचौक,महात्मा गांधी रोड,ओतुर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन यात त्यांनी म्हटले आहे  कि,शुक्रवारी (दि.-१३) सायंकाळी ७:३० वा.दुकान बंद करून घरी गेले व ( दि.१४) शनिवारी दुकान बंद ठेवत असल्याने दुकान उघडले नाही रविवारी (दि.१५)रोजी सकाळी ६ वाजता शेजारच्या महीलेने सांगितले कि तुमचे दुकानाचे शटर उघडे आहे यावरुन जाऊन पाहिले असता कोणातरी अनोळखी चोरट्यांने त्यांचे  लक्ष्मी ज्वेलर्स  या नावाचे दुकानाचे शटर ऊचकटुन आत प्रवेश करून काऊन्टरचे ड्राॕवर मध्ये ठेवलेल्या डब्यातील अंदाजे २५ किलो वजनाचे चांदीचे दागीने त्यामध्ये पायातील पैंजण, जोडवी,ताट,छल्ले, गणपती मुर्ती, तांबे,पेले,वाट्या, असे अंदाजे ७,५०,०००/- रूपये किमतीचे व वर्णनाचे दागीने चोरीस गेले आहेत..दरम्यान जवळीलच सोनु निकम यांच्या दुर्गा ज्वेलर्स मधे देखील चोरी झाल्याचे समजते.
पोलिसांनी भा.द.वि.कलम ४५७ व ३८० अन्वये गुन्हा नोंदविला असुन अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरज बनसोडे करित आहेत.घटणास्थळी जुन्नरच्या उपविभागिय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांनी भेट दिली.असुन फिंगर प्रिंट पथकास देखील पाचारण करण्यात आले होते.
या चोरीच्या घटनेमुळे ओतुर परिसरात व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

अधिकारी महासंघाच्‍या दुर्गा महिला मंचची राज्यव्यापी बैठक संपन्न

0

पुणे- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचची राज्यव्यापी बैठक येथे संपन्न झाली. राज्‍यातील सर्व महिला अधिका-यांपर्यंत पोहोचण्‍यासाठी दुर्गा महिला मंचची सर्व जिल्हयात स्थापना करण्‍यासह इतर महत्‍त्‍वपूर्ण विषयांवर चर्चा करण्‍यात आली.  महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ ही 72 अधिकारी संघटनांची मान्यताप्राप्त शिखर संघटना आहे.

बैठकीत पुढील  मागण्या व विषयांवर व्‍यापक चर्चा करण्‍यात आली. महिला कर्मचारी व अधिकारी यांना प्रसूती रजा व्यतिरिक्‍त,6 महिन्याची बालसंगोपन  रजा मंजूर करण्‍यात आल्‍याबद्दल शासनाचे आभार मानणारा ठराव  मंजूर करण्‍यात आला.

महिला कर्मचारी-अधिकारी यांचा कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक  छळासंबंधी तक्रार निवारण समितींचा आढावा सर्व जिल्हाधिका-यांनी घेणे. लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 संबंधी प्रशिक्षण देणे. अधिकारी महासंघांतर्गत अंतर्गत दुर्गा महिला मंच शाखा सर्व जिल्हयात स्‍थापन करणे. चक्राकार बदली, पददोन्नती,  पदस्थापना पध्दतीतून महिलांना वगळणे.

अधिका-यांची संपूर्ण  मोफत वैद्यकीय तपासणी करणे.  महिला प्रसाधनगृहामधे सॅनीटरी नॅपकीनचे व्हेंडिंग व डिस्पोजल मशिन बसविणे. चांगल्या दर्जाचे व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करणे व शासकीय विश्रामगृहे प्राधान्याने उपलब्ध करणे

महिला पदाधिका-यांच्‍या राज्यव्यापी बैठकीत सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव विभागातून महिला अधिकारी उपस्थित होत्या. दुर्गा महिला मंचच्‍या  राज्य अध्यक्षा डॉ. सोनाली कदम, अधिकारी महासंघ संस्थापक ग. दि. कुलथे, राज्य अध्यक्ष विनोद  देसाई, राज्य सरचिटणीस समिर भाटकर, राज्य उपाध्यक्ष विनायक लहाडे, ज्ञानेश्वर जुन्नरकर, महिला पदाधिकारी वंदना गेवराईकर, सितल सेवतकर, सुवर्णा पवार, सुवर्णा जोशी, सविता नलावडे, सिध्दी संकपाळ, जयश्री गोरे, सरोज जगताप, कांचन जाधव, डॉ रेखा गायकवाड, विद्युत वरखेडकर, सुदाम टाव्हरे, दशरथ बोरकर आदींनी  विचार मांडले

बैठकीच्‍या यशस्‍वीतेसाठी वृषाली पाटील, अशोक मोहिते, रवींद्र चव्हाण, विलास हांडे यांनी प्रयत्न केले. पुढील बैठक नागपूर येथे घेण्यात येणार असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.

पीएमपीएमएल खाजगीकरण ; हेडमास्तरांचा महापौरांसह पदाधिकाऱ्यांवर दबाव -अरविंद शिंदे(व्हिडीओ)

0

पुणे- पीएमपीएमएल खाजगीकरण प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष महापौरांवर दबाव आणत असून याप्रकरणी केवळ तेच हालचाली करत आहेत . पालकमंत्र्यांपासून सारे गप्प आहेत असा आरोप आज कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी येथे केला .
स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या मुख्य इमारतीपुढे कॉंग्रेस-राष्ट्रवादीने खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी निदर्शने केली .विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील, माजी महापौर दत्ता धनकवडे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे ,माजी सभागृहनेते सुभाष जगताप ,सुनील टिंगरे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर,कॉंग्रेसचे अजित दरेकर आणि शिंदे यांच्या सह बाबा धुमाळ, राकेश कामठे, अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते . पहा या आंदोलनाची एक व्हिडीओ झलक ….

हा तर पीएमपीएमएल विकण्याचा डाव -चेतन तुपे पाटील (व्हिडीओ)

पुणे- प्रायोगिक तत्वावर पीएमपीएमएल चे फायद्यातील काही मार्ग फोर्स कंपनीला देण्याचा प्रकार म्हणजे  पीएमपीएमएल चे नुसते खाजगीकरण नसून तो विकण्याचाच डाव आहे .आणि याचे सूत्रधार भाजपचे शहराध्यक्ष आहेत असा घणाघाती आरोप येथे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे . या प्रकाराविरुद्ध १४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता  पीएमपीएमएल च्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे हि त्यांनी सांगितले . पहा आणि ऐका नेमके तुपे पाटलांनी काय म्हटले आहे ,त्यांच्याच शब्दात ….

संभाजी भिडेंना आंबे महागात पडणार अन‌् मनूही भोवणार? -हायकोर्टात याचिका दाखल

0

नाशिक- ‘आंबे खाल्ल्याने मुले होतात’ आणि ‘संत ज्ञानेश्वर, तुकारामांपेक्षाही मनू श्रेष्ठ’ ही वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात मुंबई हायकोर्टात अॅड. नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात भिडेंना भाषणे करण्यावर घटनात्मक प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य हे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातील तरतुदींचा भंग करत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील आंब्याचे फळ खाल्ले तर ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतात, असा चमत्कारिक दावा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी जून महिन्यात नाशिकमध्ये केला होता. हे विधान गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीलाच आव्हान देणारे असल्याचे सांगत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा समितीचे सदस्य गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालिका अर्चना पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे गर्भलिंगनिदान कायद्याच्या कलमांचा भंग आहे. भिडे यांनी असे वक्तव्य करून कायद्याचा भंग केला असल्याने त्यांच्याविरुद्ध योग्य न्यायालयात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पत्रात करण्यात आली. कुटुंबकल्याण विभागाने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्याधिकाऱ्यांना जिल्हा समुचित प्राधिकारी या नात्याने भिडे यांच्या वक्तव्याबाबत खातरजमा करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करावा, असे आदेशित केले. त्यानुसार महापालिकेने चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी भिडे गुरुजी यांना नोटीस पाठवण्यात आली. मात्र, नोटीस देऊन पंधरा दिवस उलटूनही त्यास उत्तर देण्यात आले नाही. पुणे येथे पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले भिडे यांनी धारकऱ्यांना संबाेधित करताना सांगितले की, गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून आपल्या हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता.

गर्भलिंगनिदान कायद्यातील कलमांचा भंग
या धक्कादायक विधानांच्या विरोधात भिडे गुरुजींवर अॅड. सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आंबे खाणाऱ्याला मुले होतात या वक्तव्याने गर्भलिंगनिदान कायद्यातील कलमांचा भंग केला आहे. मनूशी संबंधित विधान हे लोकांच्या धार्मिक भावना बिघडवणारे आहे. भारतीय घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र देताना काही बंधनेही घालण्याची तरतूद केली आहे. भिडेंचे वक्तव्य या तरतुदींचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणांवर घटनात्मक प्रतिबंध घालावा, अशी मागणी मी याचिकेद्वारे केली आहे.
– अॅड. नितीन सातपुते, याचिकाकर्ते

देवभाषा संस्कृत दिन नवीन मराठी शाळेत उत्साहात साजरा

0

पुणे -आषाढ महिन्याचा प्रथम दिन म्हणजे संस्कृत साहित्यिकांचा आनंदाचा, सणाचा दिवस .हा दिवस संपूर्ण देशभरात महाकवी कालिदास दिन व देवभाषा संस्कृत दिन  म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो .याच दिनाचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या  नवीन मराठी शाळेत शुक्रवार दि.१३/७/२०१८ रोजी  संस्कृत दिन विविध कार्यक्रमांनी व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व महाकवी कालिदास यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री .सुनीलजी भंडगे ,संस्थेच्या पदाधिकारी माननीय डॉक्टर सविताताई केळकर, शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ ,ज्येष्ठ शिक्षक सौ .तनुजा तिकोने, श्री .धनंजय तळपे, सौ .जयश्री खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांनी स्वागत व प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या .सौ.अर्चना देव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व माननीय मुख्याध्यापिका सौ .कल्पना वाघ यांनी शाळेच्या वतीने पुस्तक भेट देऊन मान्यवरांचा सत्कार केला. सौ .स्वाती तळपे यांनी संस्कृत दिन व महाकवी कालिदास यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

माननीय डॉक्टर सविताताई केळकर यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नवीन भाषा शिकून माणूस म्हणून मोठे होण्याचा संदेश दिला .माननीय डॉक्टर सुनीलजी भंडगे यांनी संस्कृत भाषेमुळे वाणी शुद्ध होते असे विचार व्यक्त करून संस्कृत गीताच्या दोन ओळी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतलेल्या. इयत्ता तिसरी मुठा वर्गातील विद्यार्थ्यांनी मम माता ,पक्षि गीतम् इत्यादी संस्कृत गीते सादर केली. तसेच इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पक्षी मोर याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती संस्कृत नाट्याविष्कारातून सादर केली.

सौ. अर्चना देव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ .योगिता भावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .अशाप्रकारे संस्कृत दिनाचा कार्यक्रम नवीन मराठी शाळेत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

ग्राहकांची लूट करणाऱ्या फूडमाॅल्स , मल्टीप्लेक्सवर कठोर कारवाई -गिरीश बापट

0

पुणे. :- मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे व फूडमाॅलमध्ये जादा दराने विक्री करणाऱ्या चालकांवर एक आॅगस्टपासून कठोर कारवाई करण्यात येईल . असा ईशारा  अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधिमंडळात पत्रकारांशी बोलतांना दिला. तसेच चित्रपटगृहात बाहेरील खाद्य पदार्थ नेणाऱ्या प्रेक्षकाला कुणीही अटकाव करू शकणार नाही.अशी माहितीही बापट यांनी दिली.  विधानपरिषदेत या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावरील चर्चेनंतर बापट पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, महामार्गावरील फूडमाॅल्स ,मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे व अन्य माॅल्समध्ये उत्पादकांमार्फत जादा किंमत ( Dual M.R.P ) छापून ग्राहकांची लूट केली जात होती. तशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष मोहिम राबवून अशा उत्पादकांवर कारवाई केली. त्यांच्यावर २०१६-१७ या वर्षात खटले दाखल केले. त्यावर आक्षेप नोंदवून काही उत्पादक न्यायालयात गेले. त्यांनी स्थगिती आणली. त्यानंतर राज्य शासनाने जानेवारी १७ मध्ये केंन्द्रांला विनंती करून आवेष्टीत वस्तू नियम २०११ मध्ये सुधारणा करण्याची विनंती केली. विशेषत: जादा किंमती छापणा-यांविरुध्द कठोर नियम बनवावेत . असा आग्रह केला. त्याची दखल घेऊन केन्द्राने एक आॅगस्ट २०१८ पासून वेस्टनावर जादा किंमत छापण्यास प्रतिबंध करणारी अधिसूचना जारी केली. त्यानुसार आता जादा दर आकारणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वेष्टन असलेल्या प्रत्येक वस्तूवर उत्पादकांचे नाव, आयातदाराचे नाव पत्ता, वस्तूंचे नाव, वजन, सर्व करांसह कमाल किरकोळ किंमत,उत्पादन, पॅकिंग व आयात केल्याचा महिना व वर्ष छापणे बंधनकारक आहे. तसेच ईमेल आयडी व दूरध्वनिक्रमांक छापणे अनिवार्य आहे.त्यात  खाडाखोड केल्याचे अथवा अधिक दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाईचे आदेश आम्ही दिले आहेत. राज्यातील चव्वेचाळीस मल्टीप्लेक्स व माॅल्सची गेल्या काही महिन्यात तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन माॅल्सच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. हाॅटेल्स व रेस्टाॅरन्टचालकांवर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अशी कारवाई करता येत नाही.
चित्रपट गृहात खाद्य पदार्थ नेण्याच्या संदर्भातील विधानपरिषदेत चर्चा झाली असे सांगून बापट म्हणाले की, चित्रपटगृहात बाहेरून खाद्य पदार्थ नेण्यास मज्जाव करणारा कोणताही कायदा सध्या अस्तित्वात नाही. राज्य सरकारनेही अंकासाठी कधी कुणाला अटकाव केला नव्हता. असे प्रतिज्ञापत्र आता आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत. सध्या असे खाद्यपदार्थ नेता येणार नाहीत. अशी अट चालकांनी घातली आहे. ती आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्र चित्रपट अधिनियम १९६६ मध्येही अशा प्रकारच्या मनाईचा उल्लेख नाही. या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पहात आहोत. गृह विभाग याबाबत दिशा ठरवीत आहे.

गृहनिर्माण संस्थांना दिलासा 
मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुका स्वतंत्र पणे घेण्याची मुभा देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने गुरुवारी घेतला. अशी माहितीही बापट यांनी दिली. ते म्हणाले की, या निर्णयामुळे आता शंभरपर्यंत सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या सर्वसाधारण सभेतच निवडणुका घेता येईल. सहकार खात्याच्या निवडणुक प्राधिकरणाचे या निवडणुकांवर नियंत्रण राहाणार नाही. पुणे शहरात अशा संस्थांची संख्या दहा हजारांवर आहे. दहा ते पंधरा सदस्य असलेल्या संस्थेला उमेदवार मिळत नाहीत. त्यांना निवडणुकीचा खर्चही झेपत नाही. आरक्षण असलेल्या जागा रिकाम्या राहातात. त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांचे काम ठप्प झाल्याच्या तक्रारी आल्याने मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला. सहकार कायद्यात बर्याच त्रुटी होत्या .त्यावर उपाय सुचविण्यासाठी सहनिबंधक संदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनाला मिळाला आहे. या समितीने या निवडणकांबाबत शिफारस केली होती. ती  मान्य करण्यात आली.

निर्मल वारी उपक्रम यशस्वी

0
पुणे
पंढरीच्या वाटेवर वर्षेनुवर्षे वारी करणाऱ्या वारकरी बांधव -भगिनींना आता स्वच्छतेचे महत्व पटले आहे. गेली चार – पाच वर्षे स्वयंसेवकांनी घेतलेले अथक परिश्रम आणि  जनजागृतीमुळे  आता निर्मल वारी उपक्रम यशस्वी ठरला आहे . अनेक गावांनीही  स्वच्छतेची कास धरली आहे. शासनानेही  तात्पुरती आणि फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून दिल्याने स्वच्छतेसाठी आपुलकीची  ‘सक्ती’ हीच विठू भक्ती याचा प्रत्यय  मिळत आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज पालखी सोहळय़ामध्ये  ‘निर्मल वारी अभियान’ राबविण्याचा प्रयोग आता यशस्वी ठरला आहे. मात्र सुरुवातीला उपक्रमासाठी कोणते अडथळे आले, गावांचा प्रतिसाद कसा होता  , ग्रामस्थांची भूमिका काय होती याबाबत या उपक्रमात प्रारंभीपासून अग्रेसर असणारे व भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे म्हणाले कि यवत आणि लोणी गावांमध्ये या निर्मल वारीचा प्रयोग करण्याचे चार वर्षांपूर्वी माजी खासदार प्रदीप रावत यांच्या संकल्पनेतून ठरले. मोतीबागेत झालेल्या बैठकीत तत्कालीन प्रांत कार्यवाह अतुल लिमये आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि आम्ही शंभर महिला आणि शंभर पुरुष या गावांमध्ये पोहचलो.वारकरी प्रातर्विधीसाठी कोणत्या ठिकाणी जातात ती ठिकाणे निश्चित केली आणि त्या ठिकाणी तात्पुरते   शौचालये  उभारून त्याचा वापर करण्यास उद्युक्त केले. रात्री बारा  पासून ते पहाटेपर्यंत  आम्ही कार्यरत होतो.  प्रारंभी  ग्रामस्थांनी राजकीय दृष्टिकोनातून या उपक्रमाकडे पाहिले आणि आमच्या भूमिकेवर संशय घेतला मात्र आम्ही
दरवर्षी आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून प्रस्थान ठेवणाऱ्या पालख्यांसमवेत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी रवाना होत आहेत. वारीमध्ये पुरुष आणि महिला वारकऱ्यांची संख्या खूप असते. जास्त दिवसांचा प्रवास असल्यामुळे पालखी सोहळा मार्गावरील वेगवेगळय़ा गावांमध्ये मुक्काम करतो. प्रातर्विधीसाठी गावामध्ये शौचालयांची सोय नसल्यामुळे अनेकांना उघडय़ावरच शौचास बसावे लागते. त्यामुळे या गावाजवळचा परिसर दूषित होत असतो. त्यामुळे परिसरामध्ये विविध आजारांची लागण होत असते.आणि अनेक कुटुंबे काही कालावधीसाठी गावे सोडून दुसरीकडे राहण्यास जातात हे निदर्शनास आणून देताना  हे टाळण्यासाठी हा उपक्रम किती उपयुक्त आहे हे ग्रामस्थांना पटवून दिले,पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढत गेली.ग्रामस्थांचा सहभाग वाढत गेला.  यवत गावात यशस्वी झालेल्या  या  प्रयोगाचे रिपोर्टींग शासनापर्यंत पोहचवले आणि शासनाने त्यासाठी पुढाकार घेत कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून दिला.
वारी मुक्कामाच्या प्रत्येक गावामध्ये राज्य सरकारतर्फे तात्पुरती आणि फिरती शौचालये उपलब्ध करून दिल्याने निर्मल वारी यशस्वी ठरत आहे. हजारो स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. प्रारंभी वारकऱ्यांचा    प्रातर्विधीसाठी पैसे मोजावे लागतात असा  समज होता,माऊली … माऊली करून त्यांना निशुल्क असल्याचे आणि सर्वांच्या  आरोग्यासाठी किती महत्वाचे याचे केलेले प्रबोधन आज यशस्वी ठरले आहे. अनेक संस्थांचा सहभाग वाढल्याने  स्वच्छतेसाठी आपुलकीची  ‘सक्ती’ हीच विठू भक्ती हा गजर खऱ्या अर्थाने प्रभावी ठरल्याचे बाळासाहेब अमराळे यांनी नमूद केले.
… स्वच्छतेसाठी कंत्राटदारांवर हवी सक्ती ! 
निर्मल वारी अभियानाला शासनाने गती देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने आता अनेक गावांमध्ये  तात्पुरती आणि फिरती शौचालये  उभारली जातात मात्र आता ठिकाणे निश्चित झाली आहेत. त्याठिकाणी चौथरा उभारून तसेच लगतची जागा सिमेंट क्रॉंक्रीटीकरण करून  शौचालये उभारणे आवश्यक आहे. वारी कालावधीत पाऊस असतो आणि चिखल मोठ्याप्रमाणावर होत असल्याने ;तसेच जागा समतल नसल्याने  शौचालये हलत असतात. त्यात आता टेंडरपद्धतीने स्वच्छतेचे कंत्राट दिले जाते मात्र ज्यावेळी  शौचालयांचा वापर होतो त्यावेळेची स्वच्छता महत्वाची असते. पाणी उपलब्ध आहे कि नाही, टँकर पोहचला कि नाही आणि मैला वेळेवर उचलला जातो कि नाही याकडे मात्र दुर्लक्ष संबंधित कंत्राटदाराकडून होत असल्याने नाहक वारकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो शिवाय या उपक्रमावर त्याचा विपरीत परिमाण होईल याची भीतीही आम्हा स्वयंसेवकांना असते. त्यामुळे स्वच्छतेसाठी दिरंगाई केल्यास कंत्राटदारावर दंडाच्या रूपाने कारवाई व्हावी अशी अपेक्षाही   बाळासाहेब अमराळे यांनी व्यक्त केली.

शहरात अत्याधुनिक मोबाईल टॉयलेटची संकल्पना अस्तित्वात आणा :आबा बागुल

0
पंचतारांकित स्वच्छतागृहे , मास्टर प्लॅन तयार 
पुणे- जागेअभावी स्वच्छतागृहे उभारता येत नाही आणि उभारली तर त्याची स्वच्छता राखता येत नाही असा कारभार एकीकडे  सुरु आहे तर दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरु असताना महिला वर्ग असो किंवा नागरिकांची स्वच्छतागृहांअभावी कुचंबणा होत आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी  आता शहरात सर्वत्र अत्याधुनिक मोबाईल टॉयलेटची संकल्पना राबवावी अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात  माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, सध्यस्थितीत स्वच्छतागृहांच्या अभावामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः महिलावर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. अनेक वर्षे हा प्रश्न सुटलेला नाही. जागेअभावी स्वच्छतागृहे उभारता येत नाही आणि उभारली तर त्याची स्वच्छता राखता येत नाही. त्यातही आधी बांधायचे नंतर कुणी हरकत घेतली तर तोडायचे असा कारभार स्वच्छतागृहांबाबत सुरु आहे. परिणामी हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. नागरिकांना विशेषतः महिलावर्गाना दिलासा देण्यासाठी  शहरात प्रत्येक शंभर अथवा दोनशे  मीटर अंतरावर पालिकेने अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट उभी करावीत.  विशेष म्हणजे मोबाईल टॉयलेटचा एक मास्टर प्लॅन मी  तयार करून घेतला आहे.  हे मोबाईल टॉयलेट कोणत्याही आस्थापनेला बाधा न आणता ,कोणतीही दुर्गंधी नसलेली आणि स्वच्छतेबाबत पंचतारांकित आहेत हा मास्टर प्लॅन पालिका प्रशासनाला सुपूर्त करण्याची तयारीही आहे. जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ भारतचा प्रत्यय मिळेल. असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक आरोग्य धोक्यात न येता ही मोबाईल टॉयलेट संकल्पना प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करून आबा बागुल म्हणाले, सध्या जी स्वच्छतागृहे आहेत,त्याचा वापर नको ,अशी वेळ नागरिकांवर अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे येत आहे. अत्याधुनिक आणि पंचतारांकित असलेल्या  मोबाईल टॉयलेटचा वापर सर्वसामान्य ते श्रीमंत वर्ग करतील अशी संकल्पना प्रत्यक्षात येणे सहजशक्य आहे. पालिकेने ही संकल्पना अंमलात आणली किंवा जरी बीओटीवर मोबाईल टॉयलेट उभारले तरी राज्य -केंद्र शासनाकडून पालिकेला अनुदान मिळवणे शक्य आहे. त्यामुळे या  अत्याधुनिक मोबाईल टॉयलेटसाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करून ते शहरात सर्वत्र उभारावेत त्यासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्या पुढाकार घेण्यासही  तयार आहेत याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.

वादग्रस्त समान पाणी पुरवठा योजनेविरोधात माजी उपमहापौर आबा बागुल यांच्याकडून जनहित याचिका दाखल

0
पुणे –चोवीस तास पाणी पुरवठा म्हणजे नेमके काय आहे ? धरणातील पाणीसाठ्याची  उपलब्धता कशी आहे याचा कोणताही विचार न करता तसेच जागा नसताना  टाक्या उभारून आणि जलवाहिन्या टाकून ही योजना होणार आहे का ? निविदांमधील दरांचे घोळ, मर्जीतील ठेकेदारांसाठीच  कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी , काम सुरु नसताना २०० कोटींचे कर्जरोखे ;पण व्याजापोटी पुणेकरांवर आतापर्यंत १८ कोटींचा ‘भार’ आदी विविध मुद्दे उपस्थित करून वादग्रस्त ठरलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतील अनागोंदीविरुद्ध पुणेकरांच्यावतीने माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.  
  याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, वादग्रस्त ठरलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतील अनियमितताअनेकवेळा चव्हाट्यावर आलेली आहे त्याबाबत वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. शहरातील नागरिकांना २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून देशात पहिल्यांदाच कर्जरोख्यांचे ‘सेलिब्रेशन ‘ करणाऱ्या महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात समान पाणी पुरवठ्यासाठी ५०० कोटींची तरतूद असतानाही २०० कोटी रुपये कर्जापोटी पालिकेच्या स्वतंत्र खात्यात जमा करून घेतले. प्रत्यक्षात या योजनेच्या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही. उलट पालिकेचा मोठा आर्थिक  तोटाच झाला आहे. योजना घाईगबडबडीत राबविण्यासाठी प्रशासनाने बनवाबनवीचा कारभार केला. आधी जादा दराची निविदा भरणारी कंपनी नंतर कमी दराची निविदा कशी काय भरते ?या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले. त्यातही  अमृत अभियानअंतर्गत जुलै २०१६ रोजी पाणीपुरवठा प्रकल्पाशी संबंधित मॅकेनिकल , इलेक्ट्रिकल, अटोमेशन आदी कामांसाठी स्वतंत्र निविदा काढण्याबाबत अध्यादेश / परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे  तसेच याबाबत उच्च न्यायालयानेही तसा निर्णय दिलेला असताना त्याकडे दुर्लक्ष करीत पालिका प्रशासनाने एकत्र निविदा प्रक्रिया राबवली  आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची ही  कृती बेकायदेशीर असून  संशयास्पद तर आहे शिवाय न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी आहे.पालिकेला   जाणीवपूर्वक  आर्थिक तोट्यात घालण्याची कृती तत्कालीन आयुक्तांनी केलेली आहे ,ठराविक कंत्राटदारासाठी हा अनागोंदी कारभार झालेला आहे. त्यामुळे या योजनेच्या  निविदा प्रक्रियेची चौकशी व्हावी यासाठी ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

अध्यात्मिक गुरु दादा वासवानी अनंतात विलीन

0

पुणे–प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांच्यावर शासकीय इतमामात आज (दि. 13) अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी 3 वाजता त्यांच्या अंतयात्रेला सुरुवात झाली होती. सायंकाळी 6.30 वाजता त्यांना मुखाग्नी देण्यात आला. सिंधी समाजाच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवरांनी अंतदर्शन घेतले.

दादा वासवानी यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात मानवतेच्या कल्याणच्या दृष्टीने काम केले. जागतिक शांततेसाठी सातत्याने प्रयत्न केले. प्राणीमात्रांवर प्रेम करा असा संदेश दिला. समाजाला आवश्यक असलेले रुग्णालय, शाळा, महाविद्यालय या व्यवस्थेची उभारणी केली. दादांनी शिकवलेले एखादे काम जरी आमच्याकडून पूर्ण झाले तर खऱ्या अर्थाने ती त्यांना श्रद्धांजली असेल, अशी भावना अनुयायांनी व्यक्त केली.

2 ऑगस्ट रोजी त्यांच्या वयाची शताब्दी पूर्ण होणार होती. 2 ऑगस्ट 1918 रोजी दादा वासवानी यांचा जन्म झाला. त्यांच्या शताब्दी निमित्त साधू वासवानी मिशनतर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, गुरुवारीच त्यांचे निधन झाल्याने अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अल्लाना कुटुंबीयांनी औदार्याचा आदर्श निर्माण केला : डॉ.पी. ए. इनामदार

0
फातिमा अल्लाना यांना पुण्यात सभेद्वारे आदरांजली
पुणे :शैक्षणिक, सामाजिक, अनाथालय संस्थांना उदार हस्ते मदत करुन अल्लाना कुटुंबीयांनी औदार्याचा आदर्श निर्माण केला, सामाजिक काम करताना मदतीचा हात मिळतो, याची खात्री अल्लाना कुटुंबीयांमुळे झाली. त्यांचा आदर्श घेऊन  ‘देणारे हात’ व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी केले.
मुंबईच्या मेमन समाजातील देणगीदार, अंजुमन खैरुल इस्लाम संस्थेच्या माजी अध्यक्ष्  , वर्ल्ड मेमन फाऊंडेशनच्या माजी विश्वस्त फातिमा अल्लाना यांचे अलिकडेच निधन झाले. त्यांना पुण्यात शोकसभेद्वारे आदरांजली वाहण्यात आली.
ही शोकसभा आझम कॅम्पस च्या असेंब्ली हॉलमध्ये झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ.पी. ए. इनामदार बोलत होते.
या शोकसभेत विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी मुन्वर पीरभाय,अबेदा इनामदार,  लतीफ मगदूम, अरिफ मेमन, झुबेर शेख, नाझिम शेख, डॉ. मुश्ताक मुकादम , एस.ए.इनामदार व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘आझम कॅम्पस, अंजुमन खैरुल इस्लाम,यतिमखाना अशा देशातील , देशाबाहेरील सामाजिक, शैक्षणिक कार्याला अल्लाना कुटुंबीयांनी  नेहमी मदत केली. सधन व्यावसायिक म्हणून त्यांनी समाजाचा आधार बनणे पसंत केले. देणग्या देताना त्यातून होणाऱ्या कामावर लक्ष ठेवले.आझम कॅम्पसमधील रंगूनवाला दंत महाविद्यालय, फार्मसी, आर्किटेक्चर , मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट च्या स्थापनेत त्यांनी उदार हस्ते मदत केली. संस्थांच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवले. फातिमा अल्लाना तसेच अल्लाना कुटुंबीयांचे ऋण आझम कॅम्पस कधीच विसरणार नाही.
लतीफ मगदूम, अरिफ मेमन,प्राचार्य आर. गणेसन, डॉ. किरण भिसे, प्राचार्य लीना देबनाथ आदींनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. मुश्ताक मुकादम यांनी सूत्रसंचालन केले

स्पाईसजेटचे सीएमडी अजय सिंह यांचा `यूएसआयएसपीएफ लीडरशिप` पुरस्काराने गौरव

अमेरिका-भारत दरम्यानचे व्यावसायिक संबंध विकसित करून अमेरिका आणि भारतातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात त्यांनी बजावलेल्या परिवर्तनशील भूमिकेचा सन्मान

गुरुग्राम – यू.एस.-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने (यूएसआयएसपीएफ) वॉशिंग्टन येथे झालेल्या आपल्या पहिल्या वार्षिक लीडरशिप समिटमध्ये १२ जुलै रोजी स्पाईसजेटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अजय सिंह यांना `यूएसआयएसपीएफ लीडरशिप पुरस्कार` देऊन गौरव केला. अमेरिका आणि भारतादरम्यानचे व्यावसायत वृद्धी तसेच सहकार्य वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच परिवर्तनशील नेतृत्त्व आणि लोकसेवेतील त्यांच्या लक्षणीय योगदानाबद्दल फोरमने त्यांचा हा गौरव केला.

कॅटरपिलर इनकॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. जिम उमप्लेबी III यांचा देखील लीडरशिप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अमेरिका-भारत दरम्यानचे व्यावसायिक संबंध दृढ करून अमेरिका आणि भारतातील नागरिकांचे जीवनमान प्रगतीशील करण्यात त्यांनी बजावलेल्या परिवर्तनशील भूमिकेबद्दल या दोघांचा गौरव करण्यात आला.

अमेरिका आणि भारतादरम्यानची धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने वॉशिंग्टन येथे वार्षिक लीडरशिप समिट आयोजित करण्यात आले होते. `धोरणात्मक भागीदाराचे बळकटीकरण` (स्ट्रेन्थनिंग दी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) ही या वर्षीच्या समिटचे विषयसूत्र होते.

`हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आले आहे. स्पाईसजेट हा यूएसआयएसपीएफचा प्रवास आणि दृष्टीकोनाचा हिस्सा बनला आहे. आपल्या अथक मेहनतीने मरणासन्न कंपनीला नवसंजीवनी देऊन अवघ्या तीन वर्षांत जगभराच्या प्रशंसेला प्राप्त ठरणारी कंपनी बनविणाऱ्या स्पाईसजेटशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा ही सन्मान आहे. स्पाईसजेटचे हे यश भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या मजबूत आणि वृद्धींगत होणाऱ्या संबंधांचे प्रतीक आहे. ही तर फक्त सुरुवातच आहे; नजीकच्या काळात एकत्रितपणे उंच भरारी घेण्याकडे आमचे उद्दीष्ट आहे,` असे स्पाईसजेटचे सीएमडी अजय सिंग म्हणाले.

श्री. सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली स्पाईसजेटने बोईंगकडे अरुंद (नॅरो) आणि रुंद (वाईड) आकाराची विमाने बनविण्याची ऑर्डर दिली असून बोईंगच्या इतिहासातील नव्या विमानांची ही सर्वात मोठी मागणी आहे. या विमानांती ऑर्डर देऊन अमेरिकेत हजारोंसाठी रोजगार उपलब्ध केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी स्पाईसजेटची प्रशंसा केली आहे. स्पाईसजेटने दिलेल्या ऑर्डरमध्ये ५० बॉम्बर्डिअर क्यू४०० विमानांचा समावेश असून बॉम्बर्डिअरच्या इतिहासात क्यू४००साठी आलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.

भारत सरकारचे अधिकारी, अमेरिका आणि भारतातील प्रमुख उद्योगपती आणि अमेरिकेतील सरकारी अधिकारी यानिमित्ताने एकत्र येऊन त्यांनी गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली.

सुमारे ३०० ज्येष्ठ उद्योगपती आणि गुंतवणूकदार या समिटला उपस्थित होते. वॉलमार्ट, डाऊ, बोईंग इंटरनॅशनल, अॅबॉट, अॅम्वे आणि बँक ऑफ अमेरिका या कंपन्यांसह अमेरिका आणि भारताच्या उद्योग क्षेत्र तसेच सरकारचे प्रमुख प्रतिनिधी सहभागी होऊन अमेरिका आणि भारत या दोन देशांदरम्यानची भागीदारी किती महत्त्वपूर्ण आहे, याबद्दल आपली मते मांडली. शिवाय, तसेच लोकशाही, सुरक्षेबरोबरच रोजगारनिर्मिती, नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उद्योग आणि सरकारमध्ये शाश्वतता निर्माण करून आर्थिक विकासाला गती देण्याबाबत त्यांनी चर्चा केली.

या समिटला भारताकडून अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरना, नीति आयोगाचे व्हाईस-चेअरमन राजीव कुमार तर, अमेरिकेकडून सिनेटर रॉब पोर्टमॅन (R-OH); यूएसडीएचे व्यापार आणि परराष्ट्र कृषीव्यवहारविषयक अंडर सेक्रेटरी टेड मॅककिने; डेप्युटी यूएस ट्रेड प्रतिनिधी जेफ्री गेरिश आणि सिनेट इंडिया कॉकसचे सहअध्यक्ष सिनेटर मार्क वॉर्नेर (D-VA) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यूएसआयएसपीएफचे चेअरमन तसेच सिस्कोचे माजी कार्यकारी चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व जेसी२ व्हेन्चर्सचे संस्थापक जॉन चेम्बर्स यांच्याबरोबर माजी परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांची रंगलेली चर्चा ही यावर्षीच्या समिटचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

भारताने साधलेल्या अभूतपूर्व जागतिक आर्थिक प्रगतीचा मागोवा समिटमध्ये घेण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने विकास करीत असून ग्राहक अर्थव्यवस्थेत लवकरच तिसरे स्थान प्राप्त करीत असून व्यापार, तंत्रज्ञान आणि नाविन्यता याबाबतीत अमेरिका भारताशी संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे. संघटना स्थापन झाल्याच्या पहिल्या वर्षातच अमेरिका आणि भारतातील प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यूएसआयएसपीएफ हे उभय देशांमधील भागीदारी आणखी वृद्धींगत करण्याचे एक माध्यम बनली आहे.

स्पाईसजेट लि.बद्दल माहिती –

स्पाईसजेट ही भारताची सर्वाधिक पसंतीची एअरलाइन असून कंपनीने आधी कधीही नव्हे, इतक्या वाजवी किमतीत अधिकाधिक भारतीयांना हवाई सफर घडवत आहे. स्पाईसजेटकडून दिवसाला ५५ ठिकाणी जाणाऱ्या सरासरी ४१२ विमानसेवा सुरू असून त्यात ४८ राष्ट्रीय आणि ७ आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे. या एअरलाइनच्या ताफ्यात ३६ बोईंग ७३७एजी आणि २२ बॉम्बार्डिअर क्यू-४०० विमाने आहेत. बहुतांश विमानांमध्ये `स्पाइसमॅक्स` उपलब्ध करण्यात आले असून भारतातील इकॉनॉमी क्लासमधील आसनव्यवस्थेतील ही सर्वात प्रशस्त व्यवस्था आहे.

देशातील सर्वात पसंतीची एअरलाइन असलेल्या स्पाईसजेटचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. त्यात `बीएमएल मुंजल अॅवॉर्ड २०१८`चा समावेश असून `बिझनेसे एक्सलेन्स थ्रू लर्निंग अॅण्ड डेव्हलपमेन्ट`साठी हा सन्मान देण्यात आला. विंग्ज इंडिया २०१८मध्ये `उत्कृष्ट राष्ट्रीय एअरलाइन` पुरस्कार तर अर्नस्ट अॅण्ड यंगकडून परवर्तनशील व्यावसायाबद्दल `२०१७ वर्षातील उद्योजक` पुरस्काराने स्पाईसजेटला गौरविण्यात आले. याशिवाय, २०१६ या आर्थिक वर्षात वेगवान विकास साधल्याबद्दल सीएपीए चेअरमनच्या ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये समावेश, सिंगापूर येथे झालेल्या एशियावन अॅवॉर्ड सोहळ्यात `आशियातील सर्वोत्कृष्ट ब्रॅण्ड २०१६`, `ग्लोबल एशियन ऑफ दी ईयर अॅवॉर्ड` आणि `एशियाज् ग्रेटेस्ट सीएफओ २०१६` या पुरस्कारांनी स्पाईसजेटला सन्मानित करण्यात आले. डब्ल्यूटीएम लंडनमध्ये `वर्ल्ड ट्रॅव्हल लीडर्स अॅवॉर्ड`, लास वेगासमध्ये प्युचर ट्रॅव्हल एक्सपिरिएन्स या जागतिक पुरस्कार सोहळ्यात `बेस्ट चेक-इन इनिशिएटिव्ह` पुरस्कार आणि अॅसोचेमच्या १०व्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात (नागरी हवाईसेवा आणि पर्यटन) `उत्कृष्ट राष्ट्रीय एअरलाइन` पुरस्काराने गौरविण्यात आले.

यूएस – इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमबद्दल माहिती –

अमेरिका आणि भारतादरम्यान अतिशय मजबूत अशी धोरणात्मक भागीदारी तयार करण्याच्या दृष्टीने यूएस – इंडिया स्टॅटेजिक पार्टनरशिप फोरम वचनबद्ध आहे. यामध्ये उभय देशांमधील व्यापाराला प्रोत्साहन देणे हा प्रमुख भाग असला तरी, याच्या पलीकडे जाऊन उभय देशांमधील अधिक संबंध दृढ करण्याचे आमचे लक्ष्य आहे. नव्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध करण्यासाठी व्यवसाय आणि सरकार हे एकत्र आल्यास नागरिकांचे राहणीमान उंचावेल, असा आमचा प्रयत्न आहे.

वॉशिंग्टन येथे मुख्यालय असलेल्या यूएसआयएसपीएफची न्यूयॉर्क, सिलिकॉन व्हॅली, मुंबई आणि नवी दिल्लीत कार्यालये आहेत.

शिवसेनेने पालिकेच्या वार्ड ऑफिस मध्ये फेकला कचरा

0

पुणे-कचऱ्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांची व्यथा मांडण्यासाठी आज टिळक रोड क्षेत्रीय  कार्यालयात व सर्व कार्यालयात आवारात कचरा फेकून शिवसेनेने संताप व्यक्त केला. शिवसेना विभाग प्रमुख सूरज लोखंडे यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन करण्यात आले .कचऱ्याचा प्रश्न सोडवा अन्यथा शिवसेना रोज येथे कचरा टाकून आपले कर्तव्य काय आहे याची जाणीव करून देईल असे लोखंडे यांनी म्हटले आहे .