पुणे-कचऱ्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांची व्यथा मांडण्यासाठी आज टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयात व सर्व कार्यालयात आवारात कचरा फेकून शिवसेनेने संताप व्यक्त केला. शिवसेना विभाग प्रमुख सूरज लोखंडे यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन करण्यात आले .कचऱ्याचा प्रश्न सोडवा अन्यथा शिवसेना रोज येथे कचरा टाकून आपले कर्तव्य काय आहे याची जाणीव करून देईल असे लोखंडे यांनी म्हटले आहे .