अल्लाना कुटुंबीयांनी औदार्याचा आदर्श निर्माण केला : डॉ.पी. ए. इनामदार
फातिमा अल्लाना यांना पुण्यात सभेद्वारे आदरांजली
पुणे :शैक्षणिक, सामाजिक, अनाथालय संस्थांना उदार हस्ते मदत करुन अल्लाना कुटुंबीयांनी औदार्याचा आदर्श निर्माण केला, सामाजिक काम करताना मदतीचा हात मिळतो, याची खात्री अल्लाना कुटुंबीयांमुळे झाली. त्यांचा आदर्श घेऊन ‘देणारे हात’ व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी केले.
मुंबईच्या मेमन समाजातील देणगीदार, अंजुमन खैरुल इस्लाम संस्थेच्या माजी अध्यक्ष् , वर्ल्ड मेमन फाऊंडेशनच्या माजी विश्वस्त फातिमा अल्लाना यांचे अलिकडेच निधन झाले. त्यांना पुण्यात शोकसभेद्वारे आदरांजली वाहण्यात आली.
ही शोकसभा आझम कॅम्पस च्या असेंब्ली हॉलमध्ये झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ.पी. ए. इनामदार बोलत होते.
या शोकसभेत विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी मुन्वर पीरभाय,अबेदा इनामदार, लतीफ मगदूम, अरिफ मेमन, झुबेर शेख, नाझिम शेख, डॉ. मुश्ताक मुकादम , एस.ए.इनामदार व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘आझम कॅम्पस, अंजुमन खैरुल इस्लाम,यतिमखाना अशा देशातील , देशाबाहेरील सामाजिक, शैक्षणिक कार्याला अल्लाना कुटुंबीयांनी नेहमी मदत केली. सधन व्यावसायिक म्हणून त्यांनी समाजाचा आधार बनणे पसंत केले. देणग्या देताना त्यातून होणाऱ्या कामावर लक्ष ठेवले.आझम कॅम्पसमधील रंगूनवाला दंत महाविद्यालय, फार्मसी, आर्किटेक्चर , मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट च्या स्थापनेत त्यांनी उदार हस्ते मदत केली. संस्थांच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवले. फातिमा अल्लाना तसेच अल्लाना कुटुंबीयांचे ऋण आझम कॅम्पस कधीच विसरणार नाही.
लतीफ मगदूम, अरिफ मेमन,प्राचार्य आर. गणेसन, डॉ. किरण भिसे, प्राचार्य लीना देबनाथ आदींनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. मुश्ताक मुकादम यांनी सूत्रसंचालन केले