ज्वेलर्सचे दुकान फोडुन साडेसात लाख रूपये किंमतीचे चांदीच्या दागिण्यांची चोरी
ओतुर – दि.१५
ओतुरमधील भरवस्तीत असणारे लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानचे शटर अज्ञात चोरट्याने उचकटुन आत प्रवेश करुन काऊंटरमधे ठेवलेल्या डब्यातील सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरीस गेल्याची घटना शनिवारी (दि.१४) च्या रात्री घटली असल्याची माहीती ओतुर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार के. एम. पाटोळे यांनी दिली.
या बाबत मनिषा दादासाहेब सुळे(रा.होळीचौक,महात्मा गांधी रोड,ओतुर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन यात त्यांनी म्हटले आहे कि,शुक्रवारी (दि.-१३) सायंकाळी ७:३० वा.दुकान बंद करून घरी गेले व ( दि.१४) शनिवारी दुकान बंद ठेवत असल्याने दुकान उघडले नाही रविवारी (दि.१५)रोजी सकाळी ६ वाजता शेजारच्या महीलेने सांगितले कि तुमचे दुकानाचे शटर उघडे आहे यावरुन जाऊन पाहिले असता कोणातरी अनोळखी चोरट्यांने त्यांचे लक्ष्मी ज्वेलर्स या नावाचे दुकानाचे शटर ऊचकटुन आत प्रवेश करून काऊन्टरचे ड्राॕवर मध्ये ठेवलेल्या डब्यातील अंदाजे २५ किलो वजनाचे चांदीचे दागीने त्यामध्ये पायातील पैंजण, जोडवी,ताट,छल्ले, गणपती मुर्ती, तांबे,पेले,वाट्या, असे अंदाजे ७,५०,०००/- रूपये किमतीचे व वर्णनाचे दागीने चोरीस गेले आहेत..दरम्यान जवळीलच सोनु निकम यांच्या दुर्गा ज्वेलर्स मधे देखील चोरी झाल्याचे समजते.
पोलिसांनी भा.द.वि.कलम ४५७ व ३८० अन्वये गुन्हा नोंदविला असुन अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरज बनसोडे करित आहेत.घटणास्थळी जुन्नरच्या उपविभागिय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांनी भेट दिली.असुन फिंगर प्रिंट पथकास देखील पाचारण करण्यात आले होते.
या चोरीच्या घटनेमुळे ओतुर परिसरात व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.