Home Blog Page 3092

पुण्यातील तरुणांच्‍या जीवनात प्रकाश आणणारा ‘लाईट हाऊस प्रकल्प’

भारत हा तरुणांचा देश म्‍हणून ओळखला जातो. या तरुणांच्‍या शक्‍तीचा देशविकासात उपयोग करुन घेण्‍यासाठी विविध योजनांचा अवलंब केला जात आहे. महाराष्‍ट्र पुरोगामी विचाराचे राज्‍य असून येथे युवाशक्‍तीचा सकारात्‍मक वापर करुन घेण्‍यासाठी नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

पुणे हे राज्‍याची शैक्षणिक राजधानी म्‍हणून ओळखले जाते. अत्‍यंत वेगाने वाढणा-या पुणे शहरात तरुणांची संख्‍याही वेगाने वाढत आहे. आजच्‍या तरुण पिढीला आपली स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी विविध मार्ग उपलब्‍ध असली तरी नेमक्‍या कोणत्‍या मार्गांचा वापर करावयाचा, याबाबत त्‍यांच्‍या मनात संभ्रम असतो. ज्‍यांची आर्थिक परिस्थिती उत्‍तम असते, ते आपल्‍या सोयीनुसार स्‍वत:च्‍या पायावर उभे राहू शकतात. मात्र, ज्‍यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती अनुकूल नसते, अशा वस्‍ती पातळीवरील तरुणांसाठी पुणे महानगर पालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत “लाइट हाउस- कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र” हा प्रकल्‍प वरदान ठरत आहे.

पुण्यातील वस्तीपातळीवरील तरुण आणि तरुणींसाठी स्वतःची करिअर विषयक स्वप्‍ने प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यातून उपजीविकेचे साधन मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास पूर्ण मदत करण्याच्या हेतूने जून 2016 हा प्रकल्‍प सुरु झाला. औंध, येरवडा आणि हडपसर येथे 3 लाइट हाऊस केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. लॅपटॉप, व्हिडीओ वॉल यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, प्रत्येक विद्यार्थ्यास करिअरची वाट शोधण्यासाठी वैयक्तिक लक्ष तसेच विद्यार्थी आणि त्याच्‍या कुटुंबाला महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती करून घेण्याची संधी हे या प्रकल्पाचे वैशिष्‍ट्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवडता कौशल्य विकास कार्यक्रम येथे विनामूल्य करता येतो.

प्रकल्‍पाच्‍या अमृता बहुलेकर म्‍हणाल्‍या, वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला विद्यार्थी जेव्‍हा लाइट हाऊस मध्ये पहिल्यांदा येतो तेव्‍हा कोणताही कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी, 80 तासाच्या (अंदाजे 20 दिवसांच्या ) फाउंडेशन कोर्सने या प्रवासाची सुरुवात होते. स्वतःमधील क्षमता, बुद्धिमत्ता आणि कौशल्य परत एकदा शोधायची संधी यातून मिळते. विविध खेळ आणि सर्जनशील उपक्रमातून संभाषण कौशल्य, नेमकेपणाने आपले मत मांडणे, गटामध्ये सगळ्यांसोबत काम करणे, नेतृत्व कौशल्य आजमावणे याची संधी मुलांना मिळते. स्वतःचा शोध घेतानाच आजच्‍या काळात कोणत्या प्रकारच्या कामाला जास्त वाव आहे, हे देखील ही मुले प्रत्यक्ष प्रकल्पामधून स्वतः शिकतात. कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांवर देखील फाउंडेशन कोर्स मध्ये काम केले जाते.

पुणे सिटी कनेक्‍टच्‍या ऋची माथूर यांनी ‘लाइट हाऊस’ ही एक  ‘सुरक्षित जागा’ असून या सगळ्या गोष्टी करताना एक मोकळेपणा येत असल्‍याचे सांगितले. आपापसात विश्वास निर्माण होण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होते. इथे आलेली व्यक्ती, कोणताही भेदभाव न करता, ‘माणूस’ म्हणून तिच्या भल्या-बुऱ्या गुणांसकट  स्वीकारली जाते. योग्य संधी आणि साथ मिळाली तर प्रत्येक व्यक्तीमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे, यावर आमचा विश्वास आहे आणि यावरच हे केंद्र उभारलेले आहे, असे त्‍या अभिमानाने सांगतात.

फाउंडेशन कोर्स पूर्ण केलेल्या तरुण वर्गाची आवड, क्षमता आणि गुणवत्ता, व्यक्तिमत्व याविषयी अधिक माहिती देणारी करिअर टेस्ट घेतली जाते. या चाचणीचा निकाल, तरुणाचे मत, आणि भोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचे आणि पालकांचे समुपदेशन केले जाते. मग विद्यार्थी पूर्ण विचार करून कौशल्य विकास कार्यक्रमाची निवड स्वतः करतात. याबाबत त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन, त्यांनी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन घेतलेला निर्णय अंतिम असतो. या केंद्राद्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास कार्यक्रम चालू आहेत. उदा. टॅली, कॉम्पुटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी आणि हेल्थ, जिम इंस्ट्रक्‍टर, नर्सिंग सहायक, कुकिंग, ग्राफिक डिझाइन, सॉफ्टवेअर लँग्वेजेस हे व इतर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. याच सोबत संगणक साक्षरतेचे शिक्षणही  सर्वांना दिले जात असल्‍याचे  गणेश नटराजन यांनी सांगितले.

लाइट हाऊस प्रकल्प इतर कौशल्य विकास कार्यक्रमांपासून वेगळा आहे कारण, कोणत्याही टप्प्यावर शिक्षण थांबवणारी कोणतीही अडचण आल्यास लाइट हाऊसची पूर्ण टीम त्या मुलीमागे/मुलांमागे उभी असते आणि निवडलेला कोर्स पूर्ण होईल याची आपलेपणाने खबरदारी घेतली जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर मुलांना काम शोधण्यासाठीच नव्हे तर कामावरचे मुखत्वे पहिले 3 महिने पूर्ण होईपर्यंत त्यांना मदत आणि मार्गदर्शन केले जाते. अर्थात लाइट हाऊसमध्ये एकदा आलेली व्यक्ती या परिवाराचा कायमस्वरूपी सदस्य बनते.

पुणे महापालिका क्षेत्रात चालू असलेल्‍या 4 केंद्रांमध्ये एकत्रितपणे 4 हजारांहून अधिक तरुण वर्ग सहभागी झालेला आहे. यापैकी 2 हजार 400 हून अधिक तरुणांनी  कौशल्य विकास कार्यक्रम निवडून, ते कौशल्य शिकण्यास सुरुवात केलेली आहे. उर्वरित विद्यार्थी फाउंडेशन कोर्सशी निगडित या प्रवासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. 816  मुले टेक महिंद्रा, मेट्रो ग्लोबल, इन्फोसिस, न्यांसा अशा संस्थांमध्ये कार्यरत आहेत आणि काही स्वतःचा व्यवसाय  यशस्वीपणे  चालवत आहेत.

     वंदना पगार यांनी लाईट हाऊसमध्‍ये प्रशिक्षण घेतले. सध्‍या त्यांनी स्वतःचा मसाला बनवण्याचा व्यवसाय सुरु केला असून  परदेशातही मसाले पाठवत आहेत.  ‘लाइट हाऊस’मुळे आशेचा नवीन किरण सापडल्याचे त्‍या सांगतात.  लाईट हाऊसच्या मदतीने त्‍या स्वतःचे स्नॅक सेंटरही सुरु करणार आहेत.

‘इन्फोसिस’मध्ये काम करणारा अल्ताफ सय्यद म्हणतो, लाइट हाऊसमध्ये येऊन मी माझे संभाषण कौशल्य सुधारले. इंदिरा वसाहत, औंध ते इन्फोसिस हा प्रवास माझ्यासाठी अनेक नव्या शक्यता निर्माण करणारा आहे. वस्तीतील प्रत्येक तरुणाला या पर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असा निर्धार त्याने व्‍यकत केला.

लाइट हाऊसमध्ये आलेल्या तरुण-तरुणींच्‍या माध्यमातून वस्त्यांचे परिवर्तन होण्यासाठी अथक प्रयत्न चालू आहेत. पुण्यातील प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये लाइट हाऊसची स्थापना करून पुण्यातील वस्ती पातळीवरील तरुण  पिढीचे आर्थिक, सामाजिक परिवर्तन करण्याचा प्रयत्‍न करण्‍यात येत असल्‍याचे महापालिकेचे आयुक्‍त सौरभ राव यांनी सांगितले. लाईट हाऊसच्‍या निमित्ताने सरकारी यंत्रणा, विविध कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि जागरुक  नागरिक या साऱ्यांना एकत्रितपणे सकारात्मक बदलासाठी काम करण्याची संधी निर्माण झाली आहे.

    सध्या लाइट हाऊस पुण्यातील 4 ठिकाणी चालू आहे. लाइट हाऊसमध्ये कोर्सेस विनामूल्य शिकवले जातात. इच्छुकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन नोडल ऑफीसर गणेश सोनुने यांनी केले आहे.   लाइट हाऊस – औंध – जुने औंध वॉर्ड ऑफिस, ब्रेमेन चौक, औंध. (संपर्क – अश्विनी – ७२१८१६६६०५), लाइट हाऊस – येरवडा- क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे  ई – लर्निंग स्कूल, अण्णाभाऊ साठे सभागृहामागे, गुंजन टॉकीज शेजारी, येरवडा. (संपर्क- श्रुती – ९८३४५५५७३०), लाइट हाऊस – हडपसर – हडपसर  पी.एम.टी. बिल्डिंग, तिसरा मजला, हडपसर (संपर्क- विजय -९९७५७८७९४१),लाइट हाऊस –  वारजे – तिरुपती नगरशेजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वारजे नाका (संपर्क- विद्या – ९४०३१४८७९२)

सरकारी यंत्रणा, विविध कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि जागरुक  नागरिक  या सर्वांच्‍या सहकार्याने  हे ‘लाईट हाऊस’ अधिकाधिक तरुणांच्‍या जीवनात प्रकाश आणो, हीच सदिच्‍छा.

-राजेंद्र सरग

मृत्यू हा शाप नव्हे-वरदान आहे – मुनिश्री पुलकसागर महाराज

0

पुणे-“मृत्यु हे जगण्याचे प्रमाणपत्र आहे. जीवन कसे जगला आहात हे जर समजायचे असेल तर मृत्युवरून समजते की माणसाने कसे आयुष्य जगले असेल. जगात मृत्यु नसेल तर काय झाले असते? ही वृद्धावस्त, होणारा त्रास किती वेळा पर्यंत सहण करत बसले असते. मृत्यू हा शाप नाही तर वरदान आहे. जर मृत्यु आयुष्यात नसेल तर हे आयुष्य निरर्थक आहे. मृत्यु अटळ आहे, जो या जगात आला आहे तो एक ना एक दिवस जाणार आहे. राजा असो, गुरू असो, चेला असो की अजून कोणी असो त्याला या जगातून एक ना एक दिवस जावच लागणार आहे, हे लक्षात घेऊन मृत्यू बद्दलचे भय काढून टाका. मृत्यू नंतर सगळेजण हळहळले पाहिजेत, असे चांगले कार्य जीवंत असताना करा.” असा संदेश मुनिश्री पुलकसागर महाराज यांनी दिला.

सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे सुरू आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे तेरावे पुष्प गुंफतांना ‘यमराज की चिट्टी’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, संजीव नाईक, सुदिन खोत, सुरेंद्र गांधी आदी मंचावर उपस्थित होते. तसेच पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, उदयपूरचे फादर राणा आणि माजी नगरसेवक श्याम मानकर यांनी याप्रसंगी उपस्थित राहुन मुनिश्रींच्या प्रवचनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरवातीस राजीव शहा यांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. पादप्रक्षालण पुलकसखी ग्रुपच्या महिलांनी केले. मार्केटयार्ड येथील वैष्णवी भूषण शहा ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले. मुनिश्रींच्या प्रवचनाचे थेट प्रक्षेपण जिनवाणी वाहिणीवरून केले जाते.

मुनिश्रीं प्रवचनात पुढे म्हणाले, समजा तुम्ही अमर झालात तर कसे जगणार, मृत्युची वाट तर पाहाल ना. मृत्यु या पृथ्वी तलावावर नसता तर किती दिवस वृद्धपकाळ, आजार घेऊन फिरला असतात. हा वृद्धपकाळ हा तुम्हाला ओझं बनला असता. जर मृत्यु नसता तर दुःखापासून तुमची मुक्ती पण झाली नसती. मृत्यु वाईट गोष्ट नाही तर चांगली गोष्ट आहे. ज्या प्रकारे मोबाईलची बॉडी खराब झाली तर आपण मोबाईल फेकून न देता त्याची नवीन बॉडी टाकून घेतो. त्याप्रमाणे मृत्यु देखील हेच काम करत असतो. जून्या बॉडीला सोडून नव्या बॉडीला अंगी कारत असतो. त्यामुळे मृत्यु ही चांगली गोष्ट आहे. जीवनात पद मिळो ना मिळो, धन मिळो ना मिळो, मोठे बनून मोठे व्यक्ती बनो ना बनो, जगात काही मिळो ना मिळो पण मात्र मृत्यु जरून येणार आहे. याची जाणीव मनी बाळगावी असे मुनिश्री यांनी सांगितले.

माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे  यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून आशिर्वाद घेतले. याप्रसंगी ते म्हणाले, मुनिश्रींचे दर्शन घेऊन मी खूप प्रसन्न झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या या भूमित मी मुनिश्री पुलकसागर महाराजांचे मनापासून स्वागत करतो. पुढच्या महिन्यात गणेश उत्सव आहे पुण्याचेच नव्हे तर सार्‍या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणार्‍या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे आपण आवर्जून यावे अशी आग्रहाची विनंती त्यांनी मुनिश्रींना केली.

उदयपूरवरून आलेले फादर राणा याप्रसंगी म्हणाले, मी दुसर्‍यांदा पुणे येथे आलो आहे. मुनिश्रींना ऐकणे मी माझे भाग्य समजतो. पुलकसागरजी या युगाचे क्रांती पुरूष आहेत. मी जगात सगळीकडे प्रवचन देत असतो. आज पर्यंत मी 500 प्रवचन दिले आहेत. परंतु आज मला मुनिश्रींना ऐकण्याची संधी मिळाली, ही बाब माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे असे मी मानतो असे ते म्हणाले.

आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अजित पाटील यांनी केले.

फर्ग्युसन कॉलेजमधील सत्यनारायण पूजेविरोधात निदर्शने

0

पुणे-केवळ एकाच धर्माचे उदात्तीकरण करण्यासाठी सत्यनारायण पूजा केली जात असेल तर त्याचा निषेध करीत फर्ग्युसन महाविद्यालयाने केलेल्या सत्यनारायण पूजेला विद्यार्थी संघटनेने विरोध केला आहे. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने करीत प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी केली. 

दरवर्षी प्रमाणे फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. यंदा देखील महाविद्यालयाच्या मुख्य कार्यालयात सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होते. पूजेचे जाहीर निमंत्रण देण्यात आले होते. मात्र केवळ एकाच धर्माच्या धार्मिक कार्यक्रमाला प्राधान्य का दिले जाते, असा सवाल करीत काही विद्यार्थी संघटनांनी या सत्यनारायण पूजेला जोरदार विरोध केला. प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी करीत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत निदर्शने केली.

अनधिकृत बांधकाम हा आजामिनपात्र गुन्हा ;3 वर्षाची शिक्षा -पीएमआरडीएच्या कार्यशाळेतून नागरी प्रबोधन

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम
प्रतिबंध, नियंत्रण, निष्कासन व प्रधानमंत्री आवास योजना, बांधकाम परवानगी विभागाच्यावतीने
आयोजित कार्यशाळेत रीतसर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई
जनजागृती व आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्याद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरे बांधण्यास
अनुदान (बीएलसी) स्वरूपातील सर्वेक्षण व माहिती उपस्थित मावळ ग्रामस्थांना आयोजित
कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आली.
सदर कार्यशाळा मावळ येथील भेगडे लॉन्स सभागृहात दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता
महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पीएमआरडीएचे
पोलीस अधीक्षक सारंग आवाड, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, अपर जिल्हाधिकारी
मिलिंद पाठक, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, मावळचे
तहसीलदार रणजित देसाई, पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम,
भाजप तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,
ग्रामसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रादेशिक
नगररचना अधिनियम १९६६ मधील कलमे व तरतूद तसेच कारवाईचे स्वरूप व अधिकार
याविषयी सांगितले. तसेच अनधिकृत बांधकामात समाविष्ट सर्वजणांवर कारवाई करून काळ्या
यादीत टाकण्याची कार्यवाही पीएमआरडीएच्यावतीने केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच
अजामीनपात्र गुन्हा दाखल करून ३ वर्षाच्या कारावासाची शिक्षा देखील या कायद्यान्वये आहे.
अनधिकृत बांधकामांची माहिती वेळेत न दिल्यास तालुकानिहाय ग्रामसेवक, पोलीस पाटील व
कोतवाल यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणी नागरिकांची होत
असललेली फसवणूकीपासून नागरिकांनी सावध राहावे. अनधिकृत बांधकामधारकांना निष्कासनपूर्वी
देण्यात आलेल्या नोटीसाना नागरिकांनी 24 तासात उत्तर देणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकाम
थांबविण्यासाठी ग्रामसेवकांनी तत्परता दाखवावी. बांधकाम नियमनाकुल असल्यास तत्काळ
परवानगी घ्यावी. स्वस्तातील बांधकामांच्या खोट्या जाहिराती व भूलथापांना नागरिकांनी बळी पडू
नये.

महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी यांनी बांधकाम परवानगी नियमित
करण्यासाठी ०७/१०/२०१७च्या शासन निर्णयनुसार दंड भरून ते नियमित करण्यासाठी कोणकोणत्या
प्रक्रिया आहेत हे सांगितले. बांधकामाची सध्य स्थिती, परवानगी व झोन पाहूनच नागरिकांनी
पुढील कार्यवाही करावी. अन्यथा विना परवानगी सुरु असलेल्या बांधकामांना दंड आकारून
कायदेशीर कारवाई केली जाईल. ऑनलाईन बांधकाम परवानगी घेण्याचे आवाहन त्यांनी
नागरिकांना केले.
उपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामाविषयी
माहिती दिली. प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ मधील कलमे व तरतूद, महाराष्ट्र जमीन
महसूल संहितेतील महत्वाच्या तरतूदी तसेच ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतूदी व
त्यावर होणारी कार्यवाही ग्रामस्थांना समजावून सांगितली. तसेच अनधिकृत बांधकामधारकाला
आकारण्यात येणार दंड हा संबधित मालकाकडून वसूल करण्यात येतो ही माहिती देखील
ग्रामस्थांना देण्यात आली. प्रादेशिक योजनेचे गावनिहाय नकाशे ग्रामस्थांना देण्यात येणार असल्याचे
सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना ही आर्थिक दुर्बल घटकांसाठी फायदेशीर व परवडणारी व
बांधकामासाठी अनुदान कशा स्वरुपात दिले जाणार आहेत त्याचे टप्पे काय असतील हे सांगण्यात
आले. यानंतर प्रश्नोत्तरांचा तासामध्ये मावळ ग्रामस्थांनी बांधकाम परवानगी, रस्ते व अनधिकृत
बांधकाम याविषयी प्रश्न उपस्थित करून शंकाचे निरसन केले.

जिल्ह्यात तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी ओतुरमध्ये पहिल्यांदा मतदान प्रक्रिया -तान्हाजी तांबे तिसऱ्यांदा तंटामुक्ती अध्यक्ष

0
ओतुर(संजोक काळदंते)  -येथील १५ ऑगष्टची ग्रामसभा शुक्रवारी  (दि.२४)खासदार शिवाजीदादा आढळरावपाटील सभागृह ग्रामपंचायत ओतुर येथे संपन्न झाली यावेळी इतर विषयासोबत महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समिती अध्यक्षपदाकरिता निवडणुक घेण्यात आली.विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात कुठेही या अध्यक्षपदाकरिता निवडणुक झाली नव्हती.
या ग्रामसभेमध्ये कचरा नियोजन व गावच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे विषय झाले यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवड. या पदाकरिता गावातील प्रतिष्ठित नागरिक तान्हाजी तांबे,प्रकाश डुंबरे,विठ्ठल डुंबरे, मयूर ढोबळे,मिनाक्षी लाहोरकर, पंढरीनाथ पानसरे अशा सहा जणांनी अध्यक्षपदाकरीता ईच्छा व्यक्त केली परंतु कोणाच्याही नावावर एक मत न झाल्याने ओतुर गावचे सरपंच बाळासाहेब घुले तसेच ग्रामविकास अधिकारी सतिश गवारी यांनी ग्रामसभेपुढे निवडणूक प्रक्रियेचा विषय ठेवला असता तो सर्वानुमते मान्य करण्यात आला व सहाही जणांमध्ये मतदान घ्यायचे ठरले यानुसार मतदान पत्रिका तयार करून उपस्थित ग्रामस्थांमधुन शांततेच्या मार्गाने मतदान घेण्यात आले.
एकूण १९९ जणांनी मतदान केले यात तान्हाजी विठ्ठल तांबे यांना ९८ मते, प्रकाश डुंबरे यांना ७६ मते, विठ्ठल डुंबरे यांना ५ मते, मयूर ढोबळे यांना ५ मते, पंढरीनाथ पानसरे यांना २ मते,मिनाक्षी लाहोरकर यांना ९ मते मिळाली तर ४ मते बाद झाली. तान्हाजी विठ्ठल तांबे यांची २२ मतांनी निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सतिश गवारी यांनी व सरपंच बाळासाहेब घुले यांनी जाहीर केले.तंटामुक्ती ग्राम समिती करिता निवडणूक प्रक्रिया जिल्ह्यात पहिल्यांदा संपन्न झाली असल्याने इतर गावांच्या दृष्टीने हा उत्सुकतेचा विषय बनला आहे जिल्ह्यात आजपर्यंत इतिहासात तंटामुक्ती ग्रामसमिती अध्यक्ष निवड झाली होती मात्र निवडणूक प्रक्रिया पहिल्यांदा जुन्नर तालुक्यातील ओतुर याठिकाणी संपन्न झाली.येथे तंटामुक्ती अध्यक्ष पदाकरिता गेले अनेक दिवस काही अंशी वाद असल्याचे ऐकीवात होते हा वाद आता मिटला असेच म्हणावे लागेल तसेच तंटामुक्ती अध्यक्ष तान्हाजी तांबे हे सलग दोन वेळा तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आता त्यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांनी हायट्रिक केली आहे. गावच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना तान्हाजी तांबे म्हणाले की मी गावातील जास्तीत जास्त प्रमाणात असणारे महसूली तंटे तसेच फौजदारी तंटे गाव पातळीवर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून नवीन समिती नेमून समितीदेखील गावातील तंटे मिटवण्यासाठी कार्यरत राहील यापुढील काळात कमीत कमी तंटे होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.या ग्रामसभेला उपस्थित डॉ.सविता फलके व गणेश तांबे यांनी गावांमधील कचरा गोळा करण्यासाठी असणारी घंटागाडी वेळेत फिरावी तसेच गुरुवारी बाजारच्या दिवशी भाजीपाला व इतर कचरा गावात रस्त्यावर पडतो तो कचरा गोळा करून एका जागी बाजार करूंनीच टाकावा व ग्रामपंचायत कडून बाजारतळाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली ठेवण्यात यावी जेणेकरून या कचऱ्याचे नियोजन बाजार उरकल्यावर लगेच करता येईल व याचा त्रास ग्रामस्थांना होणार नाही याबाबत सरपंच बाळासाहेब घुले यांनी सांगितले की लवकरच गावातील कचरा नियोजन करणार असून गावात छोट्या गल्ली  बोळांमध्ये फिरणाऱ्या घंटागाडीची व्यवस्था होणार आहे या ग्रामसभेला सरपंच बाळासाहेब घुले जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले पंचायत समिती सदस्य विशाल तांबे ग्रामपंचायत सदस्य अनिल तांबे, आशिष शहा,बाळासाहेब ढमाले,दत्तात्रय रोंगटे,डॉ.सुनिता वेताळ, वर्षा तांबे,सविता थोरात,स्मिता डुंबरे,मनीषा वारे, उपसरपंच राधाबाई जाधव, रईस मणियार, रामदास तांबे रत्नाकर धिरडे जालिंदर पानसरे उपस्थित होते तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून होतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी जगताप महसूल विभागाचे कामगार तलाठी राहुल पंदारे आदी मान्यवर उपस्थित होते उत्तर गावची ग्रामसभा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होऊन अशीही गाजणार व जिल्ह्यात चर्चा रंगणार हे सर्वसामान्य जनतेस नवीन नाही मात्र या निवडणुकीमुळे एक नवीन पायंडा पडला असल्याचे मत सुज्ञ ग्रामस्थांनी व्यक्त केले तर यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले म्हणाले की गावच्या विकासासाठी राजकिय मंडळींनी राजकारण विसरुन सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे राजकारण विसरून आपण आपल्या गावचा विकास स्वतः साधू शकतो असे यावेळी बोलताना ते म्हणाले या सभेचे सुत्रसंचलन ग्रामविकास अधिकारी सतिश गवारी यांनी केले तर सरपंच बाळासाहेब घुले यांनी आभार मानले.

ग्रीक महाकाव्यातही सूडचक्राची छाया: डॉ. सुप्रिया सहस्त्रबुध्दे

0
पुणे :’ग्रीक महाकाव्यातही महाभारताप्रमाणे सूडचक्राची छाया  आहे. या पुराणकथांची जगावर छाप असून जागतिक साहित्यात ते मोलाचा दस्तावेज ठरला आहे. पुरातन,  प्राचीन ग्रीक भाषेतील इलीयाड, ओडिसी महाकाव्यांचे आजही आवडीने वाचन केले जाते ‘ असे प्रतिपादन मॉडर्न महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका डॉ . सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
‘रसिक मित्र मंडळ’ संस्थे तर्फे ५८ व्या मासिक व्याख्यानाचे आयोजन ‘पुणे श्रमिक पत्रकार संघ‘ येथे शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते. या व्याख्यानात प्रा. सहस्त्रबुद्धे बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी ‘रसिक मित्र मंडळ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला होते.
‘इलियाड’ व ‘ओडिसी’ या ग्रीक महाकाव्यांवर डॉ .सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले.

व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा तौलनिक अभ्यास  मांडला. डॉ . सहस्त्रबुद्धे यांनी ग्रीक पुराणावर पीएच डी केली आहे .

त्या म्हणाल्या, ‘ ग्रीक  पुराणकथांचे वैविध्य विलक्षण आहे.इलियड वर पुरुष वर्चस्व आहे ,तर ओडिसी वर स्त्री वर्चस्व आहे . भारतीय महाकाव्य ‘महाभारत’ हा सूडाचा प्रवास आहे, असे अनेक वेळा वाटते. त्या विषयावर बरेच लेखनही केले गेले आहे. अनेक ग्रीक पुराणकथाही सूडचक्राच्या कथा वाटतात.साहित्यात ग्रीक पुराणकथांच्या कधी धूसर तर कधी स्पष्ट छाया दिसून येतात.पण ,ग्रीक अत्यंत वास्तववादी होते ,दैववादी नव्हते . अनेक उपमा ,फ्रेजेस ग्रीक पुराणातून पुढे आल्या . ग्रीक पुराणकथांमध्ये वास्तवता आणि ऐतिहासिकता यांची सशक्त मुळे आहेत .
या कार्यक्रमात प्रदीप निफाडकर यांना अक्षररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि श्रुती करंदीकर यांचा गझल संशोधनासाठी फेलोशिप मिळाल्याबद्दल सन्मान केला.प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले.

लोकसेवा शाळेतर्फे केरळसाठी 28 हजार 600 रुपयांची मदत

0

केरळ सरकारच्या वतीने लोकसेवा शाळेला आभाराचे पत्र

पुणे : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसेवा फार्मसी कॉलेज, इंग्लिश मिडियम स्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी 28 हजार 600 रुपयांची मदत केरळच्या मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी पाठविली आहे. केरळ सरकारकडून त्यानिमित्त आभाराचे पत्रही शाळेला प्राप्त झाले आहे.

केरळमध्ये पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. जगभरातून मदतीसाठी हात पुढे येत आहेत. अशावेळी आपणही केरळवासियांचे अश्रु पुसण्यासाठी पुढाकार घ्यावा असे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना वाटले. संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व डॉ. राजेश वाके यांच्या मार्गदर्शनाखाली हा मदतनिधी गोळा करण्यात आला. केरळच्या मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी हा निधी पाठविल्यानंतर केरळ सरकारकडून शाळेस त्याबद्दल आभाराचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली आहे.

आदर्श शिंदेची लयभारी स्टाईल

0

संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ ‘संगीत सम्राट पर्व २’ ने उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वालादेखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रेक्षक जरी दुसऱ्या पर्वाच्या रुपरेषेत काही बदल अनुभवत असले तरी परीक्षक म्हणून आदर्श शिंदे यांची जागा दुसऱ्या पर्वात देखील कायम आहे.

पहिल्या पर्वापासून आदर्श शिंदे एक उत्तम परीक्षक बनून स्पर्धकांना योग्यरीत्या मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांचा महत्वपूर्ण प्रतिसाद आणि त्यांच्या अनुभवातून स्पर्धक खूप काही शिकू शकतात. दुसऱ्या पर्वात देखील प्रेक्षकआदर्श शिंदे यांच्या परीक्षकाच्या भूमिकेला पसंती दर्शवत आहे, मग ती आदर्श शिंदे यांना परफॉर्मन्स आवडल्यानंतर त्यांनी दिलेली शिंदे शाही सलामी असो किंवा स्पर्धकांना दाद देताना त्यांनी म्हंटलेलं ‘आवाज वाढव परफॉर्मन्स’असो, आदर्श शिंदे यांची परिक्षणाची ही हटके स्टाईल प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. आदर्शच्या परीक्षणाच्या स्टाईलसोबतच त्याचा फॅशन सेन्स देखील सर्वांना आवडतो आहे.

आदर्श दुसऱ्या पर्वात त्याच्या स्टाईल सोबत एक्सपेरिमेंट करताना दिसत आहे. सर्व फॅशन ट्रेंड्स बाजूला करून आदर्श स्वतःची अशी वेगळी स्टाईल निर्माण करत आहे. या पर्वात आदर्श ब्राईट कलरचे आऊटफिट आणि त्यासोबतकॉम्प्लिमेंट करेल असे बूट परिधान करतो, तसेच त्याचे ट्रेंडी आऊटफिट तितक्याच आत्मविश्वासाने कॅरी देखील करतो.

त्याच्या स्टाईल सेन्सबद्दल बोलताना आदर्श म्हणाला, “माझ्या मते फॅशनची अशी काही निश्चित परिभाषा नाही आहे. मी माझ्या मूड आणि कम्फर्टप्रमाणे ड्रेसअप होतो. माझ्या कॉश्यूम डिझायनरला माझी स्टाईल खूप चांगल्यारित्यासमजली आहे. मला बोल्ड आणि ब्राईट ड्रेसिंग स्टाईल आवडते. अनोखे पॅटर्न्स, सुंदर रंग आणि ट्रेंडी स्टाईल या सगळ्याच कॉम्बिनेशन आहे माझा फॅशन मंत्र.”

मीरा देणार आदित्यला सरप्राईज

0

‘नवे पर्व, युवा सर्व’ असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन
केले.’आम्ही दोघी’ ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. आम्ही दोघीमालिकेचं कथानक
मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मी
रा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणिस्वच्छंदी आहे. सध्या मालिके
त प्रेक्षक मीरा आणि आदित्यमधील वाढती मैत्री व त्या मैत्रीचं प्रेमात झालेलं रूपांतर पाहत आहेत.

आदित्यने जेव्हा त्याच्या प्रेमाचा खुलासा मीरासमोर केला तेव्हा मीराने देखील तिचा वेळ घेऊन त्याला होकार दिला.
मीराने आदित्यच्या प्रेमाचा स्वीकार केल्यामुळे आदित्य सध्या खुश आहे. मीरापण प्रेमाचे नवे नवे दिवस एन्जॉयकरते
आहे. अथर्वला जेव्हा आदित्यचा वाढदिवसाबद्दल कळतं तेव्हा तो मीराला सांगतो. मीरा आणि अथर्व त्याच्या बर्थडेचा प्
लॅन करतात. मीरा गच्चीत आदित्यला सरप्राईज द्यायचं ठरवते. केक कटिंग करत असताना नेमकी मधुरागच्चीवर येते आ
णि तिला प्लॅनबद्दल न सांगितल्यामुळे ती चिडते. कशीबशी परिस्थिती सावरून आदित्यचा बर्थडे सेलिब्रेट होतो.

अशा सर्व परिस्थितीमध्ये मीरा आणि आदित्य एकमेकांसाठी कसा वेळ काढतील? किती दिवस मीरा आणि आदित्य स्व
तःचे प्रेम लपवून ठेवतील?

किशोरवयीन गायकांच्या गीत रामायणाने ‘भारतीय विद्या भवन’ मंत्रमुग्ध !

0
पुणे :विक्रम पेंढारकर प्रस्तुत सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘गीत रामायण’ कार्यक्रमाने ‘भारतीय विद्या भवन’ मधील श्रोते मंत्रमुग्ध झाले.
वर्धन पेंढारकर आणि अथर्व बुरसे या किशोरवयीन गायकांनी गीत रामायणातील निवडक गीते सादर करून गदिमा आणि बाबूजींना स्वरांची मानवंदना दिली. कार्यक्रम रसिकांना रामायणाचे दर्शन देणारा ठरला
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वर्धन पेंढारकर, अथर्व बुरसे यांना मैत्रेयी पेंढारकर आणि वैशाली जोशी साथ दिली. तर विक्रम पेंढारकर ( हार्मोनियम ), प्रसाद वैद्य (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्ये), चारूशीला गोसावी (व्हायोलिन) यांनी वाद्यवृंदावर साथसंगत केली.’भारतीय विद्या भवन ‘ चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.
सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५३वा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 24 ऑगस्ट 2018 रोजी ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी ६ वाजता झाला.
रामायणातील महत्वाचे प्रसंग गीतांच्या माध्यमातून सादर करत रामायण उलगडले. या कार्यक्रमांतर्गत ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’, ‘शरयू तीरावर अयोध्या’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला गं सखे ‘, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘नकोस नौके’, ‘शेवटी करिता नम्र प्रणाम’ , ‘दैवजात दुःखे भरता’ , ‘साक्षीस व्योम पृथ्वी’, ‘लीलया उडुनी गगनात’, ‘सेतू बांधा रे सागरी’, ‘त्रिवार जयजयकार’ , ‘गा बाळांनो श्री रामायण’ या गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
‘सेतू बांधा रे सागरी’ हे गीत सादर करताच रसिकश्रोत्यांनी टाळय़ांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे निवेदन वैशाली जोशी यांनी केले.

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत शौनक शिंदे, आदर्श गोपाळ यांना विजेतेपद

0
  • ईशा जोशी हिला दुहेरी मुकुट 

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यतपद टेबल टेनिस स्पर्धेत शौनक शिंदे, आदर्श गोपाळ व ईशा जोशी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत युथ(21 वर्षाखालील)मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत 21 वर्षाखालील मुलींच्या युवा गटात अतितटीच्या झालेल्या सामन्यात अव्वल मानांकीत ईशा जोशी हिने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत तिस-या मानांकीत पृथा वर्टीकरचा 4-3(11/8, 6/11, 9/11, 6/11, 16/14, 11/6, 11/9)असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात सुरुवातीला ईशाने पहिला सेट पृथाविरुद्ध 11/8असा तर, पृथाने दुसरा सेट ईशा विरुद्ध 11/6असा जिंकून बरोबरी साधली. पृथाने जोरदार आक्रमण करत ईशाविरुद्ध पुढील दोन्ही सेट 11/9, 11/6असा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर सामन्याच्या शेवटपर्यंत पृथाला सूर गवसला नाही व याचाच फायदा घेत ईशाने पुढील तीनही सेट 16/14, 11/6, 11/9 असे जिंकून विजेतेपद मिळवले. महिला गटातही ईशाने बाजी मारत सातव्या मानांकीत प्रिथीका सेनगुप्ता हिचा 11-9, 11-4, 11-7, 8-11, 11-9 असा पराभव करत दिहेरी मुकुटाचा मान मिळवला. ईशा स.प महाविद्यालय येथे प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे उपेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ईशाचे युवा गटातील या वर्षातील हे तिसरे तर महिला गटातील चौथे विजेतेपद आहे.

21 वर्षाखालील मुलांच्या युवा गटात शौनक शिंदे याने गौरव लोहपत्रेचा 4-2(11/8, 11/6, 2/11, 9/11, 11/9, 11/8)असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. सामन्यात पहिल्या दोन सेटमध्ये शौनकने आपले वर्चस्व कायम राखत गौरव विरुद्ध 11/8, 11/6अशा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या गौरवने आपल्या खेळात नवीन रणनिती आखत शौनकविरुद्ध पुढील दोन सेट 11/2, 11/9अशा फरकाने जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर शौनकने जोरदार पुनरागमन करत गौरव विरुद्ध पुढील दोन सेट 11/9, 11/8 असे जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. 16वर्षीय शौनक हा पी.जोग.महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून रेडियंट स्पोर्ट्स अकादमी येथे प्रशिक्षक रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या गटातील या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे.

पुरूष गटात दहाव्या मानांकीत आदर्श गोपाळने बिगर मानांकीत गौरव लोहापात्रेचा  4-2(11-7, 12-14, 11-8, 5-11, 11-6, 12-10)  असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 16 वर्षीय आदर्श हा लॉयला हायस्कुल मध्ये शास्त्र शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील या गटातील हे पहिलेच विजेतेपद आहे.

स्पर्धेत एकूण 80000रुपयांची पारितोषिके देण्यात आली.पृथा वर्टीकर हिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्या मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी क्लबचे खजिनदार आनंद परांजपे, पीडीटीटीएचे संस्थापक सुभाष लोढा, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्ष स्मिता बोडस, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस प्रकाश तुळपुळे, संयोजन सचिव अविनाश जोशी, दीपक हळदणकर, मधुकर लोणारे, उपेंद्र मुळ्ये, कपिल खरे, राहुल पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

21 वर्षाखालील युवा गट मुले- अंतिम फेरी

शौनक शिंदे(2) वि.वि गौरव लोहापात्रे(9) 4-2(11/8, 11/6, 2/11, 9/11, 11/9, 11/8)

21 वर्षाखालील युवा गट मुली- अंतिम फेरी

ईशा जोशी(1) वि.वि पृथा वर्टीकर(3) 4-3(11/8, 6/11, 9/11, 6/11, 16/14, 11/6, 11/9);

महिला गट- अंतिम फेरी

ईशा जोशी(1) वि.वि प्रिथीका सेनगुप्ता(7) 11-9, 11-4, 11-7, 8-11, 11-9

पुरूष गट- अंतिम फेरी

आदर्श गोपाळ(10) वि.वि गौरव लोहापात्रे 4-2(11-7, 12-14, 11-8, 5-11, 11-6, 12-10)

आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेसाठी डॉक्टर दांपत्याच्या शोधनिबंधांची निवड

0

पुणे : नेदरलँड येथील महाऋषी आयुर्वेदा आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 1 व 2 सप्टेंबर रोजी होत असलेल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेमध्ये पुण्यातील डॉ. सुषमा पाटील व डॉ. विक्रांत पाटील या दांपत्यांचा शोधनिबंध सादर होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. गीता कृष्णन आदी मान्यवर या परिषदेस उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. विक्रांत पाटील यांनी दिली.

आयुर्वेद थायरॉईड क्लिनिकचे डॉ. विक्रांत पाटील हे हायपर थायरॉईड व डॉ. सुषमा पाटील पीसीओडी याविषयावर शोधनिबंध सादर करणार आहेत. दोन दिवसांची ही परिषद नेदरलँडमधील लेडइन शहरात होत आहे. लाईफस्टाईल डिसॉर्डर हा परिषदेचा विषय असल्याचे डॉ. विक्रांत पाटील यांनी यावेळी सांगितले. आयुर्वेदीक उपचाराने पीसीओडी व थायरॉईडवर निश्चित व कालबद्ध उपचार करता येतात, असेही ते म्हणाले.

दक्षिण पुणे बनतंय ..2 नंबर धंद्यांचं आगर ..किनारा हॉटेल वरील छाप्यात सेक्स रॅकेट उघडकीस..

0

पुणे -दक्षिण पुणे म्हणजे कात्रज ,धनकवडी,बिबवेवाडी, नऱ्हे… असा परिसर जो सरकारी जागा हडप करणे ,बेकायदा बांधकामे करण्यात मशहूर होता तो परिसर आता 2 नंबरच्या धंद्यांनी गिळंकृत केला असून बेकायदा दारू धंदे ,मटका अड्डे ,यांना सुकाळ आल्याचे चित्र असताना  कात्रज येथील  किनारा हाॅटेल येथे पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट उघडकीस अाणले अाहे.

याप्रकरणी पाेलिसांनी हाॅटेलचा व्यवस्थापक अनिल श्रीधर पुजारी आणि चित्तरंजन दामाेदर शेट्टी यांना अटक केली. या छाप्यात पाेलिसांनी साेलापूर येथील ३० वर्षीय तरुणी व पुण्यातील हडपसर येथील २० वर्षीय तरुणीची वेश्याव्यवसायातून सुटका केली अाहे.याप्रकरणी अाराेपींविराेधात भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. किनारा लाॅजचे व्यवस्थापक हाॅटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी तरुणींचा पुरवठा करत हाेते. याबाबत पाेलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उघडकीस अाणले.

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

0

मुंबई-ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारलीही होती. मात्र बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विजय चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टी गाजवत होते. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील स्त्री पात्र तर प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर विजय चव्हाण यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटके प्रचंड गाजली होती. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

स्पॅनिश मध्यरक्षक जोनाथन विला याचा एफसी पुणे सिटी संघात समावेश

0

पुणे: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील क्लब एफसी पुणे सिटी संघाने आगामी २०१८-१९मौसमाकरिता  स्पॅनिश मध्यरक्षक जोनाथन विला याचा  संघात समावेश केल्याची घोषणा आज केली.

एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, जोनाथन हा अव्वल दर्जाचा मध्यरक्षक असून त्याला बचावफळीस साथ देत खेळणे आवडते.  मध्यरक्षक असतानाही उत्कृष्ट बचाव करण्याची त्याची क्षमता आणि योग्य वेळी आक्रमण करण्याचे कौशल्य यामुळे आमच्यासाठी आदर्श खेळाडू ठरेल.

जोनाथन याने आपल्या युवा कारकिर्दीची सुरुवात सेल्टा दि वीगोकडून केली आणि त्यानंतर २००६मध्ये ला लीगकडून पदार्पण करताना २००६-०७मध्ये युईएफए करंडक स्पर्धा खेळला होता. सेल्टाकडून दहा वर्षे खेळताना २०१४मध्ये जोनाथन बिटर जेरुसलेम एफसी संघात सहभागी झाला.  २०१७मध्ये स्पेनमध्ये रिक्रिएटिव्हो दि हुईलवा संघात सहभागी झाला.

एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य प्रशिक्षक मिगुल एंजल पोर्तुगल म्हणाले की, जोनाथनची खेळी उत्कृष्ट आहे आणि एक मध्यरक्षक म्हणून त्याला प्रदीर्घ अनुभव असून त्याचा फायदा आमच्या संघासाठी नक्कीच होईल. आगामी मौसमासाठी त्याची निवड आमच्या संघासाठी योग्य असून तो संघाची जबाबदारी मैदानाच्या आत व बाहेर सांभाळेल अशी आशा आहे.

यावेळी जोनाथन विला म्हणाला कि, माझ्या कारकिर्दीतील हे नव्हे आव्हान असून भारतात खेळण्याचा हा माझा पहिलाच मौसम आहे. एका नव्या आव्हानाबरोबरच नवीन संस्कृती व जीवनशैली स्विकारण्याचे देखील आव्हान असणार आहे. माझ्या खेळाद्वारे चाहत्यांवर आणि क्लबवर नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल अशी आशा आहे.