पुणे -दक्षिण पुणे म्हणजे कात्रज ,धनकवडी,बिबवेवाडी, नऱ्हे… असा परिसर जो सरकारी जागा हडप करणे ,बेकायदा बांधकामे करण्यात मशहूर होता तो परिसर आता 2 नंबरच्या धंद्यांनी गिळंकृत केला असून बेकायदा दारू धंदे ,मटका अड्डे ,यांना सुकाळ आल्याचे चित्र असताना कात्रज येथील किनारा हाॅटेल येथे पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट उघडकीस अाणले अाहे.
याप्रकरणी पाेलिसांनी हाॅटेलचा व्यवस्थापक अनिल श्रीधर पुजारी आणि चित्तरंजन दामाेदर शेट्टी यांना अटक केली. या छाप्यात पाेलिसांनी साेलापूर येथील ३० वर्षीय तरुणी व पुण्यातील हडपसर येथील २० वर्षीय तरुणीची वेश्याव्यवसायातून सुटका केली अाहे.याप्रकरणी अाराेपींविराेधात भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. किनारा लाॅजचे व्यवस्थापक हाॅटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी तरुणींचा पुरवठा करत हाेते. याबाबत पाेलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उघडकीस अाणले.