पुणे :’ग्रीक महाकाव्यातही महाभारताप्रमाणे सूडचक्राची छाया आहे. या पुराणकथांची जगावर छाप असून जागतिक साहित्यात ते मोलाचा दस्तावेज ठरला आहे. पुरातन, प्राचीन ग्रीक भाषेतील इलीयाड, ओडिसी महाकाव्यांचे आजही आवडीने वाचन केले जाते ‘ असे प्रतिपादन मॉडर्न महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका डॉ . सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
‘रसिक मित्र मंडळ’ संस्थे तर्फे ५८ व्या मासिक व्याख्यानाचे आयोजन ‘पुणे श्रमिक पत्रकार संघ‘ येथे शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते. या व्याख्यानात प्रा. सहस्त्रबुद्धे बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी ‘रसिक मित्र मंडळ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला होते.
‘इलियाड’ व ‘ओडिसी’ या ग्रीक महाकाव्यांवर डॉ .सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले.
व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा तौलनिक अभ्यास मांडला. डॉ . सहस्त्रबुद्धे यांनी ग्रीक पुराणावर पीएच डी केली आहे .
त्या म्हणाल्या, ‘ ग्रीक पुराणकथांचे वैविध्य विलक्षण आहे.इलियड वर पुरुष वर्चस्व आहे ,तर ओडिसी वर स्त्री वर्चस्व आहे . भारतीय महाकाव्य ‘महाभारत’ हा सूडाचा प्रवास आहे, असे अनेक वेळा वाटते. त्या विषयावर बरेच लेखनही केले गेले आहे. अनेक ग्रीक पुराणकथाही सूडचक्राच्या कथा वाटतात.साहित्यात ग्रीक पुराणकथांच्या कधी धूसर तर कधी स्पष्ट छाया दिसून येतात.पण ,ग्रीक अत्यंत वास्तववादी होते ,दैववादी नव्हते . अनेक उपमा ,फ्रेजेस ग्रीक पुराणातून पुढे आल्या . ग्रीक पुराणकथांमध्ये वास्तवता आणि ऐतिहासिकता यांची सशक्त मुळे आहेत .
या कार्यक्रमात प्रदीप निफाडकर यांना अक्षररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि श्रुती करंदीकर यांचा गझल संशोधनासाठी फेलोशिप मिळाल्याबद्दल सन्मान केला.प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले.