महाराष्ट्राच्या इंद्रजीत महिंद्रकरची रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय मास्टर रत्नाकरन के वर मात
अजित पवारांनी काय दिवे लावलेत ते माहिती आहे – पालकमंत्री बापटांचे उत्तर
पुणे-राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कालवा फुटीला पालकमंत्र्यांना जबाबदार धरले आहे .यासंदर्भातील थेट प्रश्नाला ,’अजित पवारांनी काय दिवे लावलेत ते माहिती आहे’ असे स्पष्ट भाषेत उत्तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे .कालवा फुटीने पुण्यात हाहाकार उडालेला असताना पालकमंत्री कुठे आहेत ?कालवा फुटीला पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जबाबदार आहेत .असे आरोप विरोधी पक्षांकडून होत होते . एवढेच काय भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी देखील पालकमंत्री बापट आणि खासदार शिरोळे यांनी येथे येणे हे त्यांचे कर्तव्यच होते , असे विधान कालच केले. या पार्श्वभूमीवर आज श्री बापट बोलत होते.
ते म्हणाले , मी सर्व परिस्थिती जाणून आहे . आणि तेथे जाण्यापेक्षा मदत काय करता येईल हे पाहणे गरजेचे होते .त्यानुसार आज मुंबईतून आल्यावर घेतलेल्या बैठकीत दुर्घटनाग्रस्तांना मदती साठी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत .
कालवा बाधितांना मदतीसाठी 3 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे – पालकमंत्री बापट
पुणे- पुणे महानगरपालिका हद्दीतील पर्वती भागातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान झालेल्या घरांच्या पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून त्यांना खास बाब म्हणून मदत देण्याबाबतचा 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव तात्काळ पाठविण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार गीता दळवी, हेमंत निकम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, कालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्याबाबत विनंती करण्यात यावी. शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार कालवाबाधितांना नुकसान भरपाई मिळेलच, पण हानीची तीव्रता पहाता खास बाब म्हणून 3 कोटी रुपयांच्या मदतीची विनंती करणारा प्रस्ताव तात्काळ पाठवावा. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. कालवाबाधित भागातील घरांचे पंचनामे पूर्ण झालेल्या संपूर्ण कुटुंबाची यादी त्या भागातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे देऊन संबंधित कुटुंबांना धान्य वाटप करण्यात यावे, यावेळी नियंत्रण व देखभालीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रतिनिधी असावा, असेही ते म्हणाले.
मुठा उजवा कालवा फुटून या भागातील घरांमध्ये पाणी जाऊन त्यांच्या घरातील चीजवस्तूंचे नुकसान झाले आहे. हानीची तीव्रता पहाता शासनाकडून भरीव मदतीची गरज असल्यामुळे 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे पालकमंत्री श्री. बापट यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी घटनेची पार्श्वभूमी सांगितली. जिल्हा प्रशासनाकडून बाधितांच्या घरांच्या पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली असून 740 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये सुमारे 90 घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर्णत: बाधित व अंशत: बाधित घरांच्या मदतीचा तसेच खास बाब म्हणून 3 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले.
जलस्त्रोत संरक्षित करण्याचा नवा भूजल कायदा – २०१८ सर्वंकष हवा : संस्था, कार्यकर्त्यांची मागणी
प्रदर्शनामुळे महिलांच्या कलेला व्यासपीठ -दिलीप बंड
वंचिताना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक राजू इनामदार यांचे मत; वंचित विकासतर्फे ‘आपुलकी पुरस्कार’ प्रदान
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुठा कालवा बाधित भागातील नागरिकांशी साधला संवाद
भारत फोर्जचा एआयएमए मॅनेजिंग इंडिया अॅवॉर्ड्स – इंडियन एमएनसी ऑफ द इयर पुरस्काराने गौरव
नवी दिल्ली-येथे 26 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएमए) 45व्या नॅशनल मॅनेजमेंट कन्व्हेन्शनमध्ये भारत फोर्जला गौरवण्यात आले. एआयएमए पुरस्कार नवे बेंचमार्क निर्माण करून उद्योगामध्ये मूलभूत बदल आणणाऱ्या व इतरांसाठी अनुकरणी कार्य करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींची दखल घेतात.
2010 मध्ये सुरुवात झाल्यापासून, या पुरस्काराने भारतातील उद्योग, मीडिया, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत, एआयएमए मॅनेजिंग इंडिया अॅवॉर्ड्स देशातील सर्वात प्रतिष्ठेचे पुरस्कार म्हणून लोकप्रिय झाले आहेत.
भारत फोर्ज लिमिटेडविषयी
भारत फोर्ज लिमिटेड (बीएफएल) ही 3 अब्ज डॉलर उलाढालीच्या कल्याणी समूहाची प्रमुख कंपनी आहे व ऑटोमोटिव्ह, रेल्वे, ऊर्जा, संरक्षण, बांधकाम व खाणकाम, तेल व वायू यासहित विविध औद्योगिक क्षेत्रांना अतिशय चांगली कामगिरी, नाविन्य, सुरक्षा व महत्त्वाचे भाग आणि सोल्यूशन यांचा जागतिक पुरवठादार आहे. आज बीएफएल या प्रदेशातील मेटॅलर्जिकल ज्ञानाचे सर्वात मोठे भांडार आहे आणि कंपनी भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या परदेशी ग्राहकांना संकल्पनेपासून उत्पादनाचे डिझाइन, इंजिनीअरिंग, उत्पादन, चाचणी आणि व्हॅलिडेशनपर्यंत परिपूर्ण सेवा देते. उल्लेखनीय प्रगती व भांडवली वस्तू व पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये आक्रमकपणे प्रवेश करून एक इंजिनीअरिंग समूह म्हणून साधलेले परिवर्तन, यामुळे बीएफएल एक जागतिक आर्थिक सत्ता यामध्ये भारताचे परिवर्तन झपाट्याने करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनविषयी
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन ही भारतातील मॅनेजमेंट पेशाची सर्वोच्च राष्ट्रीय संघटना आहे आणि आपल्या विविध उपक्रमांद्वारे ती मॅनेजमेंट पेशाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यरत आहे. संघटनेकडे परदेशात दोन एलएमए आहेत व 67 स्थानिक मॅनेजमेंच असोसिएशनद्वारे 30000 हून अधिक सदस्य आहेत. एआयएमए ही नॉन-लॉबिंग बॉडी आहे आणि आधुनिक व महत्त्वाच्या व्यवस्थापन पद्धती व तंत्रे लोकप्रिय करण्यासाठी सहसा जगातील सर्वोत्तम प्रोफेशनल संघटना व संस्थांबरोबर काम करते. नॅशनल मॅनेजमेंट कन्व्हेन्शन हा एआयएमएचा प्रमुख वार्षिक कार्यक्रम असून, त्याचा भर प्रामुख्याने राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर असतो. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील विचारवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी व मंत्री यांसह विविध वक्ते व्याख्याने देतात.
शालेय विद्यार्थ्यांसाठीचे भारतातील सर्वांत मोठे टेक क्विझ देशभरातील १२ शहरांमध्ये होणार
टीसीएस आयटी विझ ४ ऑक्टोबर रोजी पुण्यात
पुणे: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या अग्रगण्य आयटी सेवा, कन्सल्टिंग अॅण्ड बिझनेस सोल्युशन्स फर्मतर्फे घेतल्या जाणाऱ्या टीसीएस आयटी विझ २०१८ या प्रश्नमंजूषेची पुण्यातील फेरी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही स्पर्धा कोथरूड भागातील कर्वे रोडवर शिवाजी पुतळ्याजवळ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होईल, असे टीसीएसने जाहीर केले आहे.
यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. ८-१२ या इयत्तांमध्ये शिकणारे शालेय विद्यार्थी (विद्यापीठपूर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थीही भाग घेऊ शकतात) या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. एक शिक्षणसंस्था यासाठी जास्तीत जास्त १२ संघ (प्रत्येक संघात दोन विद्यार्थी) पाठवू शकते.
टीसीएस आयटी विझ २०१८ भारतात १२ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ती शहरे पुढीलप्रमाणे: अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वेर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि पुणे.
संबंधित शिक्षणसंस्थांनी यासाठी ३० सप्टेंबरपूर्वी प्रवेशिका पाठवणे आवश्यक आहे. प्रवेशिका टीसीएस, विझ को-ऑर्डिनेटर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ५४ बी, हडपसर औद्योगिक वसाहत, पुणे ४११०१३, भारत या पत्त्यावर पाठवायच्या आहेत. अधिक तपशिलांसाठी संपर्क साधा: ०९२२८८०८३०४/८६९८८६७२९७ किंवा ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी: www.tcsitwiz.com.
प्रश्नमंजूषेचे स्वरूप: लिखित प्राथमिक फेरीतील पहिले सहा संघ प्रादेशिक फेरीसाठी पात्र ठरतील. एकाच शाळेचे एकाहून अधिक संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, तरी त्यातील सर्वाधिक गुणसंख्या असलेल्या संघालाच व्यासपीठावर बोलावले जाईल. प्रादेशिक फेरीत जिंकणारा संघ राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होईल.
बक्षिसे: प्रादेशिक विजेत्याला यंदा ६०,००० रुपये मूल्याची गिफ्ट व्हाउचर्स दिली जातील तर उपविजेत्यांना ४०,००० रुपये मूल्याची गिफ्ट व्हाउचर्स दिली जातील. याशिवाय विशेष डिझाइन केलेली ट्रॉफी आणि पदकेही दिली जातील. अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या ६ संघांनाही टीसीएसतर्फे अनेक बक्षिसे दिली जातील. यात जीम बॅग, ब्ल्यूटूथ स्पीकर्ससह मल्टिफंक्शनल म्युझिक टॉर्च, टीसीएस५० पेन ड्राइव्हसह वायरलेस आउटडोअर स्पीकर्स आदींचा समावेश आहे.
ट्विटर कॉण्टेस्ट: प्रत्येक शहरातील प्रादेशिक फेरीमध्ये सर्व स्पर्धकांसाठी एक ट्विटर कॉण्टेस्ट घेतली जाईल. सर्वाधिक ट्विस्ट्स आलेल्या दोन स्पर्धकांना तसेच ‘दिवसातील सर्वोत्तम ट्विट करणाऱ्या’ स्पर्धकाला ब्लूटूथ स्पीकर असलेल्या स्मार्ट म्युझिक फ्लॉवर पॉटसह मल्टिफंक्शनल टॉर्च आणि एलईडी नाइट लाइट अशी बक्षिसे देण्यात येतील.
अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांना यात भाग घेणे सोपे जावे यासाठी प्रादेशिक अंतिम फेऱ्यांचे लाइव्ह वेबकास्ट आयोजण्यात आले आहे. प्रादेशिक फेऱ्यांचे वेब स्ट्रीमिंग: www.tcsitwiz.com वर बघता येईल.
प्रश्नमंजूषेचा भर प्रामुख्याने खालील मुद्दयांवर असेल:
- विविध उद्योगक्षेत्रांत म्हणजेच तंत्रज्ञान पर्यावरण, व्यवसाय, मनुष्यबळ, नवीन प्रवाह आणि लिजंड्स आदींमध्ये माहिती तंत्रज्ञानाचे उपयोजन
- माहिती तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव असलेली क्षेत्रे- वेब, शिक्षण, मनोरंजन, पुस्तके, संगीत, चित्रपट, बँकिंग, जाहिरातदारी, क्रीडा, गेमिंग, सोशल मीडिया, मोबाइल फोनचे विश्व.
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्ती- जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक, आयटीचे ब्रॅण्ड्स आणि कम्युनिकेशन कंपन्या, सॉफ्टवेअर उत्पादने आणि ब्रॅण्ड्स, माहिती तंत्रज्ञानाचा इतिहास आणि माहिती तंत्रज्ञानातील विनोदी अंग
- क्लाउड कम्प्युटिंग, एआय, ऑटोमेशन, बायोमेट्रिक्स, रोबोटिक्स, वर्ल्ड ऑफ इंटरनेट, युनिक वेबसाइट्स, आयटी बझवर्ड्स आणि अॅक्रॉनिम्स यांसारखी उदयोन्मुख क्षेत्रे
- टीसीएसच्या पाच दशकांच्या उत्कृष्ट प्रवासावर आधारित TCS @50
टीसीएस आयटी विझविषयी
टीसीएस आयटी विझ हा १९९९ मध्ये सुरू झालेला एक ‘ज्ञानाधारित उपक्रम’ आहे. आठवी ते बारावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठीची ही भारतातील सर्वांत मोठी आंतरशालेय आयटी क्विझ स्पर्धा आहे. आयटीतील कौशल्यांबद्दल जागरूकता निर्माण करून त्याच्या महत्त्वावर भर देणे तसेच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून बघण्याची क्षमता देणे ही या क्विझची उद्दिष्टे आहेत. आजच्या समाजात आणि अर्थव्यवस्थेत, माहिती तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवून देण्याची क्षमता आयटीमध्ये आहे. कम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान यांना प्रभावी पूरक व्यासपीठ म्हणून ही प्रश्नमंजूषा उपयुक्त आहे. कारण, यातील बहुतेक प्रश्न हे अभ्यासक्रमापलीकडील संशोधन करून काढण्यात आले आहेत. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडे बघण्यास भाग पाडतील. टीसीएस आयटी विझ ही आयटी क्विझिंगच्या क्षेत्रातील पहिलीच स्पर्धा असून, बुद्धिमत्ता व रोचकता यांचा मेळ साधणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून या स्पर्धेने प्रश्नमंजूषेचा चेहरा पालटून टाकला आहे. त्याचबरोबर यात सॉफ्टवेअरवर आधारित फेऱ्यांसारख्या नवीन तंत्रज्ञानात्मक संकल्पना, गेमिफिकेशन आणि अॅनिमेशनचाही समावेश आहे. तुम्ही आम्हाला ट्विटरवरही फॉलो करू शकता: @TCSITWiz
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडविषयी (टीसीएस)
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि व्यवसाय सोल्युशन्स कंपनी असून गेल्या पन्नास वर्षांत कंपनीने जगातील अनेक मोठ्या व्यवसायांशी त्यांच्या रूपांतरणाच्या प्रवासात भागीदारी केली आहे. टीसीएस एक कन्सल्टिंगवर आधारित, आकलनाचा आधार असलेल्या आयटी, व्यवसाय व तंत्रज्ञानात्मक सेवांची एकात्मिक श्रेणी तसेच इंजिनीअरिंग सेवा देऊ करते. या सेवा दिल्या जातात कंपनीच्या अनोख्या स्थान स्वतंत्र वेगवान डिलीव्हरी प्रारूपाच्या माध्यमातून. सॉफ्टवेअर विकासातील सर्वोत्कृष्टतेचा मापदंड म्हणून या प्रारूपाला मान्यता आहे.
भारतातील सर्वांत मोठ्या बहुराष्ट्रीय व्यवसाय समूहाचा, टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएसकडे ४६ देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण लाभलेले ३९४,०००हून अधिक कन्सल्टण्ट्स आहेत. कंपनीचा ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील एकत्रित महसूल १९.०९ अब्ज डॉलर्स होता. कंपनी भारतातील बीएसई (पूर्वीचा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजः आणि एनएसई (नॅशनल स्टॉक्स एक्स्चेंज) यांच्या सूचीत समाविष्ट आहे. टीसीएसने हवामान बदलाविषयी घेतलेली सक्रिय भूमिका आणि जगभरातील समुदायांसोबत केलेल्या पुरस्कारप्राप्त कामामुळे कंपनीला जगातील अग्रगण्य शाश्वतता सूचींमध्ये स्थान मिळाले आहे. डॉ जोन्स सस्टेनिबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय), एमएससीआय ग्लोबल सस्टेनिबिलिटी इंडेक्स आणि एफटीएसईफॉर गुड इमर्जिंग इंडेक्स या सूचींमध्ये कंपनीला स्थान मिळाले आहे.
लँड टायटल विम्यामुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता ; क्रेडाईकडून उपक्रमाचे स्वागत
पुणे:- जमिनीच्या मालकीला संरक्षण देण्यासाठी लँड टायटल विमा योजना सुरु करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. बांधकाम व्यावसायिक समुदायाने त्याचे स्वागत केले आहे. या संबंधीची पावले उचलण्यापूर्वी सरकारने जमिनी संबंधीच्या व्यवहार व नोंदी यांचा सविस्तर विचार करणे गरजेचे आहे कारण देशात जमिनीच्या मालकीला संरक्षण देण्यासाठीच्या विम्याची चौकट अद्याप बाल्यवस्थेत आहे. सरकार हि भूमी अभिलेखाची रक्षक असून अनेक संस्थांमार्फत या अभिलेखांची हाताळणी होत असते. या सर्व संस्था आपापल्या कोशात काम करतात. त्यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्याने आपल्या देशात जमिनीचे वाद उपस्थित होतात.
रेरा कायद्याच्या कलम १६ मध्ये विकासकांना लँड विमा घेणे अनिवार्य केले आहे, मात्र प्रत्येक राज्याच्या नियामकाने या संबंधात अधिसूचना प्रसिद्ध केल्यावरच ही सक्ती लागू होईल.
रेरा हा एक प्रगतीशील कायदा असून त्यात लँड टायटल विम्याची तरतूद असली तरी यामुळे घरांच्या किमती निश्चितच वाढतील याकडे लक्ष वेधले आहे. ‘लँड टायटल’ हि संकल्पना नवीन असल्यामुळे विमा कंपनी कडून अयोग्य विमा धोरण आणि तशाच सेवा देणाऱ्या कंपन्या या क्षेत्रात एकाधिकार निर्माण करणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केले.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या लँड टायटल विमा योजना या परदेशातील उपलब्ध विमा योजनांच्या नकला असल्याचे प्रामुख्याने जाणवते.भारतात जमीन हि केवळ वादग्रस्त आणि खटले बाजीचीबाब नसून हा विषय अनेक वैयक्तिक कायद्यांशी व प्रचलित परंपरांशी निगडीत आहे. याच कारणास्तव जमिनीच्या मालकीसंबंधी शाश्वती देणारी विमा योजना गरजेची आहे. परंतु बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या विमा योजना हि मुलभूत गरज पूर्ण करण्यास सक्षम नाहीत व त्यामुळे विमा घेतल्यानंतरही क्लेमच्या योग्य रक्कम संबंधितांना मिळणार नाहीत मात्र या अतिरिक्त खर्चामुळे घरांच्या किंमती वाढतील व परवडणारी घरे तयार करणाऱ्या विकसकांवर जास्तीचे ओझे पडेल.उपलब्ध असलेल्या विमा योजनांनुसार १५ लाखांखाली विकल्या जाणाऱ्या
घरांसाठी लँड टायटल विम्याची रक्कम साधारण रु.४०,००० ते १,५०,००० पर्यंत होते म्हणजे या रकमेने घरांच्या किंमती साधारण वाढतील असा अंदाज कटारिया यांनी व्यक्त केला.
जोपर्यंत योग्य विमा योजना व दाव्याची प्रक्रिया सुस्पष्ट व मजबूत होत नाही तो पर्यंत अशा विम्याद्वारे ग्राहकांच्या जमीन मालकीस योग्य संरक्षण देण्याचा प्राथमिक उद्देश साध्य होणार नाही परंतु विनाकारण विमा प्रीमियर वर खर्च वाढेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
जमिनीच्या मालकीच्या संरक्षणाच्या मूळ उद्देशाला धरून शांतीलाल कटारिया यांनी असे सुचवले कि, जमिनीच्या मूळ मालकापासून मालकीची हस्तांतरणाची नोंद,जमीन व जमीन मालकाच्या फोटोसह नोंदवल्यास एखाद्या व्यक्तीने धारण केलेल्या जमिनीची माहिती व एकूण क्षेत्रफळाची माहिती काढणे सहज सोपे होईल व त्यामुळे लँड टायटल विम्याचे स्वरूप ही सर्वांना सुसह्य होईल असेही मत त्यांनी मांडले.
आम्ही पण मतदार; रिटेल व्यापाऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा रिटेलमधील परकीय गुंतवणुकीला विरोध म्हणून रिटेल व्यापारी संघातर्फे दुचाकी रॅली
पुणे, दि. 28 सप्टेंबर : देशातील रिटेल व्यवसायामध्ये 100 टक्के गुंतवणूकीस केंद्र सरकारने परवानगी दिल्याने आधीच मॉलमुळे त्रस्त झालेला रिटेल व्यापारी आता उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा म्हणून व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचे आंदोलन केले. पुण्यात आंदोलनादरम्यान ‘आम्ही पण मतदार’ अशा आशयाचे फलक हातात घेत सरकारला एक प्रकारे इशारा देत दुचाकी रॅली काढण्यात आली.
रिटेलमधील परकीय गुंतवणुकीमुळे वॉलमार्ट, अलीबाबा, फ्लिपकार्ट या कंपन्या रिटेल व्यवसायात येत आहेत. यामुळे देशातील रिटेल व्यापारी उध्वस्त होणार आहे. या निर्णयाविरोधात देशभरात सीएआयटी संघटनेच्या वतीने आज भारत बंदचे आंदोलन पुकारले होते. त्यास पाठींबा म्हणून पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने सारसबाग ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. गणपतीची आरती करुन बाजीराव रस्त्याने मंगळवारलपेठेतील जुन्या बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही दुचाकी रॅली गेली. जिल्हाधिकारी कार्यालयात किरकोळ व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
वॉलमार्टसारख्या कंपन्यांना व्यवसायासाठी 2 टक्क्यांनी कर्ज मिळते तर, आपल्याकडे कर्जावरील व्याजाचा दर 9 ते 18 टक्के आहे. मॉलच्या स्पर्धेत कंबरडे मोडलेला रिटेल व्यापारी या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी कशी स्पर्धा करणार आहे? देशात 35 कोटींहून अधिक नागरिक रिटेल व्यवसायातून रोजगार मिळवून जगतात. आणि आपले केंद्र सरकार 7 कोटी लोकांना रोजगार देण्यासाठी 35 कोटी लोकांच्या रोजगाराला संकटात आणून रिटेल व्यवसायात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहे. इतका साधा व सरळ विचार केंद्र सरकारच्या लक्षात येत नाही हेच विशेष आहे. आजच्या घडीला अमेरिकेने कायदा करून देशांतील व्यापाराला संरक्षण दिले आहे. चीन, रशिया सर्वजण स्थानिकांना प्रथम प्राधान्य देत असताना आपले सरकार मात्र स्थानिक रिटेल व्यवसाय संपविण्याचे काम करीत आहे.
रिटेल व्यवसायात काम करणाऱ्यांचे शिक्षण कमी आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भिती आहे.
स्थायीच्या खास अधिकारात नगरसेवकाच्या भावाची ‘उपमुख्यलेखापालपदावर बहुमताच्या आधारे नियुक्ती
दोषीला माफी नाही :कॅनॉल दुर्घटनाग्रस्तांना गृहपयोगी वस्तूसाठी खासदार काकडेंची 50 लाखांची मदत-(व्हिडीओ)
पुणे : दांडेकर पूलाजवळील कॅनॉलची भिंत फुटून झालेली दुर्घटना अत्यंत भयानक आहे. ही घटना रात्री झाली असती तर, हजारो नागरिकांचे प्राण गेले असते. दैव बलवत्तर म्हणून ही माणसं वाचली. या पीडित लोकांना तातडीची मदत म्हणून खासदार फंडातून 50 लाख रुपयांची मदत देत आहे. तसेच, त्यांचे कायमचे पूनर्वसन करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत, असे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासदार संजय काकडे यांनी आज सकाळी कॅनॉलची भिंत फुटून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांच्या घरांची पाहणी केली. पीडित कुटुंबियांना भेटून धीर दिला व तत्काळ त्यांच्या मदतीसाठी खासदार फंडातून 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. खासदार काकडे यांच्याबरोबर माजी नगरसेवक शिवाजी गदादे पाटील, माथाडी संघटनेचे अध्यक्ष दिनेश धाडवे , शंकर पवार आदी उपस्थित होते.
पीडित कुटुंबियांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, दैनंदीन उपयोगाची भांडी, फ्रीज, टीव्ही आदींचे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या भिंतीच वाहून गेलात व पडल्या आहेत. पीडित कुटुंबियांना भेट दिल्यावेळी पीडितांचा आक्रोश मोठा होता. यावेळी पीडित नागरिकांनी खासदार काकडे यांना झालेल्या नुकसानीची माहिती देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
खासदार काकडेंचा फोन व तात्पुरत्या निवासाची सोय
दुर्घटनाग्रस्त अनेक कुटुंबियांची सध्या राहण्याची अडचण आहे. स्थानिक पीडित कुटुंबियांकडून ही माहिती मिळताच खासदार संजय काकडे यांनी एसआरएच्या निंबाळकर यांना लगेच फोन केला व नाईकनवरे यांच्या स्कीम मधील 120 रिकाम्या फ्लॅट्समध्ये या पीडित कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, खासदार फंडातून दिलेल्या 50 लाख रुपयांतून पीडित कुटुंबियांना आवश्यक ती मदत तत्काळ करावी अशी विनंती खासदार संजय काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. तसे पत्रही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
———————–
-दोषींवर कडक कारवाई करा
कॅनॉलच्या भिंतीला तडे गेल्यासंदर्भात गेल्या दीड वर्षांपासून प्रशासनाला माहिती होते. प्रसिद्धी माध्यमांमध्ये त्याविषयी बातम्या आल्या होत्या. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही अक्षम्य बाब असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही खासदार काकडे यांनी यावेळी सांगितले.
—————
पालकमंत्र्यांनी तातडीने भेट द्यायला हवी होती – खासदार काकडे
पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट न दिल्याबद्दल व त्यावर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी पत्रकारांनी खासदार संजय काकडे यांना विचारले. त्यावेळी खासदार काकडे म्हणाले की, कॅनॉलची भिंत फुटून झालेली दुर्घटना अत्यंत भयानक होती. त्याचे गांभीर्य लक्षात घेता पालकमंत्री गिरीश बापट यांनी तातडीने घटनास्थळी येऊन मदत व पूनर्वसनाचे कार्य हाती घ्यायला हवे होते. बापट हे पालकमंत्री असल्याने ते स्वत: आले असते तर, संपूर्ण यंत्रणा तिथे आली असती व मदतीचे कार्य वेगाने झाले असते. त्यामुळे अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य आहे.
तर कालवाफुटीची दुर्घटना घडली नसती -पुनर्वसनासाठी जास्ती जास्त निधी देवू -भिमाले (व्हिडीओ)
पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली …या दुर्दैवी कुटुंबाच्या व्यथा मांडून त्यांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त निधी देवू असे सांगत ..अधिकारी आणि ठेकेदार यांचे दुर्लक्ष हेच या घटनेमागे कारण असल्याचे आज महापलिकेच्या मुख्य सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले .
जर नगरसेवकांचे ऐकले असते तर हि दुर्घटना घडली नसती.२०१६ मध्येच कालव्याची परिस्थिती नाजूक झाल्याचे समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले याकडे त्यांनी लक्ष वेधले .
पहा आणि ऐका यावेळी श्रीनाथ भिमाले काय म्हणाले त्यांच्याच शब्दात …
कालवाफुटी;पाटबंधारे खात्यासह रिलायन्सच्या कारभारावर चेतन तुपेंचा प्रहार (व्हिडीओ)
पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली …या दुर्दैवी कुटुंबाच्या व्यथा मांडून त्यांना मदत करा अशी मागणी करत आज आज महापलिकेच्या मुख्य सभेत विरोधीपक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी रिलायन्स कंपनीच्या मनमानी खोदाई कारभाराला आणि पाटबंधारे च्या बेमुर्वतखोरीला लगाम घालण्याची मागणी केली .
पहा आणि ऐका यावेळी तुपे पाटील काय म्हणाले त्यांच्याच शब्दात …



