शालेय विद्यार्थ्यांसाठीचे भारतातील सर्वांत मोठे टेक क्विझ देशभरातील १२ शहरांमध्ये होणार

Date:

टीसीएस आयटी विझ ४ ऑक्टोबर रोजी पुण्यात

पुणे: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या अग्रगण्य आयटी सेवा, कन्सल्टिंग अॅण्ड बिझनेस सोल्युशन्स फर्मतर्फे घेतल्या जाणाऱ्या टीसीएस आयटी विझ २०१८ या प्रश्नमंजूषेची पुण्यातील फेरी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही स्पर्धा कोथरूड भागातील कर्वे रोडवर शिवाजी पुतळ्याजवळ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होईल, असे टीसीएसने जाहीर केले आहे.

यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. ८-१२ या इयत्तांमध्ये शिकणारे शालेय विद्यार्थी (विद्यापीठपूर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थीही भाग घेऊ शकतात) या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. एक शिक्षणसंस्था यासाठी जास्तीत जास्त १२ संघ  (प्रत्येक संघात दोन विद्यार्थी) पाठवू शकते.

टीसीएस आयटी विझ २०१८ भारतात १२ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ती शहरे पुढीलप्रमाणे: अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वेर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि पुणे.

संबंधित शिक्षणसंस्थांनी यासाठी ३० सप्टेंबरपूर्वी प्रवेशिका पाठवणे आवश्यक आहे. प्रवेशिका टीसीएस, विझ को-ऑर्डिनेटर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ५४ बी, हडपसर औद्योगिक वसाहत, पुणे ४११०१३, भारत या पत्त्यावर पाठवायच्या आहेत. अधिक तपशिलांसाठी संपर्क साधा: ०९२२८८०८३०४/८६९८८६७२९७ किंवा ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी: www.tcsitwiz.com.

प्रश्नमंजूषेचे स्वरूप: लिखित प्राथमिक फेरीतील पहिले सहा संघ प्रादेशिक फेरीसाठी पात्र ठरतील. एकाच शाळेचे एकाहून अधिक संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, तरी त्यातील सर्वाधिक गुणसंख्या असलेल्या संघालाच व्यासपीठावर बोलावले जाईल. प्रादेशिक फेरीत जिंकणारा संघ राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होईल.

बक्षिसे: प्रादेशिक विजेत्याला यंदा ६०,००० रुपये मूल्याची गिफ्ट व्हाउचर्स दिली जातील तर उपविजेत्यांना ४०,००० रुपये मूल्याची गिफ्ट व्हाउचर्स दिली जातील. याशिवाय विशेष डिझाइन केलेली ट्रॉफी आणि पदकेही दिली जातील. अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या ६ संघांनाही टीसीएसतर्फे अनेक बक्षिसे दिली जातील. यात जीम बॅग, ब्ल्यूटूथ स्पीकर्ससह मल्टिफंक्शनल म्युझिक टॉर्च, टीसीएस५० पेन ड्राइव्हसह वायरलेस आउटडोअर स्पीकर्स आदींचा समावेश आहे.

ट्विटर कॉण्टेस्ट: प्रत्येक शहरातील प्रादेशिक फेरीमध्ये सर्व स्पर्धकांसाठी एक ट्विटर कॉण्टेस्ट घेतली जाईल. सर्वाधिक ट्विस्ट्स आलेल्या दोन स्पर्धकांना तसेच ‘दिवसातील सर्वोत्तम ट्विट करणाऱ्या’ स्पर्धकाला ब्लूटूथ स्पीकर असलेल्या स्मार्ट म्युझिक फ्लॉवर पॉटसह मल्टिफंक्शनल टॉर्च आणि एलईडी नाइट लाइट अशी बक्षिसे देण्यात येतील.

अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांना यात भाग घेणे सोपे जावे यासाठी प्रादेशिक अंतिम फेऱ्यांचे लाइव्ह वेबकास्ट आयोजण्यात आले आहे. प्रादेशिक फेऱ्यांचे वेब स्ट्रीमिंग: www.tcsitwiz.com वर बघता येईल.

प्रश्नमंजूषेचा भर प्रामुख्याने खालील मुद्दयांवर असेल:

  • विविध उद्योगक्षेत्रांत म्हणजेच तंत्रज्ञान पर्यावरण, व्यवसाय, मनुष्यबळ, नवीन प्रवाह आणि लिजंड्स आदींमध्ये माहिती तंत्रज्ञानाचे उपयोजन
  • माहिती तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव असलेली क्षेत्रे- वेब, शिक्षण, मनोरंजन, पुस्तके, संगीत, चित्रपट, बँकिंग, जाहिरातदारी, क्रीडा, गेमिंग, सोशल मीडिया, मोबाइल फोनचे विश्व.
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्ती- जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक, आयटीचे ब्रॅण्ड्स आणि कम्युनिकेशन कंपन्या, सॉफ्टवेअर उत्पादने आणि ब्रॅण्ड्स, माहिती तंत्रज्ञानाचा इतिहास आणि माहिती तंत्रज्ञानातील विनोदी अंग
  • क्लाउड कम्प्युटिंग, एआय, ऑटोमेशन, बायोमेट्रिक्स, रोबोटिक्स, वर्ल्ड ऑफ इंटरनेट, युनिक वेबसाइट्स, आयटी बझवर्ड्‌स आणि अॅक्रॉनिम्स यांसारखी उदयोन्मुख क्षेत्रे
  • टीसीएसच्या पाच दशकांच्या उत्कृष्ट प्रवासावर आधारित TCS @50

टीसीएस आयटी विझविषयी

टीसीएस आयटी विझ हा १९९९ मध्ये सुरू झालेला एक ‘ज्ञानाधारित उपक्रम’ आहे. आठवी ते बारावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठीची ही भारतातील सर्वांत मोठी आंतरशालेय आयटी क्विझ स्पर्धा आहे. आयटीतील कौशल्यांबद्दल जागरूकता निर्माण करून त्याच्या महत्त्वावर भर देणे तसेच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून बघण्याची क्षमता देणे ही या क्विझची उद्दिष्टे आहेत. आजच्या समाजात आणि अर्थव्यवस्थेत, माहिती तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवून देण्याची क्षमता आयटीमध्ये आहे. कम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान यांना प्रभावी पूरक व्यासपीठ म्हणून ही प्रश्नमंजूषा उपयुक्त आहे. कारण, यातील बहुतेक प्रश्न हे अभ्यासक्रमापलीकडील संशोधन करून काढण्यात आले आहेत. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडे बघण्यास भाग पाडतील. टीसीएस आयटी विझ ही आयटी क्विझिंगच्या क्षेत्रातील पहिलीच स्पर्धा असून, बुद्धिमत्ता व रोचकता यांचा मेळ साधणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून या स्पर्धेने प्रश्नमंजूषेचा चेहरा पालटून टाकला आहे. त्याचबरोबर यात सॉफ्टवेअरवर आधारित फेऱ्यांसारख्या नवीन तंत्रज्ञानात्मक संकल्पना, गेमिफिकेशन आणि अॅनिमेशनचाही समावेश आहे.   तुम्ही आम्हाला ट्विटरवरही फॉलो करू शकता: @TCSITWiz

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडविषयी (टीसीएस)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि व्यवसाय सोल्युशन्स कंपनी असून गेल्या पन्नास वर्षांत कंपनीने जगातील अनेक मोठ्या व्यवसायांशी त्यांच्या रूपांतरणाच्या प्रवासात भागीदारी केली आहे. टीसीएस एक कन्सल्टिंगवर आधारित, आकलनाचा आधार असलेल्या आयटी, व्यवसाय व तंत्रज्ञानात्मक सेवांची एकात्मिक श्रेणी तसेच इंजिनीअरिंग सेवा देऊ करते. या सेवा दिल्या जातात कंपनीच्या अनोख्या स्थान स्वतंत्र वेगवान डिलीव्हरी प्रारूपाच्या माध्यमातून. सॉफ्टवेअर विकासातील सर्वोत्कृष्टतेचा मापदंड म्हणून या प्रारूपाला मान्यता आहे.

भारतातील सर्वांत मोठ्या बहुराष्ट्रीय व्यवसाय समूहाचा, टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएसकडे ४६ देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण लाभलेले ३९४,०००हून अधिक कन्सल्टण्ट्स आहेत.  कंपनीचा ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील एकत्रित महसूल १९.०९ अब्ज डॉलर्स होता. कंपनी भारतातील बीएसई (पूर्वीचा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजः आणि एनएसई (नॅशनल स्टॉक्स एक्स्चेंज) यांच्या सूचीत समाविष्ट आहे. टीसीएसने हवामान बदलाविषयी घेतलेली सक्रिय भूमिका आणि जगभरातील समुदायांसोबत केलेल्या पुरस्कारप्राप्त कामामुळे कंपनीला जगातील अग्रगण्य शाश्वतता सूचींमध्ये स्थान मिळाले आहे. डॉ जोन्स सस्टेनिबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय), एमएससीआय ग्लोबल सस्टेनिबिलिटी इंडेक्स आणि एफटीएसईफॉर गुड इमर्जिंग इंडेक्स या सूचींमध्ये कंपनीला स्थान मिळाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...