पुणे-पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री पुणे शहर पिंजून काढत आहे. बिबवेवाडीतील भेटीत एका महिला मतदाराने भाजपाची विजयाची गुढी उंचच उंच राहो, अशा शुभेच्छा दिल्या. त्यावर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे कृतज्ञता पूर्वक आभार मानले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. महायुतीने पुणे लोकसभेच्या प्रचारात चांगलाच जोर धरला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही विधानसभा निहाय बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या प्रवासादरम्यान बिबवेवाडी येथील माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयास भेट दिली.
यावेळी येथील रहिवासी पौर्णिमा जोशी यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना विजयाची गुढी भेट दिली. तसेच, भाजपाची विजयाची गुढी उंचच उंच राहो अशा शुभेच्छा दिल्या. त्यावर नामदार पाटील यांनी आदर पूर्वक त्याचा स्विकार करुन आभार मानले. यावेळी प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.