पुणे :नैसर्गिक जलस्त्रोत संरक्षित करण्याचा नवा भूजल कायदा -२०१८ सर्वंकष हवा, त्यात नागरिक, संस्थां, कार्यकर्त्यांनी मांडलेली मते सरकारने विचारात घ्यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत दरम्यान करण्यात आली.
शैलेंद्र पटेल (‘जल देवता सेवा अभियान), रवींद्र सिन्हा (भूजल अभियान) आणि दीपक श्रोते (‘रामनदी स्वच्छता अभियान’), ललीत राठी (समग्र नदी परिवार), पुष्कर कुलकर्णी (वसुंधरा स्वच्छता अभियान) या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.
या नव्या कायद्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. संस्था, नागरिक, तज्ज्ञांच्या सूचना मागवल्या आहेत. ३० सप्टेबर २०१८ अंतिम तारीख आहे.
‘आमच्या सूचना सरकारला कळवल्या आहेत. नागरिक, संस्थांनी सूचना पुढील इमेल, पत्त्यावर कळवाव्यात, असेही आवाहन या पत्रकार परिषदेत करण्याात आले. आतापर्यंत पुण्यातून २ हजार सूचना सरकारपर्यंत गेल्या
जल देवता सेवा अभियान- अतिरिक्त मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि जलनिःसारण विभाग महाराष्ट्र राज्य, जी. टी हॉस्पिटल बिल्डिंग, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई -०१, इमेल psec.wssd@maharashtra.gov.in
या बाबत राज्य सरकारची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अजून सुनावणीची प्रक्रिया बाकी आहे.
नवा कायदा सक्षम, परिपूर्ण, सर्वंकष असावा आणि लोकसहभागाच्या दृष्टीने सुलभ असावा, कारण आताच एखादा जलस्त्रोत वाचवायचा झाल्यास सरकारी यंत्रणांकडून त्याचे नकाशे, नोंदी, कागद मिळत नाहीत. जलस्त्रोत वाचवण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नाही.
राम नदी, बावधन झरा, नासिक, आळंदी येथील कुंडातील जलस्त्रोत पुनरुज्ज्वीत करताना आलेल्या अडचणींची माहिती यावेळी देण्यात आली.
पुरातन नैसर्गिक विहिरी, तलाव, ओढे,नाले ,नदी यांच्या नैसर्गिक जागेची लांबी रुंदी नैसर्गिकरित्या अबाधित होत्या, पण कदाचित प्रत्यक्ष जलसाठ्याचे अधोरेखित नकाशे अपूर्ण किंवा उपलब्ध होत नसल्यामुळे म्हणून अतिक्रमण करून जमीन, रास्ता,घर नाहीसे करता आले. त्यामुळे आज पर्यंत जल युक्त शिवार अंतर्गत जनसहभागाने स्वतःचा वेळ व पैसे खर्चून अप्रतिम जलसंसाधनाचे कार्य केले आहे ,ते कार्य पुढच्या पिढीसाठी टिकून संरक्षित राहण्यासाठी त्या कार्याचे जागेचे लांबी रुंदी चे नकाशे सरकारी दप्तरी अधोरेखित करून जनतेसाठी उपलब्ध व्हावेत म्हणजे अतिक्रमण होऊन नामशेष होणार नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले.
अधिक माहिती :
सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार ‘आंतरराष्ट्रीय नदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जलस्त्रोत वाचविण्यात यावे असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. गंगा की अविरलतासाठी १०० दिवसापासून उपोषण करणाऱ्या स्वामी सानंदजींना आपला सहभाग नोंदवण्यासाठी एक दिवसीय मुळा, मुठा, राम नदीवर उपोषण करण्यात येणार आहे.
भारतातील सर्व नदया प्रमाणे आम्ही सुद्धा रामनदी प्रदूषण मुक्त अविरल वाहत राहावी या साठी बावधन येथील रामनदी जवळील विठ्ठल मंदिर व कॉर्पोरेशन शाळेजवळ रविवार दिनांक 30 सप्टेंबर 18 रोजी सकाळी 9 ते 5 एक दिवसीय उपोषण करणार आहोत तरी त्या मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा.
आपल्या पुढच्या पिढीसाठीची रामनदी प्रदूषणमुक्त व अविरल वाहत राहण्यासाठीचा सहभाग म्हणून सर्व नागरिकांच्या सह्या घेतलेला अर्ज मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांना पाठवणार आहोत. तरी कृपया जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि सही करावी, असे आवाहन शैलेंद्र पटेल यांनी यावेळी केले.
उपोषणासाठी सहभागी होऊ इच्छित व्यक्तींनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा. मानव जातीला जिवंत ठेवणारे जलस्रोत जिवंत राहण्यासाठी भूजल मार्ग व पाणलोट क्षेत्राच्या जागा अधि गृहीत करून सुरक्षित ठेवाव्या, असे पटेल यांनी सांगितले.

